
दुसऱ्या डोस करीता लसींचा पुरवठा करा : अन्यथा आंदोलन करणार
शेकाप नेते भाई मोहन गुंड यांचा इशारा
केज (११ मे ) : कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेता येईल कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस तात्काळ उपलब्ध करुन न दिल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती सदस्य भाई मोहन गुंड यांनी प्रशासनाला दिला आहे.
बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात भाई मोहन गुंड यांनी म्हटले आहे की, कोरोना रोगाची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी केज शहरातील व बीड जिल्ह्यातील अनेक नागरिकांना पहिल्या टप्प्यात कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस केज तालुक्यासह बीड जिल्ह्यात देण्यात आला. एक डोस घेतल्या पासून २८ दिवसानंतर दुसरा डोस घ्यावा लागतो. पहीला डोस जो घेतला तोच दुसरा डोस घेणे गरजेचं आहे, असे आरोग्य विभागा कडुन सांगण्यात आले. मात्र दुसऱ्या डोससाठी कोवॅक्सिन कंपनीची लस केज शहरासह बीड जिल्ह्यात उपलब्ध नसल्याचे भाई मोहन गुंड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लक्षात आणून दिले आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी कोवॅक्सिन लस तात्काळ जिल्ह्यात उपलब्ध करुण देण्यात यावी. जेणेकरून कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेता येईल. कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस तात्काळ उपलब्ध करुन न दिल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समीती सदस्य भाई मोहन गुंड, भाई मंगेश देशमुख, भाई अशोक रोडे यांनी दिला आहे.