शेकापचा ७३ वा वर्धापन दिवस राज्यभरात उत्साहात साजरा

शेकापचा ७३ वा वर्धापन दिवस राज्यभरात उत्साहात साजरा

पुन्हा नव्या जोमाने पक्ष संघटना बळकट करण्याचा भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केला आशावाद

शेतकरी कामगार पक्ष – ७३ वा वर्धापनदिन

लाल सलाम… लाल सलाम… लाल सलाम… शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबाग येथील मुख्य कार्यालयात पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून पक्षाचा ७३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

Gepostet von Chitra Aswad Patil am Sonntag, 2. August 2020

 

अलिबाग: रायगडसह संपूर्ण राज्यभरात रविवारी शेतकरी कामगार पक्षाचा ७३ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत मी आता ६५ वर्षाचा झालोय,तरीही मी थकलेलो नाही, मी मरगळलेलो नाही,नव्या उमेदीने,नव्या जोशाने पुन्हा शेकाप उभारणीसाठी प्रयत्न करतोय,नव्या पिढीनंही आपले योगदान द्यावे,असे भावनिक आवाहन केले.

या कार्यक्रमाला जिल्हा चिटणीस ऍड,आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, पं.स.सभापती प्रमोद ठाकूर, तालुका चिटणीस अनिल पाटील, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे,सर्व नगरसेवक,जिल्हा कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, जि.प.सदस्या चित्रा पाटील, माजी.जि.प.सदस्य संजय पाटील, ऍड.प्रसाद पाटील, माजी उपसभापती प्रकाश पाटील, शैला पाटील,पालिका बांधकाम सभापती ऍड.गौतम पाटील, शहर चिटणीस अशोक प्रधान, माजी नगराध्यक्ष सतिश प्रधान,नागेश कुळकर्णी,यतिन घरत यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन मशाल प्रज्वलित करण्यात आली.त्यानंतर ध्वजाला मानवंदना देण्यात आली.राष्ट्गीतानंतर आमदार जयंत पाटील यांनी लाल बावटे की जय ,अशा घोषणाही दिल्या.

अलिबाग येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून राज्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आमदार जयंत पाटील यांनी स्थापनेपासूनच पक्ष कामगिरीची आढावा घेतला. गेल्या काही काळात वैधानिक आघाडीवर आपल्या पक्षाची पिछेहाट झाली आहे. त्यावर मात करुन आपले पक्ष संघटन विस्तारण्याच्या कामाला आग्रक्रम देऊन कामाला लागूया. परिक्षेचे कितीतरी प्रसंग आले तरी विजयासाठी जीवाचे रान करु या पक्ष संघटनेत आणि पक्ष संघटनेच्या कामाला लागूया,असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी त्यांनी राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थिती,कोरोनाची आलेली साथ,रायगडसह संपूर्ण कोकणाला बसलेला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा यांचाही सविस्तर आढावा घेतला.

निसर्ग चक्रीवादळात रायगडसह कोकणाचे अपरिमित असे नुकसान झालेलेे आहे.त्यातून येथील जनतेला सावरण्यासाठी आता राज्यातील जनतेेने पुढे येण्याची गरज आहे,असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले.राज्यात ज्या ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती आल्या,मग ती जलप्रलय असो वा भूकंप अशावेळी कोकणा माणसाने त्या आपदग्रस्तांसाठी आपल्या परीने भरीव सहकार्य,मदत केली आहे.त्यातून उतराई होण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेनेही कोकणवासियांना मदत करावी,असे आवाहनही त्यांनी केले.

कोविड साथीत शेकापचे योगदान

राज्यात कोविडची महाभयंकर अशी साथ पसरली आहे.त्यातून सावरण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे आपापल्या परीने कामगिरी करीत आहेत.एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून शेकापनेही मदतीचा वाटा उचलला आहे.पक्षाचे असंख्य कार्यकर्ते,नेते स्वताचा जीव धोक्यात घालून कोविड साथीत सर्वसामान्यांना मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.काही कार्यकर्त्यांना या साथीची बाधाही झालेली आहे.तर अनेकांना जीवही गमवावा लागला आहे.त्यांचे योगदान पक्षाचा सरचिटणीस म्हणून मी कदापि विसरु शकत नाही.त्यांचा आम्हाला निश्‍चितच अभिमान वाटत आलेला आहे,असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

सरकारला सर्वतोपरी सहकार्य

यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या कामगिरीवरीह समाधान व्यक्त केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या प्रकारे काम करीत असल्याचा दावाही त्यांनी केला.अशा कठीण प्रसंगी राजकारण न करता आम्ही एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून सहकार्य करीत असल्याचीही ग्वाहीही त्यांनी दिली.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *