डॉ.आ.ह. साळुंखे यांना “महाराष्ट्र भूषण” सन्मान मिळण्याकरीता पाठपुरावा करणार : आमदार भाई जयंत पाटील

डॉ.आ.ह. साळुंखे यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार मिळण्यासाठी पाठपुरावा करणार : आमदार भाई जयंत पाटील भाई राहुल पोकळेंच्या मागणीची घेतली दखल पुणे ( २८ ऑक्टोबर) : डॉ.आ.ह. साळुंखे हे साहित्य क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. आजपर्यंत त्यांनी साधारण ५५ पुस्तके लिहीलेली आहे व त्यांच्या साहित्यावर अनेकांनी पुस्तके लिहीली पीएचडी मिळवलेली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना शासनाचा “महाराष्ट्र भूषण” हा सन्मान मिळावा यासाठी आपण पुरेपूर पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आमदार भाई जयंत पाटील यांनी दिले. भाई जयंत पाटील पुणे येथे आले असता, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहुल पोकळे…

कोट्यवधींच्या निधी मंजूरी नंतरही नळयोजना कशी काय रखडली ?

शेकाप नेते, माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांचा सवाल रोहा, रायगड (२८ ऑक्टोबर): धाटाव औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्यामुळे कुंडलिकेच्या दोन्ही तीरावरील गावांचे पाण्याचे स्रोत दूषित झाल्याने २६ गावातील नागरिकांसाठी नळपाणी योजना राबविण्यात आली आहे. या योजनेतील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहचावे यासाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार भाई पंडित पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे पाठपुरावा करून साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच निधी मंजूर करूनदेखील अद्याप कामाला सुरुवात का नाही, असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार भाई पंडीत पाटील यांनी उपस्थित केला असून येत्या १५ दिवसात सदर कामाला सुरुवात झाली नाही…

शेतकरी व कामगार विरोधी कायद्याना विरोध करण्यासाठी शेतकरी व कामगार संघटनांनी एकत्र यावे – आमदार भाई जयंत पाटील

२६ नोव्हेंबरला भारत बंदची हाक | पुणे | प्रतिनिधी | पुणे येथे आज २८ ऑक्टोंबर रोजी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती बैठक पार पडली. देशातील २५० पेक्षा जास्त शेतकरी संघटनांची एकजूट असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या इकाईचे गठन करत आपल्या राज्यातही लढा देण्याचे निश्चित झाले आहे. केंद्र सरकारने हुकुमशाही पध्दतीने शेतकऱ्यावर लादलेल्या चार कायद्यांना स्पष्ट विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनाची आज पुणे येथे बैठक पार पडली. दिनांक २६ व २७ नोव्हेंबर २०२० रोजी होणाऱ्या देशव्यापी कार्यक्रमाचे आज नियोजन करण्यात आले. महाराष्ट्रात शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करत आंदोलनाची दिशा ठरविण्यात…

कापूस खरेदी तात्काळ सुरू करा : अन्यथा शेकाप जिल्हाभरात तीव्र आंदोलन करणार

कापूस खरेदी तात्काळ सुरू करा : अन्यथा शेकाप जिल्हाभरात तीव्र आंदोलन करणार भाई ॲड.नारायण गोरे यांचा इशारा माजलगाव,बीड ( २७ ऑक्टोबर): परतीच्या पावसाने निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाने शेतकरी हवालदिल झालेला असून थोडाफार शिल्लक राहिलेला कापूस विक्री करण्यासाठी शासनाची कोणतीही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने, शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत असून खाजगी व्यापारी शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात लूट करीत आहेत.त्यामुळे शासनाने तात्काळ शासकीय कापूस खरेदी सुरू करावी,अन्यथा शेतकरी कामगार पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य मध्यवर्ती सदस्य भाई ॲड. नारायण गोले पाटील यांनी दिले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने माजलगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना…

रावण दहनाची प्रथा बंद करा : भाई रामदास जराते यांचे आवाहन

  गडचिरोली(२५ ऑक्टोबर): राजा रावण हे संपूर्ण आदिवासी समाजाचे दैवत आणि आदर्श आहेत त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करुन आदिवासी समाजाच्या भावना दुखावण्याचे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी यापुढे करु नये, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले. धानोरा तालुक्यातील परसवाडी येथील रावण मंदिर येथे मुळनिवासी कोया वंशीय,महान ज्ञानी पंडित, आदिवासी राजा रावण यांचे पुजन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते हस्ते अत्यंत साधेपणाने आणि शारीरिक अंतर ठेवून करण्यात आले.यावेळी पुरोगामी युवक संघटना…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बोंब मारो आंदोलन : शेतकरी कामगार पक्ष आक्रमक

दुष्काळासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बोंबमारो आंदोलन शेतकरी कामगार पक्ष आक्रमक : प्रशासनाचा केला निषेध बीड (२३ ऑक्टोबर):- बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या, मागील वर्षाचे एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना बिल वाटप करा कापसाला आठ हजार रुपये भाव द्या, डीसीसी बँक एकदिन प्रलंबित पिक कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करा, बीड जिल्ह्यामध्ये सरसकट पिक विमा लागू करा यासह शेतकऱ्याच्या इतर हे प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेकापचे भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने व बोंब मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार बोंममारो…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या: भाई जयंत पाटील

  परतीच्या पावसाने कोकणासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान मुंबई( १७ ऑक्टोबर ): परतीच्या पावसाने कोकणासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकर्‍यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली. गेल्या ३ ते ४दिवसांपासून परतीच्या पावसाने कोकणासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजविला. शेतकर्‍यांचे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीसाठी राज्य सरकारला गळ घालत आहेत. शेतकर्‍यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतीय. राज्यशासनाने पंचनाम्याचे आदेश…

नीट परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड वेबसाईटवर पुन्हा सुरु करा : भाई राहुल पोकळे यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

नीट परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड वेबसाईटवर पुन्हा सुरु करा : भाई राहुल पोकळे यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे मागणीपुणे (१७ आक्टोंबर) : NEET विद्यार्थीना विना परीक्षा बैठक क्रमांक सदर परिक्षेच्या निकालाची प्रत प्रिंट काढता येत नसल्याने प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहुल पोकळे यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. भाई राहुल पोकळे यांनी म्हटले आहे की, आज नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन सदर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यास रोल नंबर आवश्यक आहे. पण नीट परीक्षा दि.१३ सप्टेंबर २०२०…

ओला दुष्काळ जाहीर करा : शेकाप नेते माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांची मागणी

ओला दुष्काळ जाहीर करा : शेकाप नेते माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांची मागणी श्रीवर्धन (१६ ऑक्टोबर) : कोकणातील शेतकऱ्यांना पुढील वर्षभर शासनाने मोफत धान्य द्यावे, शेतकऱ्यांना मोफत वा सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध करून द्यावे. शंभर युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे यासारख्या मागण्या मांडत माजी आमदार पंडितशेट पाटील यांनी कोकणात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांनी केली आहे. माजी आमदार भाई पंडितशेट पाटील यांनी श्रीवर्धन भागात परतीच्या प्रवासाने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर संपूर्ण कोकणात मोठी नुकसान झालेली असल्याने सरकारकडे ही मागणी केलेली आहे. पत्रकारांशी बोलताना ते…

कर्जदारांकडून बळजबरीने वसूल केलेली रक्कम परत : शेतकरी कामगार पक्षाच्या दणक्याने बजाज फायनान्स नमले

कर्जदारांकडून बळजबरीने वसूल केलेली रक्कम परत : शेतकरी कामगार पक्षाच्या दणक्याने बजाज फायनान्स नमले पुणे (१६ ऑक्टोबर):लाॅकडावून च्या काळात बजाज फायनान्सने कर्जदारांच्या बँक खात्यातून ७ ते ८ हजार रुपये बळजबरीने बाऊन्सिंग चार्ज वसुल केले होते.शेतकरी कामगार पक्षाच्या दणक्यानंतर सदर चार्ज कर्जदारांना परत करणे सुरू केले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे पुणे शहर चिटणीस (अध्यक्ष) सागर आल्हाट यांच्याकडे शहरातील अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारी केलेल्या असल्याने पुण्याच्या विमाननगर येथील बजाज फायनान्स कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ८ ऑक्टोबर रोजी शेतकरी कामगार पक्षातर्फे कायदेशीर दणका देत निवेदन देऊन समज देण्यात आली होती. सदर निवेदनातील मागणीवर कारवाई करीत काल बजाज फायनान्स कंपनीने…