
लाल बावटा खांद्यावर घेऊन लढत राहू : भाई धैर्यशील पाटील
प्रमोद पाटील यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर
पेण (२ ऑगस्ट) : शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा जाती, धर्माच्या आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन नेहमीच काम करत आलेला आहे. सध्याची परिस्थिती बिकट असली तरीही शेकापक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊन जनसामान्यांचे काम करत राहू,असा आशावाद शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार भाई धैर्यशील पाटील व्यक्त केला.
शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन पेणमध्ये साधेपणाने पार पडला. या दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषदेचे सभापती प्रमोद पाटील यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शेकाप कार्यालया समोर माजी आ.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. शेकाप ज्येष्ठ नेते तथा मा.आमदार अॅड. गणपतराव देशमुख यांचे निधन दोनच दिवसापूर्वी झाल्याने ध्वजारोहण होताच झेंडा अर्धवट आणून गणपतराव देशमुखांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच माजी सभापती प्रमोद पाटील यांना देखील श्रध्दांजली वाहण्यात आली.
या वेळी धैर्यशील पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्याना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. रक्तदान आयोजित केल्याबद्दल त्यांनी समाधान देखील व्यक्त केले.गणपतराव देशमुख यांच्या कार्याचाही त्यांनी आवर्जून गौरव केला.
स्व. प्रमोद पाटील यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उध्दघाटन प्रमोद पाटलांच्या पत्नी स्मिता पाटील व बहिण अॅड. निलीमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरासाठी तरुणाईनी प्रचंड प्रतिसाद दिला. धैर्यशील पाटील यांनी ही रक्तदान केले तर १८ वर्षाच्या दिशा संतोष वाघमारे हीच्या सह १०५ जणांनी रक्तदान करून प्रमोद पाटलांना अगळी वेगळी श्रध्दांजली वाहिली. रक्त संकलनाचे काम जिल्हा रुग्णालय शासकीय रक्तपेढी अलिबाग यांच्या कडून करण्यात आले. यासाठी डॉ.दीपक गोसावी, हेमकांत सोनार, सुनिल बंदीछोडे, उमेश पाटील, रविंद्र कदम, संतोष ढाकणे व दिक्षिता ठाकूर यांनी केले.
कार्यक्रमासाठी जि. प. अर्थ व बांधकाम सभापती अॅड.निलीमा पाटील,माजी सभापती डी.बी.पाटील,जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरि ओम),पंचायत समितीच्या सभापती मनिषा भोईर , मा. उपसभापती सुनिल गायकर, तैलेश पाटील ,मा.सभापती संजय भोईर, सरिता म्हात्रे ,चिटणीस संजय डंगर,लाल ब्रिगेड अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाउ ऐरणकर, सुरेश पाटील,माजी सभापती परशुराम शेट पाटील, उपसभापती अण्णा घासे, प्रफुल म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य,संदेश ठाकूर,नितीन पाटील,नगरसेवक शोमेर पेणकर,नगरसेवक संतोष पाटील,यंशवंत म्हात्रे,चंद्रकांत पाटील,प्रमोद म्हात्रे, कांदळे सरपंच मुरलीधर भोईर,कळवे सरपंच कमलाकर मोकल,अंतोरे सरपंच अमित पाटील,दिव सरपंच विवेक म्हात्रे,कालेश्री सरपंच महेश ठाकूर, खरोशी सरपंच चंद्रकात घरत, काशिनाथ पाटील, दिलीप पाटील यांच्या सह स्व.प्रमोद पाटील यांचे कुटुंबीय हजर होते.