ज्वारी व गव्हाची मदत : कळंब तालुका शेकापचा स्तुत्य उपक्रम

महाड पुरग्रस्तांसाठी भाई बाळासाहेब धस यांच्या नेतृत्वात कळंब वरुन धान्य रवाना

कळंब (९ ऑगस्ट) : उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील महापुरग्रस्त भाऊ – बहीणींसाठी स्वच्छ ज्वारी व गहु येत्या आठवड्याभरात पाठवून देण्याचा निर्णय पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित बैठकीत घेण्यात आला होता.सदरच्या ठरावावर अंमलबजावणी करीत आज ९ ऑगस्ट ला कळंब तालुका शेतकरी कामगार पक्षातर्फे २५ क्विंटल ज्वारी व गहू महाड पुरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आले.

सदरची मदत ही फक्त कळंब तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांच्या कडुनच संकलित करण्यात येईल असाही ठराव करण्यात आला होता. त्यानुसारच आज पक्षाचे तालुका चिटणीस भाई बाळासाहेब धस यांच्या नेतृत्वाखाली २५ क्विंटल ज्वारी व गहू कळंब वरुन रवाना करण्यात आली आहे. सदरचे धान्य पक्षाचे नेते, आमदार भाई बाळाराम पाटील यांचेकडे सोपविण्यात येणार असून त्यांच्या मार्फत महाड येथील गरजू पुरग्रस्तांना वाटप करण्यात येणार आहे.

या कामी भाई भास्कर कुरुंद, भगवान यादव, सुखदेव टेकाळे, दशरथ केसरे रामदास गुंड, मनोहर भाकरे गोपीचंद फावडे,सुरेश व्होके, अच्युतराव वीर, किशनराव शिनगारे यांनी परिश्रम घेतले आहेत.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *