
शेकाप प्रेमींनो व्यक्त व्हा! पुरस्कार मिळवा!!
राज्यव्यापी निबंध स्पर्धेचे आयोजन
मुंबई ( १८ मे ) : राज्यातील सर्वात जुना आणि आपल्या वैचारिक निष्ठेवर आजपर्यंत आपले अस्तित्व टिकवून असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला पुन्हा राज्यभरात आपले गतवैभव मिळवून देण्यासाठी पक्षविस्तार कार्यात जनसहभाग मिळावा यासाठी पक्षाच्या पक्ष प्रशिक्षण,प्रचार व प्रसार समितीच्या वतीने राज्यव्यापी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शेतकरी कामगार पक्ष प्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समीती सदस्य तथा पक्ष प्रशिक्षण , प्रचार व प्रसार समिती सदस्य भाई चंद्रशेखर पाटील यांनी केले आहे.
शेतकरी कामगार पक्ष नेतृत्वाने नव्या वैचारीक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने पक्षाच्या राजकिय पिछेहाटीवर नव्या दमाने व उमेदिने चिंतन सुरू केले आहे. अभ्यासू, चिंतनशील व प्रामाणिक कार्यकर्त्यांची व नेत्यांची जीवघेणी कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्याची नितांत गरज निर्माण झालेली आहे.त्याकरीता पक्ष प्रशिक्षण, प्रचार व प्रसार समितीच्या माध्यमातून हि महाराष्ट्रव्यापी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
शेकापला राजकीय दृष्ट्या यशस्वी करण्यासाठी कोणता कृतिकार्यक्रम आखावा. सत्ता संपादनासाठी शेकापची राजकीय व्युव्हरचना काय असावी. शेकाप पक्ष वाढीसाठी ( विशेषतः युवकांना आकर्षित करण्यासाठी ) कल्पक योजना व उपाययोजना हे या निबंध स्पर्धेचे तीन विषय आहेत. ६०० शब्द मर्यादेत आपले निबंध ६ जून शिवराज्याभिषेक दिवसांपूर्वी पाठविणे बंधनकारक आहे.
२६ जून २०२१ रोजी छत्रपती शाहू महाराज जयंती दिनी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार असून सर्वोत्कृष्ट दहा निबंध लेखकांना प्रत्येकी एक हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येईल. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांचा उचित सन्मान करण्यात येणार आहे.
मान्यवरांच्या मार्फत परीक्षण करून उत्कृष्ट निबंध पुढील कार्यवाही साठी पक्षनेत्यांकडे पाठवले जातील. वैचारिक, सक्रिय व सर्व शेकाप पक्षनिष्ठ समाजाला समाहून घेऊन शेकाप उत्क्रांत करण्यासाठी या निबंधाच्या माध्यमातून आपली मते मागविण्याचा हा प्रयत्न आहे. तरी सर्व शेकाप प्रेमी जनतेने या खुल्या निबंध स्पर्धेत सहभागी व्हावे ही नम्र विनंती. आपले निबंध pwpbhaishekharpatil@gmail.com या ई-मेलवर पाठवावे असे आवाहनही शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समीती सदस्य तथा पक्ष प्रशिक्षण , प्रचार व प्रसार समिती सदस्य भाई चंद्रशेखर पाटील यांनी केले आहे.