पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींना देणार पोर्टेबल ऑक्सीजन कॅन

शेकाप नेते भाई प्रितम जनार्दन म्हात्रे यांचा पुढाकार पनवेल (३०एप्रिल) : गेले काही दिवस पनवेल च्या ग्रामीण भागात आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सदर रुग्णांना दवाखान्यात पोहचून उपचार सुरू होईपर्यंतच्या काळात ऑक्सिजन शिवाय रुग्णांच्या जिवीतास धोका होऊ नये यासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींना पोर्टेबल ऑक्सिजन कॅन मोफत पुरविण्याचा उपक्रम शेतकरी कामगार पक्षाचे नेते, पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते भाई प्रितम म्हात्रे यांनी सुरू केला आहे. कोविड रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची क्षमता कमी झाल्यामुळे बऱ्याचशा पेशंटना वेळेवर ऑक्सीजन बेड उपलब्ध न झाल्यामुळे व्यक्ती दगावण्याची च्या घटना घडल्या. अशा घटना समजल्यावर मन…

वैदिकांनी गौण बनविलेला बहुजनांचा महान नायक “मारुती”

‘मारुति’ हा शब्द ‘मरुत्’ या शब्दापासून बनला आहे. मरुताचा पुत्र तो ‘मारुति’ होय. मरुताचे वंशापत्य, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. याचा अर्थ मारुती हा मरुताचा पुत्र वा मरुताच्या वंशात जन्माला आलेला पुरुष ठरतो. मारुतीचा मरुताशी जवळचा संबंध आहे. हे यावरून स्पष्ट होते. मरुत् हा केवळ एक पुरुष नसून तो अनेक जणांचा गण होता. त्यामुळेच ‘मरुत्’ हा शब्द वैदिक वाङ्मयात बहुतेक वेळा बहुवचनात वापरला जातो. मरुतांविषयी वैदिक ग्रंथांनी केलेले काही निर्देश आधी उद्धृत करावेत आणि मग त्यांच्या संबंधी काही विवेचन करावे, असे माझ्या मनात आहे. या मरुतांच्या संदर्भात वैदिक ग्रंथांनी घेतलेली एक भूमिका आपल्या दृष्टीने खूप…

लेनिन नावाचा अजरामर माणूस..

  लेनिन… जगाने अनुभवलेलं एक बिलोरी स्वप्न… व्यवस्थेच्या मुळावर घाव घालून रशियात समाजवादाचा बीज पेरणारा हाडाचा क्रांतिकारक. क्रांतीच्या स्वप्नांना मेहनतीचे पंख जोडून परिवर्तनाची पहाट आणणारा उगवत्या जगातील लाल सूर्य. विषमतेविरुद्ध लढणाऱ्या जगाच्या कानाकोपऱ्यातील सच्च्या कार्यकर्त्यांच्या हृदयातील स्फुर्तीचा जिवंत झरा. सबंध जगावर आपल्या निस्सीम कर्तृत्वाने छाप पाडणारा एक मोठा माणूस. मृत्यूच्या 96 वर्षानंतरही ज्याच्या प्रेताच्या दर्शनासाठी रोज रांगा लागतात असा लोकप्रियतेचे शिखर गाठलेला रशियाचा अजरामर राष्ट्राध्यक्ष म्हणजे ब्लादिमीर लेनिन. 22 एप्रिल 1870 ला व्होल्गा नदीच्या किनाऱ्यावरील सिम्बीस्क्र गावात एका शिक्षकाच्या पोटी सुसंस्कृत आणि सुखी कुटुंबात लेनिनचा जन्म झाला. सहा भावंडांतील लेनिन हे तिसरे अपत्य होतं. शालेय…

“मार्क्सवाद संपला आहे ?”

गेली अनेक दशकं हे पुनःपुन्हा ओरडून सांगितलं जातं आहे.एक साधा प्रश्न आहे, जर तो खरंच संपला असेल तर हे पुनःपुन्हा ओरडून सांगायची गरज का वाटते?कारण यामागं दडली असते एक भीती, जी प्रस्थापित वर्गाला आतून सतत पोखरत असते.या भांडवली जगात जगण्याची जणू जीवघेणी स्पर्धाच लागली आहे, प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीत इतरांना मागे टाकण्यासाठी धावतो आहे. त्यामुळे तो इतरांपासून सतत दुरावला जातो आहे. त्याला हवं असणारं आयुष्य तो जगू शकत नाही आहे आणि तो जे जगतो आहे ते त्याला नको आहे यामुळे तो स्वतः पासून देखील दुरावला जातो आहे. इतरांना दाखवताना सगळं काही आलबेल असल्याचा मुखवटा पण प्रत्यक्ष…

भाजीपाल्यासह फळाचे बीट चालू न केल्यास शेकाप आसुड आंदोलन करणार

कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाल्यासह फळांची खरेदी करावी : भाई अँड.नारायण गोले पाटील यांची मागणी माजलगाव ( प्रतिनिधी ) : मराठवाड्यातील नावाजलेली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकीक देखील आहे. या वर्षी माजलगाव तालुक्यातील शेतकन्यांनी भाजीपाला,फळे ( मेथी चुका पालक,गोबी वांगे कांदे.लसुन,कोथींबीर, भेंडी,गवार,कारले, दोडके व टरबुज पपई मोसंबी.लींबु,खरबुज ) आदींची प्रचंड प्रमाणात लागवड केलेली असुन त्यास लाखो रुपये खर्च करुन भाजीपाला व फळे पिकवले आहेत, परंतु माजलगाव बाजार समीती केवळ शेतकऱ्यांची सोयाबीन तुर बाजरी,गहु ,ज्वारी हरभरे हे कडधान्ये खरेदी करुन उर्वरीत पिकांना खरेदी करण्यास जाणीवपुर्वक टाळत आहेत.सदरची खरेदी तात्काळ सुरू…

स्वाभिमानीच्या सचिन अरुण शिंदे यांना शेकापचा पाठिंबा

पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणूकीतून महाराष्ट्रात स्वतंत्र पुरोगामी पर्याय मजबूत करणार सोलापूर (९ एप्रिल): पंढरपूर – मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीतून महाराष्ट्रात स्वतंत्र पुरोगामी पर्याय मजबूत करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनातील सक्रीय कार्यकर्ते सचिन अरुण शिंदे यांना शेतकरी कामगार पक्षातर्फे आज भक्कम पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आणि भाई गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्रात स्वतंत्र पुरोगामी पर्याय मजबूत होण्यासाठी हा पाठिंबा स्वाभिमानीच्या सचिन शिंदे यांना जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत राहुन भांडवलदारधार्जिण्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षासह स्वाभीमानी शेतकरी संघटना व इतर पक्षांनी प्रयत्नांची पराकाष्ठा…

पुण्यातील परिस्थिती भयावह : अजित पवारांनी राजीनामा द्यावा

खजिनदार भाई राहुल पोकळे यांची मागणी पुणे (९ एप्रिल) : पुणे जिल्ह्यात कोविड १९ विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखांवर पोहचलेली असून संपूर्ण जिल्हाभरात कोणत्याही ठिकाणी रुग्णांकरीता बेड उपलब्ध नाहीत.ही परिस्थिती भयावह असून याला जबाबदार सत्ताधारी असून जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि पुण्याचे महापौर मुर्लिधर मोहोळ यांनी या नाकर्तेपणा करीता तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहुल पोकळे यांनी केली आहे. भाई राहुल पोकळे यांनी म्हटले आहे की, राज्यातील आघाडी सरकारने दुर्लक्ष तर केंद्रातील मोदी सरकारने सापत्न पणाची वागणूक दिल्याने पुणे शहरासह जिल्ह्यात…