
कोविड रुग्णांची ‘आर्थिक’ लुट : शेकापच्या दणक्याने दवाखाना प्रशासन आले ताळ्यावर
भाई गणेश कडू यांच्यामुळे वाचले लाखो रुपये
पनवेल (९ मे ) : पनवेल येथील हांडे हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यू नंतरही अव्वाच्या सव्वा बील मयत रुग्णांच्या नातेवाइकांकडून दवाखाना प्रशासन उकळत असल्याचा प्रकार लक्षात येताच शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा सह चिटणीस, नगरसेवक भाई गणेश कडू यांनी सदर दवाखाना प्रशासनाची कानउघडणी करुन ताळ्यावर आणल्याने मयत रुग्णांच्या नातेवाइकाचे लाखो रुपये वाचून दिलासा मिळाला.
तीन दिवसा पूर्वी शिरढोण गावचे हॉटेल उद्योजक रविकांत मुकादम यांचे वडील श्री. लक्ष्मण हीरू मुकादम ह्यांचे कोरोना आजारामुळे पनवेल येथील हांडे हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांचे मृत्यू नंतरही हांडे हाॅस्पीटलच्या ‘लुटारू’ प्रशासनाने २ लाख ८० हजारांचे बील अदा करण्यास सांगितले होते.
सदरची बाब युवा नेते देवा पाटील यांनी शेकाप जिल्हा सह चिटणीस, नगरसेवक भाई गणेश कडू यांच्या कानावर घातली असता भाई गणेश कडू यांनी हांडे हाॅस्पीटल गाठत दवाखान्याच्या व्यवस्थापनाला धारेवर धरून त्याना जाब विचारला. व मयत रुग्णांच्या नातेवाइकांची लुटमार न थांबविल्यास शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा देताच रुग्णालय व्यवस्थापन भंबेरी उडाली.आणि रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने संबंधीत मयत रुग्णाचे संपूर्ण २ लाख ८० हजार रुपयांचे बील माफ केले. तसेच आज सुद्धा शिरढोण गावातील श्री. पद्माकर बारकु मुकादम ह्यांचे सुद्धा कोरोना आजारामुळे नावडे येथील विजय हॉस्पिटल येथे निधन झाले असता भाई गणेश कडू यांच्या पाठपुराव्यामुळे त्यांचे सुध्दा १ लाख ४३ हजार एवढी विजय हाॅस्पीटल ला कमी करण्यासाठी भाग पाडले.
शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून भाई गणेश कडू यांनी अडचणीच्या काळात कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांची खासगी रुग्णालयांकडून होणारी लुटमार थांबल्याने शिरढोण ग्रामस्थांतर्फे त्यांचे आभार मानले आहे.