सामान्य माणसांच्या हितासाठी पुरोगामी युवक संघटनेने काम करावे : भाई संपतरावबापू पवार पाटील यांचे आवाहन

सडोली येथे पुरोगामी युवक संघटनेच्या मेळाव्यात तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

कोल्हापूर (५ सप्टेंबर ) : पक्षात आलेली मरगळ झटकून गतवैभव पुन्हा प्राप्त करण्याची जबाबदारी शेतकरी कामगार पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे मरगळ झटकून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी पक्ष विचाराने नव्या जोमाने कामाला लागावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भाई संपतरावबापू पवार पाटील यांनी केले.

शेतकरी कामगार पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने आयोजित युवक मेळाव्यात ते बोलत होते. शेतकरी कामगार पक्षाचे काम पारंपरिक पद्धतीने करीत असतांना ज्या काही चुका झालेल्या असतील त्यात कालानुरुप सुधारणा करून पक्षकार्य व्यापक करावे.त्यासाठी युवक नेतृत्वाने पुढाकार घ्यावा , असेही ते म्हणाले.

शेकडो तरुणांनी उपस्थिती दर्शविलेल्या या कार्यक्रमाला भाई अशोक पवार पाटील,भाई एकनाथ पाटील,भाई बाबासाहेब देवकर, अमित कांबळे, क्रांतिसिंह पवार पाटील, विश्वास अतिग्रे, समर पवार पाटील,शरद पाटील, बाबुराव पाटील, सरदार पाटील, शामराव मुळीक, तानाजी मेटील ऐश्वर्या पवार पाटील,अक्षय पवार पाटील, अभिजीत मेटील कुमार पाटील संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *