भाजीपाल्यासह फळाचे बीट चालू न केल्यास शेकाप आसुड आंदोलन करणार

कृषी उत्पन्न बाजार समितीने भाजीपाल्यासह फळांची खरेदी करावी : भाई अँड.नारायण गोले पाटील यांची मागणी

माजलगाव ( प्रतिनिधी ) : मराठवाड्यातील नावाजलेली कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकीक देखील आहे. या वर्षी माजलगाव तालुक्यातील शेतकन्यांनी भाजीपाला,फळे ( मेथी चुका पालक,गोबी वांगे कांदे.लसुन,कोथींबीर, भेंडी,गवार,कारले, दोडके व टरबुज पपई मोसंबी.लींबु,खरबुज ) आदींची प्रचंड प्रमाणात लागवड केलेली असुन त्यास लाखो रुपये खर्च करुन भाजीपाला व फळे पिकवले आहेत, परंतु माजलगाव बाजार समीती केवळ शेतकऱ्यांची सोयाबीन तुर बाजरी,गहु ,ज्वारी हरभरे हे कडधान्ये खरेदी करुन उर्वरीत पिकांना खरेदी करण्यास जाणीवपुर्वक टाळत आहेत.सदरची खरेदी तात्काळ सुरू करण्यात आली नसल्याच्या निषेधार्थ आसुड आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड.नारायण गोलेपाटिल यांनी दिला आहे.

भाई ॲड.नारायण गोलेपाटिल यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे कवडी मोल किमतीत भाजीपाला व फळे खाजगी व्यापाऱ्यांना विक्री करावी लागत आहेत. त्यामुळे शेतकरी पुर्णतः कोलमडुन गेला असुन तो आर्थीक दृष्ट्या हतबल झाला आहे. त्यातुन अनेक शेतकऱ्यानी भाजीपाला – फळबागा या शहरात नेऊन खाजगी व्यापाऱ्यांना विक्री करने तोट्याचे अडचणीचे होत असल्याने व सध्या कोविड १९ च्या लॉकडाऊन मुळे आवश्यक वाहतुक उपलब्धनसल्यामुळे भाजीपाल्यात व फळबागेत शेळ्या मेंढ्या,गुरेढोरे यांना सोडुन पुर्ण पिके उदवस्त केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लाखो रुपयांचा खर्च देखील न मिळाल्यामुळे अनेक खाजगी सावकारांचे उतरवठे झिजवत आहेत. तर काही शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत . परंतु शासनाचे प्रतिनिधी असनारे पालकमंत्री, आमदार,खासदार व बाजार समीतीतील पदाधीकारी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करुन शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवत असल्याची टिकाही त्यांनी केली आहे.

कोरोनासारख्या जागतीक महामारीच्या संकटाचा सामना करताना शेतकरी शेतमजुर युवक, विद्यार्थी हे आर्थीक संकटात सापडले असतांना शेतकऱ्यांचा हक्काचा भाजीपाला व फळे रस्त्यावर फेकुन द्यायला शासन व शासनाचे जवाबदार प्रतीनीधी भाग पाडत आहेत त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.करीता माजलगाव बाजार समीतीने शेतकऱ्यांचा भाजीपाला व फळे यांची बाजारपेठ निर्माण करुन तात्काळ खरेदी व विक्री करुन शेतकर्याच्या पिकवलेल्या भाजीपाला व फळांची जबबदारीने व हमीभावात तात्काळ खरेदी सुरु करावी.अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतिने सोशल डिस्टन्स पाळुन व कलम १४४ चे उलंघन होणार नाही याचे आधीन राहुन दि ११ एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जंयती दिवशी सकाळी ११ वाजता बाजारसमीतीचे आवारात भाजीपाला व फळे यांचे बाजार समीतीस तोरण बांधुन राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती करुन आसुड आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड.नारायण गोलेपाटील,भाई लहु सोळंके, राजाभाऊ घायतिडक, मुंजा पांचाळ, समाधान पोळ, सिद्धेश्वर गायकवाड, राजेभाऊ घोडके, संभाजी चव्हाण, राजेभाऊ जाधव, सुदाम चव्हाण, सुभाष थोरात, यांच्यासह आदींनी केले आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *