शिक्षक व शिक्षकेत्तर पदांना वीस टक्के अनुदान अखेर मंजूर

 

कोकण विभाग शिक्षक आमदार भाई बाळाराम पाटील यांचा पाठपुरावा यशस्वी

मुंबई ( ५ जुलै ) : कोकण आणि कोल्हापूर विभागातील पात्र उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मंजूर व्हावे यासाठीीशेतकरी कामगार पक्षाचे नेते,  कोकण विभाग शिक्षक आमदार भाई बाळाराम पाटील यांचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अनेक वेळा उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजितदादा पवार आणि शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन सदर मागणी लावून धरली होती. पुढील अधिवेशनात या विषया बाबत पुरवणी मागणी सादर करू, असे आश्वासन  अजितदादा पवार यांनी दिले होते.

अखेर उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात पुरवणी मागणी मांडलेली असून कोल्हापूर आणि मुंबई विभागातील १०२३ शिक्षक शिक्षकेतर पदांना २० टक्के अनुदान निधी मंजूर करण्यात आले आहे. तसेच उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, ज्यादा तुकड्या, अतिरिक्त शाखांतील ८८२० शिक्षक शिक्षकेतर पदांना २० टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

मुंबई आणि कोल्हापूर विभागातील अनुदान पासून वंचित असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ही दिलासादायक बाब आहे. लवकरच सदर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पदांना अनुदान मिळून वीस टक्क्यानुसार वेतन सुरू होणार असल्याचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी सांगितले.

मुंबई आणि कोल्हापूर विभागातील उच्च माध्यमिक शाळेतील अनुदान पासून वंचित असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अनुदान मिळवून दिल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे नेते, आमदार भाई बाळाराम पाटील यांचे आभार मानले आहेत.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *