कार्ल मार्क्स

(५ मे १८१८–१४ मार्च १८८३) साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता, समाजशास्त्रज्ञ, अनेक समाजवादी विचारसरणींपैकी एका समाजवादी विचारसरणीचा प्रणेता. १९१८ साली झालेल्या रशियातील साम्यवादी क्रांतीच्या आणि १९४९ मध्ये चीनमध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचा मूळ प्रणेता. यहुदी वा ज्यू मातापितरांपासून पश्चिम जर्मनीतील ऱ्हाइनलंड या प्रांतातील ट्रीर शहरात कार्लचा जन्म झाला. पित्याचे नाव हाइन्‍रिख पित्याचा वकिलीचा धंदा चांगला चालत होता. त्याला खिश्चन धर्माचा स्वीकार करावा लागला त्याला ज्ञानोदय आंदोलनामध्ये रस होता, त्याचे कांट आणि व्हॉल्सेअर हे आवडते लेखक. कार्लला वयाच्या ६व्या वर्षीच बाप्तिस्मा मिळाला. कार्लचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ट्रीर याच गावी झाले. ज्या माध्यमिक विद्यालयात शिक्षण झाले त्याच्यावर…

वैदिकांनी गौण बनविलेला बहुजनांचा महान नायक “मारुती”

‘मारुति’ हा शब्द ‘मरुत्’ या शब्दापासून बनला आहे. मरुताचा पुत्र तो ‘मारुति’ होय. मरुताचे वंशापत्य, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. याचा अर्थ मारुती हा मरुताचा पुत्र वा मरुताच्या वंशात जन्माला आलेला पुरुष ठरतो. मारुतीचा मरुताशी जवळचा संबंध आहे. हे यावरून स्पष्ट होते. मरुत् हा केवळ एक पुरुष नसून तो अनेक जणांचा गण होता. त्यामुळेच ‘मरुत्’ हा शब्द वैदिक वाङ्मयात बहुतेक वेळा बहुवचनात वापरला जातो. मरुतांविषयी वैदिक ग्रंथांनी केलेले काही निर्देश आधी उद्धृत करावेत आणि मग त्यांच्या संबंधी काही विवेचन करावे, असे माझ्या मनात आहे. या मरुतांच्या संदर्भात वैदिक ग्रंथांनी घेतलेली एक भूमिका आपल्या दृष्टीने खूप…

लेनिन नावाचा अजरामर माणूस..

  लेनिन… जगाने अनुभवलेलं एक बिलोरी स्वप्न… व्यवस्थेच्या मुळावर घाव घालून रशियात समाजवादाचा बीज पेरणारा हाडाचा क्रांतिकारक. क्रांतीच्या स्वप्नांना मेहनतीचे पंख जोडून परिवर्तनाची पहाट आणणारा उगवत्या जगातील लाल सूर्य. विषमतेविरुद्ध लढणाऱ्या जगाच्या कानाकोपऱ्यातील सच्च्या कार्यकर्त्यांच्या हृदयातील स्फुर्तीचा जिवंत झरा. सबंध जगावर आपल्या निस्सीम कर्तृत्वाने छाप पाडणारा एक मोठा माणूस. मृत्यूच्या 96 वर्षानंतरही ज्याच्या प्रेताच्या दर्शनासाठी रोज रांगा लागतात असा लोकप्रियतेचे शिखर गाठलेला रशियाचा अजरामर राष्ट्राध्यक्ष म्हणजे ब्लादिमीर लेनिन. 22 एप्रिल 1870 ला व्होल्गा नदीच्या किनाऱ्यावरील सिम्बीस्क्र गावात एका शिक्षकाच्या पोटी सुसंस्कृत आणि सुखी कुटुंबात लेनिनचा जन्म झाला. सहा भावंडांतील लेनिन हे तिसरे अपत्य होतं. शालेय…

“मार्क्सवाद संपला आहे ?”

गेली अनेक दशकं हे पुनःपुन्हा ओरडून सांगितलं जातं आहे.एक साधा प्रश्न आहे, जर तो खरंच संपला असेल तर हे पुनःपुन्हा ओरडून सांगायची गरज का वाटते?कारण यामागं दडली असते एक भीती, जी प्रस्थापित वर्गाला आतून सतत पोखरत असते.या भांडवली जगात जगण्याची जणू जीवघेणी स्पर्धाच लागली आहे, प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीत इतरांना मागे टाकण्यासाठी धावतो आहे. त्यामुळे तो इतरांपासून सतत दुरावला जातो आहे. त्याला हवं असणारं आयुष्य तो जगू शकत नाही आहे आणि तो जे जगतो आहे ते त्याला नको आहे यामुळे तो स्वतः पासून देखील दुरावला जातो आहे. इतरांना दाखवताना सगळं काही आलबेल असल्याचा मुखवटा पण प्रत्यक्ष…