पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतींना देणार पोर्टेबल ऑक्सीजन कॅन

शेकाप नेते भाई प्रितम जनार्दन म्हात्रे यांचा पुढाकार

पनवेल (३०एप्रिल) : गेले काही दिवस पनवेल च्या ग्रामीण भागात आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सदर रुग्णांना दवाखान्यात पोहचून उपचार सुरू होईपर्यंतच्या काळात ऑक्सिजन शिवाय रुग्णांच्या जिवीतास धोका होऊ नये यासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींना पोर्टेबल ऑक्सिजन कॅन मोफत पुरविण्याचा उपक्रम शेतकरी कामगार पक्षाचे नेते, पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते भाई प्रितम म्हात्रे यांनी सुरू केला आहे.

कोविड रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची क्षमता कमी झाल्यामुळे बऱ्याचशा पेशंटना वेळेवर ऑक्सीजन बेड उपलब्ध न झाल्यामुळे व्यक्ती दगावण्याची च्या घटना घडल्या. अशा घटना समजल्यावर मन खूप व्यतीत झाल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती भाई प्रितम म्हात्रे यांनी दिली आहे.

कोरोना रुग्ण अत्यवस्थ झाल्यावर अशा प्रसंगी शहरांमध्ये ऑक्सीजन बेड त्वरित उपलब्ध न झाल्यामुळे पेशंटची प्रकृती जास्त प्रमाणात खालावते,अशावेळी जर अशा पेशंटला जर घरापासून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीत पेशंटला जर ऑक्सिजन कॅन मार्फत थोडेफार ऑक्सीजन दिले गेले तर पेशंट अत्यवस्थ होण्याचे प्रमाण फार कमी होऊ शकते. तसेच पेशंटला अशी ऑक्सिजन सारखी अत्यावश्यक गोष्ट प्रवासादरम्यान मिळाल्यामुळे मानसिक धीर सुद्धा मिळतो अशा उद्दिष्टाने आम्ही अशा संकटसमयी पनवेल तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना माझ्या जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आवश्यक ते मुबलक ऑक्सीजन कॅन उपलब्ध करून देण्याचा मानस केला आहे. त्यासाठी ३ ग्रामपंचायतीमधील प्रत्येक एक सदस्यांकडे २ पोर्टेबल ऑक्सिजन कॅन दिले आहेत. सदर कॅनचा वापर फक्त अत्यवस्थ रुग्णांनी प्रवासादरम्यानच करावा अशा सूचनाही संबंधित सदस्यांना करण्यात आल्याची माहितीही भाई प्रितम म्हात्रे यांनी दिली आहे.

यापुढेही जसे ऑक्सीजन कॅन उपलब्ध होतील त्याप्रमाणे पनवेल आणि उरण मधील इतर भागातही आवश्यक त्या ठिकाणी पोर्टेबल ऑक्सीजन कॅन पोहोचवण्यासाठी आम्ही नक्की उपाययोजना करू,असे आश्वासनही पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाई प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी दिले आहे.

पोर्टेबल ऑक्सिजन कॅन वाटपामध्ये कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये पक्षपातीपणा न करता सरसकट सर्व ग्रामपंचायतींना आवश्यक ते ऑक्सिजन कॅन देण्याचा भाई प्रीतम म्हात्रे यांच्या निर्णयाचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील तसेच सर्व स्तरातील नागरिक , विविध पक्षाचे कार्यकर्ते , सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *