नव्याने पुनर्बांधणी करुन शेतकरी कामगार पक्षात तरुणांना संधी देणार : भाई जयंत पाटील

राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका समीत्या केल्या बरखास्त सांगोला (२६ सप्टेंबर) : शेतकरी कामगार पक्ष हा देशातील जूना ब्राह्मणेतर राजकीय पक्ष असून शाहू फुले आंबेडकरांचा कृतिशील वैचारिक वारसा जपणारा आणि मार्क्स,लेनीन,माओच्या क्रांतिच्या सिद्धांतावर चालणारा पक्ष आहे. भांडवली व जातीयवादी पक्षांना शह देण्यासाठी जनतेला शेकाप सारख्या पक्षाचीच गरज असल्याने पक्षाची पुनर्बांधणी करण्यात येणार असून त्यात तरुणांना संधी देण्यात येणार आहे.त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका समीत्या बरखास्त करण्यात येत असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी आज जाहीर केले. सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती समितीची दोनदिवसीय बैठक आयोजित करण्यात आली…

सामान्य माणसांच्या हितासाठी पुरोगामी युवक संघटनेने काम करावे : भाई संपतरावबापू पवार पाटील यांचे आवाहन

सडोली येथे पुरोगामी युवक संघटनेच्या मेळाव्यात तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग कोल्हापूर (५ सप्टेंबर ) : पक्षात आलेली मरगळ झटकून गतवैभव पुन्हा प्राप्त करण्याची जबाबदारी शेतकरी कामगार पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे मरगळ झटकून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी पक्ष विचाराने नव्या जोमाने कामाला लागावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भाई संपतरावबापू पवार पाटील यांनी केले. शेतकरी कामगार पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते. शेतकरी कामगार पक्षाचे काम पारंपरिक पद्धतीने करीत असतांना ज्या काही चुका झालेल्या असतील त्यात कालानुरुप सुधारणा करून पक्षकार्य व्यापक करावे.त्यासाठी युवक नेतृत्वाने पुढाकार घ्यावा…