८ डिसेंबरचा भारत बंद उत्स्फूर्तपणे यशस्वी करा : भाई जयंत पाटील यांचे आवाहन

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचा शेकापचा भक्कम निर्धार

मुंबई (६ डिसेंबर): केंद्र सरकारच्या शेतकरी कामगार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीत घेराव आंदोलन सुरू आहे. सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे शेतकरी शिष्टमंडळांसोबतच्या अद्यापपर्यंतच्या सर्व बैठका व वाटाघाटी निष्फळ ठरल्या आहेत. या आंदोलनकारी शेतकऱ्यांनी सरकारच्या अनास्थेविरोधात ८ डिसेंबर २०२० रोजी ‘भारत बंद’ची हाक दिलेली असल्याने राज्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी,कामगार आणि सामान्य जनतेने हा ‘भारत बंद’ यशस्वी करावा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केले आहे.

भाई जयंत पाटील यांनी म्हटले आहे की,केंद्र सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात बदल, आवश्यक वस्तू कायद्यात बदल आणि कंत्राटी शेती अशी ३ कृषीविरोधी विधेयके, आणि विद्यमान कामगार कायदे निरस्त करून ४ कामगार विरोधी श्रम संहिता (Labour Code) मंजूर केल्या आहेत. तसेच केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या वीज विधेयकात, शेतकरी आणि इतर निवासी ग्राहकांची सवलत रद्द करून सर्वांना समान दर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारची ही सर्व विधेयके शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या विरोधातील असून त्यांचे जीवन उध्वस्त करणारी आहेत.

केंद्र सरकारच्या शेतकरी कामगार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांचे राजधानी दिल्लीत घेराव आंदोलन सुरू आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांचे बाबतीत अक्षम्य अनास्था दाखवीत आहे . सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी शिष्टमंडळांसोबतच्या अद्यापपर्यंतच्या सर्व बैठका व वाटाघाटी निष्फळ ठरल्या आहेत. या आंदोलनकारी शेतकऱ्यांनी सरकारच्या अनास्थेविरोधात ८ डिसेंबर २०२० रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकरी कामगार पक्ष हा दिल्लीतील आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या सोबत असून पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि सामान्य जनतेने हा ‘भारत बंद’ यशस्वी करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांच्या या हाकेला देशभरातील जनतेने प्रतिसाद देवून हा भारत बंद उत्स्फूर्तपणे यशस्वी करावा असे आवाहनही भाई जयंत पाटील यांनी केले आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *