राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या: भाई जयंत पाटील

  परतीच्या पावसाने कोकणासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान मुंबई( १७ ऑक्टोबर ): परतीच्या पावसाने कोकणासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले असून, या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच शेतकर्‍यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली. गेल्या ३ ते ४दिवसांपासून परतीच्या पावसाने कोकणासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजविला. शेतकर्‍यांचे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी मदतीसाठी राज्य सरकारला गळ घालत आहेत. शेतकर्‍यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतीय. राज्यशासनाने पंचनाम्याचे आदेश…