अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आक्रमक : अन्यायकारक कृषी विधेयके रद्द करण्यासाठी केला चक्काजाम

कोल्हापूर/पुणे (६ नोव्हेंबर) : केंद्र सरकारने  बहुमताच्या जोरावर    संमत केलेले कृषी विधेेयक शेतकरी व कामगार विरोधी असून पारंपारिक कृषी अर्थव्यवस्था  उध्वस्त करणारे आहेत हे कायदे रद्द करावेत  या  मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी कोल्हापूर, पुण्यासह विविध ठिकाणी रास्ता रोको,चक्काजाम, निदर्शने करण्यात आले. कोल्हापुर-राधानगरी मार्गावर हळदी ता.करवीर येथील शिवाजी चौकात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आयोजित केलेल्या देशव्यापी    चक्काजाम आंदोलन करून सुमारे एक तास वाहतुक रोखुन धरली. यावेळी मोदी  सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा माजी आमदार भाई संपत बापू पवार म्हणाले, नवीन…

शेतकरी व कामगार विरोधी कायद्याना विरोध करण्यासाठी शेतकरी व कामगार संघटनांनी एकत्र यावे – आमदार भाई जयंत पाटील

२६ नोव्हेंबरला भारत बंदची हाक | पुणे | प्रतिनिधी | पुणे येथे आज २८ ऑक्टोंबर रोजी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती बैठक पार पडली. देशातील २५० पेक्षा जास्त शेतकरी संघटनांची एकजूट असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्याच्या इकाईचे गठन करत आपल्या राज्यातही लढा देण्याचे निश्चित झाले आहे. केंद्र सरकारने हुकुमशाही पध्दतीने शेतकऱ्यावर लादलेल्या चार कायद्यांना स्पष्ट विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनाची आज पुणे येथे बैठक पार पडली. दिनांक २६ व २७ नोव्हेंबर २०२० रोजी होणाऱ्या देशव्यापी कार्यक्रमाचे आज नियोजन करण्यात आले. महाराष्ट्रात शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करत आंदोलनाची दिशा ठरविण्यात…

नीट परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड वेबसाईटवर पुन्हा सुरु करा : भाई राहुल पोकळे यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

नीट परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड वेबसाईटवर पुन्हा सुरु करा : भाई राहुल पोकळे यांची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे मागणीपुणे (१७ आक्टोंबर) : NEET विद्यार्थीना विना परीक्षा बैठक क्रमांक सदर परिक्षेच्या निकालाची प्रत प्रिंट काढता येत नसल्याने प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी वेबसाईटवर सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहुल पोकळे यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. भाई राहुल पोकळे यांनी म्हटले आहे की, आज नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन सदर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यास रोल नंबर आवश्यक आहे. पण नीट परीक्षा दि.१३ सप्टेंबर २०२०…

कर्जदारांकडून बळजबरीने वसूल केलेली रक्कम परत : शेतकरी कामगार पक्षाच्या दणक्याने बजाज फायनान्स नमले

कर्जदारांकडून बळजबरीने वसूल केलेली रक्कम परत : शेतकरी कामगार पक्षाच्या दणक्याने बजाज फायनान्स नमले पुणे (१६ ऑक्टोबर):लाॅकडावून च्या काळात बजाज फायनान्सने कर्जदारांच्या बँक खात्यातून ७ ते ८ हजार रुपये बळजबरीने बाऊन्सिंग चार्ज वसुल केले होते.शेतकरी कामगार पक्षाच्या दणक्यानंतर सदर चार्ज कर्जदारांना परत करणे सुरू केले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे पुणे शहर चिटणीस (अध्यक्ष) सागर आल्हाट यांच्याकडे शहरातील अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारी केलेल्या असल्याने पुण्याच्या विमाननगर येथील बजाज फायनान्स कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ८ ऑक्टोबर रोजी शेतकरी कामगार पक्षातर्फे कायदेशीर दणका देत निवेदन देऊन समज देण्यात आली होती. सदर निवेदनातील मागणीवर कारवाई करीत काल बजाज फायनान्स कंपनीने…

डिस्टीलरी प्रकल्पासाठी घेतलेले पैसे शेतकऱ्यांना परत करा: अन्यथा राज्यभर आंदोलन

डिस्टीलरी प्रकल्पासाठी घेतलेले पैसे शेतकऱ्यांना परत करा: अन्यथा राज्यभर आंदोलन साखर आयुक्तांना शेतकरी कामगार पक्षाचा इशारा पुणे: इंदापूर तालुक्यातील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पासाठी प्रति टन ५० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांकडून घेतलेली रक्कम संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ परत करण्यात यावेत अन्यथा महोदय याप्रकरणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहुल पोकळे यांनी साखर आयुक्तांना दिला आहे. पुण्याच्या शिवाजीनगरस्थित साखर आयुक्तांना लिहिलेल्या निवेदनात भाई राहुल पोकळे यांनी म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मौजे तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांचा ऊस सन २००८ –…

कोरोना महामारी : मृतकाच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत द्या – शेतकरी कामगार पक्षाची मागणी

  पुणे (२४ऑगस्ट): कोरोनामुळे मृत्युमुखी पडून लोकांचे संसार उघड्यावर येण्यास शासनच जबाबदार आहे, त्यामुळे कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला शासनाने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने राज्याचे मुख्यमंत्री उध्दवराव ठाकरे यांचेकडे केली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहुल पोकळे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, देशात रोज अंदाजे १५ हजार लोक विविध कारणांनी मृत्युमुखी पडतात. त्यात वाईट काही नाही, परंतु कोरोना काळात जे लोक मरणार नव्हते, ते लोक मेलेले आहेत.आणि ज्यांच्या घरात असा प्रसंग आलेला आहे, त्यांचे दुःख त्यांनाच माहिती आहे.…