News Update

प्रास्ताविक

१८७३ साली जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला होता. ग्रामीण जीवनात खोलवर रुजलेली ही पहिली चळवळ होती. भारतीय शेतकरी कामगार पक्षाला जोतीराव फुले यांच्या या सत्यशोधक समाजाचा वैचारिक वारसा, तसेच महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. जोतीराव फुलेंच्या निधनानंतर दशकभर थंडावलेल्या बहुजनांच्या चळवळीला शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाने पुन्हा चालना मिळाली.

india, coolie, labor

प्रारंभिक कार्ये

शेतकरी कामगार पक्षाला प्रारंभापासूनच शास्त्रीय समाजसत्तावादाची वैचारिक बैठक देऊन शंकरराव मोरेंनी ग्रामीण महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना या पक्षाच्या झेंड्याखाली खेचून आणले. शंकररावांच्या सार्वजनिक जीवनातील तिसऱ्या व सर्वांत तेजस्वी कालखंडाला शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासूनच सुरुवात झाली. शेतकरी कामगार पक्षाची धोरणे सर्वांना समजावी म्हणून कार्यकर्त्यांची वैचारिक बैठक भक्कम करण्यासाठी अनेक अभ्यास वर्गातून व शिबिरातून बौद्धिक वर्ग घेतले.

book, old, cover

ऐतिहासिक लढे

अनेक ऐतिहासिक  लढे शेतकरी कामगार पक्षाने रस्त्यावर व विधिमंडळात लढले. त्यातून महाराष्ट्र सहकार कायदा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी, महिलांना ५० टक्के आरक्षण, प्राथमिक शाळा स्थापना, कापूस एकाधिकार योजना, शेतमाल हमीभाव कायदा यासारख्या अनेक कायद्यांची व तरतुदींची निर्मिती महाराष्ट्र सरकारला करावी लागली आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार नोकरदारांच्या हक्कांसाठी शेकापचा लाल बावटा खांद्यावर घेऊन  लढा उभा करण्याचा  निर्धार आहे.

01

विधानसभा सदस्य

02

विधान परिषद सदस्य

जिल्हा परिषद

रायगड जिल्हा परिषद शेकापची सत्ता: नांदेड, सोलापूर, नाशिक, परभणी, नागपूर या ५ जिल्हा परिषदांमध्ये पक्षाचे सदस्य

पंचायत समिती

पेण, पनवेल, अलिबाग, सांगोला पंचायत समितीवर शेकापची सत्ता

नगरपरिषद

अलिबाग, काटोल,बिलोली, इत्यादी नगरपरिषद शेकापच्या वर्चस्वाखाली, तसेच खोपोली, पनवेलमध्ये पक्षाचे नगरसेवक

News Media