
दरवाढीविरोधात शेकाप आक्रमक : खत पोत्याची केली होळी
भाई मोहन गुंड यांनी केज तहसील समोर केले आदोलन
केज (१९ मेे ) : देशात पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीने नागरीक त्रस्तअसताना ऐन पेरणीच्या तोंडावर रासायनिक खताच्या दरात वाढ केली. या दरवाढी विरोधात आज केज तहसील कार्यालय समोर रासायनिक खतांच्या पोत्याची होळी करुन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दरवाढीचा निषेध केला आहे.
दरम्यान रासायनिक खताची दरवाढ तात्काळ रद्द करा अन्यथा यापेक्षा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेकापनेते भाई मोहन गुंड यांनी दिला आहे.
शेतीला अनेक वर्षा पासून रासायनिक खताची सवय झाल्यामुळे शेतीचा पोत उडालेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना खत घेतल्या शिवाय पर्याय नाही ,आधीच शेतकरी कोरोनाच्या संकटामुळे हवालदिल झालेला असून शेतीमाल पिकवला तर बाजारपेठेत त्याला कोणी घ्यायला तयार नाही. आणि वरून केंद्र सरकारने केलेली रासायनिक खतांची दरवाढ ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी व मुळावर उठनारी बाब आसून तात्काळ खतांची दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी केज तहसिल कार्यालय समोर खताच्या पोत्याची होळी करुन तिव्र निषेध करण्यात आला.
खतांची दरवाढ रद्द न झाल्यास हातात कायदा घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलने करण्यात येतील असा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात भाई मोहन गुंड, अशोक रोडे, मंगेश देशमुख, जीडी आप्पा देशमुख, राज तपसे,किरण पारवे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, कृषिमंत्री, पंतप्रधान यांना पाठवण्यात आल्या आहेत.