कर्जदारांकडून बळजबरीने वसूल केलेली रक्कम परत : शेतकरी कामगार पक्षाच्या दणक्याने बजाज फायनान्स नमले

कर्जदारांकडून बळजबरीने वसूल केलेली रक्कम परत

: शेतकरी कामगार पक्षाच्या दणक्याने बजाज फायनान्स नमले

पुणे (१६ ऑक्टोबर):लाॅकडावून च्या काळात बजाज फायनान्सने कर्जदारांच्या बँक खात्यातून ७ ते ८ हजार रुपये बळजबरीने बाऊन्सिंग चार्ज वसुल केले होते.शेतकरी कामगार पक्षाच्या दणक्यानंतर सदर चार्ज कर्जदारांना परत करणे सुरू केले आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे पुणे शहर चिटणीस (अध्यक्ष) सागर आल्हाट यांच्याकडे शहरातील अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारी केलेल्या असल्याने पुण्याच्या विमाननगर येथील बजाज फायनान्स कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ८ ऑक्टोबर रोजी शेतकरी कामगार पक्षातर्फे कायदेशीर दणका देत निवेदन देऊन समज देण्यात आली होती.

सदर निवेदनातील मागणीवर कारवाई करीत काल बजाज फायनान्स कंपनीने जे लाॅकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येक महिन्यात ३ते ४ वेळा बेकायदेशीर चेक/ECS लावून जे कर्जदारांच्या बँक खात्यात बाऊन्सिंग चार्ज सात ते आठ हजार रुपये लावले होते,ते सात ते आठ हजार रुपये बाऊन्सिंग चार्ज पुन्हा कर्जदारांच्या बँक खात्यात रिफंड करण्यात आले आहे.

बजाज फायनान्स कंपनीने सरकारच्या आदेशानंतरही आपला मनमानी कारभार करीत कर्जदारांची सुरु केलेली लूट थांबविल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे पुणे शहर चिटणीस (अध्यक्ष) भाई सागर आल्हाट आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत असून अन्यायग्रस्त कर्जदारांनी न्याय मिळवून दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *