पुलखल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकापच्या सावित्री गेडाम

गडचिरोली ( १७ मे ) : गडचिरोली तालुक्यातील पुलखल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या सावित्री तुकाराम गेडाम यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

पुलखल ग्रामपंचायतीची जानेवारी २०२१ रोजी सार्वत्रिक निवडणूक झाली होती. सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतींमध्ये भारतीय जनता पक्ष समर्पित चार तर शेतकरी कामगार समर्थीत तीन सदस्य निवडून आले होते. आणि जयश्री दिपक कन्नाके या सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या.मात्र त्यांचे पती दिपक कन्नाके यांचे राहते घर हे शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले असल्याने दिनांक २४ मार्च रोजीच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी सरपंच पदावरून अनर्ह केले होते.

त्यामुळे पुलखल ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त होते.अखेर आज झालेल्या विशेष सभेत सरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्या सावित्री तुकाराम गेडाम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिल्पा प्रमोद ठाकरे, तुकाराम गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.

सावित्री गेडाम सरपंच झाल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे,महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई सुनील कारेते, राजाराम ठाकरे, प्रमोद ठाकरे, मधुकर कोहळे यांनी अभिनंदन केले आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *