मासेमारी नौकांना मासे विक्रीच्या परवानगीचे आदेश द्या : शेतकरी कामगार पक्षाची अदिती तटकरे यांच्याकडे मागणी

  पनवेल (२९ सप्टेंबर): कोविड 19 चा प्रादुर्भाव तसेच मच्छिमारांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी करंजा संस्थेने सादर केलेल्या यादीतील १०० मासेमारी नौकांना तात्पुरत्या स्वरूपात / कालावधीत त्यांच्या करंजा बंदर येथे मासे विक्री करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, विधान परिषदेचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी उद्योग,खनिकर्म,पर्यटन, फलोत्पादन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार भाई बाळाराम पाटील यांनी अदिती तटकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रायगड जिल्हयातील करंजा संस्थेच्या यादीतील नमूद मासेमारी नौका मुंबई शहर जिल्हयात कार्यरत असून नविन भाऊचा धक्का व ससून डॉक बंदरातील वर्तमान…

वाढीव विद्युत बिले माफ करा: अन्यथा आंदोलन – शेकापचा इशारा

वाढीव विद्युत बिले माफ करा: अन्यथा आंदोलन – शेकापचा इशारा अलिबाग : लॉकडावूनमुळे आधीच आर्थिक संकटात असताना निसर्ग चक्रीवादळाने उध्वस्त झालेल्या रायगडकरांना महावितरणने शॉक देत वाढीव तसेच सरासरी बिल दिल्याने जनता त्रस्त आहे. त्यामुळे वाढीव बिलं रद्द करून ३०० युनिट पर्यंतची सर्व वीजबिले माफ करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत शेतकरी कामगार पक्षाने महावितरणला अल्टिमेटम दिला आहे. शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी प्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेकापक्षाच्या शिष्टमंडळाने आज महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता अजित पिंगळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी तालुका चिटणीस अनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रियदर्शनी पाटील, अनिल…

शेकापचा ७३ वा वर्धापन दिवस राज्यभरात उत्साहात साजरा

शेकापचा ७३ वा वर्धापन दिवस राज्यभरात उत्साहात साजरा पुन्हा नव्या जोमाने पक्ष संघटना बळकट करण्याचा भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केला आशावाद   अलिबाग: रायगडसह संपूर्ण राज्यभरात रविवारी शेतकरी कामगार पक्षाचा ७३ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत मी आता ६५ वर्षाचा झालोय,तरीही मी थकलेलो नाही, मी मरगळलेलो नाही,नव्या उमेदीने,नव्या जोशाने पुन्हा शेकाप उभारणीसाठी प्रयत्न करतोय,नव्या पिढीनंही आपले योगदान द्यावे,असे भावनिक आवाहन केले. या कार्यक्रमाला जिल्हा चिटणीस ऍड,आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, पं.स.सभापती…