शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बोंब मारो आंदोलन : शेतकरी कामगार पक्ष आक्रमक

दुष्काळासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बोंबमारो आंदोलन शेतकरी कामगार पक्ष आक्रमक : प्रशासनाचा केला निषेध बीड (२३ ऑक्टोबर):- बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्ह्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या, मागील वर्षाचे एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांना बिल वाटप करा कापसाला आठ हजार रुपये भाव द्या, डीसीसी बँक एकदिन प्रलंबित पिक कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करा, बीड जिल्ह्यामध्ये सरसकट पिक विमा लागू करा यासह शेतकऱ्याच्या इतर हे प्रश्नावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेकापचे भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने व बोंब मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधामध्ये कार्यकर्त्यांनी जोरदार बोंममारो…

अन्यायकारक कृषी विधेयके देशात कुठेही लागू करु नका : शेतकरी कामगार पक्षाची राष्ट्रपतींना विनंती

  अन्यायकारक कृषी विधेयके देशात कुठेही लागू करु नका : शेतकरी कामगार पक्षाची राष्ट्रपतींना विनंती गडचिरोली (२५ सप्टेंबर): कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात बदल, आवश्यक वस्तू कायद्यात बदल आणि कंत्राटी शेती अशी तीन कृषीविरोधी विधेयके केंद्र सरकारने नुकतीच संख्याबळावर रेटून बेकायदेशीरपणे संसदीय कार्यपद्धतीचे सर्व संकेत व नियम पायदळी तुडवून पास करून घेतलेली आहेत. सदरचे घटनाबाह्य, शेतकरीविरोधी कृषी विधेयके देशात कुठेही लागू करण्यात येवू नये, अशी विनंती भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे राष्ट्रपतींना करण्यात आली. आज देशभरातील २६० राजकीय ,शेतकरी, शेतमजूर संघटना एकत्र येऊन अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या मार्फत सदरच्या अन्यायकारक विधेयकांवर माननीय राष्ट्रपती यांनी…

केज येथे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हास्तरीय अभ्यास शिबीर

*केज येथे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हास्तरीय अभ्यास शिबीर क्रांतिकारकांच्या विचारा शिवाय परिपक्व कार्यकर्ता होऊ शकत नाही -भाई उमाकांत राठोङ जिल्हाभर तालुकास्तरावर कार्यकर्ता शिबीर घेणार – मोहन गुंड केज प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा अभ्यास शिबिर भाई मोहन गुंड यांच्या पुढाकाराने आज दि.6 सप्टेंबर रोजी केज येथे संपन्न झाले. या शिबिराच्या सुरुवातीस क्रांतिसिंह काॅम्रेड नाना पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड उद्धव भवलकर यांना श्रद्धांजली अर्पण करून, अभ्यास शिबिराचे पहिल्या सत्राचे उद्घाटन भाई अॅड. संग्रम तूपे यांच्या हस्ते झाले तर या पहिल्या सत्राला भाई प्रा. डॉ. उमाकांत राठोड यांनी…

बदली प्रकरणी बोंबा मारो आंदोलनाने तहसील कार्यालय दणाणले : बदली न झाल्यास आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन

    केज,बीड (२४ऑगष्ट): येथील नायब तहसीलदार सचिन देशपांडे हे वीस ते पंचवीस वर्षांपासून केज येथील वेगवेगळ्या विभागात तर कधी नगरपंचायत मध्ये पदभार घेऊन, राजकीय व्यक्तींच्या सोयीनुसार वागतात त्याचा फायदा स्थानिक राजकारण्यांना होतो त्यामुळे हे ठाण मांडे अधिकारी यांची बदली व्हावी ,जिल्ह्यात नायब तहसीलदार मंडळधिकारी ,कारकून यांच्या बदल्या झाल्या असताना केज तहसील अंतर्गत नायब ताहसिलदारासह तलाठी ,मंडळ अधिकारी यांच्या बदल्या होणे अपेक्षित तक्रारी केल्या असताना बदल्या का होत नाहीत म्हणून दि.24 रोजी केज तहसील कार्यालयासमोर जिल्हाधिकारी यांच्या नावाने बोंबा मारो आंदोलन करण्यात आले.या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने तहसील कार्यालय परिसर दणाणून गेले. शेतकरी कामगार पक्ष, शिवसंग्राम,रिपाई मित्र…

शेतकऱ्यांच्या पीक कर्जासह विविध प्रश्नावर शेकापचे जिल्हाभरात अन्नत्याग आंदोलन

शेतकऱ्यांच्या पीक कर्जासह विविध प्रश्नावर शेकापचे जिल्हाभरात अन्नत्याग आंदोलन: महामारीत बँकांकडून शेतकऱ्याची पिळवणूक – भाई गुंड बीड (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका व बीड जिल्हा मध्यवर्ती बँक पिक कर्ज देण्यासाठी जाणीवपूर्वक विलंबा सह, टाळाटाळ करत असून, ना हरकत प्रमाणपत्र शक्तीचे करत असल्याने, शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित राहावे लागत आहे. स्टेट बँक ऑफ हैदराबाद,भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा आदी बँकांनी असला तरी अद्याप दहा टक्के देखील पीक कर्ज वाटप केले नाही. परंतु या बँका शेतकऱ्यांना कागदपत्र च्या नावाखाली विनाकारण चकरा मारायला लावत असून संकटात सापडलेला शेतकरी बँकेत फाईल दाखल करून सुद्धा पिकांना खुरपणी,खत, फवारणी पैस्या आभावी करू…

केज येथे शेकापचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

क्रांतिसिंह काॅ.नाना पाटील, लोकशाहीर काॅ.अण्णाभाऊ साठे यांचे विचारानेच शेतकर्यांच्या जिवनात क्रांती शक्य -डाॅ.प्रा संतोष रणखांब केज येथे शेकापचा वर्धापन दिन उत्साहात साजरा केज (बीड) ३ ऑगष्ट रोजी क्रांतिसिंह काॅ.नाना पाटील,लोकशाहीर काॅ.अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त जयंती व शेतकरी कामगार पक्षाच्या 73 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. पक्षाच्या वर्धापण दिनानिमित्त दरवर्षी कार्यक्रम आयोजित केलेले असतात मात्र या वेळेस सिटी केबल फेसबुक लाईव्ह कार्यक्रम शिक्षक पतपेढी येथे घेण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापण दिनानिमित्त केज येथे पक्ष कार्यालयासमोर पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहन भाई अॅड.नारायण गोले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर नुतन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन भाई अॅड. संग्रम…