भारताची आरोग्यसेवा धोक्यात…!!

कोरोनाने माजवलेल्या हाहाकारामुळे आज आपली आरोग्य व्यवस्था पूर्णतः नागडी झाली असल्याचे प्रकर्षाने जाणवले आहे,मग प्रश्न उरतो इतक्या वर्ष जे जे सत्तेवर आले त्यांनी काय केले? आणि आम्ही त्यांना याबाबत जाब का विचारला नाही? भारतात आरोग्याची परिस्थिती अतिशय दारुण आहे हे मान्य करायला हवे.क्षय,हिवताप,हत्तीरोग,कावीळ आणि मेंदूज्वर या संसर्गजन्य आजारावर आपण अजून पूर्ण ताबा मिळवलेला नसताना त्यात कोरोनाने आपण पूर्ण हतबल झालेलो आहोत.मलेरियामुळे भारतात दरवर्षी अंदाजे 2 लाख लोक मरतात म्हणजे दिवसाला अंदाजे 548 लोक.जगातल्या टी बी च्या एकूण संख्येपैकी 28% रुग्ण एकट्या भारतात आहेत.दरवर्षी 3 लाख लोक मरतात म्हणजे रोजचे 822 लोक मरण पावतात.जुलाबामुळे संपूर्ण जगात…

‘कोरोना’ उपचारांसाठी कामगारांना आर्थिक लाभ द्या

शेतकरी कामगार पक्षाची मागणी मुंबई ( २४ मे ) : राज्यातील नोंदणीकृत बांधकाम व इतर कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना असाध्य आजारकाळात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने पंचेवीस हजार रूपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेत  ‘ कोरोना’ चा या दुर्धर आजारांमध्ये समावेश करुन लाभ देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याच्या योजनेच्या यादीत ‘कोरोना’ या…

दरवाढीविरोधात शेकाप आक्रमक : खत पोत्याची केली होळी

भाई मोहन गुंड यांनी केज तहसील समोर केले आदोलन केज (१९ मेे ) : देशात पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीने नागरीक त्रस्तअसताना ऐन पेरणीच्या तोंडावर रासायनिक खताच्या दरात वाढ केली. या दरवाढी विरोधात आज केज तहसील कार्यालय समोर रासायनिक खतांच्या पोत्याची होळी करुन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दरवाढीचा निषेध केला आहे. दरम्यान रासायनिक खताची दरवाढ तात्काळ रद्द करा अन्यथा यापेक्षा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेकापनेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे. शेतीला अनेक वर्षा पासून रासायनिक खताची सवय झाल्यामुळे शेतीचा पोत उडालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना खत घेतल्या शिवाय पर्याय नाही ,आधीच शेतकरी कोरोनाच्या संकटामुळे हवालदिल…

शेकाप प्रेमींनो व्यक्त व्हा! पुरस्कार मिळवा!!

राज्यव्यापी निबंध स्पर्धेचे आयोजन मुंबई ( १८ मे ) : राज्यातील सर्वात जुना आणि आपल्या वैचारिक निष्ठेवर आजपर्यंत आपले अस्तित्व टिकवून असलेल्या शेतकरी कामगार प‌क्षाला पुन्हा राज्यभरात आपले गतवैभव मिळवून देण्यासाठी पक्षविस्तार कार्यात जनसहभाग मिळावा यासाठी पक्षाच्या पक्ष प्रशिक्षण,प्रचार व प्रसार समितीच्या वतीने राज्यव्यापी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शेतकरी कामगार पक्ष प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समीती सदस्य तथा पक्ष प्रशिक्षण , प्रचार व प्रसार समिती सदस्य भाई चंद्रशेखर पाटील यांनी केले आहे. शेतकरी कामगार पक्ष नेतृत्वाने नव्या वैचारीक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने पक्षाच्या राजकिय पिछेहाटीवर नव्या दमाने व…

पुलखल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकापच्या सावित्री गेडाम

गडचिरोली ( १७ मे ) : गडचिरोली तालुक्यातील पुलखल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या सावित्री तुकाराम गेडाम यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. पुलखल ग्रामपंचायतीची जानेवारी २०२१ रोजी सार्वत्रिक निवडणूक झाली होती. सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्ष समर्पित चार तर शेतकरी कामगार समर्थीत तीन सदस्य निवडून आले होते. आणि जयश्री दिपक कन्नाके या सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या.मात्र त्यांचे पती दिपक कन्नाके यांचे राहते घर हे शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले असल्याने दिनांक २४ मार्च रोजीच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी सरपंच पदावरून अनर्ह केले होते. त्यामुळे पुलखल ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त होते.अखेर आज…

नवे शैक्षणिक धोरण उच्चनिच व्यवस्थेला चालना देणारे : प्रा. डॉ.भाई उमाकांत राठोड यांची टिका

नव्या शैक्षणिक धोरणातील तरतुदी धोकादायक ठरण्याचा व्याख्यानमालेतील सुर मुंबई ( १६ मे ) : विज्ञानाधारित शिक्षणाची गरज असतांना मोदी सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर देवधर्म आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अभ्यासक्रम राबवता येतील असे असून गरीब आणि श्रीमंत अशी दरी कायम राहून उच्चनिच व्यवस्था पुन्हा निर्माण होण्यासाठी हे नवे शैक्षणिक धोरण आणले आहे,अशी टिका शेतकरी कामगार पक्षाच्या चिटणीस मंडळाचे सदस्य प्रा.डॉ.भाई उमाकांत राठोड यांनी केले. शेतकरी कामगार पक्षातर्फे शेकाप युवा कार्यकर्ता प्रशिक्षण व अभ्यास शिबीर अंतर्गत शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती सदस्य तथा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व कोकण शिक्षक मतदार…

कोरोनाच्या सावटाखाली लहान मुलं : तिसऱ्या लाटेपुर्वी उपाययोजना करा

महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते भाई प्रितम म्हात्रे यांची मागणी पनवेल ( ११ मे ) : कोरोनामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणेने तिसऱ्या लाटेची पूर्व सूचना दिल्याने आगामी काळात नागरिकांच्या आरोग्याची विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लहान मुलांच्या आरोग्याबाबतीत योग्य उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते भाई प्रितम जनार्दन म्हात्रे यानी केली आहे. भाई प्रितम म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, रायगडच्या पालकमंत्री, पनवेल महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे…

दुसऱ्या डोस करीता लसींचा पुरवठा करा : अन्यथा आंदोलन करणार

शेकाप नेते भाई मोहन गुंड यांचा इशारा केज (११ मे ) : कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेता येईल कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस तात्काळ उपलब्ध करुन न दिल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती सदस्य भाई मोहन गुंड यांनी प्रशासनाला दिला आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात भाई मोहन गुंड यांनी म्हटले आहे की, कोरोना रोगाची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी केज शहरातील व बीड जिल्ह्यातील अनेक नागरिकांना पहिल्या टप्प्यात कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस केज तालुक्यासह बीड जिल्ह्यात देण्यात आला. एक डोस घेतल्या पासून २८ दिवसानंतर दुसरा डोस…

राज्याची आरोग्य व्यवस्था सक्षम करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी लिहिले मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांना पत्र मुंबई ( ११ मे ) : कोविड -१९ च्या संसर्गामुळे महाराष्ट्रातील सध्या : ची असलेली रुग्णसंख्या राज्याच्या लोकसंख्येनुसार आवश्यक लसीकरण व अत्यावश्यक आरोग्य सेवा यासाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर , नर्सेस , फार्मासिस्ट , टेक्निशियन , सफाई कर्मचारी यांची आवश्यकता आहे.त्यामुळे रुग्णवाढीच्या संख्येनुसार रुग्ण खाटांची संख्या व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, टेक्निशियन, सफाई कर्मचारी आदिंची आवश्यक व्यवस्था राज्यात तात्काळ करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे मुख्यमंत्र्यांना…

कोविड रुग्णांची ‘आर्थिक’ लुट : शेकापच्या दणक्याने दवाखाना प्रशासन आले ताळ्यावर

भाई गणेश कडू यांच्यामुळे वाचले लाखो रुपये पनवेल (९ मे ) : पनवेल येथील हांडे हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यू नंतरही अव्वाच्या सव्वा बील मयत रुग्णांच्या नातेवाइकांकडून दवाखाना प्रशासन उकळत असल्याचा प्रकार लक्षात येताच शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा सह चिटणीस, नगरसेवक भाई गणेश कडू यांनी सदर दवाखाना प्रशासनाची कानउघडणी करुन ताळ्यावर आणल्याने मयत रुग्णांच्या नातेवाइकाचे लाखो रुपये वाचून दिलासा मिळाला. तीन दिवसा पूर्वी शिरढोण गावचे हॉटेल उद्योजक रविकांत मुकादम यांचे वडील श्री. लक्ष्मण हीरू मुकादम ह्यांचे कोरोना आजारामुळे पनवेल येथील हांडे हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांचे मृत्यू नंतरही हांडे हाॅस्पीटलच्या ‘लुटारू’ प्रशासनाने २ लाख…