नुकसान भरपाई टाळण्यासाठी प्रशासनाने केली बोगस आणेवारी जाहीर : शेतकरी कामगार पक्षाचा आरोप

गडचिरोली (३० डिसेंबर) : २०२०-२१ या वर्षाची खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर केली असून, जिल्ह्यातील उत्पन्नाची सरासरी पैसेवारी ०.६३ एवढी आहे. सुमारे १३३७ गावांची पैसेवारी ५० पैशाहून अधिक आहे,असे जिल्हा प्रशासनाने आज जाहीर केलेले असून महापूर आणि मावा,करपा, तुडतुडा यासारख्या रोगांनी धान पीकांना जबरी फटका बसून शेतकऱ्यांची मोठी नुकसान झालेली असतांनाही ५० पैशांपेक्षा अधिकची आणेवारी जाहीर करुन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नागविण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केला आहे. भाई रामदास जराते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ऑगस्ट महिन्यात…

८ डिसेंबरचा भारत बंद उत्स्फूर्तपणे यशस्वी करा : भाई जयंत पाटील यांचे आवाहन

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचा शेकापचा भक्कम निर्धार मुंबई (६ डिसेंबर): केंद्र सरकारच्या शेतकरी कामगार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीत घेराव आंदोलन सुरू आहे. सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकरी शिष्टमंडळांसोबतच्या अद्यापपर्यंतच्या सर्व बैठका व वाटाघाटी निष्फळ ठरल्या आहेत. या आंदोलनकारी शेतकऱ्यांनी सरकारच्या अनास्थेविरोधात ८ डिसेंबर २०२० रोजी ‘भारत बंद’ची हाक दिलेली असल्याने राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी,कामगार आणि सामान्य जनतेने हा ‘भारत बंद’ यशस्वी करावा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केले आहे. भाई जयंत पाटील यांनी म्हटले आहे की,केंद्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात बदल, आवश्यक…

अन्यायकारक कृषी विधेयके राज्यात लागू करु नका: आमदार भाई जयंत पाटील

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षातर्फे मागणी मुंबई (३ डिसेंबर): मोदी सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कोणतीही चर्चा न करता तीन शेती आणि चार कामगार विरोधी विधेयके संसदीय संकेतांची पायमल्ली करून बळजबरी पारीत केले आहेत.त्याला देशभरातील शेतकरी आणि कामगार कडाडून विरोध करीत आहेत.त्यामुळे राज्य सरकारने ही विधेयके राज्यात लागू करु नये, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज विधानभवनात झालेल्या बैठकीत आमदार भाई जयंत पाटील यांनी ही मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. विधानभवन परिसरात पत्रकारांशी याबाबत बोलतांना आमदार भाई…