मालेगावात शेकापचा रास्ता रोको: वाहतूक ठप्प

राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मालेगाव : मालेगाव येथून जाणाऱ्या कल्याण ते निर्मल या २२२ महा मार्गाचे चौदपदरी करणाचे काम पाटील कन्स्ट्रक्शन या कंपनी कडून होत असून या निकृष्ट दर्जाच्या कामाची गुणवत्ता तपासून कंत्राटदारांविरूद्ध व रस्त्याच्या कामावर देखरेख करणारे अभियंते यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मालेगाव येथील महामार्गावर शेकापचे जिल्हा चिटणीस भाई शुभाशिष कामेवार यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मालेगाव येथून २२२ या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक…