गडचिरोलीत २६ व २७ नोव्हेंबरला शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक

गडचिरोली,ता.२५: भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधीमंडळातील ज्येष्ठ सदस्य आ.भाई जयंत पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह शुक्रवारी(ता.२५) आज जिल्ह्यात दाखल होत आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीची बैठक २६ व २७ नोव्हेंबरला गडचिरोली येथील बँक ऑफ इंडियासमोरील हॉटेल लेक व्ह्यू येथे होणार आहे. या बैठकीला पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, आ.बाळाराम पाटील, आ. शामसुंदर शिंदे, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्ष सुप्रिया पाटील, पुरोगामी महिला संघटनेच्या राज्याध्यक्ष आशा शिंदे, पुरोगामी युवक संघटने राज्याध्यक्ष भाई बाबासाहेब देशमुख, माजी आमदार संपतबापू पवार, माजी आमदार धैर्यशीलपाटील, माजी आमदार पंडितशेट पाटील, माजी आमदार विवेकानंद पाटील, प्रा…

रावण दहनाची प्रथा बंद करा : भाई रामदास जराते यांचे आवाहन

  गडचिरोली(२५ ऑक्टोबर): राजा रावण हे संपूर्ण आदिवासी समाजाचे दैवत आणि आदर्श आहेत त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करुन आदिवासी समाजाच्या भावना दुखावण्याचे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी यापुढे करु नये, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केले. धानोरा तालुक्यातील परसवाडी येथील रावण मंदिर येथे मुळनिवासी कोया वंशीय,महान ज्ञानी पंडित, आदिवासी राजा रावण यांचे पुजन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते हस्ते अत्यंत साधेपणाने आणि शारीरिक अंतर ठेवून करण्यात आले.यावेळी पुरोगामी युवक संघटना…

शासनाने खरेदी केलेल्या मक्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी : शेतकरी कामगार पक्षाची छगन भुजबळ यांचेकडे मागणी

  शासनाने खरेदी केलेल्या मक्याची रक्कम शेतकऱ्यांना तात्काळ द्यावी : शेतकरी कामगार पक्षाची छगन भुजबळ यांचेकडे मागणी गडचिरोली (२९ सप्टेंबर) : केंद्र सरकारच्या NeML चे पोर्टल वर लाॅट एन्ट्री न झाल्याचे कारण देवून शासनाने खरेदी केलेला मका व ज्वारी शेतकऱ्यांना परत न करता सदर भरडधान्याच्या बिलाची रक्कम तातडीने अदा करुन संबंधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचेकडे केली आहे. राज्यभरातील स्थानिक खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या पत्रानुसार हजारो शेतकऱ्यांना, आपण विकलेल्या…

अन्यायकारक कृषी विधेयके देशात कुठेही लागू करु नका : शेतकरी कामगार पक्षाची राष्ट्रपतींना विनंती

  अन्यायकारक कृषी विधेयके देशात कुठेही लागू करु नका : शेतकरी कामगार पक्षाची राष्ट्रपतींना विनंती गडचिरोली (२५ सप्टेंबर): कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात बदल, आवश्यक वस्तू कायद्यात बदल आणि कंत्राटी शेती अशी तीन कृषीविरोधी विधेयके केंद्र सरकारने नुकतीच संख्याबळावर रेटून बेकायदेशीरपणे संसदीय कार्यपद्धतीचे सर्व संकेत व नियम पायदळी तुडवून पास करून घेतलेली आहेत. सदरचे घटनाबाह्य, शेतकरीविरोधी कृषी विधेयके देशात कुठेही लागू करण्यात येवू नये, अशी विनंती भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे राष्ट्रपतींना करण्यात आली. आज देशभरातील २६० राजकीय ,शेतकरी, शेतमजूर संघटना एकत्र येऊन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या मार्फत सदरच्या अन्यायकारक विधेयकांवर माननीय राष्ट्रपती यांनी…

मंत्र्यांच्या नावाने राज्यव्यापी पैसे वसुली प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावरुन तपास करावा अन्यथा आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा: शेतकरी कामगार पक्षाची मागणी

गडचिरोली (२० सप्टेंबर): राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या नावाने प्रत्येकी एक लाख रुपये जमा केल्याप्रकरणी आरमोरी पोलीसांनी 9 लाख रुपये जप्ती केल्याच्या प्रकरणाची व्याप्ती राज्यभरात असल्याने वरीष्ठ स्तरावरुन चौकशी करुन आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालकांच्या नावे वसुली करणाऱ्या रॅकेटवर कारवाई करावी,अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई रामदास जराते यांनी केली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना भाई रामदास जराते यांनी म्हटले की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार वाढ आणि सेवेत कायम करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे राज्याचे आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालक यांना…

वैनगंगेच्या कृत्रिम महापूराने बाधितांना प्रत्यक्ष नुकसानीची सरकारने भरपाई द्यावी: शेतकरी कामगार पक्षाची केंद्रीय पथकाकडे मागणी

  वैनगंगेच्या कृत्रिम महापूराने बाधितांना प्रत्यक्ष नुकसानीची सरकारने भरपाई द्यावी: शेतकरी कामगार पक्षाची केंद्रीय पथकाकडे मागणी पीकनिहाय पंचनामा करण्याचे आदेश प्रशासनाला देण्याचे केंद्रीय पथकाने दिले आश्वासन गडचिरोली: वैनगंगा नदीला आलेल्या महापूरास गोसेखुर्द धरणाचे प्रशासन आणि महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारचे आपसात नसलेले समन्वय जबाबदार आहे.त्यामुळे नैतिकतेच्या दृष्टीने या कृत्रिम महापूराची जबाबदारी सरकारने घेवून याप्रकरणी दोषींवर कारवाई करावी आणि नैसर्गिक आपत्तीचे निकषांऐवजी प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची पीक निहाय भरपाई करुन द्यावी, अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाने केंद्रीय पथकाकडे केलेली आहे. गडचिरोली येथील स्थानिक सर्कीट हाऊस येथे काल शनिवारी सायंकाळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ…

कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

  कंत्राटी तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांचे समायोजन करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी गडचिरोली: राज्यभरात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत साधारणपणे २२,००० कर्मचारी कंत्राटी तत्वावर मागील १० ते १५ वर्षापासून कार्यरत आहेत. सदर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने समायोजन करुन सेवेत कायमस्वरुपी करावे,अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी केली आहे. भाई रामदास जराते यांनी राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना अद्याप सदर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले नाही किंवा मानधनातही विशेष वाढ केलेली नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग…

वैनगंगेला आलेला महापूर कृत्रिम: शेतकऱ्यांच्या हजारो कोटींच्या पिकांच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा

शेतकरी कामगार पक्षाने नरेंद्र मोदी,उध्दव ठाकरे यांच्याकडे केली मागणी गडचिरोली: गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ दरवाजे उघडून वैनगंगा नदीला आणल्या गेलेला कृत्रीम पूर व त्यामूळे नागपूर , भंडारा , चंद्रपूर , गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी काठावरील गावातील शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपयांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांवर खडक कारवाई करा, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूर्व विदर्भात असलेल्या गोसेखूर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे संपूर्ण…

युरीयाचा काळाबाजार थांबवा: शेतकरी कामगार पक्षाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 

  गडचिरोली: उशिरा आलेल्या पावसामुळे रोवणी हंगाम सध्या भरात चालू असताना जिल्ह्यात युरीया खताची क्रुत्रिम टंचाई निर्माण करुन काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.   जिल्हाधिकारी यांच्या कडे केलेल्या लेखी तक्रारीत भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, राज्याचे क्रुषीमंत्री गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता, जिल्ह्याकरीता रासायनिक खतांची असलेल्या आवश्यकतेऐवढे खत वेळेपूर्वीच उपलब्ध करण्यात आलेले असल्याचे म्हणाले होते. असे असतांना जिल्हाभरात शेतकऱ्यांना २६६ रुपये किंमतीचे युरीया खत टंचाईच्या नावाने २९० ते ३५० अशा चढ्या दराने विक्री केले जात आहे.        …