अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आक्रमक : अन्यायकारक कृषी विधेयके रद्द करण्यासाठी केला चक्काजाम

कोल्हापूर/पुणे (६ नोव्हेंबर) : केंद्र सरकारने  बहुमताच्या जोरावर    संमत केलेले कृषी विधेेयक शेतकरी व कामगार विरोधी असून पारंपारिक कृषी अर्थव्यवस्था  उध्वस्त करणारे आहेत हे कायदे रद्द करावेत  या  मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी कोल्हापूर, पुण्यासह विविध ठिकाणी रास्ता रोको,चक्काजाम, निदर्शने करण्यात आले.

कोल्हापुर-राधानगरी मार्गावर हळदी ता.करवीर येथील शिवाजी चौकात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आयोजित केलेल्या देशव्यापी    चक्काजाम आंदोलन करून सुमारे एक तास वाहतुक रोखुन धरली. यावेळी मोदी  सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

राधानगरी कोल्हापूर
राधानगरी कोल्हापूर

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा माजी आमदार भाई संपत बापू पवार म्हणाले, नवीन कृषी कायद्यामुळे शेती भांडवलदार व उद्योगपतींच्या हातात जाईल याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो शासनाची धोरणे ग्रामीण भाग व शेतकरी विरोधी असून शेतकरीविरोधी असून अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत करावी भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केरबा पाटील म्हणाले नवे धोरण शेतकऱ्यांना निराधार बनवणारे आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जनार्दन पाटील म्हणाले केंद्र सरकार शेतकऱ्यांनाही औद्योगिक पद्धतीचा वीज दर लावून देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर यांनी प्रास्ताविकात केंद्र सरकार उद्योगपती साठी काम करत आहे असे सांगितले यावेळी कोल्हापुर राधानगरी मार्गावर एकतास चक्काजाम करण्यात आंदोलन करण्यात आल्याने कोल्हापूर राधानगरी रोडवर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

बांबवडे
बांबवडे

यावेळी सचिन पाटील अमित कांबळे गोविंद मेटील, शामराव चौगले, संजय जाधव डी के पाटील अक्षय पवार पाटील नंदू पाटील नामदेव पाटील भगवान पाटील श्रीकांत चव्हाण  उपस्थित होते.

बांबवडे येथे शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समीती सदस्य भाई भारत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात येवून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सदर कृषी विधेयके रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

 

पुणे - बंगलोर
पुणे – बंगलोर

पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी व संघटनांचा चक्काजाम करण्यात आला.आंदोलनादरम्यान महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलीस व कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली.त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

पुणे जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. पुणे शहरात व पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सक्रिय असलेल्या अनेक संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकरी, स्त्रिया आणि पुरुष यांच्या सोबतच शहरी व ग्रामीण, अंगमेहनत करणारे विविध कष्टकरी आणि तरुण विद्यार्थी यांचा मोठा सहभाग होता.

आंदोलकांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारने बळजबरी पारीत केलेल्या कायद्यांचा निषेध केला. त्यानंतर सदर अन्यायकारक कृषी विधेयके तात्काळ रद्द करण्यात यावेत या मागणीचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, पुणे जिल्ह्याच्या वतीने देण्यात आले.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहूल पोकळे,सागर आल्हाट,मा.नगरसेवक भैरू चौगले,शहर प्रवक्ते धनंजय सुतकर, काशिनाथ शिंदे, पर्वती विधानसभा मतदारसंघ महिला अध्यक्षा ज्योती विर,कांचन ढावरे,मिरा तुपेरे,भाग्यश्वर गवेकर,विजय हुलवान, संतोष जानकर, निलेश शिंदे,प्रसाद पोकळे,अमोल मानकर,बाबा पातुळकर,संजय गवळी, दादासाहेब पोकळे,विद्याधर थोपटे, आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *