शेतकरी व कामगार विरोधी कायद्याना विरोध करण्यासाठी शेतकरी व कामगार संघटनांनी एकत्र यावे – आमदार भाई जयंत पाटील

२६ नोव्हेंबरला भारत बंदची हाक

| पुणे | प्रतिनिधी |

पुणे येथे आज २८ ऑक्टोंबर रोजी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती बैठक पार पडली. देशातील २५० पेक्षा जास्त शेतकरी संघटनांची एकजूट असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या इकाईचे गठन करत आपल्या राज्यातही लढा देण्याचे निश्चित झाले आहे. केंद्र सरकारने हुकुमशाही पध्दतीने शेतकऱ्यावर लादलेल्या चार कायद्यांना स्पष्ट विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनाची आज पुणे येथे बैठक पार पडली.

दिनांक २६ व २७ नोव्हेंबर २०२० रोजी होणाऱ्या देशव्यापी कार्यक्रमाचे आज नियोजन करण्यात आले. महाराष्ट्रात शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करत आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली.

२६ नोव्हेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्रात ठीक ठिकाणी बैठका होत आहेत, १८ नोव्हेंबरला अलिबाग येथे पुढील बैठक पार पडणार आहे,असे आमदार भाई जयंत पाटील यांनी सांगितले. या वेळी मा.खा राजू शेट्टी, कॉ. डॉ. अशोक ढवळे, कॉ. बाबा आढाव, प्रतिभा शिंदे, भाई ॲड.राजेंद्र कोरडे, भाई राहुल पोकळे, किशोर ढमाले, भाई चंद्रशेखर पाटील, भाई मोहन गुंड,भाई संपतराव पाटील, भाई सागर आल्हाट, भाई नितीन बनसोडे,भाई नाशेर शेख,भाई ॲड.संदेश पवार,भाई ॲड.संग्राम तुपे,भाई ॲड.नारायण गोले पाटील,भाई दत्ता प्रभाळे,भाई भीमराव कुठे,भाई अर्जुन सोनावणे आदी उपस्थित होते.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *