आपदग्रस्तांच्या मदतीसाठी शेकापचा पुढाकार

महाड, चिपळूण मध्ये पोहचले अन्नधान्य, पिण्याचे पाणी आणि साधने

महाड ( २५ जुलै) : महाड मधील तळये येथील दरडग्रस्त आणि चिपळूण येथील पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष पुढे सरसावला आहे.शेतकरी कामगार पक्षातर्फे आतापर्यंत दरडग्रस्त आणि पुरग्रस्तांना अन्नाची पाकिटे, बिस्किटे,राशन, पिण्याचे शुद्ध पाणी आणि आपत्तीनंतरचा मलबा साफ करण्यासाठी जेसीबी, डंपर, ग्रेडर अशी विविध साधने उपलब्ध करण्यात आली आहेत.

दरम्यान शेकापक्षाचे रायगड जिल्हा चिटणीस ॲड.आस्वाद उर्फ पप्पूशेठ पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिताताई पारधी, रायगड जिल्हा परिषद सदस्य व आरडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुरेशशेठ खैरे, शेकापक्षाचे पोलादपूर तालुका चिटणीस व आरडीसीसी बँकेचे संचालक एकनाथ आप्पा गायकवाड, बोरावळे ग्रामपंचायतीचे सरपंच वैभवभाई चांदे यांनी काल तातडीने तळीये गावाला भेट देऊन दरडग्रस्तांची भेट घेवून सांत्वन केले असून रायगड जिल्हा परिषदेच्या अधिनस्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना, आपदग्रस्तांना आवश्यक सुविधा शिघ्रतेने पुरविण्याचे आदेश दिले आहेत.

पक्षाच्या महिला नेत्या चित्रलेखा पाटील यांनी संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून दरडग्रस्त आणि पुरग्रस्तांना अन्नाची पाकिटे, बिस्किटे, राशन आणि आवश्यक मदत पोहचविण्याचे कार्य हाती घेतले असून मदत अव्याहतपणे सुरू आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाई प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने स्थानिक प्रशासनाला आवश्यक त्या ठिकाणी जे.सी.बी.,डंपर, पिण्याच्या पाण्याचे टँकर, ग्रेडर इत्यादी मशिनरी स्वच्छतेचे प्राधान्य देऊन पाठविले आहेत. तसेच पुढील दोन दिवसात आवश्यक त्या इतर जीवनावश्यक वस्तू शेतकरी कामगार पक्ष आणि जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत तेथे वस्तू पोहोच करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

दुर्घटनाग्रस्त लोकांनी धीर सोडू नये, आपल्या सोबत अख्खा महाराष्ट्र कुटुंबाप्रमाणे पाठीशी आहे, असा विश्वासही भाई प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महाड ,पोलादपूर येथील पूरग्रस्तांना धान्य,बिस्किटे, साखर,चहा पावडर, कपडे,मेणबत्ती, माचिस,मॅग्गी पाकिटे,कपडे,साड्या,टॉवेल, पोहे,पाणी बॉक्स,मच्छर अगरबत्ती अशी भरीव मदत पाठविण्यात आली असून याप्रसंगी शेकाप नेते पंडीत पाटील उपस्थित होते.
रोहा तालुक्याच्या वतीने पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या मदतीमध्ये तालुका चिटणीस राजेश सानप,गणेश मढवी,हेमंत ठाकूर,विठ्ठल मोरे,,जितेंद्र जोशी, कांचन माळी, संजीवनी चाळके,जयश्री जोशी,बिनधास्त धनावडे,प्रमोद भोसले, हरेश म्हात्रे,मंगेश ढमाल, जीवन देशमुख, निखिल मढवी,मिनाक्षी म्हात्रे,नंदेश यादव,अशोक कोशिमकर,नंदिनी यादव,सुबोध देशमुख, अरविंद भिलारे,संतोष दिवकर,प्रतिक कांडणेकर,लियाकत खोत,खेळू ढमाल, गोपीनाथ गंभे,स्मित मापारी,शशिकांत कडू,पूनम गोविलकर, विलास म्हात्रे,पांडुरंग भेरे, खुटल महिला मंडळ,अमोल शिंगरे, दिगंबर साळे, तानाजी म्हात्रे,पांडुरंग ठाकूर,दिपा ठाकूर,गणेश खरीवले,समीर खरीवले,दिलीप म्हात्रे,रत्नदीप चावरेकर,बाळा भोईर,नरेंद्र मरवडे,प्रकाश धुमाळ,राजू कांबळे,गणपत म्हात्रे,अनंता वाघ,आरिबा दादण, दिपक पाडगे यांनी सढळहस्ते मदत केली आहे.प्रणित टेमकर यांनी सदर साहित्य पूरग्रस्तांपर्यंत मोफत वाहन उपलब्ध करून देत मोलाचे सहकार्य केले.

तळा तालुका शेतकरी कामगार पक्षातर्फे महाड पोलादपूर पूरग्रस्तांना महिला नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते आर्थिक सहाय्य मदत सुपूर्द करण्यात आली असून महाड आणि चिपळूण येथील आपदग्रस्तांच्या पाठीशी राज्यभरातील कार्यकर्ते सोबत असून शेवटपर्यंत आवश्यक मदत शेतकरी कामगार पक्षातर्फे पुरविण्यात येईल, असे महिला नेत्या चित्रलेखा पाटील यांनी म्हटले आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *