शेतकरी कामगार पक्षातर्फे रामराज विभागाला रुग्णवाहिका भेट

आमदार भाई जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण

अलिबाग ( ७ जुलै ) : शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्यातर्फे रामराज विभागातील नागरिकाच्या सेवेसाठी रुग्णवाहिका भेट देण्यात आली.

सदर रुगणवाहिकेचे लोकार्पण चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकापक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर तेलगे, तालुका चिटणीस अनिल पाटील, माजी सभापती प्रिया पेढवी, अरुण भगत, सुभाष वागळे, धर्मा लोभी, बाळू पाटील, हर्षदा मयेकर, विक्रांत वार्डे, मोहन धुमाळ आदी प्रामुख्याने उपस्थित होेते.

यावेळी बोलताना महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, आतापर्यंत शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून दोन लाख गरजूंना अन्न धान्य वाटप करण्यात आले. नऊ कोटी रुपयांच्या अन्नधान्य व इतर साहित्याचे वाटप केले गेले आहे.

सामाजिक चळवळीची बांधीलकी जपण्याची शिकवण लाल बावट्याची आहे. पक्षीय राजकारण न बघता रुग्णवाहिकेची सेवा पुरविण्यात यावी, अशी सुचना यावेळी चित्रलेखा पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिली. आपले काम सेवेचे, कष्टकर्‍यांसाठीचे आहे हे कायम लक्षात ठेवा. लोकांचे काम होणे महत्वाचे आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

भविष्यात महिलांना चालक प्रशिक्षण देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. तसेच तालुक्यात अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्याात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी रुग्णवाहिकेसाठी मोहन धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जाहिर करण्यात आली. या समितीच्या वतीने सदर रुग्णवाहिका चालविण्यात येणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *