भारतीय शेतकरी कामगार पक्ष

२ रे अधिवेशन : दाभाडी
मे, १९५०

राजकीय ठरावाचा मसुदा

१.आंतरराष्ट्रीय परिस्थिती

जगातील दोन गट

दुसऱ्या जागतिक महायुद्धामुळे युद्धोत्तर काळात आंतरराष्ट्रीय परिस्थितीत मूलभूत स्वरूपाचे फेरबदल झाले . साम्राज्यवादी गट आणि साम्राज्यशाहीविरोधी गटाच्या परस्परविरोधी गटातील झगडा आज अशा परिस्थितीत लढला जात आहे , की ज्या परिस्थितीत भांडवलशाहीवरील अरिष्ट तीव्र होत आहे , साम्राज्यवादी शक्ती कमजोर होत आहेत आणि समाजसत्तावादी व लोकशाही शक्ती वाढत आहेत . या दोन गटांचे जागतिक धोरणाबाबतचे मार्ग अगदी भिन्न आहेत . साम्राज्यशाहीविरोधी लोकशाहीवादी गटात रशिया , पूर्व युरोपातील जनतेची लोकशाही प्रस्थापित झालेली राष्ट्रे व चीन आणि सर्वच देशांतील क्रांतिकारक जनता असून या गटांचे पुढारीपण सोव्हिएट रशियाकडे आहे . राष्ट्रातील जनतेत शांतता नांदण्यासाठी आणि जनतेच्या लोकशाहीसाठी प्रतिगामी साम्राज्यवाद्यांविरुद्ध सुसंगत व प्रखर लढा देणे हे या गटाचे उद्दिष्ट आहे . लोकशाहीविरोधी साम्राज्यवाद्यांच्या गटात अमेरिका , इंग्लंड , फ्रान्स , इटली व इतर देशांतील पिळवणूक करणारे वर्ग असून त्या गटाचे पुढारीपण अमेरिकेकडे आहे . अमेरिकेचे वर्चस्व जगभर बळजबरीने प्रस्थापित करणे , निरनिराळ्या देशांना व तेथील जनतेला गुलाम बनविणे , लोकशाही शक्तीचा नायनाट करणे , नवे जागतिक युद्ध पेटविणे हे या गटाचे उद्दिष्ट आहे . दिवसेंदिवस या परस्परविरोधी गटांतील लढा तीव्र होत असून इंग्लंड - अमेरिकेच्या साम्राज्यवादी गटाचे युद्धखोर स्वरूप उघड होत आहे .

साम्राज्यशाही

गट युद्धासाठी आवश्यक असलेला कच्चा माल व इतर सामुग्री बळकावण्याचा प्रयत्न करीत असताना अमेरिकेने सर्व जगभर आर्थिक , राजकीय व लष्करीदृष्ट्या आपला साम्राज्यविस्तार चालविला आहे व ती सर्वत्र आपले लष्करी , आरमारी व हवाई तळांचे जाळे पसरवीत आहे . हा गट स्पेनमध्ये फ्रँको , ग्रीसमध्ये राजेशाही फॅसिस्ट , चीनमध्ये उलथून पडलेला चेंग - कै - शेक , व्हिएटनाममध्ये बाओदाई यांसारख्या जीर्ण व प्रतिगामी राजवटींना साहाय्य करीत आहे . इतकेच नव्हे , तर जनतेची लोकशाही प्रस्थापित झालेल्या देशांतून ज्यांचे उच्चाटन केले गेले आहे अशा पिळवणूक करणाऱ्या वर्गाच्या अवशेषांना व त्यांच्या हेरांना तो उचलून धरीत आहे . थोडक्यात , अमेरिकेचा साम्राज्यशाही गट हा जागतिक प्रतिगाम्यांचे केंद्र व आधारस्तंभ बनला आहे . याल्टा पोट्सडॅम या ठिकाणी घेण्यात आलेले निर्णय धाब्यावर बसवून इंग्लंड - अमेरिकन गटाने जर्मनीची फाळणी करून पश्चिम जर्मनीत बॉन सरकार प्रस्थापित केले आहे . जर्मनीचे लोकशाहीकरण करण्याऐवजी हिटलरला मदत करणाऱ्या मक्तेदारांचे व युद्धखोरांचे अमेरिका पुनरुज्जीवन करीत आहे . या धोरणापाठीमागे आपल्या साम्राज्यशाही आकांक्षांच्या पूर्ततेसाठी पश्चिम जर्मनीचा आक्रमक तळ म्हणून उपयोग करणे हा तिचा हेतू आहे .

मार्शल योजना

मार्शल योजना ही अमेरिकेच्या युद्धखोर धोरणाचाच एक महत्त्वाचा भाग असून या योजनेचा खरा उद्देश , युरोपातील राष्ट्रांना आर्थिक पुनर्घटनेकरिता मदत करणे हा नसून युरोपवर अमेरिकेची आर्थिक व राजकीय गुलामगिरी लादणे हा आहे , हे आता स्पष्ट झाले आहे . या योजनेनुसार मदत घेतलेल्या कोणत्याही राष्ट्राची आर्थिक घडी व्यवस्थित बसण्याच्या ऐवजी ती जास्तच विस्कळीत झाली आहे ही गोष्ट संयुक्त राष्ट्रसंघाच्या सेक्रेटरीएटने आपल्या १९४८ सालातील जागतिक आर्थिक परिस्थितीवरील अहवालात नमूद केली आहे . मार्शलीकरण झालेल्या देशांना अमेरिकन मक्तेदारांच्या हितसंबंधांच्या दावणीस बांधण्यात आले आहे . कॉ . सुलॉव्ह यांनी कॉमिनफार्मच्या नोव्हेंबर १९४९ मध्ये भरलेल्या सभेस सादर केलेल्या अहवालात म्हटल्याप्रमाणे , " मार्शल योजना हे अमेरिकन साम्राज्यवाद्यांचे आर्थिक , राजकीय व लष्करी हत्यार आहे व त्याच्या साहाय्याने ते पश्चिम युरोपची अर्थव्यवस्था आपल्या ताब्यात घेऊन पश्चिम युरोपला आपली वसाहत बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत ." निरनिराळ्या देशांवर अमेरिकन साम्राज्यशाहीने नुकतीच लादलेली मूल्य - कपात म्हणजे या देशांच्या अर्थव्यवस्थेवर अमेरिकेकडून होणारा हल्ला तीव्र झाल्याचा पुरावा आहे . ब्रिटिश - अमेरिकन साम्राज्यवादी गट हा पश्चिमसंघ , उत्तर अटलांटिक गट व त्याचे पूरक असे भूमध्य करार , मध्यपूर्व करार , आग्नेय आशिया करार , अतिपूर्व करार , पॅसिफिक गट , अरब राष्ट्रांचा गट वगैरे मार्गाने आपले युद्धखोर धोरण पुढे नेत आहे . युरोपमधील राष्ट्रांवर अमेरिका लादीत असलेल्या गुलामगिरीला होणारा जनतेचा वाढता प्रतिकार मोडून काढणे व युरोपमधील व आशियातील जनतेची लोकशाही सरकारे अस्तित्वात असलेले देश व विशेषत : लोकशाही छावणीतील मुख्य शक्ती सोव्हिएट रशिया , यांच्याविरुद्ध प्रत्यक्ष चढाई करणे हा या गटाचा व करारांचा उद्देश आहे . हे गट व करार म्हणजे समग्र मानवजातीला भयंकर धोका आहे . सोव्हिएट रशिया , जनतेची लोकशाही सरकारे प्रस्थापित झालेली राष्ट्रे व इतर देश यांच्यात सहकार्य निर्माण होऊ नये आणि देशादेशात शांतता नांदू नये म्हणून ब्रिटिश अमेरिकन गट संयुक्त राष्ट्रसंघटनेला सुरूंग लावीत आहे . अणुशास्त्राला बंदी घालण्याच्या व शस्त्रे कमी करण्याच्या या संघटनेच्या योजना तो धाब्यावर बसवीत आहे . कृत्रिम रीतीने आंतरराष्ट्रीय तेढीचे प्रसंग निर्माण करणे आणि रेडिओ , वर्तमानपत्रे , सिनेमा इत्यादी प्रचारसाधनांचा भरपूर उपयोग करून युद्धानुकूल मनोवृत्ती निर्माण करणे या मार्गाने या गटाने शीतयुद्ध सुरू केले आहे . अमेरिका व ब्रिटन यांच्या लष्करी खर्चात झालेली भरमसाट वाढ हा या युद्ध पेटविण्याचा प्रत्यक्ष परिणाम आहे . अमेरिकेचा लष्करी खर्च या वर्षी ५२०० कोटी डॉलर्स म्हणजे युद्धपूर्व काळाच्या २० पटीने जास्त आहे . देशाचे शिक्षण , सार्वजनिक आरोग्य यांवरील खर्चाच्या २६ पट हा खर्च आहे . ब्रिटनमध्येही लष्करी खर्चाचा आकडा आज १९३९ सालच्या तिप्पट आहे . अशा रीतीने युद्धाची तयारी करीत असताना भांडवलदारी मक्तेदारी युद्धखोरांना जनतेला युद्ध की नको याची दखलगिरी घेण्याची जरुरी वाटत नाही ; एवढेच नव्हे , तर श्रमजीवी जनतेवर कामवाढ , पगारकाट , बेकारी , वाढती महागाई इत्यादी स्वरूपात से नवे नवे हल्लेच चढवीत आहेत . त्याचप्रमाणे युद्ध पेटविण्याचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून ते आपल्या या लल्यांना विरोध करणाऱ्या जनतेची चळवळ दडपून टाकीत आहेत आणि जनतेच्या लोकशाही हक्कांवर पाला घालून आपली पिछाडी बळकट करीत आहेत . अशा रीतीने लष्करी व व्यूहरचनात्मक उपाय , जकीय दडपण , आर्थिक वर्चस्व , निरनिराळ्या शांतील जनतेला गुलाम बनविणे या मार्गांचा अवलंब न ब्रिटिश - अमेरिकन गट जागतिक युद्ध पेटविण्याचा प्रयत्न करीत आहे . त्यांचा हा आक्रमणखोर लष्करी - राजकीय गट मानवजातीला नव्या जागतिक कत्तलीची धमकी देत आहे . कट म्हणजे मानवजातीवरील एक भीषण संकट आहे .

आर्थिक अरिष्टाचे चक्र

साम्राज्यवादी युद्धखोर गट लष्करी तयारी करीत असला तरी त्याची ताकद वाढली नसून ती कमीच होत आहे . गेल्या दोन वर्षांत भांडवलशाही साखळीतील चीन व इतर काही दुवे निखळून पडले आहेत व साम्राज्यवादी गटांतील अंतर्गत व बाह्य विरोध तीव्र होत असून तो गट आर्थिक अरिष्टाच्या चक्रात सापडत आहे . अमेरिकेच्या औद्योगिक उत्पादनात २२ % , उद्योगपतींच्या कायम भांडवलात २१.५ % , डिपार्टमेंटल स्टोअर्सच्या विक्रीत १२ ते १४ % , कोळशाच्या उत्पादनात ३ ९ % , रेल्वेतून विक्री होणाऱ्या मालाच्या वाहतुकीत २० % याप्रमाणे घट झालेली आहे . तेथील बेकारांची संख्या १ कोटी ५० लक्ष आहे . शेतीच्या धंद्यात अमेरिकेत ४० लक्ष टन कापूस , १ ९ २ लक्ष टन बुशेल गहू , ४०४ लक्ष टन अळशीचे तेल , १०१ लक्ष टन लोणी इतका माल पडून आहे . शिवाय तेथे २१ कोटी अंड्यांचा नाश करण्यात आला असून दूध , लोणी वगैरे पदार्थ प्रचंड प्रमाणात नासून चालले आहेत . अमेरिकेप्रमाणे युरोपातील इतर भांडवली देशांतील आर्थिक अरिष्टेही तीव्र होत आहेत . बेकारांची संख्या इटलीत २० ते २४ लक्ष आणि पश्चिम जर्मनी व बेल्जियम मिळून १३८७५०० अशी आहे . सर्व भांडवलशाही जगातील हा आकडा ४ कोटींवर आहे . बेकारीबरोबरच या राष्ट्रांच्या उत्पादनात घट होत असून त्यांचा व्यापार मंदावला आहे . या वाढत्या अरिष्टाबरोबरच भांडवली देशांतील जनतेच्या चळवळींचा जोरही वाढत आहे . अमेरिकन खाणी कामगारांचा संप , इटलीतील शेतमजुरांचा जमिनीसाठी लढा , फ्रान्समधील पगारवाढीसाठी सार्वत्रिक संप आणि वसाहतवादी देशांतील साम्राज्यशाहीविरोधी स्वातंत्र्यलढेही अधिकाधिक तीव्र होत असून ते लढ्याच्या अवस्थेकडे झुकत आहेत .

सोव्हिएट गट

परंतु साम्राज्यशाही गट अशा रीतीने युद्धाची तयारी करीत असताना साम्राज्यशाहीविरोधी गट हे युद्धप्रयत्न हाणून पाडण्यासाठी आपली एकजूट करून एक भक्कम फळी उभारत आहे व युद्धखोरांना अलग पाडण्यासाठी व त्यांच्या सैतानी योजना हाणून पाडण्यासाठी चिकाटीने लढत आहे . या शांततावादी गटाचे पुढारीपण करणाऱ्या सोव्हिएट रशियाच्या ताकदीत प्रचंड वाढ झाली आहे . दुसऱ्या महायुद्धाने झालेली प्रचंड हानी भरून काढण्यास सोव्हिएट रशियास बराच काळ लागेल , ही साम्राज्यशाही गटाची आशा फोल ठरली आहे . १९४९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात रशियाचे औद्योगिक उत्पादन १९४० सालापेक्षा ५० % वाढले आहे . शेतीच्या धंद्यातही याच प्रमाणात प्रगती सुरू आहे . सोव्हिएट युनियनला अणुबाँबचा शोध लागल्याने अमेरिकेची ॲटमबाँबची मक्तेदारी नष्ट झाली आहे व साम्राज्यशाही गोटात गोंधळ उडाला आहे . उलट शांततावादी गटाच्या ताकदीत भरच पडली आहे . अणुबाँबचा शोध लागल्यानंतरसुद्धा रशियाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल कौन्सिलसमोर अणुबाँबवर बंदी करणारा , युद्धाच्या तयारीचा निषेध करणारा व शांततेला बळकटी आणण्यासाठी पाच राष्ट्रांची कमेटी नेमण्याची मागणी करणारा ठराव मांडला आहे . अशा रीतीने शांतता आघाडीला बळकटी आणून युद्धखोरांचा रस्ता रोखून धरण्याचा प्रयत्न रशिया करीत आहे . पोलंड , झेकोस्लोव्हाकिया , बल्गेरिया , रुमानिया , हंगेरी , अल्बनिया या देशांत जनतेची लोकशाही सरकारे प्रस्थापित झाली असून तेथील जनता समाजसत्तावादी समाजरचना निर्माण करण्याच्या मार्गावर निश्चयाने पावले टाकीत आहे . या देशांची आर्थिक व सांस्कृतिक प्रगती झपाट्याने होत आहे . त्यांची अंतर्गत एकजूट भक्कम झाली आहे व सोव्हिएट रशियाशी त्यांचे संबंध दृढ झाले आहेत . त्यामुळे साम्राज्यशाहीविरोधी , युद्धविरोधी शांतता आघाडी बळकट झाली आहे . पूर्व जर्मनीत लोकशाही सरकार प्रस्थापित झाल्यामुळे या मोर्चाची ताकद वाढली आहे .

चंग - कै - शेक नेस्तनाबूद

राष्ट्राचा विश्वासघात करून अमेरिकेचा हस्तक बनलेल्या चेंग - कै - शेकची सत्ता चिनी जनतेने उखडून टाकून त्या ठिकाणी जनतेच्या लोकशाहीची प्रस्थापना केली आहे . त्यामुळे अमेरिकेच्या युद्धयोजनांना मोठा धक्का बसला असून साम्राज्यवादी फळीत मोठे खिंडार पडले आहे . नवा साम्राज्यशाहीविरोधी मोर्चात सामील झाल्याने त्या गटाची ताकद वाढली आहे व आतरराष्ट्रीय गटाच्या बलाबलात निर्णायक फरक पडला आहे . जनतेच्या शांततावादी मोर्चाची प्रचंड संघटना सर्व जगभर निर्माण झाली असून त्यात आतापावेतो कोट्यवधी जनता सामील झाली आहे . शांतता सैनिकांच्या चळवळीत कामगारवर्ग , शेतकरीवर्ग , बुद्धजीवीवर्ग , शहरातील जनतेचा मध्यम थर यातील जनता सामील झाली आहे . इटली , फ्रान्स या देशांत कामगारवर्गाने युद्धसाहित्य उतरविण्याचे नाकारून शांततेचा लढा एका नव्या वरच्या पातळीवर नेला आहे .

वसाहतींचा स्वातंत्र्यलढा

वसाहत देशात व परतंत्र देशात राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीने मिळविलेल्या विजयामुळे साम्राज्यशाहीविरोधी शक्तीच्या ताकदीत वाढच झाली आहे . चीनमधील जनतेच्या लोकशाही विजयामुळे वसाहतीच्या स्वातंत्र्यलढ्याच्या नव्या टप्प्याला आरंभ झाला आहे . व्हिएटनाम , ब्रह्मदेश , इंडोनेशिया , कोरिया , फिलिपाईन्स देशांत साम्राज्यशाहीविरोधी स्वातंत्र्य चळवळीचा विशेष उठाव होत असून जनतेचे सशस्त्र लढे चालू आहेत . सर्वसाधारणपणे जगातील सर्व वासाहतिक व परतंत्र देशांत स्वातंत्र्याची चळवळ प्रचंड व व्यापक प्रमाणात वाढत आहे . हिंदी जनतेचा लोकशाहीसाठी लढाही याच चळवळीचा एक भाग आहे .

२ : राष्ट्रीय परिस्थिती

दोन महायुध्दे व भारतातील स्वातंत्र्याचा उठाव
पहिल्या साम्राज्यशाही महायुद्धाच्या व लगेच नंतरच्या काळात सर्व वासाहतिक व निमवासाहतिक देशांत , साम्राज्यशाहीविरोधी उठावांची एक लाट उसळली . हिंदुस्थानातही या लाटेचे पडसाद उठल्याशिवाय राहिले नाहीत . लष्करात बंडे , शेतकरी उठाव , मुंबईत गिरणी कामगारांचा प्रचंड संप हे या उठावाचेच भाग आहेत . याच काळात हिंदी स्वातंत्र्याच्या चळवळीचा जोरदार उठाव झाला . या स्वातंत्र्यलढ्यात कामगार , शेतकरी , मध्यमवर्ग हे सर्व सामील झाले . परंतु या लढ्याचे स्वरूप अत्यंत असंघटित होते व भांडवलदारवर्गाकडे होते. पहिल्या महायुद्धाचा अटळ परिणाम असा झाला , की हिंदुस्थानात औद्योगिक वाढीची थोडीशी प्रगती होऊन हिंदी कामगारवर्गाच्या संख्येतही वाढ झाली . १ ९ १४ साली एकूण कामगारांची संख्या ९ ५१००० होती , ती १ ९ १८ साली ११२३००० झाली . परंतु हा कामगारवर्ग अजून असंघटित व अपरिपक्व होता , त्याच्यावर सुधारणावादी पुढारीपणाचे वजन होते आणि कामगारवर्गाचा असा एक खास राजकीय पक्षही अस्तित्वात नव्हता . त्या काळात कामगारवर्गाने साम्राज्यशाहीविरोधी क्रांतिकारक चळवळीवर पुढारीपण प्रस्थापित करण्यासारखी भौतिक परिस्थितीच अस्तित्वात नव्हती आणि म्हणून तो वर्ग ही गोष्ट करूही शकला नाही . या काळात जनतेचे क्रांतिकारक उठाव जसजसे तीव्र स्वरूप धारण करू लागले तसतसा राष्ट्रीय चळवळीच्या भांडवलदारी पुढारीपणाचा डळमळीतपणा वाढू लागला व शेवटी चौरीचौरा येथ झालेल्या दंग्याचा आधार घेऊन ' जनता अहिंसक युद्धाला अजून तयार नाही ' असे म्हणून महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचा लढा पाठीमागे घेण्याची ' हिमालयाएवढी ' चूक केली . खरे पाहता भांडवलदारवर्गाची जनतेच्या उठावाची भीती आणि त्या पुढारीपणाचा डळमळीतपणा हा या काळात अत्यंत स्पष्ट झाला .

औद्योगिक प्रगती

यानंतरच्या काळात हिंदुस्थानात उद्योगधंद्यांची जी वाढ झाली त्यामुळे कामगारवर्गाची संख्या पुष्कळच वाढली . १९१८ साली फॅक्टरींची संख्या २४३६ व कामगारांची ११.२३ लक्ष होती ती १९२६ साली अनुक्रमे ७२७१ व १५.१८ लक्ष याप्रमाणे वाढली . खाणीतील कामगारांची संख्या १९२६ साली २६०११३ होती . याशिवाय या काळात निरनिराळ्या उद्योगधंद्यांची व त्यात घातलेल्या भांडवलाचीही वाढ झाली . १९१८ साली जॉईंट स्टॉक कंपन्यात एकंदर ९९ .११ कोटी रुपये भांडवल गुंतविलेले होते ते १९२५ साली २७६.९ ६ कोटी रुपये झाले . त्याचप्रमाणे रेल्वेच्या धंद्यात १९२० साली ५६६.३८ लक्ष रुपये भांडवल होते ते १९२५ साली ७३३.३७ लक्ष झाले . अशा रीतीने उद्योगधंद्यांच्या व कामगारांच्या संख्येत वाढ होऊन कामगारवर्ग हा हिंदुस्थानातील एक प्रमुख वर्ग बनला . उद्योगधंद्यांच्या आणि कामगारवर्गाच्या वाढत्या संख्येबरोबर भांडवलदारांनी कामगारवर्गाची चालविलेली पिळवणूक वाढतच गेली व बेकारी , पगारकाट , कामवाढ इत्यादी स्वरूपात त्यांनी कामगारवर्गावर हल्ले चढविण्यास सुरुवात केली

आर्थिक मंदी व तिचे परिणाम

१९२९ सालचे आर्थिक अरिष्ट कोसळले त्याच्या आधीच्या काळात कामगारवर्ग संघटित होऊ लागला होता . एवढेच नव्हे , तर साम्राज्यशाहीचे व स्वदेशी भांडवलदारांचे होणारे पगारकाटीसारखे हल्ले परतवून लावण्यासाठी तो संपलढ्यात उतरत होता . अशा रीतीने वर्गलढ्यातून जात असलेला लढाऊ कामगारवर्ग हिंदी वर्गव्यवस्थेतील एक क्रांतिकारक शक्ती म्हणून पुढे येत होता . या काळात कामगारवर्गाने केलेल्या लढ्यांची व त्यांच्या संघटनेच्या ताकदीची कल्पना पुढील आकड्यांवरून येईल . हिंदुस्थानात १९२६ साली झालेल्या संपांची संख्या १२८ होती व त्यात १,३१,६५५ कामगार सामील झाले होते . १९२८ साली २०३ संप झाले व त्यात ५,०६,८३१ कामगार सामील झाले . १९२८ सालानंतर १९४५ सालापर्यंत कामगार - संपांची इतकी मोठी लाट हिंदुस्थानात आली नाही . या संपांच्या वाढत्या लाटेबरोबरच कामगारांच्या युनियन्सची ताकदही वाढत होती . मुंबईच्या गिरणी कामगार युनियनची ( लाल बावटा ) सभासदसंख्या १९२९ च्या डिसेंबर महिन्यात ५४००० आणि १९२९च्या मार्च महिन्यात ६५००० होती . ट्रेड युनियनमध्ये संघटित झालेल्या मुंबईतील कामगारांची एकूण संख्या १९२६ साली ५९,५४४ , १९२७ साली ७५६०२ , १९२८ साली ९५,३२१ आणि १९२९ साली २,००,३२५ याप्रमाणे वाढलेली आहे . १९२९ साली ज्या वेळेला आर्थिक अरिष्ट ओढवले त्या वेळी कामगारवर्गाची परिस्थिती ही अशी होती . या काळात कामगारवर्ग बराचसा जागृत व संघटित होत होता . तसेच स्वतःला मार्क्सवादी म्हणविणारा कम्युनिस्ट पक्षही अस्तित्वात आला होता . व त्यामुळे साम्राज्यशाहीविरोधी हिंदी क्रांतिकारक चळवळीवर त्याचे प्रभुत्व प्रस्थापित होण्यासारखी जात होते . या लढ्यांना क्रांतिकारक मागनि जाऊन भौतिक परिस्थिती निर्माण झालेली होती . कामगारवर्गाबरोबर शेतकरीवर्गाचे लढेही लटुले देण्याचा भांडवलदारी पुढारी पण करीत होते . उदाहरणार्थ महात्मा गांधींच्या पुढारीपणाखाली झालेला बारडोलीचा लढा क्रांतिकारक मार्गाने जाऊ नये म्हणून गांधींनी आटोकाट प्रयत्न केला व त्यात त्यांना यशही आले . अशा रीतीने वर्गीय लढे लढले जात असताना व त्यांची तीव्रता वाढत असताना त्याचे परिणाम राजकीय चळवळीवरही दिसू लागले होते . १ ९ २८ साली हिंदी जनतेने सायमन कमिशनवर बहिष्कार घालून आपल्या साम्राज्यशाहीविरोधी भावनेचे जे प्रचंड निदर्शन केले , त्याचे पुढारीपण मुंबईत वर्गजागृत होत चाललेल्या कामगारवर्गानेच घेतले . हिंदुस्थानातील या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरच १ ९ २८ साली कम्युनिस्ट इंटरनॅशनलने वासाहतिक वा निमवासाहतिक देशांतील क्रांतिकारक लढ्यांचे विवेचन करताना , ' कामगार व शेतकरी यांच्या स्वतंत्र संघटना प्रस्थापित करून त्यांना व श्रमिक जनतेला भांडवलदार वर्गाच्या पुढारीपणाखालून काढले पाहिजे , ' असे हिंदुस्थानातील क्रांतिकारक चळवळीला मार्गदर्शन केले आहे . पण या मार्गदर्शनाप्रमाणे आचार झाला का ? या प्रश्नाचे ' नाही ' असे उत्तर द्यावे लागेल . कम्युनिस्ट इंटरनॅशनल , लेनिन , स्टॅलिन यांनी केलेले मार्गदर्शन व दिलेले आदेश पाळण्याची खरी जबाबदारी स्वत : ला मार्क्सवाद लेनिनवादाचा एकनिष्ठ उपासक म्हणविणाऱ्या हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाऱ्यांवर होती ; पण या पुढारीपणाने राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या त्या अवस्थेत अनेक घोडचुका केल्यामुळे कम्युनिस्ट इंटरनॅशनलने वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व लेनिन , स्टॅलिन यांनी दिलेले इशारे व्यर्थ ठरले . याबाबत अधिक तपशीलवार टीका पुढे स्वतंत्र विभागात केली आहे . ता . १-१-१९ ३० रोजी लाहोरच्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेने ' पूर्ण स्वातंत्र्य मिळविणे हे काँग्रेसचे ध्येय आहे ' अशी घोषणा केली . त्याच वेळी ते ध्येय साध्य करण्यासाठी लढ्याची अपरिहार्यता मान्य करण्यात येऊन हा मुख्यत्वे कायदेभंगाचा होणारा लढा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला योग्य वाटेल त्या वेळी सुरू करण्याचा अधिकार देण्यात आला . याप्रमाणे काँग्रेसच्या ध्येयाची व त्यासाठी करावयाच्या लढ्याची घोषणा करण्यात आली . तरी या लढ्याचे स्वरूप व त्या लढ्याचे ध्येय याबाबत जनतेची कल्पना व काँग्रेस पुढाऱ्यांच्या कल्पना एकरूप नव्हत्या . ता . २६ जाने . १ ९ ३० रोजी स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात आला . त्या वेळी स्वातंत्र्याची जी प्रतिज्ञा वाचून दाखविण्यात आली त्या प्रतिज्ञेत “ ब्रिटिश राजवटीपुढे इत : पर मान तुकविणे हा मानवजात व परमेश्वर या दोघांच्या विरुद्ध गुन्हा आहे . आपण जर स्वेच्छेने मदत करण्याचे बंद केले व कर देण्याचे थांबविले व हिनवणूक होत असतानाही हिंसा केली नाही तर या अमानुष राजवटीचा अंत होण्याची खात्री आहे , " असे जाहीर करण्यात आले . ही प्रतिज्ञा घेणाऱ्या जनतेची ब्रिटिशांच्या अमानुष राजवटीचा अंत करण्यासाठी हा अखेरचा व निकराचा लढा आहे अशी समजूत झाली व त्याप्रमाणे सोक्षमोक्ष करण्यासाठी लढ्यास सिद्ध झाली . पण या लढ्याबाबत काँग्रेसश्रेष्ठींची कल्पना निराळी होती . मोठ्या लढ्यांचा देखावा उभा करून ब्रिटिश साम्राज्यवाद्यांवर दडपण आणून व काही हक्क पदरात पाडून अखेर तडजोड करण्याचा त्यांचा बेत होता व त्या दृष्टीने ते एकेक पाऊल टाकीत होते . काँग्रेसच्या घोषणांनी दबून ब्रिटिश सरकार ताबडतोब तडजोडीस पुढे न आल्यामुळे काँग्रेस पुढाऱ्यांना लढा सुरू करावा लागला . त्या लढ्यात जनतेने मोठ्या प्रमाणावर व हिरीरीने भाग घेतल्यामुळे त्या लढ्याला विराट असे स्वरूप प्राप्त झाले . त्या विराट , क्रांतिकारक स्वरूपामुळे काँग्रेसश्रेष्ठी व ब्रिटिश साम्राज्यवादी असे दोघेही घाबरले व त्यामुळे दोघांनी आपसात विचार करून ' गांधी - आयर्विन करार ' जन्मास आणला . काँग्रेसच्या भांडवली पुढारीपणाने जनतेच्या उठावास पुन्हा खच्ची केले . ब्रिटिश भांडवलदारांनी परत काँग्रेसश्रेष्ठींच्या तोंडाला पाने पुसली . महात्मा गांधींना गोलमेज परिषदेहून मोकळ्या हातांनीच परत पाठवले . काँग्रेसने परत लढा पुकारला व अखेर तोही काही दिवसांनी परत घेऊन निवडणुकीच्या सनदशीर राजकारणाकडे आपले लक्ष वळविले . १९३७ च्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमताने निवडून देऊन जनतेने तिच्या हाती अनेक प्रांतांतील राजसत्ता दिली ; पण राजसत्तेचा उपयोग काँग्रेसश्रेष्ठींनी मुख्यत : भांडवलदारवर्गाच्या हितासाठीच केला . काँग्रेसचे उजव्या गटाचे श्रेष्ठी व डावे गट यांच्यात याच काळात जोराने संघर्ष व्हावयास सुरुवात झाली . १९३४ साली मार्क्सवादी पक्ष म्हणून समाजवादी पक्ष जन्माला आला . देशगौरव सुभाषचंद्र बोस यांचे व काँग्रेसचे उजवे पुढारी यांच्यातील बेबनाव विकोपास गेला . १९३३ नंतर युरोप खंडात हुकूमशहा हिटलर मुसोलिनी यांची आक्रमक आमदानी सुरू झाली . त्याचप्रमाणे जपानी फॅसिस्टांनी चीनविरुद्ध चढाई सुरू केली . त्या साम्राज्यवाद्यांच्या प्रक्षोभक आक्रमणखोर धोरणामुळे नव्या साम्राज्यशाही युद्धाचे ढग सर्वत्र जमू लागले. 'या परिस्थितीचा फायदा घेऊन काँग्रेसने ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्ध युद्ध पुकारावे, ' अशी या देशातील डावे गट मागणी करू लागले. पण सत्तेला चिकटलेल्या व जनतेच्या लढ्याला बिचकणाऱ्या काँग्रेसने आपले सनदशीरच राजकारण पुढे चालवले. अखेर १९३९च्या सप्टेंबर महिन्याच्या एक तारखेस दुसऱ्या जागतिक साम्राज्यशाही युद्धाची तुतारी फुकली गेली. या युद्धाबाबत काँग्रेसने डळमळीत व धरसोडीचे धोरण अवलंबिले. जनतेचा लढा उभा न करता ब्रिटिश साम्राज्यवाद्यांवर चळवळीचे दडपण आणून आपल्या हाती सत्ता घेण्याचा काँग्रेसच्या पुढारीपणाचा कावा होता. याच हेतूने वैयक्तिक कायदेभंगाची मिळमिळीत चळवळ सुरू करण्यात आली व अखेर तिला व्यापक स्वरूप येण्याची भीती निर्माण होताच तीही परत घेण्यात आली . त्यानंतर 'क्रिप्स योजना' पुढे येऊन तडजोडीचे राजकारण परत सुरू झाले. पण त्यानंतर युद्धात पडलेल्या जपानने झपाट्याने हिंदुस्थानच्या दारावर ठोठावण्यास सुरुवात केल्यामुळे, ' ब्रिटिश साम्राज्यवाद्यांचे दिवाळे वाजणार ; त्यांच्याशी तडजोड करण्यात अर्थ नाही, 'असा विचार करून महात्मा गांधी व इतर काँग्रेस पुढारी हे परत लढ्याची ब्रह्मदेश व्यापून भाषा बोलू लागले व त्यातूनच ८ ऑगस्ट १९४२ चा 'चले जाव' चा ठराव जन्मला. ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी या ठरावाला दाद न देता काँग्रेसवरच तुफान चढाई करून काँग्रेसश्रेष्ठींना व इतर पुढाऱ्यांना तडकाफडकी तुरूंगात टाकले. साम्राज्यशाहीने दिलेल्या या उद्दाम आव्हानाला जनतेने स्वयंस्फूर्तीने जोराचे व क्रांतिकारक स्वरूपाचे जनतेचा उठाव ठेचण्यासाठी साम्राज्यशाहीने क्रूर व पाशवी दडपशाही करून देशाला रक्ताचे स्नान घातले. तरीही जनतेने आपला उत्तर दिले.लढा तसाच पुढे चालू ठेवला.

जनताक्रांतीने बिचकलेले काँग्रेस पुढारी

थोड्या कालाच्या लढ्याने दबून साम्राज्यशाही तडजोडीला तयार होईल ही कल्पना चुकीची ठरली. म्हणून १९४३ सालापासूनच हा लढा आपला नाही ' असे महात्मा गांधींनी काँग्रेसच्या वतीने जाहीर केले व आपल्या नव्या तडजोडवादी धोरणाच्या मार्गावर पहिले पाऊल टाकले. हे धोरण प्रत्यक्ष स्वरूपात येण्यास १९४७ साल उजाडावे लागले. 'हा लढा आमचा नाही' असे भांडवलशाही पुढारीपणाने जाहीर केले तेव्हापासून हिंदी भांडवलदारांच्या व ब्रिटिश मक्तेदारांच्या बलाबलात फरक होत होता. १९४२ चा लढा चालू असताना व त्यानंतरच्या काळात हिंदी भांडवलदारांच्या परिस्थितीत फरक पडत होता आणि ब्रिटिश साम्राज्यशाहीशी हातमिळवणी करण्याची भूमिका तयार होत होती. काँग्रेस पुढारी तुरूंगातून आल्याबरोबर त्यांनी आपले तडजोडीचे डावपेच खेळण्यास आरंभ केला. १९४२ चा लढा आपला नाही ' ही गोष्ट त्यांनी प्रथम जाहीर केली. १९४३ सालापासून झालेल्या कोणत्याही उठावाचे पुढारीपण त्यांनी केले नाही ; एवढेच नव्हे, तर जनतेचा प्रत्येक उठाव खच्ची करण्याचाच प्रयत्न त्यांनी केलेला आहे.

*भांडवलदारी हातमिळवणीची मूलभूत आर्थिक व राजकीय कारणे*

महायुद्ध जसजसे तीव्र होऊ लागले व लांबत चालले तसतसे वासाहतिक अर्थव्यवस्थेतील विरोध जास्त तीव्र होऊ लागले. युद्धांचे ओझे जनतेच्या पाठीवर सरकविण्याचा प्रयत्न साम्राज्यशाही जास्तीच जोराने करू लागली. साम्राज्यशाहीच्या धोरणामुळे खालावलेल्या शेतकऱ्यांचे दारिद्र्य या काळात आणखीच वाढले. अन्नधान्याखाली असलेल्या शेतीचे प्रमाण कमी झाले, एकरी उत्पादन घटले आणि त्यामुळे शेवटी हिंदुस्थानला अन्नधान्यासाठी परदेशावर अवलंबून राहावे लागू लागले. या काळात चलनवाढ भयंकर होऊन मालाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढून काळ्या बाजाराला ऊत आला.१९४३ साली बंगालमध्ये उपासमार सुरू झाली व त्यात लक्षावधी जनता मृत्युमुखी पडली . १९२१-२२ साली अन्नधान्याखाली १५.८६ कोटी एकर जमीन होती,ती १९४१-४२ साली १५.६५ कोटी एकर झाली.१९२१-२२ साली धान्याचे उत्पादन ५.४३ कोटि टन होते ते १९४१-४२ साली ४.५७ कोटी टन झाले. याच काळांत शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजाही वाढला. १९३१ साली शेतकऱ्यांच्या कर्जाचा आकडा ९०० कोटी होता तो १९३७ साली १८०० कोटी झाला व पुढील काळात तो २५०० कोटीपर्यंत तरी सहज जाऊन पोहोचलेला आहे. खेडेगावातील शेतीचे तुकडे आणखी लहान झाले आणि शेतमजुरांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढू लागली. १९४४-४५ साली शेकडा ३६ लोकांना काहीही जमीन नव्हती . शेकडा १७ लोकांना १ एकर जमीन होती व शेकडा २२ लोकांना ३ व त्याहीपेक्षा कमी एकर जमीन होती . शेतमजुरांची संख्या १९३१ साली ३.५ कोटी होती ती १९४४-४५ साली ६.५ कोटी झाली. साम्राज्यशाहीच्या किमती वाढविण्याच्या धोरणाचा परिणाम या दारिद्र्यात वाढ होणे हाच झाला. शेतकऱ्यांच्या धान्याच्या किमती उत्पादनखर्चापेक्षा कमी करण्यात आल्या ; परंतु शेतकऱ्यांना शेतीला व उपभोगासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती मात्र योग्य प्रमाणात नियंत्रित केल्या गेल्या नाहीत. सर्वसाधारण किमतीचा आकडा १९३९ साली शंभर धरून १९४७ च्या जानेवारीत २९७ व १९४७ च्या डिसेंबरात ३१४ याप्रमाणे वाढलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जवळजवळ १/२ ने घट होऊन त्याचे दारिद्रय पराकोटीला पोहोचले. या काळात झालेली चलनवाढ ही या महागाईचे एक अत्यंत प्रमुख कारण आहे . युद्धासाठी इंग्लंडला लागणारा माल हिंदुस्थानात खरेदी करून त्याच्या बदलात हिंदुस्थानला माल देण्याच्या ऐवजी ती रक्कम बैंक ऑफ इंग्लंडमध्ये हिंदुस्थानच्या नावे जमा मांडण्यात आली आणि या जमेइतक्या किमतीच्या नोटा हिंदुस्थानात छापण्यात आल्या . याच पद्धतीने हिंदुस्थानची १६०० कोटी रुपयांची पौंडी शिल्लक निर्माण झाली आहे. शेतकरीवर्गाप्रमाणे कामगारवर्गावरही अरिष्टाचे परिणाम झाले. त्याचे १९३९चे जीवनमान १०० धरल्यास १९४४-४५ साली २५० , १९४५-४६ साली २५३ , १९४६-४७ साली २६१ आणि १९४७-४८ साली २९२ याप्रमाणे त्यात वाढ झाली आहे. १९३९च्या पूर्वी- १९२३ साली मुंबईचा कामगार १.५४ पौंड धान्य रोज घेई. तर सक्तमजुरीच्या कैद्याला तुरुंगात १.८७ पौंड आणि साध्या कैद्याला १.६९ पौंड एवढे रेशन रोज दिले जाई. याचा अर्थ- तुरुंगातील कैद्याला मिळते तेवढे अन्नही विकत घेण्याची ऐपत कामगाराला नव्हती. पुढील काळात ही परिस्थिती तीव्रच होत गेली आहे. यावरून कामगारांच्या वाढत्या पिळवणुकीची कल्पना येईल. या काळात कामगारवर्गाच्या संख्येतही वाढ झाली. १९४३ साली एकंदर फॅक्टरींची संख्या १३२०९ व फॅक्टरी कामगारांची संख्या २४ लक्ष ३६ हजार ३१२ याप्रमाणे होती. १९४३ साली खाणी कामगारांची संख्या ३ लक्ष ४९ हजार ३६१ होती. १९४४ साली रेल्वेत काम करणाऱ्यांची संख्या ८ लक्ष ८९ हजार ५६ होती आणि मळ्यात काम करणाऱ्यांची १० लक्ष ७९ हजार ३४८ होती. १९४६ साली कामगारसंख्येत खालीलप्रमाणे वाढ झाली होती.

फॅक्टरी कामगार ---------- २६ लाख

अनियंत्रित कारखान्यातील कामगार ---------- १० लाख

चहाचे मळे ---------- ११.६५ लाख

रेल्वे ( सुमारे ) ---------- १० लाख

१९४७ साली कामगारांचे जीवनमान अहमदाबादेत ३२२ , सोलापूर ३६० , कानपूर ४०८ याप्रमाणे होते . हे सरकारी आकडे आहेत . परंतु प्रत्यक्ष वाढ यापेक्षा कितीतरी जास्त झाली आहे . कामगार - शेतकऱ्यांच्या वाढत्या दारिद्र्याबरोबर भांडवलदारांचे नफे मात्र वाढत होते .

भांडवलदारांचा नफा ( १ ९२८-१०० )

सन ..................सर्व धंदे..................कापड गिरण्या

१९३१.................. ७२.४.................. १५४.६

१९४०.................. ९९.९.................. २२०.१

१९४१.................. १३५.४..................४८९ .१

१९४२ ..................१६९ .४..................७६०.७

१९४६..................१५९ .४ ..................६८०.५

यावरून या काळात भांडवलदारांना झालेल्या प्रचंड नफ्याची कल्पना येईल . व्यापाऱ्यांनी काळ्या बाजारात मिळविलेल्या पैशाचे आकडे यात नाहीत . अशा रीतीने स्वतंत्र वाढीला लागणारा भांडवलाचा अभाव नष्ट झाला , आपल्या प्रगतीची सुखस्वप्ने भांडवलदार वर्गाला पडू लागली . यातूनच ' बाँबे प्लॅन'चा जन्म झाला .

*आर्थिक लढ्याची लाट*

कामगार , शेतकरी व मध्यमवर्गाची ही जी पिळवणूक चालली होती , त्या विरुद्ध हे वर्ग लढत होतेच . १९४६-४७ या कालात या लढ्यांनी तीव्र स्वरूप धारण केले . कामगार , शेतकरी , मध्यमवर्ग , लष्कर , पोलीस इत्यादी सर्व वर्गातील व व्यवसायांतील लोकांत या कालात आर्थिक मागण्यांवर संप झाले , १९४७ साली झालेल्या संपात १३२३२५३ इतके कामगार सामील झाले . शिवाय प्राथमिक शिक्षकांचा संप , पोस्ट कामगारांचा संप , बिहारमधील पोलीस शिपायांचा संप इत्यादी अनेक संप झाले . खलाशांच्या बंडाच्या स्वरूपात या असंतोषाच्या लाटेने उच्चांक गाठला . या बंडात हिंदुस्थानातील मुंबईसारख्या पहिल्या प्रतीच्या औद्योगिक शहरात खलाशांना पाठिंबा देण्यासाठी वर्गजागृत कामगार लढ्यात उतरला आणि ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या लष्करी शक्तीला त्याने मुंबईच्या रस्त्यात मोर्चे उभारून तोंड दिले . कामगारांची व नाविक दलातील खलाशांची ही विराट ताकद आणि क्रांतिकारक आवेश बघून हिंदी भांडवलदारवर्ग त्याचप्रमाणे ब्रिटिश साम्राज्यशाही गर्भगळीत झाली आणि त्या दोघांचे सहकार्य निश्चित झाले . अशा रीतीने भांडवलदारवर्गाचे वाढते नफे आणि जनतेचे वाढते उठाव यामुळे भांडवलदारांचीही भूमिका निश्चित झाली . या वर्गाने आजपर्यंतचे आपले डळमळीत धोरण सोडून दिले , ब्रिटिश साम्राज्यशाहीशी कायमची हातमिळवणी केली आणि तो निश्चितपणे अँग्लो - अमेरिकन साम्राज्यशाहीच्या गोटात जाऊन बसला . हिंदी भांडवलदारवर्गाप्रमाणे साम्राज्यशाहीची परिस्थितीही या हातमिळवणीला पोषक बनली होती . युद्धात ब्रिटिश साम्राज्यशाही कमकुवत झाली होती . हिंदी भांडवलदारांची ताकद वाढली होती . तसेच अमेरिकेच्या व्यापारी आक्रमणाची भीती वाढली होती आणि राजकीय परिस्थिती अशी होती , की ब्रिटनला जुन्या पद्धतीने हिंदुस्थानावरची आपली सत्ता कायम ठेवणे अशक्य झाले होते . या विशिष्ट परिस्थितीमुळे माउंटबॅटन - योजना व त्यावर आधारलेली हिंदी भांडवलदार व ब्रिटिश ब्रिटिश साम्राज्यशाही यांची हातमिळवणी जन्माला आली व हिंदुस्थानाला वरकरणी राजकीय स्वातंत्र्य मिळाले . पण हिंदुस्थानातील काँग्रेस पुढाऱ्यांनी ब्रिटिश राष्ट्रकुलात राहण्याचा निर्णय घेऊन व इंग्रजांचे मार्गदर्शन पत्करून मिळालेल्या राजकीय स्वातंत्र्यालाही खच्ची केले . वसाहतींना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यावाचून त्या खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊ शकत नाहीत . हिंदुस्थान हा आर्थिक दृष्ट्या परकीय साम्राज्यवादी भांडवलदारांच्या हातात राहिल्याने मिळालेले राजकीय स्वातंत्र्य जनतेच्या दृष्टीने बेगडी स्वातंत्र्य आहे .

लेनिन - स्टॅलिनचे इशारे*

" बेगडी स्वातंत्र्य बहाल करून जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न साम्राज्यशाही करते व त्याला वसाहतीतील राष्ट्रीय भांडवलदार मदत करतात ! ” ही गोष्ट लेनिनने १ ९ २० सालीच नमूद केली होती . १ ९ २० साली भरलेल्या इंटरनॅशनलच्या तिसऱ्या काँग्रेसला ' राष्ट्रीय आणि वसाहत देशांचा प्रश्न ' या संबंधीच्या सिद्धांताचा जो प्रास्ताविक मसुदा लेनिनने सादर केला त्यात तो म्हणतो , “ साम्राज्यशाही सत्तांनी राजकीय दृष्ट्या स्वतंत्र राज्य निर्माण करण्याच्या मिषाने आपल्यावर औद्योगिक , आर्थिक व लष्करी दृष्ट्या सर्वस्वी अवलंबून असलेली राज्ये निर्माण करून जनतेची जी फसवणूक चालविली आहे ती जनतेसमोर चव्हाट्यावर मांडून तिचे खरे स्वरूप स्पष्टपणे समजून येणे आवश्यक आहे . " * ( * राष्ट्रीय व वसाहत देशाचा प्रश्न- लेनिन पा . ६ ) राष्ट्रीय भांडवलदारांचे विश्वासघातकी स्वरूप स्पष्ट करताना स्टालिनने १ ९ २४ साली सांगितले होते की , “ क्रांतीला साम्राज्यशाहीपेक्षाही जास्त घाबरणारा , स्वत : च्या राष्ट्राच्या हितापेक्षा स्वत : च्या थैल्यांची काळजी जास्त वाहणारा , भांडवलदारांचा हा विभाग , सर्वात श्रीमंत आणि सर्वात वजनदार असणारा हा विभाग , स्वत : च्या देशांतील कामगार - शेतकऱ्यांच्या विरुद्ध साम्राज्यशाहीशी गट्टी करून क्रांतीच्या कट्टर शत्रूच्या गोटांत पूर्णपणे सामील होत आहे . " . ( • एशियाटिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोरील भाषण )

माउंटबॅटन पतिपत्नींचा आशीर्वाद*

१५ ऑगस्ट १९४७ रोजी हिंदुस्थानची फाळणी होऊन हिंदुस्थान व पाकिस्तान हे दोनही देश स्वतंत्र ' असल्याची घोषणा करण्यात आली . दोन्ही देशांत माउंटबॅटन पतिपत्नीच्या आशीर्वादाखाली स्वातंत्र्य सोहळे करण्यात आले . हिंदुस्थानच्या फाळणीमुळे देशाच्या निरनिराळ्या भागांस जोडणारे आर्थिक दुवे तोडले गेले आणि दोनही देशांची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली . तागाचे कारखाने आणि कापड गिरण्या हिंदुस्थानात तर ताग व बराचसा कापूस पाकिस्तानात . शेतीचे उत्पन्न पाकिस्तानात जादा तर हिंदुस्थानात त्या मानाने कारखानदारी मोठी . अशा परिस्थितीत दोघांचेही परावलंबित्व वाढले . त्यांच्यात सतत वाद निर्माण होऊ लागले . देशाच्या फाळणीच्या योजनेने जातियतेचा भस्मासुर निर्माण झाला . या दोनही राष्ट्रांचे सततचे वैर हे ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या हातातील एक हत्यार बनले . त्यांच्यातील व्यापारी युद्धाचा फायदा इंग्लंड - अमेरिकन मक्तेदारांना घेता येणे शक्य झाले . १५ ऑगस्ट ' सत्तांतरानंतर ' स्वातंत्र्य मिळाल्याचा पुकारा करण्यात आला . परंतु हिंदुस्थानाला खरेखुरे स्वातंत्र्य मिळाले नाही . हिंदुस्थानातील ८०० ते ९ ०० कोटी रुपयांचे परकीय भांडवल कायम राहिले . त्यास संरक्षणही मिळाले . कोळसा , चहा , ज्यूट या महत्त्वाच्या उद्योगधंद्यांवरील ब्रिटिश मक्तेदारांची मालकी कायमच राहिली . इतकेच नव्हे , तर १९४७ च्या नंतर परकीय भांडवलाचे आक्रमण अधिकच झाले . १९४८ मध्ये ५ कोटी १० लक्ष रुपयांचे नवे परकीय भांडवल हिंदुस्थानात गुंतविले गेले तर १ ९ ४ ९ मध्ये तो आकडा १६ कोटी ९ ० लक्षावर गेला . 'सत्तांतरा'नंतर हिंदुस्थानात नवे नवे अँग्लो इंडियन व अमेरिकन इंडियन संयुक्त कारखाने व कंपन्या स्थापल्या गेल्या . या कंपन्यांतून व कारखान्यांतून इंग्लंड व अमेरिकेत तयार झालेला माल हिंदुस्थानचा केवळ छाप मारून बाजारात येत आहे . या कंपन्यांतून परदेशी भांडवल एकंदर भांडवलाच्या ४ ९ % पेक्षा अधिक असू नये असा कायदा लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी करण्यात आला . प्रत्यक्षात राष्ट्रहितासाठी ( ? ) ४ ९ % पेक्षा अधिक टक्के परदेशी भांडवल या कंपन्यांतून घालण्याची सरकारने परवानगी दिली असून त्या भांडवलाच्या संरक्षणाची हमीही घेतली आहे . अँग्लो - अमेरिकन साम्राज्यवादी मक्तेदारांच्या भांडवलाचा हा ओघ हिंदुस्थानच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा पायिक ( Base ) धंद्यासाठी होत नसून विमानतळ , लष्करी तळ , वाहतुकीची साधने , दारूगोळ्यांचे कारखाने यांच्या विकासासाठी होत आहे . या देशात मूलभूत उद्योगधंदे वाढवू नयेत यासाठी अँग्लो - अमेरिकन साम्राज्यवादी निकराचे प्रयत्न करीत आहेत . हिंदी सरकार औद्योगिक विकासाच्या कोणत्याही प्रकारच्या मूलगामी योजना आखीत नाही . उलटपक्षी “ आणखी कित्येक वर्षे आपणास परकीय भांडवलाची गरज भासणार आहे , ' असे हिंदी सरकार व हिंदी भांडवलदार एकमुखाने स्पष्ट शब्दात सांगत आहेत . अशा परिस्थितीत ‘ साम्राज्यशाही राष्ट्रांना कच्चा माल पुरविणारा देश ' हे हिंदुस्थानचे स्थान अजूनही कायम आहे .

भांडवलवाल्यांची हिंदी घटना

‘ सत्तांतरा'नंतर बनविलेल्या घटनेत आजच्या स्वातंत्र्यविरोधी राजवटीचे उत्तम प्रतिबिंब पाहावयास सापडते . घटनेत खाजगी मालकीच्या हक्कास मान्यता नष्ट करता येणार नाही , ' असे म्हणून राष्ट्रीय व परकीय दिली आहे . ' मोबदला दिल्यावाचून खाजगी मालकी काळात भांडवलास , सरंजामशाही हितसंबंधाना संरक्षण दिले आहे . सामाजिक हितासाठी ( Public Safty ) सक्तीने नागरिकांना कामास लावण्याची ( संप फोडण्याचा उपयोग करण्याची ) , आणीबाणीच्या दडपशाहीचे कायदे करण्याची सवलत या घटनेत आहे . राजप्रमुखांना घटनात्मक स्थान देऊन त्यांना हिटलरी अधिकार या फॅसिस्ट घटनेत दिले आहेत . ' स्वातंत्र्यानंतर ' साम्राज्यवादी नोकरशाही चौकट कायम राहिली ; त्यांतील व्यक्ती बदलल्या नाहीत . इतकेच नव्हे , तर १ ९ ४२ चा क्रांतिलढा क्रूरपणाने दडपून टाकण्यात ज्यांनी हिरीरीने पुढाकार घेतला त्यांना बढत्या मिळाल्या . आझाद हिंद फौजेस सैन्यात स्थान मिळाले नाही . संस्थानिकांना मोठमोठे तनखे देण्यात आले . या सर्व घटनांचा स्पष्ट अर्थ असा की , हिंदुस्थानात ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी आपली आर्थिक , राजकीय व लष्करी राजवट नव्या स्वरूपात कायम केली आहे . हिंदुस्थानावरील ब्रिटिशांची आर्थिक हुकूमत अबाधितपणे राहिली आहे , तसेच या देशातील अर्थव्यवस्थेचे वासाहतिक स्वरूप कायमच आहे . १ ९ १७ पूर्वीच्या आणि आजच्या परिस्थितीत फरक एवढाच , की साम्राज्यशाहीविरोधी हिंदी स्वातंत्र्यलढ्याचा विश्वासघात हिंदी भांडवलदारवर्गाने साम्राज्यवाद्यांशी हातमिळवणी करून जनतेच्या पिळवणुकीवरच चालणारे शासनयंत्र आपल्या स्वत : च्या हातात घेतले . अँग्लो - अमेरिकन साम्राज्यवाद्यांचे हस्तक बनलेले पटेल - नेहरू सरकार परराष्ट्रीय राजकारणातही त्या साम्राज्यवाद्यांच्या ओंजळीने पाणी पीत आहे . आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणत्याही गटात सामील न होता स्वतंत्र भूमिका ठेवल्याची कितीही जोराची घोषणा नेहरू सरकार करीत असले तरी ती गोष्ट खरी नाही . तिसऱ्या गटाची घोषणा ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आहे .

रक्तविहीन क्रांती

हिंदुस्थानातील सत्तांतर हे इंग्लंडच्या हृदयपालटाने झाले असे भासवून ब्रिटिश राजवटीबद्दल जनतेला वाटणारी आत्यंतिक चीड नष्ट करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या भांडवलदारी पुढारीपणाने केला . इंग्रजांनी जे थोडेफार हक्क भांडवलदारांना दिले , त्यापूर्वी स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाग घेणाऱ्या लाखो लोकांचे रक्त सांडले . पण या बलिदानाकडे डोळझाक करून काँग्रेस पुढारी ‘ अहिंसेने , रक्ताचा थेंब न सांडता सत्ता मिळविली , ' असा खोटा प्रचार करून क्रांतिकारक जनतेच्या मनात अहिंसेची पेरणी करू लागले . पंडित नेहरूंनी इंग्लंडची वारी केली . ब्रिटिश राष्ट्रकुटुंबात राहण्याचा निर्णय जनताविरोधाकडे दुर्लक्ष करून घेण्यात आला . ब्रिटिश राष्ट्रकुटुंब हे ब्रिटिश साम्राज्याचे नवे नाव आहे एवढेच ! या राष्ट्रकुटुंबात राहण्याचा नेहरू सरकारने घेतलेला निर्णय हा हिंदुस्थानचे स्वातंत्र्य बेगडी असल्याचा , काँग्रेसचे भांडवलदारी पुढारीपण प्रतिक्रांतिकारक झाल्याचा सर्वात मोठा ढळढळीत पुरावा आहे . या सरकारने काश्मीरचा प्रश्न साम्राज्यवाद्यांनी नेमलेल्या लवादाकडे सोपविला आहे व गंगाजळीच्या बाबतीत इंग्लंडला सोयीची अशी व्यवस्था केली आहे .

नेहरू सरकारचा साम्राज्यशाहींना पाठिंबा

अँग्लो - अमेरिकन साम्राज्यवाद्यांच्या हुकूमावरून नेहरू सरकार ब्रह्मी जनतेला चिरडून टाकणाऱ्या थाकिन न सरकारला मदत करीत आहे . मलायन जनतेविरुद्ध लढण्यासाठी गुरखा फलटणींची भरती करीत आहे . व्हिएटनाममध्ये प्रस्थापित हो चि - मिन्ह सरकारला मान्यता देण्याचे नाकारीत आहे . अमेरिकन भांडवलदारांनी आपले भांडवल हिंदी धंद्यांत गुंतवावे म्हणून त्यांचा अनुनय पं . नेहरूनी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात केला व अमेरिकन भांडवलदारांच्या सर्व अटी मान्य असल्याची ग्वाही दिली . २१ ऑगस्ट १९४९ रोजी उत्तर अमेरिकेतील ' अलायन्स ' पत्राला दिलेल्या मुलाखतीत पं . नेहरूंनी अमेरिकन भांडवलदारांना खालील आश्वासने दिली .

१ ) हिंदुस्थानातील उद्योगधंद्यांत गुंतविलेल्या परदेशी भांडवलावरील नफ्याची शाश्वती व भांडवलाला संरक्षण .

२ ) हिंदुस्थानात मिळालेल्या नफ्याचे डॉलर्समध्ये रूपांतर करण्याची मोकळीक .

३ ) जर धंद्याचे राष्ट्रीयीकरण केले तर त्यात गुंतविलेले परकीय भांडवल नुकसानभरपाईसकट डॉलर्सच्या चलनात परत करणे .

४ ) पुढची निदान १० वर्षेपर्यंत उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयीकरण न करणे .

अशा प्रकारे नेहरू सरकार अँग्लो - अमेरिकन साम्राज्यवाद्यांचे पूर्णपणे हस्तक बनले आहे . वसाहत देशातील स्वातंत्र्यलढे चिरडून टाकण्यासाठी साम्राज्यवादी गट ज्या कारवाया करीत आहे त्यावर नेहरू बुरखा घालीत आहेत . नेहरूंची अमेरिकेतील वारी व त्यांनी अमेरिकेत भांडवलदारांना दिलेली आश्वासने , पूर्व बंगाल प्रश्नावर नुकताच झालेला नेहरू - लियाकत करार , त्यास अमेरिकेचा मिळालेला आशीर्वाद , नेहरूंची कराचीस भेट व दुसऱ्या दिवशी लियाकतअल्लींचे अमेरिकेस प्रयाण , हिंदुस्थानच्या गंगाजळीचे डॉलर्समध्ये रूपांतर करण्याची मागणी , या सर्व घटना एकच गोष्ट सिद्ध करतात आणि ती म्हणजे नेहरूंचे भांडवली सरकार साम्राज्यवाद्यांचे खरे हस्तक बनले असून त्या नात्याने ते हिंदी राष्ट्रीय स्वातंत्र्याचे शत्रू बनले आहे . चीनमधील लोकशाही क्रांती आणि मलाया , इंडोनेशिया , व्हिएटनाम , ब्रह्मदेश , फिलिपाइन्स येथील स्वातंत्र्यलढे यामुळे युद्धखोर साम्राज्यवादी गटाचे धाबे दणाणले असून ते हिंदुस्थान हा आपला शेवटचा बालेकिल्ला म्हणून लढविणार आहेत , हे उघड आहे . कारण साम्राज्यशाही मगरमिठीतून हिंदुस्थानची सुटका याचा अर्थ जगाची साम्राज्यशाहीतून मुक्तता असाच जवळजवळ आहे . हिंदी जनतेच्या चाललेल्या क्रांतिकारक लढ्याच्या या आणीबाणीच्या प्रसंगी आजपर्यंत हिंदी जनतेच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या मोर्चात सामील असलेल्या या मोर्चाच्या भांडवली पुढारीपणाने ब्रिटिश साम्राज्यशाहीशी हातमिळवणी करून ते प्रतिक्रांतिकारक बनले आहे . १५ ऑगस्ट १९४७ रोजी हिंदुस्थानला मिळालेले राजकीय स्वातंत्र्य हे हातमिळवणीचा परिणाम आहे . हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याचा कितीही गवगवा करण्यात येत असला तरी हिंदुस्थान व ब्रिटन यांच्या आर्थिक संबंधात मूलभूत फरक झालेला नाही . हिंदुस्थानची अर्थव्यवस्था अजूनही वासाहतिक स्वरूपाचीच आहे . गेल्या पंचवीस वर्षांत हिंदी स्वातंत्र्यलढ्यातून कम्युनिझमच्या रोपट्याचा योग्य विकास अजिबात झाला नाही . या दुर्दैवी परंतु महत्त्वाच्या घटनेमुळेच हिंदी राष्ट्रीय भांडवलदार आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा अशा रीतीने विश्वासघात करू शकले .

वाढती आर्थिक दुःस्थिती

साम्राज्यवाद्यांच्या गोटात सामील होऊन त्यांचे हस्तक बनलेले नेहरू सरकार अशा स्वातंत्र्यविरोधी कारवाया करीत असताना जनतेची परिस्थिती आत्यंतिक खालावत आहे . आर्थिक अरिष्ट दिवसेंदिवस तीव्रच होत असून कामगार , शजमजूर , गरीब व मध्यम शेतकरी आणि शहरी श्रमिक जनता या सर्वांची जीवन परिस्थिती अधिकाधिक बिकट होत आहे . १९४९ मध्ये १८० कोटी रुपयांचे धान्य आयात करावे लागले असून हे ओझे हिंदी खजिन्यास न झेपणारे असे आहे . आहे . सर्वसाधारण राहणीमानाचा इंडेक्स नंबर १९४७ झाला , सप्टेंबर १९४९ मध्ये तो ३७९ .८ पर्यंत चढून मूल्यकपातीमुळे या किमतीत आणखी भर पडणार जूनमध्ये २९४.२ होता , ४८ जूनमध्ये ३८२.२ इतका नंतर अवघ्या एकच महिन्यात ३९३.३ इतका झाला . अन्नधान्याचा इंडेक्स नंबर १९४७-४८-४९ च्या जूनमध्ये अनुक्रमे २८७ , ३७७ , ३८१ इतका होता . १९४९ च्या सप्टेंबरमध्ये तो ४०३.१ झाला व ऑक्टोबरमध्ये ४०६.८ पर्यंत चढला . डाळीच्या किमतीचे आकडेही असेच चढले . जून १९४७-४८ अनुक्रमे ३०६ , ४०८ इतके होते . १९५० मध्ये ४६ ९ .६ वर चढले होते . याच वेळी प्रमुख उद्योगधंद्यांच्या उत्पादनात घट होत आहे . कापूस , ज्यूट व साखर या प्रमुख उद्योगधंद्यांच्या उत्पादनात १९४९ मध्ये अनुक्रमे १० , १०.४ व ६.९ इतकी टक्के कपात झाली आहे . १९३९ -४० पासून १९४७ ते ४८ पर्यंत दर माणशी उत्पादन धान्य ३८८ पौंडांवरून ३५० पौंडांवर आले आणि कापड १६ वारांवरून ११ वारांवर आले . आर्थिक अरिष्ट अशा प्रकारे अधिकाधिक तीव्र होत आहे . महागाई बेसुमार वाढत आहे . गिरण्या बंद पडत आहेत आणि बेकारीचा आकडा फुगत चालला आहे . लेबर एम्प्लॉयमेंटमध्ये नावे नोंदविलेल्या लोकांची संख्या १९४७ मध्ये ५.७ लक्ष असून १ ९ ४८ मध्ये ८.७१ लक्ष इतकी वरती गेली . * ( * कॉमर्स अॅन्युअल नंबर १९४९ ) ५ मे १९५० रोजी प्रसिद्ध झालेल्या फसव्या सरकारी आकड्यांवरूनही मुंबई राज्यात कापडाच्या दहा गिरण्या संपूर्णपणे बंद असून १३ गिरण्यांच्या काही पाळ्या बद आहेत ; त्यामुळे २७१३६ कामगार बेकार झाले आहेत . १८ गिरण्या बंद करण्याच्या नोटिसा भांडवलदारांचे नफे मात्र वाढतच आहेत . बॉम्बे डाईंग , दिल्याने ३१२१९ कामगार बेकार होणार आहेत . कामगारवर्गाचे बेकारीचे आकडे अशा रीतीने सारखे वाढत असताना तसेच उत्पादनघट होत असताना काबेजिया , सेंच्युरी , गोकाक , स्वदेशी , कोहिनूर , टाटा या कापडाच्या गिरण्यांचा एकूण नफा १९४७ साली १८३.७५ लक्ष रुपये होता , तो १९४८ साली ५११.३३ लक्ष इतका झाला . काळ्या बाजाराचे , कर चुकविल्याचे आकडे यात अर्थातच नाहीत . s ( ऽ इस्टर्न इकॉनामिस्ट डिसेंबर १ ९ ४ ९ खास अंक ) कामगारवर्गाप्रमाणेच शेतकरीवर्गाची स्थितीही बिकट होत चालली आहे . शेतमजुरांची संख्या १९३१ मध्ये ३ कोटी ५० लक्ष होती ती १९४४ मध्ये ६ कोटी ८० लक्षापर्यंत वाढली आणि त्यानंतरच्या काळात कितीतरी भर पडलेली आहे . शेतमजूर हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतो . त्याच्या कामाच्या तासांस मर्यादा नसते . तो कधी पोटावारी तर कधी पैशावारी काम करत असतो . वर्षातील कित्येक दिवस त्यास अर्धपोटी राहावे लागते . त्याची पिळवणूक भांडवलदारी आणि सरंजामदारी या दोन्ही पद्धतीने आणि आत्यंतिक स्वरूपात चालत असते . या वर्गाच्या पगाराचा पाया ठरला नाही . राहणीचे मान आज भयंकर वाढलेले असूनही शेतमजुराचे दर दिवसाचे उत्पन्न ८ ते १२ आणे इतकेच असते असे सरकारी चौकशी कमिटीने ता . २३ एप्रिल १९५० रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालात नमूद केले आहे . * ( * अॅग्रिकल्चरल लेबर इन्क्वायरी कमिटी , भारत मुंबई ) वाढती महागाई , सरकारी कायदे , शेतीधंद्याची वाताहत आणि व्यापारी व सावकारी भांडवलदारांची पिळवणूक यामुळे गरीब शेतकऱ्याची जीवन परिस्थिती पूर्णपणे असह्य झाली आहे . या वर्गातील लोक फार मोठ्या प्रमाणावर शेतमजुराच्या वर्गात फेकले जात आहेत . लहानशा जमिनीच्या तुकड्यावर आपले कुटुंब सांभाळणे त्यास अशक्य झाले आहे . शेतीधंद्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंच्या किमती सतत वाढत असताना सरकारने धान्याच्या किमती मात्र उत्पादन किमतीपेक्षाही कमी ठरवून दिल्या आहेत . यामुळे गरीब व मध्यम शेतकऱ्यांची दैना अधिकाधिक होत असून त्यांचे जीवनच वाढत्या प्रमाणात धोक्यात येत आहे . वाढती महागाई व बेकारी यामुळे शहरी मध्यमवर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे . मुंबई सरकारने " नुकतीच आपणास कपात करावी लागेल व त्यामुळे ७००० सुशिक्षितांना बेकारीच्या खाईत टाकावे लागेल , " अशी कबुली दिली आहे . निरनिराळ्या धंद्यांतून तसेच ऑफिसांतून माणसे सरसहा काढून टाकली जात आहेत . सुशिक्षित बेकारांचा तांडा हा आपल्या समाजातील एक नित्याची गोष्ट होऊन बसली आहे . या सर्व वर्गाबरोबरच लहान व्यापारी , छोटे कारागीर , फेरीवाले व शहरी श्रमिक या मध्यमवर्गातील विविध थरांची वाताहत होत आहे . फार मोठ्या प्रमाणावर ते धंदा बसलेल्या बेकारांच्यात फेकले जात आहेत . शिक्षक , कारकून व इतर लहान सर्व दर्जाचे नोकर हे सर्व वाढती महागाई व अपुरा महागाईभत्ता यामुळे मेटाकुटीस येत आहेत . घर , सरपण , अन्न , धान्य , मीठ , दूध या दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंसंबंधी आपल्या गरजा भागविताना त्यांच्या जीवनाची घडी सर्वस्वी विस्कटत आहे . घरमजुरी करणारी माणसेही या परिस्थितीमुळे बेजार होऊन त्यांची भयंकर वाताहत होत आहे .

*भांडवली सरकारची दडपशाही*

अशा प्रकारे जनता आर्थिक अरिष्टाने बेजार झालेली असताना , तिचे जीवन अधिकाधिक कठीण होत असताना आणि बहुसंख्य जनतेला कमीत कमी मानव्याच्या पातळीवर जगता येणे अशक्यप्राय झाले असताना साम्राज्यवाद्यांना मदत करण्यासाठी आणि देशांतील भांडवलशाही टिकवून धरण्यासाठी हिंदी भांडवलदारांचे नेहरू सरकार , कामगार , शेतकरी व इतर श्रमजीवी जनतेवर नवनवे हल्ले चढवीत आहे . र - शेतकऱ्यांच्या पुढाऱ्यांना तुरुंगात टाकीत आहे ; त्यांच्या संघटनांवर अमानुष हल्ले चढवून त्या दडपून टाकीत आहे . तुरुंगात लाठीमार , गोळीबार या घटना आपल्या देशात नित्याच्याच होऊन बसल्या आहेत . बेकारी , कामवाढ , पगारकाट या कामगारांवरील हल्ल्यांत सरकार अनेक प्रकारे मदत भांडवलदारवर्गाच्या हितसंबंधाचे रक्षण करीत आहे . कापडाच्या किमती या सरकारने सतत वाढवून दिल्या आहेत . साखरेच्या गोंधळात कारखानदारांनी व व्यापाऱ्यांनी जो भरमसाट नफा मिळविला त्याबाबत सरकारने प्रतिकारात्मक काही केले नाही , उलट साखरेच्या किमती वाढवून दिल्या . एक्सेस प्रॉफिट टॅक्स कमी केले ; भांडवलदारवर्गावरील करांचे ओझेही कमी केले ; प्राप्तीवरील कर चुकविणाऱ्यांपुढे लाचारीने लोटांगण घातले . भांडवलदारांना अशाप्रकारे सावरून धरीत असताना सामान्य जनतेवरील करात वाढ करून , लष्करावर भरमसाट जादा खर्च करणारे अंदाजपत्रक पास करून , धान्याच्या किमती उत्पादनखर्चाहूनही कमी ठरवून , बेकारी , पगारकाट व कामवाढ यास उचलून धरून नेहरू सरकार आर्थिक अरिष्टाचे ओझे जनतेवर लादीत आहे . हे सर्व करीत असतानाच जनतेचा विरोध मोडून काढण्यासाठी आपल्या राजकीय सत्तेचा पुरेपूर वापर हे सरकार करीत आहे . कामगारांच्या संघटना उखडून काढण्यासाठी सरकारने इंटकसारखी आपली हस्तक कामगार संघटना स्थापन केली असून कामगारवर्गात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत . लोकशाही न्याय्य बहुमताला पायाखाली तुडवून कामगारवर्गाच्या इतर प्रातिनिधिक संघटनांना मारून टाकण्याच्या हेतूने सरकार आज इंटक संघटनेला मान्यता व भरमसाट सवलती देत आहे . सर्वोदयाच्या नावाखाली कामगारांचा संपाचा हक्क , जनतेचा प्रतिकाराचा हक्क , न्यायाने झगडण्याचा हक्क , माणुसकीने जगण्याचा हक्क , हे हुकूमशाही सरकार हिसकावून घेत आहे . ट्रेड युनियन बिल , लेबर डिस्प्यूट ॲक्ट , प्रतिबंधक स्थानबद्धतेचा कायदा यासारखे जनतेचे हक्क हिरावून घेणारे फॅसिस्ट कायदे हे सरकार पास करीत आहे . इंडेक्स नंबरची उघडउघड खोटी जुळवाजुळव करून रजिस्टर न केलेल्या संपलढ्यांची नोंद न करून सरकारी आकडे सजविण्याची अव्वल दर्जाची फॅसिस्ट पद्धती हे सरकार स्वीकारीत आहे . याप्रमाणे वाढत्या पिळवणुकीमुळे व चढत्या हुकूमशाही दडपशाहीमुळे जनतेचा असंतोष तीव्र होत आहे . तथाकथित स्वातंत्र्य व काँग्रेस सरकारविषयीचा जनतेचा भ्रमनिरास झपाट्याने होत आहे . देशातील वातावरण जनतेच्या क्रांतिकारी चळवळीस अधिकाधिक अनुकूल बनत आहे . एकजुटीची हाक देत कामगारवर्ग आपण होऊन पुढे येत आहे .

*हुकूमशाही सरकार विरुद्ध जनतेची लोकशाही चढाई

अशा परिस्थितीत साम्राज्यवाद्यांच्या गोटात सामील झालेल्या नेहरू सरकारविरोधी जनतेची लोकशाही आघाडी उघडून जनतेचा लोकशाही मोर्चा बळकट करणे आज शक्यतेच्या कोटीत येत आहे.युद्धखोर साम्राज्यवाद्यांशी हातमिळवणी केलेल्या नेहरू सरकारविरुद्ध राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी लोकशाही मोर्चा उभारून जागतिक शांतता आघाडी बळकट करण्यास अनुकूल परिस्थिती आज अस्तित्वात येत आहे . परंतु असे असूनही या परिस्थितीत अनुरूप अशी राजकीय चळवळीची पातळी वाढली नाही . आर्थिक अरिष्टाच्या मानाने राजकीय चळवळीची तीव्रता तर अगदीच कमी आहे . हे असे होण्याचे कारण उघड आहे . या देशात क्रांतिकारक परिस्थिती झपाट्याने निर्माण होत असली तरी त्या परिस्थितीचा योग्य फायदा घेणारा क्रांतिकारक पक्ष या देशात नाही . जनतेचा हा भडकलेला असंतोष संघटित करून हिंदी जनतेचा साम्राज्यशाहीविरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लोकशाही मोर्चा उभा करण्याचे ऐतिहासिक कार्य हिंदी कम्युनिस्ट पक्षाचे आहे ; पण त्या पक्षाचे मध्यमवर्गीय पुढारीपण हे कलकत्त्याच्या अधिवेशनानंतर ट्रॉटस्कीवादी साहसबाजीला ( Adventurism ) बळी पडले असून या ऐतिहासिक कार्यास पाठमोरे झाले आहे . मार्क्सवादी म्हणविणाऱ्या पार्टी पुढाऱ्यांनी हे असे क्रांतीस अपायकारक धोरण स्वीकारल्यामुळे मार्क्सवादविरोधी पवित्रा घेऊन सुधारणावाद अवलंबणाऱ्या समाजवादी पक्षाच्या पुढाऱ्यांना जनता चळवळीच्या आघाडीत फाटाफूट करून तिला खच्ची करण्याची नामी संधी मिळाली आहे . हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाच्या हातून १ ९ ३० सालापासून तो आजतागायत अनेक लहान मोठ्या चुका झाल्या व त्यामुळे या देशातील क्रांती होण्याच्या कार्यात बिघाड होऊन ते कार्य अधिक अवघड होऊन बसले आहे . हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाच्या हातून कोणत्या चुका झाल्या व त्या का झाल्या याची विस्तृत चर्चा करणे अवश्य आहे .

३ : हिंदी कम्युनिस्ट पक्ष पुढारीपणाच्या घोडचुका

*हिंदी कम्युनिस्ट पक्ष*

या काळात हिंदी कामगारवर्ग संघटित होत होता . वर्गजागृत बनत होता . त्यांचा स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून प्रस्थापित झालेला होता व या पक्षाला कम्युनिस्ट इंटरनॅशनलचे मार्गदर्शनही मिळाले होते . मार्गदर्शनात जनतेच्या असंतोषाला ' वर्गीय वळण ' देऊन तिच्या लढ्याचे पुढारीपण घेऊन राष्ट्रीय चळवळीवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करणे हे क्रांतिकारी चळवळीचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट सांगितले होते . असे असताना १९३० साली जेव्हा जनतेच्या असंतोषाला साम्राज्यशाहीविरोधी राजकीय लढ्याचे स्वरूप दिले गेले तेव्हा कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यमवर्गीय पुढारीपणाने या लढ्याला पाठिंबा दिला नाही . एवढेच नव्हे , तर विरोध केला . कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या वर उल्लेख केलेल्या ठरावात असे स्पष्ट सांगितले होते की , “ वासाहतिक देशांतील साम्राज्यशाहीविरोधी चळवळीचे स्वरूप राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्याचे असते आणि या राष्ट्रीय घटकाचा प्रभाव त्या त्या व्यावहारिक परिस्थितीच्या अनुरोधाने अत्यंत काळजीपूर्वक तपासणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे . " . परंतु ही गोष्ट हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यमवर्गीय पुढारीपणाला कधीच उमगली " भांडवली राष्ट्रीय सुधारणावादाचे मध्यमवर्गावर , शेतकरी जनतेवर आणि कामगारवर्गाच्या काही भागावर चळवळीच्या पहिल्या अवस्थेत तरी निदान , जे वजन असते , त्यामुळे त्याला सरंजामदारी साम्राज्यशाही गटापेक्षा निराळेच महत्त्व प्राप्त होते . या गोष्टीचे जर कमी महत्त्वमापन झाले तर त्यामुळे पंथ प्रवृत्तीचे धोरण आखले जाऊन कम्युनिस्ट पक्ष बहुजनसमाजापासून अलग पडतो , ' इशारा कम्युनिस्ट इंटरनॅशनलने दिला . ( • रेव्होल्युशनरी मुव्हमेंट इन कॉलनीज ॲण्ड सेमी कॉलनीज पा . २४ नॅशनलने देऊनसुद्धा हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाने हीच चूक पुन : पुन्हा केली आहे . ) १९३० सालच्या चळवळीत शेतकरीवर्ग व मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात सामील झाला . या चळवळीत खंडबंदी , करबंदी इत्यादी लढ्यांचे प्रकार हाताळले गेले . हजारो लोक तुरुंगात डांबले गेले . १९३२ च्या मे महिन्यात तुरुंगात गेलेल्यांची संख्या ८०,००० होती , ती १९३३ च्या मार्च महिन्यात १,२०,००० इतकी झाली . लाठीहल्ला व गोळीबार या घटना नित्याच्या होऊन बसल्या . या चळवळीचा विस्तार व खोली इतक्या प्रचंड प्रमाणावर असताना व जनतेच्या प्रत्येक थरातील लोक यात सामील झाले असताना , या लढ्यात सामील होणे , चळवळीचे नेतृत्व करणे व चळवळ वरच्या पायरीवर नेणे या गोष्टी न करता कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यमवर्गीय पुढारीपणाने “ या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्याचे पुढारीपण राष्ट्रीय सुधारणावादी आहे ” असा वरपांगी जहाल वाटणारा प्रचार करून त्या नावाखाली लढ्याला विरोध केला . या सर्वांचा परिणाम असा झाला , की ( १ ) राष्ट्रीय चळवळीवरील भांडवलदारी पुढारीपणाचे प्रभुत्व अबाधित राहिले आणि त्यांनी जनतेच्या साम्राज्यशाहीविरोधी उठावाचा उपयोग साम्राज्यशाही वर दडपण आणून काही सवलती मिळविण्याकडे करून घेतला . ( २ ) या लढ्यात सामील झालेल्या जनतेला वर्गीय दृष्टिकोन येऊ शकला नाही आणि त्यामुळे तिच्या राजकीय जाणिवेत योग्य वाढ झाली नाही व तिला सुसंगत क्रांतिकारक दृष्टी येऊ शकली नाही . ( ३ ) जनतेवरील भांडवली राष्ट्रीयत्वाची पकड कायम राहिली . ( ४ ) सर्वसाधारण जनतेत कम्युनिझमचे बीज पेरले गेले नाही .

*कम्युनिस्ट पक्षाने इंटरनॅशनलचे मार्गदर्शन डावलले*

कम्युनिस्ट पुढारीपणाच्या या काळातील चुकीच्या धोरणावर टीका करताना वँग मिंग याने असे म्हटले आहे की , पंथ प्रवृत्तीच्या धोरणाने साम्राज्यशाहीविरोधी जनतेच्या उठावापासून अलग राहिल्याने कम्युनिस्ट गटांनी वास्तविक रीत्या जनतेवरील गांधीवादाची आणि राष्ट्रीय सुधारणावादाची पकड कायम ठेवण्यास मदतच केली आहे . वरील उतारा वँग मिंग याने १९३५ सालातील कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या ७ व्या काँग्रेसला जो वसाहतीसंबंधीचा अहवाल सादर केला त्यातील आहे . या काँग्रेसचे काही अहवाल हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाने १९४३ साली प्रसिद्ध केले आहेत . परंतु त्यात वॅगचा अहवाल नाही .

डिमिट्रॉव्हचा आदेश

१९२८ सालानंतर १९३६ साली कम्युनिस्ट इंटरनॅशनलची ७ वी काँग्रेस भरली . मध्यंतरीच्या काळात जर्मनीत फॅसिस्ट राजवट प्रस्थापित झाली होती . अशा परिस्थितीत जागतिक परिस्थितीचा आढावा घेऊन कम्युनिस्ट इंटरनॅशनलने पुन्हा एकदा हिंदी कम्युनिस्ट पक्षाला मार्गदर्शन केले . या ७ व्या काँग्रेससमोर ' फॅसिझम आणि कामगारवर्गाची एकजूट ' यासंबंधी कॉ . डिमेट्रॉव्ह याने जो अहवाल सादर केला त्यात म्हटले आहे की , " हिंदुस्थानातील कम्युनिस्ट पक्षाने राष्ट्रीय सुधारणावादी पुढारीपणाखाली होत असलेल्या चळवळीसकट सर्व साम्राज्यशाहीविरोधी जनतेच्या चळवळींना पाठिंबा द्यावा , त्यात भाग घ्यावा व त्यांचा विस्तार वाढवावा . आपले राजकीय व संघटनात्मक स्वातंत्र्य कायम ठेवून त्यांनी हिंदी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये भाग घेणाऱ्या सर्व संघटनांत प्रत्यक्ष कार्य करावे आणि त्यांच्यात राष्ट्रीय क्रांतिकारक गट प्रस्थापित होण्याच्या क्रियेस मदत करावी या सर्वांचा हेतू हिंदी जनतेचा ब्रिटिश साम्राज्यवादीविरुद्ध चाललेला स्वातंत्र्यलढा तीव्र करणे हाच आहे . + ( + पीस फ्रंट टू पीपल्स पब्लिशिंग हाऊस , पा . ६८ ) १९३५ सालची इंटरनॅशनलची ७ वी काँग्रेस हा कामगारवर्गाच्या जागतिक लढ्यातील एक टप्पा आहे . या काळात जर्मनी , इटली व जपान या देशांत अस्तित्वात असलेल्या फॅसिस्टवादाचे विवेचन करून या भीषण संकटाला तोंड देण्यासाठी एकजुटीचा कार्यक्रम कसा आखावा याबाबतीत संपूर्ण मार्गदर्शन या काँग्रेसमध्ये केलेले आहे . वासाहतिक देशांनाही या काँग्रेसमध्ये मार्गदर्शन करून इंटरनॅशनलने आपली ऐतिहासिक जबाबदारी पार पाडली आहे .

क्रांतिकारक परिस्थिती

१९३७ सालापासून राजकीय क्षितिजावर युद्धाचे ढग जमू लागले होते व शेवटी १९३९ साली दुसऱ्या साम्राज्यशाही महायुद्धाचा भडका उडाला . दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा फॅक्टरींची एकूण संख्या १०४६६ असून त्यात १७५११३७ कामगार काम करीत होते , तसेच खाण कामगार ३५३००० , रेल्वे कामगार ६९९१५३ , मळ्यातील कामगार १०४५७५४ होते . या काळात जॉईन्ट स्टॉक कंपन्यांत गुंतविलेले भांडवल २५१ कोटी रुपये होते . या काळात कामगारांची संख्या संघटना पुष्कळच वाढली होती व हे साम्राज्यशाहीविरोधी राष्ट्रीय क्रांतीच्या लढ्याचे नेतृत्व करण्यासारखी भौतिक परिस्थिती निर्माण झाली होती . युद्ध सुरू झाले त्या वेळेला काँग्रेस मंत्रिमंडळे अधिकारावर होती . युद्ध सुरू होण्याच्या आधीपासूनच साम्राज्यशाही युद्धाला विरोध करण्यास आपल्या ठरावाने काँग्रेस बांधली गेलेली होती . जनतेची युद्धविरोधी भावनाही अत्यंत तीव्र होती . परंतु काँग्रेसचे भांडवली पुढारीपण मात्र तडजोडीच्या मार्गानेच पावले टाकीत होते . जनतेची युद्धविरोधी भावनाही तीव्र होऊन तिने प्रत्यक्ष लढ्याचे स्वरूप धारण करू नये हाच त्याचा प्रयत्न होता . म्हणूनच प्रथम मंत्रिमंडळाने राजीनामे दिले व नंतर वैयक्तिक सत्याग्रहाचा फार्स करण्यात आला . परंतु ब्रिटिश साम्राज्यशाहीवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही . शेवटी क्रिप्सची शिष्टाई वाया जाऊन ' छोडो भारत'ची घोषणा जन्माला आली व ४२ ची चळवळ सुरू झाली .

कम्युनिस्टांचे धरसोडीचे धोरण

१९३७ ते १९४१ या काळातील कम्युनिस्ट पक्षाचे धोरण कधी पंथ प्रवृत्तीचे तर कधी सुधारणावादी संधिसधूपणाचे होते . कम्युनिस्ट काँग्रेसमध्ये होते ; परंतु जनतेला काँग्रेसच्या भांडवली पुढारीपणाच्या दडपणाखालून सोडविण्यासाठी योग्य तो क्रांतिकारक प्रयत्न त्यांनी केला नाही . सोलापुरातील कम्युनिस्टांच्या पुढारीपणाखाली असलेला कामगारवर्ग हा जाणूनबुजून काँग्रेसबाहेर ठेवण्यात आला . काँग्रेसशी संयुक्त मोर्चा उभारण्याचे कार्य अत्यंत तांत्रिक स्वरूपात अमलात आणण्यात आले . १९३९ साली युद्ध सुरू झाल्यानंतर जेव्हा रामगड काँग्रेसच्या प्रतिनिधींच्या निवडणुकी झाल्या तेव्हा जनतेतील युद्धविरोधी भावना अत्यंत तीव्र होती . त्याचप्रमाणे महागाईभत्त्यासाठी दोन महिन्यांचा संप करून कामगारवर्गाने आपल्या जागृतीचे व संघटनेचे प्रदर्शन केले होते . अशा वेळेला निवडणुकीचा फायदा घेऊन सर्व जनतेला युद्धविरोधावर व राष्ट्रीय लढा सुरू करण्याच्या मागणीवर एकत्र आणणे , त्या पुढारीपणाचे डळमळीत स्वरूप उघड करणे व या जनतेचे पुढारीपण करणे , काँग्रेसमधील भांडवली पुढारीपणाला जनतेच्या चळवळीच्या पाठीमागे पुढारीपणाने काँग्रेसमधील भांडवली पुढारीपणाशी तडजोड करून महाराष्ट्रात काँग्रेसच्या निवडणुकी फरपटत नेणे शक्य होते . परंतु असे न करता बिनविरोधी करण्याचा करार केला .

लोकयुद्धाची घातकी घोषणा

१९४१ च्या जूनमध्ये जर्मनीने रशियावर हल्ला केल्यामुळे लढाईचे स्वरूप पालटले . या पालटलेल्या स्वरूपाची दखलगिरी हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाने १९४१ च्या डिसेंबरपर्यंत घेतली नाही आणि ज्या वेळेला घेतली तेव्हा ती साम्राज्यशाही , सरंजामशाही यांचे आसन दृढ करणाऱ्या हिंदी कम्युनिस्टप्रणित ' लोकयुद्धाचे ' अत्यंत चुकीचे धोरण स्वीकारून घेतली . सोव्हिएट युनियनच्या ताकदीविषयी चुकीची कल्पना आणि हिंदुस्थानातील साम्राज्यशाहीविरोधी लढ्याच्या राष्ट्रीय स्वरूपासंबंधी घेतलेली चुकीची भूमिका हीच या बदललेल्या धोरणाची कारणे होती . हे घातकी धोरण स्वीकारल्यानंतर कम्युनिस्ट पुढारीपणाला आपल्या राष्ट्रीय आणि वर्गीय वैशिष्ट्याचा पूर्ण विसर पडला . त्यांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीशी हस्तांदोलन करून हिंदी क्रांतिकारक शक्तीवर हल्ला चढविला . युद्धप्रयत्नांना अडथळा होतो म्हणून प्रत्येक संप हा राजकीय पराभव आहे ' असे ठरविले . भांडवलदारांना सोयीस्कर अशी कामवाढ लादून घेतली ; शेतकऱ्यांकडून सक्तीने वसूल केल्या जाणाऱ्या अवास्तव लेव्हीविरुद्ध व शेतकऱ्यास देण्यात येणाऱ्या कमी भावाबद्दल काहीही चळवळ केली नाही ; मॅक्सवेलच्या हिंदुस्थानविरोधी कारवायांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला . या काळातील कम्युनिस्ट पुढारीपणाचे धोरण दुरुस्तीवादी ( Revisionist ) होते .

कम्युनिस्ट पुढारीपणाने काँग्रेसश्रेष्ठींना देशाचे पुढारीपण बहाल केले*

१९४१ च्या अखेरीस कम्युनिस्ट पुढारीपणाने अशी भूमिका घेतल्याने काँग्रेसमधील भांडवलदारी राष्ट्रवादी पुढारीपणाचा मार्ग मोकळा झाला . जनतेच्या असंतोषाचे पुढारीपण वर्गीय दृष्टिकोनाने घेऊन त्यांना क्रांतीच्या अवस्थेपर्यंत नेण्याची थोडीफार कुवत असलेला एकटाच मार्क्सवादी पक्ष अशा रीतीने साम्राज्यशाहीच्या गोटात जाऊन क्रांतिविरोधी बनलेला पाहून हिंदी भांडवलशाही पुढारीपणाने आपले डावपेच निश्चित केले . १९४१-४२ सालातील युद्धपरिस्थिती ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या दृष्टीने अत्यंत आणीबाणीची होती . तिच्या हिंदुस्थानातील सत्तेचा सामाजिक पाया संपूर्णपणे हादरलेला होता व जपानचा हल्ला हिंदुस्थानवर होण्याची शक्यता निर्माण झाली होती . हे सर्व पाहून भांडवलशाही पुढारीपणाने आपले लढ्याचे तंत्र ठरविले . लढा करावयाचा तो झटपट करावयाचा , थोडक्यात आटपायचा व काही झाले तरी तो आपल्या पुढारीपणाखालून जाऊ द्यावयाचा नाही , असे त्याचे तंत्र होते . या तंत्रानुसार त्यांनी आपली पावले टाकली . कम्युनिस्ट बाजूला पडल्याने जनतेला फसविण्याचा त्यांचा मार्ग निष्कंटक झाला . फॅसिस्ट आक्रमणाला विरोध करून साम्राज्यशाहीला बरबाद करण्यास समर्थ असलेल्या देशव्यापी चळवळीची पूर्ण आखणी व तयारी न करता केवळ दडपण आणण्याच्या बुद्धीने जनतेच्या लढ्याच्या गर्जना सुरू झाल्या . यातूनच ' भारत छोडो ' आणि ' करेंगे या मरेंगे ' या घोषणा निर्माण हिंदी घोषणा झाल्या . जनतेच्या या साम्राज्यशाहीविरोधी भावनेच्या प्रतीक होत्या आणि म्हणूनच त्यांनी जनतेच्या मनाची संपूर्ण पकड घेतली . आणि जनता लढ्यात उतरली . या लढ्यात जनतेने लढ्याचे नवेनवे मार्ग शोधून काढले . साताऱ्यातील प्रति सरकार हे एका नव्या क्रांतिकारक मार्गाचे प्रतीकच होते . परंतु कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यमवर्गीय पुढाऱ्यांनी या सरकारला चोर , दरोडेखोर ठरविले व आझाद सैन्याची उभारणी करणाऱ्या नेताजींवर व इतर देशभक्तांवर जनतेला चिड आणणारे आरोप केले . कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाने वेळोवेळी झालेल्या चुका , कम्युनिस्ट इंटरनॅशनलने व कॉमिन्फॉर्मने दिलेल्या आदेशाप्रमाणे आत्मटीकेच्या रूपाने मान्य केल्या आहेत असे असले तरी कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाच्या या धोरणाचे परिणाम फार भयंकर झाले .

कम्युनिस्ट पक्ष साधारण जनतेपासून अलग पडला , एवढेच नव्हे , तर कामगारवर्गातूनही तो अलग पडला . यामुळेच कामगारवर्गाचा मोठा भाग भांडवलदारांच्या आणि मध्यमवर्गीय समाजवाद्यांच्या आहारी जाऊ शकला व कामगारांत त्यांना स्थान प्राप्त झाले . शेतकरीवर्ग भांडवलदारी पुढारीपणाच्या फार मोठ्या प्रमाणात आहारी गेला आणि मध्यमवर्ग कम्युनिस्ट विचारसरणीपासून दूर गेला . केवळ राष्ट्रीयच नव्हे , तर आंतरराष्ट्रीय कामगार चळवळीच्या दृष्टीनेही या धोरणाचे परिणाम फार भीषण झाले . आंतरराष्ट्रीय राजकारणात ' क्रांतिकारक जनतेचे अग्रदल ' हे सोव्हिएट युनियनचे स्थान हिंदी जनतेच्या डोळ्याआड झाले . " हिंदी कम्युनिस्ट पक्षाचे स्वातंत्र्यलढाविरोधी धोरण हे सोव्हिएट रशियाच्या मार्गदर्शनामुळेच आखले गेले , ” सा अपप्रचार करण्याची मोक्याची संधी भांडवलदारवर्गाला मिळाली . त्यामुळे हिंदी जनतेच्या मनात रशियाबद्दल साशंक भावना निर्माण होऊन ती जागतिक क्रांतिकारक शक्तीपासून काही काळ दुरावली . त्याचा परिणाम असा झाला , की जगाची दोन गटांत विभागणी झाली आहे अशा आजच्या परिस्थितीत काँग्रेस सरकारच्या वरपांगी तिसऱ्या गटाच्या घोषणेने जनतेच्या काही विभागांची फसवणूक होऊ शकली . कम्युनिस्ट पक्षाचा कलकत्ता काँग्रेसचा ठराव व आत्मटीका वाचून , कम्युनिस्ट पक्षाचे पुढारीपण जनतेची सर्व क्रांतिकारक शक्ती संघटित करून लोकशाही क्रांतीचा मोर्चा उभारण्याचे आपले ऐतिहासिक कार्य पार पाडील , अशी अपेक्षा आजपर्यंतचे या पुढारीपणाचे घातकी धोरण व मध्यमवर्गीय स्वरूप विसरून जाऊन काही लोक करीत होते . परंतु १९४८ ते १९५० च्या अत्यंत महत्त्वाच्या काळात कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाने जे अक्षम्य चुकीचे धोरण आखले त्याला मार्क्सवादाच्या इतिहासात तोड नाही . कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाने कलकत्त्यानंतर नवीन आखलेली व्यूहरचना व डावपेच हेच मूलत : चुकीचे असल्याने हा पक्ष आपली ऐतिहासिक जबाबदारी पार पाडण्यास असमर्थ ठरला . या पुढारीपणाने केलेली अत्यंत मोठी चूक म्हणजे त्यांनी हिंदी क्रांतीच्या अवस्थेचे केलेले निदान . हिंदी क्रांतीच्या डावपेचांची चर्चा करणाऱ्या प्रबंधात आंध्र पक्षाच्या पुढारीपणावर टीका करताना असे म्हटले आहे की , ' आपण क्रांतीच्या ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत रशियन क्रांतीच्या दोन्ही ( फेब्रुवारी आणि ऑक्टोबर ) अवस्थांची लक्षणे अंशत : आहेत . ” याचा अर्थ असा की , हिंदी परिस्थितीत भांडवली लोकशाही क्रांतीची आणि कामगार क्रांतीची सरमिसळ झाली आहे . यातून असा निष्कर्ष निघतो की , यापुढचा हिंदुस्थानचा लढा ही वासाहतिक जनतेच्या लोकशाहीच्या स्वरूपाच्या राजसत्तेच्या प्रस्थापनेसाठी होणार नसून जवळजवळ कामगारांच्या हुकूमशाहीच्या प्रस्थापनेसाठी होणार आहे .

हिंदी क्रांतीच्या अवस्थेचे हे विवेचन अनेक दृष्टीने चूक आहे . क्रांतीच्या अवस्थेचे विवेचनच चुकीचे केल्यामुळे त्या विवेचनाच्या आधारे केलेल्या घोषणा व ठरविलेले डावपेच चुकीचे असणेही साहजिकच आहे . या पक्षाच्या पुढारीपणाच्या हातून झालेल्या चुकांचा पाढा थोडक्यात वाचणे जरूर आहे .

( १ ) हिंदुस्थान हा वासाहतिक देश आहे . आज हिंदी भांडवलदारांची सत्ता जरी येथे असली तरी हा वर्ग साम्राज्यवाद्यांचा हस्तक बनला आहे . आणि प्रमुख गोष्ट म्हणजे हिंदुस्थानची आर्थिक चौकट अजूनही वासाहतिक स्वरूपाचीच आहे . म्हणून हिंदी क्रांती कम्युनिस्ट इन्टरनॅशनलने वर्णन केलेल्या क्रांतीच्या अवस्थांच्या प्रकारापैकी तिसऱ्या प्रकारात पडणारी म्हणजे वासाहतिक देशांतील लोकशाही क्रांती आहे . या क्रांतीच्या अवस्थेची रशियन क्रांतीच्या अवस्थेशी तुलना करणे चुकीचे आहे ; कारण क्रांतीपूर्व रशिया हा मागासलेला परंतु भांडवलशाही साम्राज्यवादी देश होता . उलट कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाने वरील प्रबंधात असे म्हटले आहे की , “ रशिया हिंदुस्थानपेक्षा निराळ्या प्रकारचा व निराळ्या वर्गात मोडणारा पुढारलेला देश होता असे मानणे चूक आहे . तसेच “ हिंदुस्थान व क्रांतीपूर्व रशिया यांच्यात औद्योगिक विकासाच्या बाबतीत कोणतीही भिन्नता असली तरी ती गुणात्मक स्वरूपाची नाही . " वासाहतिक हिंदुस्थान व क्रांतीपूर्व साम्राज्यशाही भांडवलशाही , रशिया यांच्यात गुणात्मक फरक नाही असे म्हणणे व वासाहतिक हिंदी क्रांतीला जवळजवळ कामगार क्रांतीच्या अवस्थेला नेऊन बसविणे म्हणजे मार्क्सवाद - लेनिनवादाला ट्रॉटस्कीवादी विकृत स्वरूप देणेच आहे .

( २ ) त्याचप्रमाणे हिंदी क्रांतीतील निरनिराळ्या हिंदी कामगारांचा अत्यंत डळमळीत ' मित्र असे वर्णन केले आहे . वासाहतिक क्रांतीमध्ये मध्यम शेतकरी कामगारवर्गाचा दोस्त असतो हा लेनिन स्टॅलिनवादी सिद्धांत लाथाडून मध्यम शेतकऱ्याचे वरीलप्रमाणे वर्णन करून कम्युनिस्ट पुढारीपणाने कामगारवर्गाचा हा मित्र गमावण्याची परिस्थिती निर्माण केली . हे सर्व करीत असताना या मध्यमवर्गीय पुढारीपणाला आपण मार्क्सवादात मौलिक भर घालीत आहोत या कल्पनेचा असा कैफ चढला होता , की त्यांनी चिनी जनतेच्या क्रांतीचा पुढारी माओ यास ' मार्क्सवाद समजत नाही ' असेही धाडसी विधान करण्यास कमी केले नाही .

( ३ ) जी गोष्ट व्यूहरचनेच्या बाबतीत तीच स्थिती डावपेचाच्या बाबतीत झालेली आहे . आणि या बाबतीत तर हे पुढारीपण ट्रॉट्स्कीवादाच्या पराकोटीला पोचले आहे . वाढत्या क्रांतिकारक डावपेचांचा अवलंब करण्याची आवश्यकता प्रतिपादन करताना हे पुढारीपण म्हणते की , " क्रांतीच्या लढ्यात सुरवात प्रथमत : क्रांतिशक्ती दुभंगलेल्या असतानाच होत आहे . " हे विधान लेनिन स्टॅलिनच्या विरुद्ध आहे . क्रांतीच्या उठावाच्या बाबतीत सर्वसाधारण सहानुभूतीची तटस्थता स्वीकारावयास तयार असल्यावाचून क्रांतीची भाषा जनता , कमीत कमी व बोलणे शुद्ध साहस आहे . क्रांतीच्या लढ्यासंबंधीचे हे चुकीचे विधान करून कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाने तुरुंगातील लढ्याचे तंत्र शोधून काढले . लढ्याच्या या मार्गाचा अशा प्रकारे उपयोग केल्याचे उदाहरण लेनिन , स्टॅलिन , डिमिट्रॉव्ह , टॉग्लियाटी माओ यांच्यासारख्या क्रांतीच्या डावपेचावर प्रभुत्व असलेल्या क्रांतिकारकांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कामगार चळवळीत आढळत नाहीत . या एकांगी व साहसवादी तंत्राचा अवलंब करून कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाने कामगार - शेतकऱ्यांचे पुढारी नाहक बळी दिले आणि देशातील हुकूमशाही सत्तेला सर्वच डाव्या पक्षांवर दडपशाहीचा वरवंटा फिरविण्याची संधी दिली .

( ४ ) हिंदी जनतेच्या सध्याच्या राजकीय जागृतीच्या पातळीचे कम्युनिस्ट पुढारीपणाने केलेले निदानही अगदी अवास्तव आहे . " हिंदी परिस्थिती प्रत्यक्ष क्रांतिकारक उठावापर्यंत जाऊन पोचली आहे " असे निदान करून पक्षाच्या पुढारीपणाने क्रांतिलढा बऱ्याच वरच्या अवस्थेला पोचल्यानंतर अमलात आणावयाचे लढ्याचे मार्ग स्वीकारले . ( नऊ मार्चचा रेल्वे संप , सार्वत्रिक संप इत्यादी ) परंतु पक्षाचे प्रत्यक्ष परिस्थितीचे निदान चुकीचे असण्याने पक्षाच्या या घोषणा साहसबाजीच्या घोषणा ठरल्या . त्यास कामगारवर्गाने व जनतेने पाठिंबा दिला नाही .

( ५ ) कामगारांचा काही भाग इन्टकमध्ये असताना , काही सोशलिस्ट पुढारीपणाच्या वर्चस्वाखाली असताना व बराच विभाग असंघटित असताना हिंदी परिस्थिती क्रांतिकारक उठावापर्यंत जाऊन पोचली आहे , असे समजणे म्हणजे आपली जागृती जनतेवर लादणे होय . परंतु पक्षाची जागृती जनतेवर लादल्याने जनता जागृत होत नाही . कम्युनिस्ट पक्षाने फक्त जहाल घोषणा देण्याचे तंत्र अवलंबिले आहे . एखाद्या पक्षाने केवळ जहाल घोषणा केल्याने जनता त्या पक्षाच्या मागे जात नाही तर या घोषणा बरोबर असल्याचे जनतेला आपल्या राजकीय अनुभवातून कळावे लागते . जनतेचे आर्थिक व राजकीय दैनंदिन लढे लढविताना , धीमेपणाने तिला क्रांतिकारक शिकवण देण्याचे सोडून कम्युनिस्ट पक्षाचे पुढारीपण केवळ अवास्तव घोषणा करीत आहे . हिंदी क्रांतिकारक परिस्थितीचे अवास्तव निदान करून लढ्याची वाढती तंत्रे अमलात आणीत असताना कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाने लेनिन स्टॅलिनवादी शिकवणुकीस हरताळ फासला आहे , कम्युनिस्ट इंटरनॅशनलचा इशारा धाब्यावर बसविला आहे . नव्या व जहाल घोषणांविषयी इंटरनॅशनलच्या कार्यक्रमात पुढील स्पष्ट इशारा दिला आहे . " नव्या व जहाल घोषणांची मजल गाठताना पार्टीन लेनिनवादाच्या राजकीय डावपेचांची मूलभूत भूमिका लक्षात घेऊन आपली दिशा ठरविली पाहिजे . पार्टीच्या धोरणाच्या बिनचूकपणाविषयी बहुजनसमाजाला स्वत : च्या अनुभवानेच ज्यामुळे खात्री पटेल अशा रीतीने बहुजनसमाजाला क्रांतिकारक भूमिकेपर्यंत नेऊन पोचविण्यात नेतृत्व करण्याची लायकी हा या डावपेचाचा गाभा आहे . " x ( x प्रोग्रॅम ऑफ दि कम्युनिस्ट इंटरनॅशनल , ६ वी काँग्रेस , पान ६७. ) कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाने क्रांतीच्या जहाल घोषणा करण्यात मार्क्सवादी डावपेचाचा गाभा दृष्टीआड केला आहे . क्रांतिलढ्यातील प्रत्येक वर्गाचे स्थान ठरविताना , डावपेच आखताना व हिंदी जनतेच्या राजकीय जाणिवेचे निदान करताना या पुढारीपणाने अक्षम्य चुका केल्या आहेत . पक्षाच्या पुढारीपणाच्या या धोरणामुळेच कम्युनिस्ट इंटरनॅशनलने आपल्या १९२८ सालच्या कार्यक्रमात म्हटल्याप्रमाणे “ पक्ष बहुजनसमाजापासून अलग पडणे अपरिहार्य झाले . कम्युनिझमचा अध : पात होऊन त्याचे जहाल ठोकळेबाजीत ' पुश्चिमझम ' मध्ये , वर्गीय क्रांतिकारक साहसबाजीत रूपांतर झाले . याप्रमाणे कम्युनिस्ट पक्ष गंभीर चुका करीत असताना कॉमिनफॉर्मने हिंदुस्थानच्या परिस्थितीबाबतचे निदान आणि त्यास अनुरूप असे धोरण जाहीर केले . असे करून कॉमिनफॉर्मने आपली एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे . हिंदी कम्युनिस्ट पक्षाचे आतापर्यंतचे ट्रॉट्स्कीवादी साहसबाजीचे धोरण व आचार यामुळे हिंदुस्थानातील क्रांतीचेच नव्हे तर जागतिक क्रांतीचेही नुकसान झालेले असल्याने त्या पक्षाचे हे धोरण व एकांगी वागणूक ताबडतोब बदलणे निकडीचे झाले आहे . हा बदल घडवून आणण्यासाठीच कॉमिनफॉर्मने आपले निदान व डावपेच जाहीर केले आहेत . कॉमिनफॉर्मच्या मार्गदर्शनाला मान्यता दर्शविणारा जो लेख * प्रसिद्ध झाला आहे त्यातही आपल्या चुका पक्षपुढारीपणाने प्रामाणिकपणाने मान्य केलेल्या दिसत नाहीत . पक्षाच्या राजकीय निदानात व डावपेचात मूलभूत सुधारणा होणे अत्यंत आवश्यक आहे . ' कामगारांचा पक्ष ' ही कम्युनिस्ट पक्षाची भूमिका सार्थपणे पार पाडण्यासाठी त्या पक्षाच्या पुढारीपणात योग्य तो बदल झाला तरच या सुधारणा होणे शक्य आहे . ( • फॉर ए लास्टिंग पीस फॉर ए पीपल्स डेमॉक्रसी , २७-१-५० ) ( * कम्युनिस्ट , फेब्रु , -मार्च १ ९ ५० , पा . १-११ . ) कम्युनिस्ट पक्ष पुढारीपणाने जरी अशी धोक्याची परिस्थिती निर्माण केली असली तरी हिंदी क्रांतीच्या मोर्चातील कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानाचा विचार करता हा पक्ष लोकशाही क्रांतीच्या मोर्चात सामील होणे अत्यंत आवश्यक आहे असेच या पक्षाचे मत आहे . कॉमिनफॉर्मच्या सडेतोड मार्गदर्शनानंतर पक्षाच्या धोरणात बदल होणे ही गोष्ट सुलभ झाली आहे . ज्या प्रमाणात हे कार्य यशस्वी होईल त्या प्रमाणात एकंदर हिंदी क्रांतीचा मोर्चा जोरदार होण्यास मौलिक मदत होईल .

४ : शेतकरी कामगार पक्षाचा जन्म व कार्य*

हिंदी कम्युनिस्ट पक्षाने वर्गजागृत कामगारांचे अग्रदल ही खऱ्या कम्युनिस्ट पक्षाची क्रांतिकारक भूमिका पार पाडून व कम्युनिस्ट इंटरनॅशनल , लेनिन स्टॅलिन यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाची कास खंबीरपणे धरून राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्याचे पुढारीपण आरंभापासून पत्करले असते तर १९४७ साली तडजोड करण्याची ताकद काँग्रेसच्या भांडवलदारी पुढारीपणाच्या हाती राहिली नसती . कम्युनिस्ट पक्षाने राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात कामगारांचे नेतृत्व प्रस्थापित करून त्या लढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली असती तर आमच्या पक्षातील बहुतेक कार्यकर्ते व आमच्या पक्षाला पाठिंबा देणारे कामगार शेतकरी हे १९३० साली अगर त्यानंतरच्या काळात कम्युनिस्ट पक्षाच्या झेंड्याखाली उभे राहिले असते . पण कम्युनिस्ट पक्ष हा अनेक चुका करून राष्ट्रीय स्वातंत्र्ययुद्धाला पाठमोरा झाल्यामुळे देशातील कामगार किसान हा काँग्रेसच्या भांडवलदारी पुढारीपणाच्या मागे होता . या पुढारीपणाने वेळोवेळी केलेल्या विश्वासघातामुळे व ब्रिटिश साम्राज्यवाद्यांशी केलेल्या समझोत्यामुळे जागा झालेला काही कार्यकर्त्यांचा गट किसान कामगारांवर येऊ घातलेल्या संकटाला थोपवून धरण्यासाठी व वर्गीय लढ्याच्या आधारे पुढील क्रांती घडवून आणण्यासाठी पक्ष स्थापून पुढे आला . काँग्रेसमधील भांडवलदारी पुढारीपण ब्रिटिश साम्राज्यशाहीशी हातमिळवणी करण्याचे प्रतिक्रांतिकारक धोरण स्वीकारीत असताना हिंदुस्थानच्या क्रांतिकारक चळवळीतील महाराष्ट्रातील क्रांतिकारक विभागाची प्रतिक्रिया म्हणजेच आपल्या पक्षाचा जन्म होय . महाराष्ट्रातील कामगार - शेतकऱ्यांची परंपरा क्रांतिकारक व साम्राज्यशाहीविरोधी असल्याने तो साम्राज्यशाहीविरोधी राष्ट्रीय लढ्यात बेडरपणे या सामील झाला . महाराष्ट्रातील कामगार - शेतकऱ्यांच्या क्रांतिकारक प्रवृत्तीतूनच साताऱ्यातील पत्रीसरकारची चळवळ निर्माण झाली . काँग्रेसचे भांडवली पुढारीपण प्रत्यक्षात साम्राज्यशाहीशी हातमिळवणी प्रतिक्रांतिकारक बनत असतानाच्या कालातच महाराष्ट्रातील कामगार शेतकऱ्यांच्या साम्राज्यशाहीविरोधी चळवळीच्या एकत्रित अनुभवातून आपल्या पक्षाच्या जन्माला कारणीभूत होणारी प्रेरणा मिळाली . महाराष्ट्राची विशिष्ट साम्राज्यशाहीविरोधी क्रांतिकारक बैठक आपल्या पक्ष स्थापनेला कारणीभूत झाली आहे . १९३० ते १९३३ , १९३९ व १९४२ या साम्राज्यशाहीविरोधी जनतेच्या लढ्यात हिरीरीने भाग घेतलेल्या संयुक्त महाराष्ट्रातील क्रांतिकारकांचा हा पक्ष आहे . हिंदुस्थानात जनतेचे जे साम्राज्यशाहीविरोधी झगडे झाले त्यातील महाराष्ट्रातील अत्यंत विशुद्ध स्वरूपातील क्रांतिकारक विभाग हा आपल्या पक्षाचा गाभा आहे . आपण राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यातून जात असताना आणि त्यानंतरच्या काळात आपल्याला जो अनुभव आला त्यातूनच आपण मार्क्सवादाकडे वळलो . आज आपण मार्क्सवादाचे , मार्क्स , एंगल्स , लेनिन , स्टालिन यांचे ग्रंथ आधारभूत मानून , तिसरी इंटरनॅशनल आणि कॉमिनफॉर्म या जागतिक कम्युनिस्ट चळवळींचे सिद्धांत आणि मार्गदर्शन आत्मसात करून मार्क्सवादी - लेनिनवादी बनलो आहोत . या खंबीर भूमिकेवरूनच आपण लोकशाही क्रांतीचा मोर्चा पुढे नेण्याचा शिकस्तीने प्रयत्न करीत आहोत . कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाचे सध्याचे साम्राज्यशाहीविरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा विचका करणारे ट्रॉट्स्कीवादी अत्यंत जहाल व पंथप्रवृत्तीचे धोरण ( Left sectarianism ) आणि समाजवादी पक्षाच्या गांधीछाप पुढारीपणाचे आणि सिद्धांताचे क्रांतिविरोधी धोरण या दोन अत्यंत विरोधी प्रवृत्तींशी झगडा करीतच आपण पुढे जात आहोत . त्यामुळे या दोन्ही पक्षांचे हल्ले आपल्या पक्षावर होत आहेत . इतर सर्व बाबतीत दोन ध्रुवांचे अंतर असलेले हे दोन्ही पक्ष आपल्या पक्षावर टीका करताना मात्र एकाच भूमिकेवर येत आहेत . हिंदी कम्युनिस्ट पुढारीपणाने आपल्यावर सुधारणावादी व संधिसाधू म्हणून टीका केली . समाजवादी पक्षाच्या पुढाऱ्यांनी आपल्याला जातीय ठरविण्याचा प्रयत्न केला . आपला पक्ष सुधारणावादी नाही याची हिंदी कम्युनिस्ट पुढारीपणाला व आपला पक्ष जातीय नाही याची समाजवादी पक्षाच्या पुढारीपणाला अलीकडे जाणीव होऊ लागली आहे ही समाधानाची गोष्ट आहे . आपला पक्ष आतापर्यंत निरनिराळ्या अवस्थांतून गेला आहे . साम्राज्यशाहीविरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा हिंदी भांडवलदारी पुढारीपणाने जो विश्वासघात केला त्याची दु : खद जाणीव जशीजशी होऊ लागली तसतसे आपल्या पक्षाचे स्वरूप जास्त स्पष्ट होऊ लागले आणि आज आपला पक्ष खंबीरपणे भूमिका घेऊन ' जनतेच्या साम्रज्यशाहीविरोधी मोर्चाचे ' पुढारीपण करण्यास सरसावला आहे . आपला पक्ष जन्माला का आला व त्याच्या जन्मापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या घटना घडून पक्षाच्या जन्मास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली याची सविस्तर माहिती पक्षाचे सरचिटणीस यांनी लिहिलेल्या ‘ आढावा व आराखडा ' या पुस्तकात दिली आहे . ब्रिटिश साम्राज्यवाद्यांशी काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी तडजोड करताच या तडजोडीचे भावी भीषण स्वरूप ओळखणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी कामगार शेतकऱ्यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस शेतकरी कामगार संघ ' स्थापन करण्याचा निर्णय तारीख ३-८-४७ रोजी घेतला . हा निर्णय आपल्या पक्षाच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा आहे . काँग्रेसचे पुढारी व मंत्री कामगार - शेतकऱ्यांच्या राज्य स्थापणार नसून भांडवलदारांनी हितासाठी राज्य करीत आहेत आणि म्हणून कामगार - शेतकरी यांचेच वर्गीय संघटन झाले पाहिजे , त्यांची ताकद वाढली पाहिजे , याची स्पष्ट जाणीव या ठरावात करून देण्यात आली आहे . कामगार - शेतकरी यांच्या राज्यासाठी वर्गीय संघटना बांधण्याच्या मार्गावर पक्षाने टाकलेले हे पहिले पाऊल होते. अशा रीतीने काँग्रेसच्या धोरणाबद्दल नापसंती नव्हते . परंतु काँग्रेस व तिचे सरकार यांचे स्वरूप काँग्रेसच्या धोरणाला विरोध करणाऱ्या वरील गटाला शकतो . गेल्या दोन वर्षांत आपल्या पक्षाने होते . दर्शविणारे सर्वच लोक काही मार्क्सवादी विचारसरणीचे जसजसे स्पष्ट होऊ लागले तसतसे आतापर्यंत ध्येय , धोरण व तत्त्वज्ञान याची निश्चिती करण्याची जरुरी भासू लागली व त्यातूनच ३-८-१९४७ रोजी काँग्रेसअंतर्गत स्वतंत्र पक्षाची स्थापना करण्याच्या निर्णयाचा जन्म झाला . ता . ३-८-४७ रोजी स्थापन झालेला हा संघ काँग्रेसान्तर्गत पक्षाच्या स्वरूपाचा होता पण काँग्रेसअंतर्गत फार काळ अस्तित्व राहणे शक्य नव्हते . साम्राज्यशाहीचे हस्तक बनलेल्या भांडवलदारवर्गाला काँग्रेसचे स्वरूप बदलून तिला आपला स्वतंत्र पक्ष बनविण्याची जरुरी भासत होती व त्याप्रमाणे काँग्रेस घटनेत बदल करून काँग्रेसमध्ये उपलब्ध राहण्यास बंदी करण्यात आली . त्यामुळे शेतकरी कामगार संघाने ता . २६-४-४८ रोजी मुंबई येथे सभा घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला व तो शेतकरी कामगार पक्ष ' या नावाने एक स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून कार्य करू लागला . स्वतंत्र मार्क्सवादी पक्ष म्हणून बाहेर पडल्यानंतर जनतेला काँग्रेसच्या भांडवलदारी पुढारीपणाखालून काढण्याचे महान कार्य आपल्याला करावयाचे होते . ता . २६-४-४८ पासून गेल्या दोन वर्षांतील आपल्या कामाकडे जर पाहिले तर आपण हे काम बऱ्याच प्रमाणावर केले आहे , असे आपण निश्चयाने म्हणू शकतो.गेल्या दोन वर्षांत आपल्या पक्षाने धुमधडाक्याच्या प्रचाराने रान उठवून काँग्रेस पुढाऱ्याचे आणि मंत्रिमंडळाचे भांडवलशाही स्वरूप जनतेसमोर तिला समजेल अशा शब्दांत कठोरपणे मांडले असून लक्षावधी कामगार - किसानांना काँग्रेसच्या पुढारीपणाखालून बाहेर काढले आहे . जन्मापासून आपल्या पक्षाने मार्क्सवादाचे तत्त्वज्ञान लाखो श्रमजीवी जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य केले आहे . कम्युनिस्ट पक्षाच्या चुकीच्या व राष्ट्रविरोधी आचारामुळे राष्ट्रप्रेमी जनतेच्या मनात मार्क्सवादाविषयी तटस्थता निर्माण झाली होती ती दूर करून उलट या तत्त्वाविषयी आस्था आपण निर्माण केली आहे . सोव्हिएट रशियाबद्दल योग्य कल्पना देऊन जागतिक श्रमजीवी जनतेच्या क्रांतीतील त्यांचे अग्रदलाचे स्थान जनतेला पटवून देण्याचे कार्य आपण केले आहे . सोव्हिएट रशियाबद्दलची तटस्थतेची भूमिका टाकून देऊन जनतेला सोव्हिएट रशियाच्या पुढारीपणाखाली शांततेच्या मोर्चात आणून उभे करण्याच्या प्रयत्नांत आपण बरेच यश मिळविले आहे . जनतेचे वर्गीय लढे विस्तृत पायावर उभारून त्यांच्यामार्फत हिंदी जनतेच्या लोकशाही क्रांतीसाठी लढाऊ मोर्चा निर्माण करण्याच्या मार्गावर आपण प्रगती उभारण्याच्या करीत आहोत . सोलापूर अधिवेशनानंतर जनतेच्या लोकशाही क्रांतीसाठी मोर्चाच्या घोषणेत ' क्रांतिकारक गटाची एकजूट ' या घोषणेला पक्षाने अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले . हिंदुस्थानातील सर्व क्रांतिकारक शक्ती एकत्रित करण्याच्या कामी पक्षाने अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली आहे . सोशलिस्ट रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष कै . शरदचंद बोस यांच्या मदतीने अखिल भारतीय संयुक्त समाजवादी परिषदेची स्थापना करून आपण हिंदुस्थानात संपूर्ण राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी पहिली क्रांतिकारक संयुक्त आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला . समाजवादी व कम्युनिस्ट पक्षांनी आपले धोरण न बदलल्यामुळे या पक्षांचा समावेश अजूनही या संयुक्त आघाडीत होऊ शकला नाही . कुलाब्याच्या आणि नगरच्या विधिमंडळ निवडणुकी हा आपल्या पक्षाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे . कुलाबा जिल्हा हा महाराष्ट्रातील खोतीने ग्रासलेला असा जिल्हा आहे . काँग्रेसच्या धोरणाचा निषेध करून तिच्या धोरणाला श्रमजीवी जनतेचा पाठिंबा नाही , हे दाखविण्यासाठीच आपल्या पक्षाने ही निवडणूक काँग्रेसवर लादली . या निवडणुकीत काँग्रेस व समाजवादी पक्ष या दोघांचाही पराभव झाला . या निवडणुकीने आपण समाजवादी पक्ष व काँग्रेस पक्ष यामधील साम्य व आपले या दोन पक्षांशी असलेले भेद आपण जनतेसमोर अत्यंत स्पष्टपणे मांडले आहेत . अशा रीतीने ग्रामीण विभागात काँग्रेसला आव्हान देऊन तिचा पराभव करण्याचे काम इतरत्र कोठेही कोणत्याही पक्षाने केलेले नाही . “ काँग्रेस सरकार जनतेचे आहे , जनतेचा त्यावर विश्वास आहे . हा प्रचार काँग्रेसची ढोंगबाजी आहे . हे आपण स्पष्ट केले . या निवडणुकी आपण काँग्रेस सरकारचे शेतकऱ्यांच्या धान्याच्या दराबद्दलचे धोरण , जनतेवर वेळोवेळी होणारा गोळीबार , मुंबई संयुक्त महाराष्ट्रातून वगळण्याच्या योजना यांना विरोध करण्यासाठी लढविल्या आणि काँग्रेस सरकारच्या कारभारावरील बुरखा काढून टाकून तिचे फॅसिस्ट स्वरूप उघडे केले आहे . नगरच्या निवडणुकी कुलाब्यापेक्षा निराळ्या पार्श्वभूमीवर झाल्या . स्थानबद्ध दत्ता देशमुख यांच्या विधिमंडळात ७२ दिवसांपेक्षा जास्त दिवस गैरहजेरीमुळे त्यांचे सभासदत्व रद्द केले गेले . आपण दत्ता देशमुख यांनाच पुन्हा उभे करण्याचा निर्णय घेतला . या निवडणुकीत काँग्रेस सरकारने काळ्याकुट्ट कारवाया केल्या . दत्ता देशमुख यांचा अर्जच येऊ नये म्हणून खटपट केली , अर्ज आल्यानंतर तो नाकारला जाईल अशीही व्यवस्था केली . निवडणुकीच्या बाबतीत भांडवली सरकार वरवर जो तटस्थतेचा आभास कायम ठेवते तेही काँग्रेस सरकारने केले नाही . दत्ता देशमुख यांचा अर्ज नामंजूर झाला तरीही आपण या निवडणुकी लढविल्या . निवडणुकीचा करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक करून ठेवणे , प्रचारासाठी पेट्रोल मिळू न देण्यापर्यंत सर्व अडथळे आणण्याचा काँग्रेस सरकारने प्रयत्न केला आणि शेवटी तर प्रत्यक्ष मतदान पेट्यांतही ढवळाढवळ करण्यास त्यांनी कमी केले नाही . सरकार वेळ आली म्हणजे मतदान पेट्यांतही ढवळाढवळ करते हे त्यामुळे जनतेला स्पष्टपणे दिसून आले . आणि भांडवली राज्यव्यवस्थेत निवडणुकीला किती अर्थ असतो हेही स्पष्ट झाले . त्याप्रमाणे नगर पूर्व खानदेश व प . खानदेश या जिल्ह्यात आपल्या पक्षाने लोकल बोर्डाच्या निवडणुकी लढविल्या व त्याचा प्रचारकार्यासाठी उपयोग करून निवडणुकीच्या साधनाच्या उपयुक्ततेविषयी जनतेत असलेला भ्रम कमी केला . या काळात आपण कामगारांच्या वर्गीय संघटना करण्याचा आणि त्यांच्यात एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला . हिंद मजदूर सभा व इन्टक यांनी कामगार वर्गात जी फूट पाडली ती नष्ट करण्याचे कार्य ओगलेवाडी ( सातारा जिल्हा ) कामगारांत आपण यशस्वी रीतीने केले आहे . ओगलेवाडीतील कामगार आता फूटपाड्यांच्या पकडीतून पूर्णपणे बाहेर पडला असून तो क्रांतिकारक एकजुटीच्या मार्गाने पावले टाकीत आहे . कामगारांच्या निरनिराळ्या संघटनांत एकजूट घडवून आणण्याचा प्रयत्न आपण सोलापुरात केला . सोलापूरची गिरणी बंद झाल्यामुळे जो लढा निर्माण झाला त्यात कम्युनिस्ट व समाजवादी या सर्वांशी संयुक्त आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला तो अयशस्वी झाला . त्यामुळे आपणास स्वतंत्रपणे हा लढा द्यावा लागला . या लढ्यात एकंदर १७५ कामगारांना पकडण्यात आले . या वेळेला जरी आपल्याला एकजूट करण्याच्या कामात यश आले नाही तरी त्यानंतर ' मे दिन साजरा करताना आपण यशस्वी झालो व गेल्या दोन वर्षांनंतर या वर्षी आपण इतर पक्षांच्या साहाय्याने हा कामगारांत एकजूट घडवून आणीत असताना आंतरराष्ट्रीय कामगार दिन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करू शकलो . कामगारांत एकजूट घडवून आणीत असतांना आपण त्यांचे वर्गीय लढेही लढविले . राधानगरी येथील कामगारांचा पगारवाढीसाठी लढा आपण लढविला . त्याचप्रमाणे मुंबईच्या म्युनिसिपल कामगारांच्या संपात आपल्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी महत्त्वाचा भाग घेतला . हल्ली आपण मुंबईच्या कामगारवर्गांत काम करण्यास सुरुवात केली आहे . आपल्या पक्षाच्या कार्याच्या दृष्टीने ही फार महत्त्वाची गोष्ट आहे . मुंबईच्या कामगारवर्गात संघटना करणे व त्यांच्यात एकजूट घडवून आणणे यामुळे सर्व हिंदुस्थानातील कामगारवर्गाच्या चळवळीला एक निराळे स्वरूप प्राप्त होणार आहे . मुंबईतील आपल्या पक्षाने चालविलेली कामगार एकजुटीची चळवळ जसजशी वाढत जाईल तसतसे आपल्या पक्षाचे स्वरूपही बदलेल व साम्राज्यशाही विरोधी लोकशाही क्रांतीवर कामगारवर्गाचे प्रभुत्व प्रस्थापित करण्याच्या कार्यात आपण यशस्वी होऊ . अशा रीतीने मुंबई , सोलापूर , नागपूर व महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या कामगारांत क्रांतिकारक एकजूट घडवून आणणे हे फार मोठे कार्य आपणास करावयाचे आहे . शेतकऱ्यांच्या प्रत्येक लहानसहान अडचणीविरुद्ध लढताना आपण त्यांचे पुढारीपण घेणे अपरिहार्यच होते . त्या दृष्टीने १९४८ साली कोवाड , जि . बेळगाव येथे शेतकरी परिषद घेऊन आपण आपल्या कामाला आरभ केला व महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकरी परिषदा घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणींना वाचा फोडली . परंतु शेतकऱ्यांच्या अडचणी चव्हाट्यावर मांडणे एवढेच काम करून आता भागणार नव्हते . काँग्रेस सरकविण्याचा प्रयत्न करीत होते . एवढेच नव्हे , तर गुजराथ व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या धान्याच्या भावात अवास्तव फरक ठेवून सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबद्दल दुजाभावही दाखविला होता . साखर , कापड इत्यादी वस्तूंचे भाव सरकारने वाढवून दिले ; परंतु शेतकऱ्यांच्या धान्याचे भाव उतरवून ते शेतकऱ्याला जगणे अशक्य करून टाकीत होते . सरकारच्या या धोरणाविरुद्ध लढा उभारण्याचे कार्य आपण केले . इगतपुरी तालुक्यात आपण हा प्रश्न धसाला लावला . सरकारी भावाने धान्य न विकण्याचे ठरवून या प्रश्नावर ८७ गाव पाटलांचे राजीनामे आपण सादर केले . सरकारने नेहमीप्रमाणे १४४ कलम जाहीर केले . ते मोडण्यात आले . ४६६ शेतकरी तुरुंगात गेले . त्यात ८७ शेतकरी स्त्रिया होत्या . शेवटी सरकारला १४४ कलम मागे घ्यावे लागले . आज हा लढा स्थगित झाला आहे , संपला नाही . वाढत्या अरिष्टांबरोबर हा प्रश्न जास्तच तीव्र होत जाणार आहे व त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लढे लढविण्याची तयारी ठेवणे जरूर आहे . इगतपुरीबरोबरच कुलाबा जिल्हा शेतकरी परिषदेचा उल्लेख करणे जरुरी आहे . गेल्या वर्षी भाताचे पीक बुडाल्याने कुलाबा जिल्ह्यावर दुष्काळाची छाया पसरली होती . अशाही परिस्थितीत खोताला व जमीन मालकाला घालावयाचा वाटा वसूल करण्याचे काम खोतांनी व जमीन मालकांनी सुरू केले . याविरुद्ध उपाययोजना करणे जरूर होते . परिषदेने हे कार्य केले . या भागातील शेतकरी आज खंबीरपणे आपल्याला बाटा घालणे अशक्य असल्याचे खोताला सांगत आहेत . शेतकऱ्याला जाचणारा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लेव्हीचा . लेव्ही वसूल करताना सरकारी अधिकारी शेतकऱ्यावर अत्यंत जुलूम करतात . या जुलमाविरुद्ध सभा , परिषदा भरवून आपण जनतेला संघटित करण्याचा प्रयत्न केला आहे . बार्शी तालुक्यात हा लढा आपण अत्यंत यशस्वी रीतीने केला . या लढ्यात ५० ते ६० शेतकरी कार्यकर्त्यांना सरकारने तुरुंगात डांबले . हैद्राबाद संस्थान हिंदुस्थानात सामील झाल्यापासून तेथेही हा लेव्हीचा प्रश्न निर्माण झाला . लेव्हीच्या जाचाविरुद्ध मराठवाड्यात जनतेचा संघटित मोर्चा उभारण्याचा प्रयत्न फक्त आपल्याच पक्षाने करण्याचा प्रयत्न केला . परंतु हैद्राबाद संस्थानातील निजामाची सत्ता संपली असली तरी नवी असलेली राजवटही तितकीच जुलमी आहे . म्हणून आपल्या प्रयत्नांना आरंभ झाल्याबरोबर तेथील प्रशासक सरकारने नारायणराव वाघमारे वगैरे तेथील कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबले , बऱ्याच जणांना हद्दपार केले व श्री . शंकरराव मोरे ( सरचिटणीस ) , नाना पाटील , केशवराव जेधे , आमदार तुळसीदास जाधव , काकासाहेब वाघ वगैरेंवर भाषणबंदीच्या किंवा प्रवेशबंदीच्या नोटीसा बजावल्या . संस्थानिकांना नष्ट ( ? ) करून जी राजवट वल्लभभाई पटेलांनी संस्थानी प्रदेशातून सुरू केली तिचे स्वरूप हे असे आहे . आपले काम जसजसे वाढू लागले तसतशी सरकारची आपल्याविरुद्ध दडपशाही वाढू लागली . आपल्या पक्षाचे दुय्यम चिटणीस श्री . दत्ता देशमुख , त्याचप्रमाणे जी . डी . लाड , राम लाड हे कार्यकर्ते पूर्वीच डांबले गेले होते . आता त्यात आणखी दुसरे दुय्यम चिटणीस भाईसाहेब सथ्था यांची भर पडली आहे . अशा रीतीने आपल्या पक्षाचे दोन्ही दुय्यम चिटणीस आज तुरुंगात आहेत . परंतु सरकारची ही दडपशाही म्हणजे आपले काम योग्य रीतीने होत आहे याचा पुरावाच आहे असे समजून आपण सरकारच्या दडपशाहीला तोंड देण्यासाठी जास्तच निकराने कामाला लागले पाहिजे . ही सर्व कामे करण्यास आपल्या पक्षाच्या ' जनसत्ता ' साप्ताहिकाने फार मोठा वाटा उचललेला आहे . लोकमान्य टिळकांचा केसरी , महात्मा गांधींचा रिजन , यानंतर महाराष्ट्राच्या खेड्याखेड्यात राजकीय दृष्टीने वाचले जाणारे एवढेच राजकीय पत्र आहे . ' जनसत्ता'मार्फत जनतेला शिक्षण देण्याचे व तिला संघटित करण्याचे कार्य सतत चालू आहे . महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मार्क्सवादी बनविण्याच्या कार्यात ' जनसत्ते'ने फार मोठा वाटा उचललेला आहे . त्याचप्रमाणे वेळोवेळी जनतेवर जो गोळीबार व जे अत्याचार झाले त्यांना प्रसिद्धी देऊन जनतेला त्याविरुद्ध संघटित करण्याचे कार्यही ' जनसत्ते'ने केले आहे . एरडगावचा गोळीबार , राजापूरचा गोळीबार , नाशिकचा गोळीबार या तिन्ही वेळेला जनतेची बाजू जनसत्तेने अत्यंत निर्भिडपणे मांडली आहे व सरकारचे फॅसिस्ट स्वरूप जनतेसमोर स्पष्ट करण्यास मदत केली आहे . धांगवडी येथे स्त्रियांवर झालेला अत्याचार चव्हाट्यावर आणण्यास व जनतेचे संघटित दडपण आणून सरकारला या अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास ' जनसत्ते ने भाग पाडले आहे . संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नाला चांगली चालना देण्याचा मान आपल्याच पक्षाने मिळविला आहे . या प्रश्नावरील जनतेची तीव्र भावना लक्षात घेऊन काँग्रेसचे पुढारी हा प्रश्न हातात घेतल्याचा देखावा निर्माण करून जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत होते . अशा वेळेला ठिकठिकाणी सभा - परिषदा घेऊन काँग्रेस पुढाऱ्यांचा हा ढोंगीपणा आपण स्पष्टपणे जनतेसमोर मांडला . त्याचप्रमाणे मुंबई महाराष्ट्रात ठेवण्याच्या प्रश्नावरही आपली भूमिका आपण कणखरपणे मांडली . आज जनतेची लोकशाही क्रांती यशस्वी झाल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न सुटणार नाही , याची स्पष्ट जाणीव जनतेला करुन देण्याचे बरेचसे श्रेय आपल्याच पक्षाला आहे . आपल्या पक्षाच्या असेंब्लीच्या सभासदांनी केलेल्या कामाचा उल्लेख करणे जरूर आहे . सरकारच्या धोरणाला विरोध करून मार्क्सवादी पद्धतीने त्याचे खो स्वरूप जनतेसमोर मांडीत राहणे हे कार्य आपल्या सभासदांनी अतिशय उत्तम रीतीने केले आहे . मुंबईच्या असेंब्लीत हल्ली जनतेची बाजू मांडणारा फक्त शेतकरी कामगार पक्षच आहे ही गोष्टही जनतेला स्वानुभवाने समजू लागली आहे . काँग्रेस सरकारचा नागरिक स्वातंत्र्यावर बंधने आणण्याचा व दडपशाही करण्याचा प्रयत्न आपण हाणून पाडण्याचा प्रयत्न असेंब्लीत केलेला आहे . परंतु काँग्रेसच्या होयबांनी भरलेल्या असेंब्लीत तो यशस्वी होणे शक्यच नव्हते . आपल्या असेंब्लीतील सभासदांनी शासनसंस्थेचे खरे स्वरूप भांडवलदारांची हुकूमशाही हे जनतेसमोर स्पष्ट करण्यास पुष्कळच मदत केली आहे . याशिवाय मार्क्सवादी पद्धतीने ठिकठिकाणी घेतलेली शिबिरे , कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचा फीवाढीविरोधी मोर्चा , सातारा जिल्ह्यात शेतकरी स्त्रियांत आपल्या स्त्री कार्यकर्त्यांनी काढलेले प्रचार दौरे समाजातील पन्नास टक्के भाग जो स्त्रीसमाज त्यांच्यात अशा रीतीने जागृती करण्याचे कार्य याहीपेक्षा नेटाने होणे जरूर आहे . लोकशाही क्रांतीचा लढा पुढे नेण्याचे कार्य हिंदी क्रांतिवाद्यांनी कॉमिनफॉर्मने केलेले मार्गदर्शन पुढे ठेवूनच केले पाहिजे . या कॉमिनफॉर्मच्या मुखपत्राच्या अग्रलेखात असे म्हटले आहे की , * ( * फॉर ए लास्टिंग पीस फॉर ए पीपल्स डेमॉक्रसी , ता . २७ जाने . १ ९ ५० . ) “ चिनी जनतेच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या विजयी लढ्याचा अनुभव हे शिकवितो की , कामगारवनि लढण्याला आणि कामगारवर्गाच्या व त्याची आघाडीची फौज असलेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या उभारण्याला तयार असलेल्या सर्व वर्गाशी , पक्षांशी , संग्राम साम्राज्यवाद्यांविरुद्ध व गटांशी व संघटनांशी एकजूट केली पाहिजे . आणि ही कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी लेनिनवादी तत्त्वज्ञानाने सज असलेली , क्रांतिकारक व्यूहरचना व डावपेच यांचे तंत्र आत्मसात केलेली , जनतेच्या शत्रूना किंचितही दयामाया न दाखविण्याचा क्रांतिकारक बाणा रोमरोमात भिनलेली , जनतेच्या सामुदायिक चळवळीत कामगारवर्गीय संघटना व शिस्त यांचा बाणा दाखविणारी कम्युनिस्ट पार्टी असली पाहिजे . " अंतर्गत परिस्थिती ज्या वेळेला अनुकूल असेल त्या वेळेस कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली जनतेची स्वातंत्र्यसेना उभारणे ही राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा यशस्वी रीतीने तडीला नेण्याची निर्णायक अट आहे . “ सशस्त्र संग्राम हा आता बऱ्याच परतंत्र व वसाहत देशांतील राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रकार बनत आहे हे चीन , व्हिएटनाम , मलाया व इतर देशांच्या उदाहरणांनी दाखवून दिले आहे . " वसाहतीच्या व निमवसाहतीच्या देशांतील जनतेच्या सामुदायिक चळवळीमुळे विकसित झालेल्या व सशस्त्र संग्रामाचे स्वरूप धारण करणाऱ्या चळवळीमुळे ब्रिटिश साम्राज्यवाद्यांना पिछेहाटीचा पवित्रा घेणे भाग पडले . हिंदुस्थानला नकली स्वातंत्र्य बहाल करण्यात आले ; परंतु ब्रिटिश साम्राज्यशाहीचे हितसंबंध ' पवित्र व अभंग ' राखण्यात आले आहेत . माउंटबॅटन कंपनी हिंदुस्थानातून निघून गेली असली तरी ब्रिटिश साम्राज्यशाही अजून कायम आहे व एखाद्या विषारी सर्पाप्रमाणे हिंदुस्थानला आपल्या आसुरी विळख्यात जखडून ठेवीत आहे . अशा परिस्थितीत हिंदी कम्युनिस्टांचे कार्य साहजिकपणे हे आहे की , चीन व इतर देशांतील राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीच्या अनुभवाचा त्यांनी उपयोग करून घेऊन कामगारवर्गाची समग्र शेतकरीवर्गाशी दोस्ती भक्कम केली पाहिजे , अत्यंत निकडीच्या शेतीविषयक सुधारणा अमलात आणण्यासाठी लढले पाहिजे आणि आपल्या देशाची गांजणूक करणाऱ्या अँग्लो अमेरिकन व साम्राज्यवाद्यांविरुद्ध व त्यांच्याशी सहकार्य करणारे प्रतिगामी बडे भांडवलदार व सरंजामी संस्थानिक यांच्याविरुद्ध देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रीय सार्वभौमत्व यासाठी लढण्याला तयार असलेल्या सर्व वर्गांची , पक्षांची , गटांची व संघटनांची एकजूट उभारली पाहिजे . " चीनमधील क्रांतीचा विजय व वसाहतीच्या देशातील राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याची प्रगती यामुळे वसाहतीवरील पकड कायम ठेवण्यासाठी निकराने धडपडणाऱ्या साम्राज्यवाद्यांचे पित्त खवळले . पराभूत होत असलेल्या साम्राज्यवाद्यांच्या या निकराच्या धडपडीचा बरोबर अंदाज न घेता तिला कमी लेखणे व चुकीचे ठरेल . “ वसाहतीच्या व परतंत्र देशातील कम्युनिस्ट पक्ष , ट्रेड युनियन्स व सर्व लोकशाही संघटना , यांनी श्रमिक जनतेची व सर्व पुरोगामी शक्तींची एकजूट उभारली पाहिजे . वसाहतीचा विस्तार वाढविण्याच्या परकीय साम्राज्यवाद्यांच्या योजनांचे साम्राज्यवाद्यांशी सहकार्य करणाऱ्या प्रतिगाम्यांच्या देशद्रोही भूमिकेचे खरे स्वरूप रोज चव्हाट्यावर मांडले पाहिजे . " वसाहतीवर वर्चस्व गाजविणाऱ्या साम्राज्यवाद्यांच्या देशातील कम्युनिस्टांचे कर्तव्य हे आहे , की त्यांनी वसाहत देशातील जनतेला आपल्या देशातील पुरोगामी शक्तींचा पाठिंबा मिळवून दिला पाहिजे व त्यासाठी त्या शक्तींची एकजूट उभारली पाहिजे . या देशातील कम्युनिस्टांनी कॉ . स्टालिनच्या पुढील शब्दांची आठवण ठेवली पाहिजे . ' वसाहतीच्या व परतंत्र देशाची स्वातंत्र्य चळवळ व अधिक पुढारलेल्या पाश्चिमात्य देशातील कामगार चळवळ यांच्यात खराखुरा दुवा सांधल्याशिवाय त्या देशात ( वसाहतीच्या व परतंत्र देशात ) कायम स्वरूपाचा विजय मिळविणे शक्य नाही . “ रशिया , चीन व जनतेच्या लोकशाहीचे देश , यातील क्रांतीचा अनुभव हे शिकवितो , की जेव्हा जनता निर्धारपूर्वक लढ्यात उतरते , जेव्हा कम्युनिस्ट पक्ष या लढ्याचे नेतृत्व करण्याला समर्थ असतात , तेव्हा देशातील अंतर्गत प्रतिक्रांतीच्या व परकीय साम्राज्यवाद्यांच्या कोणत्याही शक्ती क्रांतीच्या मार्गाने जाणाऱ्या जनतेच्या बहुजनसमाजाला चिरडू शकत नाहीत ." कॉमिनफॉर्मने हिंदुस्थानाबद्दल केलेले हे मार्गदर्शन कम्युनिस्ट पक्षाच्या पुढारीपणाने गेल्या दोन वर्षांत आखलेल्या व्यूहरचनेच्या व डावपेचांच्या पूर्णपणे विरुद्ध असून ते बदलण्याचा जाहीर इशारा कॉमिनफॉर्मने अशा रीतीने हिंदी कम्युनिस्ट पक्षाला दिला आहे . आज अत्यंत तीव्र स्वरूपाच्या आर्थिक अरिष्टामुळे साम्राज्यशाहीचा सामाजिक पायाच हादरून जात असताना व अरिष्टाचे मोठे ओझे अँग्लो - अमेरिकन साम्राज्यवादी हिंदुस्थानवर फेकीत असताना साम्राज्यवादी मक्तेदारीशी हातमिळवणी केलेल्या हिंदी भांडवलदारवर्गाचा सामाजिक पायाही नाहीसा होत आहे . अशा परिस्थितीत आर्थिक अरिष्टाने अत्यंत जेरीस आलेले काही छोटे भांडवलदार ( हिंदी कम्युनिस्ट पुढारीपणाने म्हटल्याप्रमाणे स्वयंनिर्णयाधिष्ठित पद्धतीने नव्हे ) इतर क्रांतिकारक पक्षांबरोबर आणि गटांबरोबर काही काळापुरते मर्यादित स्वरूपाचे तात्पुरते सहकार्य करणे शक्य आहे . ' समग्र शेतकरीवर्गाशी सहकार्य याचा अर्थही असाच आहे . रयतवारी पद्धतीचे विशिष्ट स्वरूप तसेच विभाग क्रांतीबरोबर अखेरपर्यंत जाणार नाहीत . परंतु असलेली वाताहत व त्यातच आर्थिक अरिष्टाचे जबर विभाग काही काळपर्यंत मर्यादित स्वरूपात , पाहिजे . हा लढाऊ क्रांतिकारक मोर्चा उभारूनच जमीनदारी पद्धती , ही लक्षात घेता सर्व श्रीमंत शेतकरी वासाहतिक अर्थव्यवस्थेमुळे एकंदर शेतीधंद्याची होत ओझे यामुळे हैराण झालेला काही श्रीमंत शेतकरी क्रांतिकारक वर्गाबरोबर , पक्षाबरोबर आणि गटाबरोब सहकार्य करणे शक्य आहे . " शत्रूच्या गोटातील प्रत्येक खिंडाराचा उपयोग करण्यात स्वत : साठी दोस्त मिळविण्यात ( कामगारवर्गाने ) कौशल्य दाखविले पाहिजे ' हे सूत्र आपण कधीही विसरता कामा नये . ( ऽ ' स्टालिन आणि चिनी क्रांती ' , ले . चैन - पा - टा , कम्युनिस्ट , १९५० , अंक २ , पा . १३४. ) वसाहत देशातील राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळी या साम्राज्यशाहीविरोधी जागतिक क्रांतिकारक आघाडीचा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे . हिंदुस्थानातील ही आघाडी आपण बळकट केली पाहिजे व साम्राज्यवाद्यांना आणि त्यांच्या हिंदी हस्तकांना आपण नेस्तनाबूद केले पाहिजे . कामगारवर्गाची कणखर लढाऊ एकजूट उभारून शेतमजुरांची , लहान शेतकऱ्यांची संघटना करून आणि लढे उभारून , मध्यम शेतकऱ्यांचे प्रश्न व्यापक प्रमाणावर सोडवून , कारकून , शिक्षक , नर्सेस व इतर नोकरवर्ग तसेच घरमजुरी करणारे , हमाली करणारे आणि शहरातील इतर व्यवसाय करणारे यांची म्हणजेच पिळल्या जाणाऱ्या श्रमिकांची संघटना करून , कामगार , शेतकरी व मध्यमवर्गीय स्त्रियांना संघटित करून आणि आगामी काळात बेकारांचे लढे संघटित करून आपण जनतेचा प्रचंड क्रांतिकारक मोर्चा उभारला आपणास हिंदी राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लोकशाही लढा पूर्णत्वास नेणे आणि जनतेच्या लोकशाहीचा विजयी झेंडा या देशात डौलाने लौकर फडकविणे शक्य आहे .

५ : समाजवादी पक्षाचे सत्य स्वरूप*

समाजवादी पक्ष अस्तित्वात असताना आपला पक्ष का काढण्यात आला व आपल्या पक्षाचे समाजवादी पक्षाशी कोणते मौलिक मतभेद आहेत याचा खुलासा करणे जरूर आहे . हिंदी लोकशाही लढ्याचा विचका करण्याची जबाबदारी कम्युनिस्ट पक्ष पुढारीपणाइतकीच समाजवादी पक्षाच्या पुढारीपणावर आहे . या पक्षाच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट ही , की त्या पक्षाने आपले धोरण आरंभी मार्क्सवादी असल्याचे म्हटले असले तरी ते मार्क्सवादी नाही . या पक्षास मार्क्सवाद मान्य नसल्यानेच आजच्या हिंदी क्रांतीचे स्वरूप , त्यातील निरनिराळ्या वर्गांचे स्थान , क्रांतिलढ्याची व्यूहरचना आणि डावपेच या बाबतीत मार्क्सवादाला धरून योजना हा पक्ष करीत नाही . मार्क्सवादाच्या बाबतीत विरोधाचीच अशी भूमिका असल्याने साहजिकच आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीने , कम्युनिस्ट इंटरनॅशनलने आणि कॉमिनफॉर्मने , वेळोवेळी जे मार्गदर्शन केले ते या पक्षाचे पुढारीपण मानीत नाही . या पक्षाचा दृष्टिकोन मार्क्सवादविरोधी असल्याने आजच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे त्यांचे निदानही चूक आहे . आजच्या जगाची ज्या दोन गटांत विभागणी झाली आहे त्यातला एक गट साम्राज्यवाद्यांचा असून दुसरा लोकशाहीवाद्यांचा आहे . या दुसऱ्या गटाचे पुढारीपण सोव्हिएट रशियाकडे आहे . परंतु समाजवादी पक्ष सोव्हिएट युनियनला ' लाल साम्राज्यशाही ' असे संबोधून तिच्या बाबतीत अत्यंत विकृत आणि लोकशाही क्रांतीला विघातक अशी भूमिका घेत आहे . या भूमिकेमुळे तो पक्ष परिणामी अँग्लो - अमेरिकन साम्राज्यशाहीला मदतच करीत आहे . अमेरिका व सोव्हिएट रशियाला एकाच रांगेत बसविणाऱ्या या लोकांना अमेरिकेचा दोस्त ब्रिटन जवळचा आहे . अमेरिकेच्या साम्राज्यशाहीविरुद्ध झगडणारा सोव्हिएट रशिया यांच्या दृष्टीने साम्राज्यशाही आणि ग्रीस , मलाया , इंडोनेशिया , ब्रह्मदेश इत्यादी ठिकाणच्या प्रतिगामी राजवटींना मदत करून तेथील जनतेला चिरडून टाकण्यास लष्करी मदत करणारे ब्रिटनचे तथाकथित मजूर सरकार मात्र याच्या दृष्टीने पुरोगामी आहे . अशा रीतीने मजूर सरकारला पुरोगामी म्हणून त्याला पाठिंबा देणे म्हणजे अमेरिकन गटाला पाठिंबा देणे होय आणि हीच गोष्ट समाजवादी पक्षाचे पुढारी करीत आहेत . त्यांच्या या धोरणामुळे जनतेच्या लोकशाही क्रांतीच्या मोर्चात सतत फाटाफूट होत आहे . तिसऱ्या गटाची योजना ही समाजवादी पक्षाच्या मनात सोव्हिएट रशियाबद्दल जी कडवी भावना आहे तिच्या पोटी जन्माला आलेली आहे व त्याचमुळे तो पक्ष कम्युनिस्ट पक्षाच्या बाबतीत जळजळीत शत्रुत्वाची भूमिका घेत आहे . आजच्या हिंदी लोकशाही क्रांतीच्या अवस्थेत सर्व क्रांतिकारक शक्तींची व पक्षांची एकजूट करणे जरूर आहे . त्याचप्रमाणे कम्युनिस्ट पक्षाला वगळून अशी एकजूट होणार नाही हेही उघड आहे . असे असताही “ काही झाले तरी कम्युनिस्टांबरोबर आम्ही सहकार्य करणार नाही . ' अशी समाजवाद्यांची दुराग्रही भूमिका आहे . या भूमिकेमुळे लोकशाही एकजूट होणे अवघड होते व एकजूट झाल्यावाचून लोकशाही क्रांती घडवून आणणे कठीण होते . लोकशाही क्रांती घडवून आणण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली एकजूट होण्याच्या मार्गात अडथळे उत्पन्न करून समाजवादी पक्ष एक प्रकारे भांडवलशाही राष्ट्रांनाच मदत करीत आहे . आज अमेरिका युद्धाची जी तयारी करीत आहे , तिची घोषणा ' कम्युनिझमचा नायनाट ' ही आहे .हिटलरने हीच घोषणा करून आपल्या पाठीमागे भांडवली राष्ट्रांची ताकद उभी करण्याचा प्रयत्न केला . या देशातील भांडवली सरकारही कम्युनिस्ट पक्षावर सशस्त्र चढाई करून वस्तुत : कम्युनिझमला ठार करण्याचाच प्रयत्न करीत आहे . समाजवादी पक्ष कम्युनिस्ट पक्षाशी सहकार्य करण्याचे नाकारून व त्या कडक टीका अमेरिकेच्या कम्युनिस्टविरोधी मोहिमेला साहाय्य करीत आहे . एवढेच नव्हे , तर जनतेला युद्धाच्या खाईत लोटण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनाही अप्रत्यक्षपणे हातभार लावीत आहे . आजची सारी परिस्थिती अशी आहे की , हिंदुस्थानवरील आपले साम्राज्यशाही पाश बळकट करून त्याला युद्धाचा तळ बनविण्याचा प्रयत्न अमेरिका करीत आहे व हिंदुस्थानातले आजचे भांडवली सरकार त्याला साथ देत आहे . अशा परिस्थितीत हिंदी लोकशाही क्रांतीचा लढा हा सोव्हिएट रशियाच्या पुढारीपणाखाली असलेल्या शांततेच्या मोर्चाचा भाग आहे . अमेरिकेच्या धोरणास अजाणतेपणाने दिलेला पाठिंबा हा हिंदी लोकशाही क्रांतीस विरोधीच ठरतो . आणि हेच धोरण समाजवादी पक्षाचे पुढारीपण अमलात आणीत आहे . कम्युनिझमच्या विरुद्ध आपला ' लोकशाही समाजवाद ' आहे असे या समाजवादी पक्षाच्या पुढारीपणाचे म्हणणे आहे . लोकशाही मार्गानेच म्हणजे भांडवली लोकशाही मार्गाने समाजवाद आणण्याचा प्रयत्न करणे आपले ध्येय असल्याचा पुकारा हे पुढारी करीत असून वेळोवेळी साधनांच्या शुचितेवर भर देत आहेत . भांडवली लोकशाहीचा हा पडदा भांडवलदारांची हुकूमशाही जनतेपासून लपविण्याच्या कामीच उपयोगी पडतो अशी मार्क्सवादाची शिकवण आहे . अशा परिस्थितीत भांडवलशाही कायद्याच्या चौकटीत कामगार - शेतकऱ्यांची सत्ता प्रस्थापित करण्याची घोषणा करणे म्हणजे जनतेची फसवणूक करणे होय . हिंदुस्थानातील भांडवली सरकार जनतेवर अमानुष दडपशाही करीत आहे . लाठीहल्ले , गोळीबार या गोष्टीही रोजच्याच झाल्या आहेत . तुरुंगांतील राजकीय कैद्यांवरही गोळीबार केले जात आहेत . अशा वेळी जनतेला पावलोपावली भांडवली लोकशाहीच्या फसव्या सिद्धांतांचे धडे देत बसणे म्हणजे काँग्रेस सरकारने लोकशाहीच्या नावावर जी हुकूमशाही चालविली आहे , तिला अमरपद देण्यासारखेच आहे आणि नेमकी हीच गोष्ट समाजवादी पुढारी करीत आहेत . त्याचप्रमाणे भांडवलदारी अर्थव्यवस्थेतील विषमता नष्ट करण्यासाठी क्रांतीच्या मार्गाऐवजी समाजवादी पक्ष भांडवलाच्या विकेंद्रीकरणाचा उपाय सुचवितात आणि त्यासाठी भांडवलशाही चौकट कायम असतानाच भांडवलाच्या राष्ट्रीयीकरणाच्या नव्या अभिनव योजना पुढे मांडतात . असे करण्याने क्रांतिकारक मार्गाचा ते त्यागच करतात . वर्गीय शासनसंस्थेबद्दलचा चुकीचा दृष्टिकोन समाजवादी पक्ष हिंदुस्थानच्या बाबतीत लावीत आहे . हिंदुस्थानात १९४७ साली जे सत्तांतर झाले ते खरे जनहिताचे झाले असे या पुढाऱ्यांचे म्हणणे आहे . अशाच त - हेच्या स्वातंत्र्यप्राप्तीने आशियातून जागतिक साम्राज्यशाहीचे उच्चाटन जवळजवळ झाले असून अशा रीतीने स्वतंत्र झालेल्या या राष्ट्रांचा तिसरा गट ब्रिटिश व फ्रेंच समाजवादी ( मजूर ) सरकारच्या सहकार्याने घडवून आणणे आवश्यक आहे , असे या पुढाऱ्यांचे मत आहे . या मतामुळे साम्राज्यशाही राष्ट्र वसाहतीमध्ये आपल्या ऐतद्देशीय हस्तकांना हाती धरून जो सत्तांतराचा देखावा निर्माण करतात त्याबद्दल जनतेच्या मनात तिला निष्क्रिय बनविणारा भ्रम निर्माण होतो . कामगारवर्गाच्या बाबतीत समाजवादी पक्षाचे पुढारी जे फाटाफुटीचे धोरण स्वीकारीत आहेत त्याचा पाया हाच आहे. समाजवादी पुढान्यांनी निरनिराळ्या प्रश्नांवर तलेल्या निरनिराळ्या भूमिका त्यांच्या वरील मावर्सवादविरोधी धोरणाची प्रतीके आहेत . वल्लभभाई पटेल यांची त्यांनी संस्थानिकांना नाहीसे केले म्हणून स्तुती करताना वल्लभभाईंनी सरंजामशाही चौकट कायम ठेवली ही गोष्ट जनतेपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न समाजवाद्यांनी केला आहे . पाकिस्तानच्या बाबतीत अत्यंत विकृत दृष्टिकोन स्वीकारून त्यांनी पाकिस्तानविरुद्ध युद्धाची घोषणा दिली आणि देश धोक्यात आहे या सबबीखाली नेहरू सरकारला मदत करण्याची तयारी दाखविली ही त्यांच्या संधिसाधू धोरणाची प्रतीके आहेत . मार्क्सवादाचा मूलभूत वर्गीय दृष्टिकोन या पक्षाच्या पुढान्यांना नसल्याने कामगारवर्गाबद्दलचे त्यांचे धोरणही क्रांतीला विघातक आणि कामगारवर्गात फाटाफूट पाडणारे आहे . कामगारांना वर्गजागृत करणे व सर्व लोकशाही मोर्चावर त्यांचे पुढारीपण प्रस्थापित करणे ही समाजवादी पुढाऱ्यांची भूमिका नसून कामगारांची स्थिती सुधारणे ही आहे . याचाच अर्थ , हे पुढारीपण कामगारांचे नसून मध्यमवर्गीयांचे आहे . अशा रीतीने कामगार मान्य संघटनेबद्दल विकृत दृष्टिकोन स्वीकारून समाजवादी पुढाऱ्यांनी औद्योगिक शांततेच्या काँग्रेस सरकारच्या भांडवली घोषणेला पाठिंबा दिला व बेकारीऐवजी कमी पगार घेण्याचा कामगारांना उपदेश केला . समाजाची भांडवली चौकट कायम असताना एखादी गिरणी समाजवाद्यांच्या ताब्यात देण्याची विनंतीही ते सरकारला वेळोवेळी करीत असतात . सहकारी संस्थांवर अवास्तव भर देऊन क्रांतिकारक मार्गापासून कामगारवर्गाला दूर ठेवण्याचा प्रयत्न ते करतात . त्यांनी त्या धोरणासाठीच आपल्या स्वतंत्र युनियन्स स्थापन केल्या असून कामगारांत फूट पाडली आहे . केवळ राष्ट्रीय नव्हे , तर आंतरराष्ट्रीय कामगारांच्या एकजुटीत फूट पाडण्यासाठी अँग्लो - अमेरिकेने आपल्या ज्या हस्तक जागतिक कामगार संघटना निर्माण केल्या , त्यांनाही समाजवादी पुढारी पाठिंबा देत असून त्यांच्याशी संघटनात्मक सहकार्य करीत आहेत. समाजवादी पक्षाच्या पुढारीपणाखाली आज जो कामगार , शेतकरी व मध्यमवर्ग आहे त्यास जनतेच्या साम्राज्यशाहीविरोधी लोकशाही क्रांतिकारक मोर्चात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे . परंतु त्यांनी या पक्षाच्या पुढाऱ्यांच्या क्रांतिविरोधी धोरणातून आपली मुक्तता करून घेतल्याशिवाय क्रांतिकारक मोर्चातील आपली जबाबदारी त्यांना पार पाडता येणार नाही . समाजवादी पक्षाच्या पुढारीपणाच्या हातून ही जी मार्क्सवादविरोधी व लोकशाही क्रांतीला मारक अशी मते मांडली जातात , त्याचे प्रमुख कारण हे पुढारीपण मध्यमवर्गीय असून ते महात्मा गांधींच्या छायेत पुढारीपणाच्या गादीवर बसले हे होय . या पुढारीपणाने लोकशाही समाजवादाच्या घोषणा करीत प्रस्तुतच्या भांडवली सरकारला प्रसन्न करून घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्याचा उपयोग होणार नाही . अंतर्गत व बहिर्गत परिस्थितीमुळे या देशातील भांडवलशाही सरकार हे अधिकाधिक हुकूमशाही स्वरूप धारण करीत असून त्या हुकूमशाहीच्या जात्यात कामगार , शेतकरी व गरीब मध्यमवर्ग भरडला जात आहे . त्यांच्या या अनुभवामुळे ते अधिकाधिक क्रांतिकारक मार्गांचा अवलंब करणे अटळ आहे . या गोष्टीची थोडी जाणीव समाजवादी पक्षाच्या डळमळीत पुढारीपणाला झाली असून त्या दडपणाखालीच त्या पुढारीपणाने बंगलोरच्या बैठकीत ' आवश्यक झाल्यास सशस्त्र उठावाच्या मार्गाचाही ' पुरस्कार केला आहे . समाजवादी पक्षात सामील असलेले कामगार , शेतकरी व गरीब मध्यमवर्गीय या सर्वांनी आपल्या प्रत्यक्ष आचाराने आपल्या कचखाऊ पुढाऱ्यांना कणखर क्रांतिकारक असे धोरण स्वीकारण्यास भाग पाडणे अत्यंत जरूर आहे .

*६ : पक्षाचे पुढील कार्य*

*वासाहतिक अर्थव्यवस्था व लोकशाही क्रांती* आपल्या पक्षास यापुढील कालात महत्त्वाची जबाबदारी पार पाडावयाची आहे . ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपणास आपल्या पुढील कामाची रूपरेषा आखावी लागेल . पण आपणाला कोणती जबाबदारी पार पाडावयाची आहे याची बरोबर कल्पना आल्यावाचून आपणास कार्यक्रमही आखता येणार नाही . सबब आपल्या देशातील अर्थव्यवस्थेचे मूलभूत स्वरूप कसे आहे व त्याच्या अनुषंगाने आपणास कोणत्या प्रकारची क्रांती घडवून आणावयाची आहे , याचे थोडे तात्त्विक विवेचन करणे जरूर आहे . १५ ऑगस्ट १९४७ रोजी हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याची घोषणा झाली असली तरी हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेत फरक झालेला नाही . ब्रिटन व हिंदुस्थान यांचे आर्थिक संबंध साम्राज्यशाही देश व वासाहतिक देश असेच राहिले आहेत . वासाहतिक अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य असे असते , की वासाहतिक देशांची अर्थव्यवस्था संपूर्णपणे साम्राज्यशाही देशाला पूरक अशी ठेवण्याचा प्रयत्न साम्राज्यशाही देश करीत असतो . वसाहतीच्या स्वतंत्र औद्योगिक प्रगतीला साम्राज्यशाही देश नेहमी विरोध करतात . तरीही वसाहतीची काही प्रमाणात जी औद्योगिक प्रगती होते ती साम्राज्यशाहीला आवश्यक म्हणून व काही वेळेला तिचा काही प्रमाणात विरोध असतानाही होते . या औद्योगिक प्रगतीबरोबर स्वतंत्र भांडवलदार व कामगारवर्ग वसाहतीमधून अस्तित्वात येतो . वासाहतिक भांडवलदार व साम्राज्यशाही भांडवलदार यांच्यातील विरोधामुळे भांडवलदारवर्ग राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीच्या पहिल्या अवस्थेत भाग घेऊ लागतो . या काळात कामगारवर्गाची प्रगतीही होतच राहते . तो संघटित व वर्गजागृत बनतो व आपल्यावरील पिळवणुकीचे जू झुगारून देण्यासाठी वर्गीय व राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात उतरतो. औद्यागिक प्रगतीत अडथळा आल्याने वसाहतीतील शेतीचा व्यवसाय खालावत जातो . शेतीवर उपजीविका करणाऱ्यांची संख्या वाढत जाते . जमिनीचे तुकडे लहान लहान होत जातात , शेतीचे उत्पन्न घटते व शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढत जातो . शेतकरी समाज एकजिनसी राहत नाही . त्यात श्रीमंत शेतकरी , मध्यम शेतकरी , गरीब शेतकरी , शेजमजूर असे विभाग पडतात . " भांडवलदारवर्गाप्रमाणे श्रीमंत शेतकरीवर्ग शेतमजूर कामाला लावणे , अवजारे भाड्याने देणे , जमीन खंडाने लावणे या मार्गाने गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक करतो . " s ( ऽ रेव्होल्युशनरी मुव्हमेंट इन दि कॉलनीज अॅण्ड सेमी कॉलनीज . ) अशा प्रकारे वासाहतिक अर्थव्यवस्थेत निर्माण होणारे देशी उद्योगधंदे व कामगारवर्ग , शेतकरी समाजाची वर दिल्याप्रमाणे निरनिराळ्या वर्गात होत जाणारी विभागणी , बैंक भांडवलाचे प्रभुत्व , सामाज्यशाहीचे आर्थिक , राजकीय व लष्करी प्रभुत्व या परस्परविरोधी आर्थिक क्रिया अस्तित्वात असतात व यातच सामाज्यशाहीविरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या क्रांतिकारक चळवळीचा पाया असतो . अशा रीतीने वसाहत देशातले स्वातंत्र्य लढे हे मूलतः साम्राज्यशाहीविरोधी असल्याने ते जागतिक कामगार क्रांतीचा एक भाग असतात .

*क्रांत्यांचे तीन प्रमुख प्रकार*

" निरनिराळ्या देशांत कामगारवर्ग ज्या भिज्ञ परिस्थितीत व भिज्ञ मार्गाने आपली हुकूमशाही प्रस्थापित करील त्याची स्थूलमानाने तीन प्रकारात विभागणी करता येईल ( १ ) भांडवलशाहीचा विकास उच्च अवस्थेला पोचला आहे असे देश अमेरिका , ब्रिटन इ . ( २ ) भांडवलशाहीचा मध्यम विकास झालेले देश पोलंड , पोर्तुगाल इ . ( ३ ) जेथे उद्योगधंद्यांची नुकतीच सुरुवात झाली आहे व काही ठिकाणी त्यांचा बराच विकासही झाला आहे असे वसाहत व निमवसाहत देश ( उदा . हिंदुस्थान , चीन इ . ) " * ( * प्रोग्रॅम दि कम्युनिस्ट इंटरनॅशनल , ६ वी काँग्रेस पान ४०. पान ४३. )

*वसाहत देशांतील क्रांतीचे कार्य*

वसाहत देशांतील क्रांतीचे प्रमुख कार्य “ एकीकडे सरंजामशाहीविरुद्ध व पिळवणुकीच्या भांडवलशाही पूर्वकालीन प्रकाराविरुद्ध लढणे व शेतकरी क्रांतीचा पद्धतशीर विकास करणे आणि दुसरीकडे परदेशी साम्राज्यशाहीविरुद्ध राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी झगडणे . ( ) हे असते . या क्रांतीचे स्वरूप मूलत : लोकशाही असून कामगार व शेतकरीवर्गाची सर्वाधिकारी सत्ता प्रस्थापित करणे हे तिचे उद्दिष्ट असते .

वासाहतिक क्रांतीचे स्वरूप*

" वसाहत देशातील क्रांतीचे प्रमुख वैशिष्ट्य असे , की साम्राज्यशाहीविरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्याशी निगडित झालेली असते . तसेच वसाहत देशांत साम्राज्यवाद्यांनी जेथे आपली गुलामगिरी नव्या स्वरूपात लादल्याने जनता बंडास उद्युक्त झाली आहे अशा निमवसाहतीच्या देशात क्रांतिकारक क्रियेवर राष्ट्रीय स्वरूपाचा साम्राज्यशाहीने चालविलेल्या दडपशाहीमुळे एकीकडे क्रांतिकारक वर्गांना परिपक्वता येते , कामगार शेतकऱ्यांचा असंतोष तीव्र होतो , त्यांची संघटना करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि जनतेच्या क्रांतिकारक उठावाला खऱ्या खऱ्या लोकक्रान्तीचे प्रचंड सामर्थ्य व स्वरूप प्राप्त होते . परंतु त्याच वेळी दुसऱ्या बाजूने राष्ट्रीयत्व आपला प्रभाव कामगार - शेतकरीवर्गावर टाकण्यास समर्थ ठरते , इतकेच नव्हे , तर इतर वर्गांच्या वृत्तीवर आपली छाप बसविते . " . ( • रेव्होल्युशनरी मुव्हमेंट इन दि कॉलनीज अँड सेमी कॉलनीज , पान २३-२४ . ) या क्रांतीचा विशेष हा , की या क्रांतीत भांडवलदारवर्गाची भूमिका अतिशय अनिश्चित असून क्रांतीची लाट जसजसी वाढते तसतसा या वर्गाचा डळमळीतपणा वाढतो . वासाहतिक क्रांतीच्या स्वरूपाचे दुसरे वैशिष्ट्य असे , की " शेतकरी क्रांती हा सर्व प्रमुख वसाहत देशातील लोकशाही क्रांतीचा कणा असतो . शेतीची मागासलेली अव्यवस्था , शेतीची वाताहत , खंड व वसुलीची जुलमी प्रथा , व्यापारी व सावकारी भांडवलाचा जुलूम यामुळे या देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेतील उत्पादनशक्तीच्या विकासात अडथळा निर्माण होतो . अशा परिस्थितीत शेतीच्या संबंधातील आणीबाणीची स्थिती व खेड्यांतील विरोधाची वाढती तीव्रता यांचा लक्षपूर्वक अभ्यास करून कामगारांच्या व शेतकऱ्यांच्या असंतोषास क्रांतिकारक वळण लावणे , त्याचा रोख साम्राज्यशाही , सरंजामशाही व भांडवलशाही यांच्याविरूद्ध वळविणे हे महत्त्वाचे कार्य असते . वसाहत देशात विशिष्ट स्वरूपात घडून येणाऱ्या क्रांतिकारक लढ्यात प्रत्येक वर्ग आपल्या आर्थिक हितसंबंधास अनुसरून विशिष्ट भूमिका पार पाडीत असतो . हे वर्गसंबंध कसे असतात हे समजून घेतल्यावाचून आपल्या देशातील वासाहतिक क्रांती पूर्णत्वास नेण्याचे कार्य आपणास पार पाडता येणार नाही . यासाठी या क्रांतीतील निरनिराळ्या वर्गाच्या भूमिका काय असतात यासंबंधी कम्युनिस्ट इंटरनॅशनलचे सिद्धांत काय आहेत ते पाहिले पाहिजे .

*वासाहतिक क्रांतीत निरनिराळ्या वर्गांची भूमिका*
राष्ट्रीय भांडवलदारवर्ग :*

देशी भांडवलदार हे साम्राज्यशाहीपुढे पुन : पुन्हा शरणागती पत्करतात . “ परंतु जनतेची वर्गीय क्रांती ताबडतोब होणार आहे असा तीव्र धोका जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत ही शरणागती अखेरची ठरत नाही . " देशी उद्योगधंद्यातील भांडवलदार राष्ट्रीय चळवळीला पाठिंबा देत असतो . हा पाठिंबा देत असताना त्याची विशिष्ट स्वरूपाची तडजोडवादी प्रवृत्ती असते . या प्रवृत्तीला राष्ट्रीय सुधारणावाद असे नाव देता येईल . “ भांडवलदारी राष्ट्रवादी चळवळ ही संधिसाधू चळवळ आहे . तिच्यात अतिशय डळमळीतपणा असतो . ती साम्राज्यशाही व क्रांती या दोन्ही दगडींवर हात ठेवून चालते . ' ( ऽ रेव्होल्युशनरी मुव्हमेंट इन दि कॉलनीज अॅण्ड सेमि कॉलनीज , पान २६ .. पान २५ ) साम्राज्यशाहीविरुद्ध आपले आसन बळकट करण्यासाठी राष्ट्रीय भांडवलदारवर्ग राष्ट्रवादी शब्दावडंबराच्या योगाने मध्यमवर्गीय जनतेस आपल्या प्रभावाखाली आणतो . कामगारवर्ग व शेतकरीवर्ग यांनाही तो आपल्या वर्चस्वाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतो . परंतु कामगार - शेतकऱ्यांच्या क्रांतिकारक उठावांची तीव्रता जो जो वाढत जाते , वासाहतिक जनतेच्या क्रांतीची लाट जो जो उंचावत जाते तो तो राष्ट्रीय भांडवलदारवर्गाचा डळमळीतपणा वाढत जातो व राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आघाडीचा विश्वासघात करून तो साम्राज्यशाहीचा हस्तक बनतो . अशा रीतीने विश्वासघात राष्ट्रीय भांडवलदारांनी साम्राज्यशाहीशी हातमिळवणी केल्यानंतर जे तथाकथित स्वतंत्र राज्य निर्माण होते ते लेनिनने १९२० साली कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या दुसऱ्या काँग्रेसला सादर केलेल्या मसुद्यात म्हटल्याप्रमाणे “ औद्योगिक , आर्थिक व लष्करी दृष्ट्या संपूर्णपणे साम्राज्यशाहीवर अवलंबून असलेले राज्य असते . वासाहतिक अर्थव्यवस्थेत लोकशाही क्रांतीला आवश्यक असलेली शेतकरी क्रांतीही ती पूर्णत्वास नेऊ शकत नाही , तिला तो अखेरपर्यंत पाठिंबा देऊ शकत नाही . “ वसाहत देशातील शेतकरीवर्गाची असहाय पिळवणूक नष्ट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शेतकरी क्रांती हाच असू शकतो . परंतु चीन , हिंदुस्थान व इजिप्त या देशांचे भांडवलदार आपल्याला तात्कालिक हितसंबंधाच्या योगाने जमीनदारशाहीशी , सावकारी भांडवलशाही व सर्वसाधारण शेतकरी जनतेची पिळवणूक करण्याशी इतके निगडीत झालेले असतात , की ते शेतकरी क्रांतीच्या विरुद्ध भूमिका घेतात ; इतकेच नव्हे , तर शेतीच्या क्षेत्रातील संबंधाच्या प्रत्येक निर्णायक सुधारणेच्या विरुद्ध भूमिका घेतात . " + भांडवलदारवर्गाच्या या भूमिकेचा परिणाम असा होतो , की “ साम्राज्यशाहीबरोबर प्रत्येक लढ्यात भांडवलदारवर्ग एका बाजूला आपल्या राष्ट्रवादी खंबीरपणाचा खूप मोठा देखावा करण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्या बाजूला शांततेच्या मार्गाने तडजोडीच्या शक्यता असल्याचा भ्रम पसरवितो . " x ( + रेव्होल्युशनरी मुव्हमेंट इन दि कॉलनीज अॅण्ड सेमी कॉलनीज , पान २६. x पान २७. )

*कामगारवर्ग :*

राष्ट्रीय भांडवलदारवर्गाच्या भांडवलदारी सुधारणावादी धोकेबाजीपासून लोकशाही क्रांतीला वाचविण्याचे ऐतिहासिक कार्य कामगारवर्गावर असते व यासाठी त्याला तीव्र लढा द्यावा लागतो . आपल्या क्रांतिकारक लढाऊ संघटना प्रस्थापित करणे , शेतकरी लढ्यांचा उठाव करणे व त्यांना नेतृत्व देणे , जनतेच्या उठावांचे मार्गदर्शन करणे व ते लढे वरच्या पातळीवर नेणे , साम्राज्यशाहीविरोधी लढ्यात कामगार वर्गाचे वर्गीय पुढारीपण प्रस्थापित करणे या मार्गानेच भांडवली पुढारीपणाविरुद्ध लढा लढता येतो . या मार्गानेच निरनिराळ्या पक्षांचे राष्ट्रीय सुधारणावादी स्वरूप , त्यांचा लढ्यातील निरुत्साह , डळमळीतपणा व तडजोडीची आणि सौदेबाजी प्रवृत्ती उघड करता येते . भांडवलदारांच्या व राष्ट्रीय सुधारणावादाच्या प्रभावातून श्रमजीवी जनतेला मुक्त केल्यावाचून वासाहतिक लोकशाही क्रांतीतील कामगारवर्गाच्या पुढारीपणाशिवाय वासाहतिक लोकशाही क्रांती पूर्णपणे पार पाडता येणार नाही . मग समाजसत्तावादी क्रांतीची गोष्टच नको . साम्राज्यशाहीविरोधी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या क्रांतिकारक लढ्यात कामगारवर्गास ऐतिहासिक महत्त्वाचे कार्य पार पाडावे लागते . याचमुळे लेनिन , स्टॅलिन तसेच कम्युनिस्ट इंटरनॅशनल यांनी “ वसाहत देशातील स्वातंत्र्यलढ्यात कामगारवर्गाचे पुढारीपण प्रस्थापित करा " असे सतत प्रतिपादन केले आहे . स्टॅलिन १ ९ २५ साली म्हणतो , “ हिंदुस्थानात भांडवलशाहीची प्रगती झाली आहे , कामगारांची संख्या बरीच मोठी आहे . " " हिंदुस्थानासारख्या वसाहत देशातील कामगार वर्गाला स्वातंत्र्य चळवळीच्या पुढारीपणाची भूमिका घेण्यासाठी तयार करणे आणि त्या सन्माननीय पदावरून भांडवलदारांना व त्यांच्या पुरस्कर्त्यांना पायरी - पायरीवरून हुसकून लावणे असा प्रश्न आहे . एक साम्राज्यवादीविरोधी क्रांतिकारक संयुक्त गट निर्माण करणे व संयुक्त गटांमध्ये कामगारवर्गाचे पुढारीपण हमखास प्रस्थापित करणे असे कार्य आहे . ' + हिंदुस्थान हा भांडवलशाहीचा सर्वांत जास्त विकास झालेला वासाहतिक देश आहे . हे लक्षात घेऊनच कम्युनिस्ट इंटरनॅशनलने हिंदुस्थानातील क्रांतिकारक चळवळीने पुढील कामे केली पाहिजेत असे प्रतिपादन केले . “ कामगारांचा कम्युनिस्ट पक्ष निर्मिणे , युनियन उभारणे , त्यांना मजबुती आणणे , ट्रेड युनियन्सना क्रांतिकारक वळण लावणे , आर्थिक , राजकीय , सामुदायिक निदर्शने वाढत्या प्रमाणात घडवून आणणे , जनतेला आपल्याकडे घेणे व तिला राष्ट्रीय सुधारणावादी भांडवलदारांच्या प्रभावातून मुक्त करणे . " x ( + पौर्वात्य देशांतील श्रमिकांच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोर भाषण १९२५ . x रेव्होल्युशनरी मुव्हमेंट इन दि कॉलनीज ॲण्ड सेमी कॉलनीज , पान ३२ , पान ९ ६ . * पान २ ९ . ) कामगारवर्गाने वासाहतिक क्रांतीत ही विशिष्ट भूमिका पार पाडीत असताना त्या क्रांतीतील राष्ट्रीय भांडवलदारवर्गांची भूमिका लक्षात घेतली पाहिजे . कम्युनिस्ट इंटरनॅशनलच्या ठरावात स्पष्ट शब्दांत पुढील प्रमाणे इशारा दिला आहे - " भांडवली राष्ट्रीय सुधारणावादाचे मध्यमवर्गावर , शेतकरी जनतेवर आणि कामगारवर्गाच्या काही भागाला , चळवळीच्या पहिल्या अवस्थेत तरी निदान जे वजन असते त्यामुळे त्याला सरंजामदारी साम्राज्यशाही गटांपेक्षा निराळेच महत्त्व प्राप्त होते . या गोष्टीचे जर कमी महत्त्वमापन झाले तर त्यामुळे जहाल पंथप्रवृत्तीचे धोरण आखले जाऊन कम्युनिस्ट पक्ष जनतेपासून अलग पडतो . ”

शेतकरी वर्ग :*

" शेतकरी हा कामगार वर्गांचा सहकारी व त्याचा दोस्त या नात्याने क्रांतीची प्रेरक शक्ती असतो . शेतकरीवर्गाला कामगारवर्गाच्या नेतृत्वाखालीच स्वत : ची मुक्तता करून घेणे शक्य असते . परंतु कामगारवर्गालाही शेतकरीवर्गाशी एकजूट करूनच वासाहतिक लोकशाही क्रांती यशस्वी करता येते . "* परंतु शेतकरीवर्ग हाही काही एकजिनसी समाज वसाहत देशात राहिलेला नसतो . अशा परिस्थितीत "सर्वसाधारण मानाने पाहता शेतकरीवर्गाच्या जमीनदार विरोधी लढ्याच्या पहिल्या कालखंडात कामगार वर्ग सगळ्या शेतकरीवर्गाला आपल्याबरोबर नेण्याची शक्यता असते . लढ्याचा अधिक विकास झाल्यावर शेतकरीवर्गाचे काही वरचे थर प्रतिक्रांतीच्या छावणीत सामील होण्याचा संभव असतो." ( * रेव्होल्युशनरी मुव्हमेंट इन दि कॉलनीज ॲण्ड सेमी कॉलनीज , पान ३०. ) शेतमजूर , गरीब शेतकरी व मध्यम शेतकरी यांच्या दैनंदिन मागण्यांसाठी खंबीरपणे लढा करून शेतकरी क्रांती पूर्णत्वाने पार पाडण्यास व शेतीच्या क्षेत्रातील सर्व प्रश्न क्रांतिकारक मार्गाने सोडविण्यास शेतकरीवर्गास मदत करून कामगारवर्ग शेतकरीवर्गातील बहुसंख्य जनतेचे नेतृत्व करू शकला तरच तो शेतकरीवर्गाच्या पुढारीपणाची भूमिका घेऊ शकतो . या पुढारीपणाच्या अभावी शेतकरी चळवळीवर भांडवली राष्ट्रवादाचा प्रभाव पडून तिचा घात होतो .

मध्यमवर्ग :*

या वर्गात विविध गट असतात आणि राष्ट्रीय क्रांतिकारक चळवळीच्या निरनिराळ्या अवस्थांत हे निरनिराळ्या भूमिका पार पाडतात . कारागीर बुडत्या धंद्यामुळे हैराण होतो व तो साम्राज्यशाहीविरोधी भूमिका घेतो . मध्यमवर्गीय बुद्धिजीवी लोक क्रांतिलढ्यात , मध्यमवर्गीय हितसंबंधांचे प्रतिनिधित्व निकराने करतात . ज्या सामाजिक थरातून हे लोक येतात तो थर जमीनदार वर्गाशी निगडीत असल्याने ते शेतकरीवर्गाच्या हितसंबंधाना पाठिंबा देत नाहीत , तर उलट भांडवली राष्ट्रवादाकडे जोराने झुकतात . राष्ट्रीय चळवळीच्या पहिल्या अवस्थेत हे चळवळीच्या लाटेवर प्रामुख्याने दिसतात . क्रांतीच्या उसळीबरोबर या वर्गातील काही लोक कामगार चळवळीत फेकले जाण्याचा संभव असतो . शहरी गरिबांची बऱ्याच मोठ्या थराची जीवन परिस्थिती त्यांना क्रांतीला पाठिंबा देण्यासच प्रवृत्त करीत असते . वासाहतिक क्रांतीतील निरनिराळ्या वर्गांच्या या भूमिका ध्यानात ठेवून आतापर्यंतच्या हिंदी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात या वर्गांनी कसा कसा भाग घेतला हे आपण पाहिले आहे . हे सिद्धांत लक्षात ठेवूनच आपण आपल्या पुढच्या लढ्यातील व्यूहरचना व डावपेच आखले आहेत . आपल्या देशातील आजच्या परिस्थितीप्रमाणे या देशात व्हावयाच्या लोकशाही क्रांतीचे स्वरूप व तंत्र हे असे आहे . ही क्रांती घडवून आणण्याची जबाबदारी मुख्यत : कामगारवर्गावर असून त्याच्या नेतृत्वाखाली शेतकरी , गरीब मध्यमवर्ग व भांडवलदारांपैकी एक विभाग यांची एकजूट झाली पाहिजे . या देशातील कामगारवर्गात आज फाटाफूट झाली आहे . त्याचप्रमाणे कामगारांतील मोठ्या विभागाला आपल्या क्रांतिकारक जबाबदारीची जाणीव नाही . शेतकरीवर्गही असंघटित असून त्यालाही आपल्या जबाबदारीची जाणीव नाही . जातिभेद व धर्मभेद आज बळावले असल्यामुळे गरीब मध्यमवर्ग हा मोठ्या आर्थिक आपत्तीशी झगडत असताही स्वत : च्या जातीय व धार्मिक श्रेष्ठत्वाच्या नशेत गुल असून कामगार व किसान यांच्याशी तुटकपणाने वागत आहे . त्यांच्यापैकी काही तर धार्मिक वेडाच्या आहारी जाऊन धर्माच्या पायावर आधारलेल्या राष्ट्रीय दुराभिमानाने पछाडले गेले आहेत व अशा प्रकारे भांडवलदारांना आर्थिक हुकूमशाहीचे स्वरूप धारण करण्यास अप्रत्यक्ष मदत करीत आहेत . हे सर्व वर्ग राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या अनेक अवस्थांतून त्याग करीत पुढे झालेले असल्यामुळे या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसविषयी व तिच्या चुढारीपणाविषयी या सर्व वर्गांच्या मनात अद्यापही आपलेपणा आहे व हे पुढारी आपल्यासाठी अद्याप काही करतील ' असा भ्रम आहे . गेल्या दोन वर्षांतील काँग्रेसच्या कारभारामुळे हा भ्रम झपाट्याने कमी झाला घेतली आहे . आजचे सरकार निवडणुकीने बदलता येईल असाही अद्याप भ्रम विशेषत : मध्यमवर्गीयांच्या आहे . क्रांतिकारक पक्षांचा निवडणुकीच्या मार्गावर विश्वास नसला तरी जनतेतील मोठ्या विभागाच्या मनात असलेला हा भ्रम दूर अपरिहार्य आहे . अशा आजच्या परिस्थितीत मार्क्सवादी पक्षाने वस्तुनिष्ठ भूमिका घेऊन व केवळ मनात वावरत आपला कार्यक्रम आखला पाहिजे . या कार्यक्रमाची पुढीलप्रमाणे आखणी करणे शक्य आहे -

लोकशाही क्रांतीचा कार्यक्रम*

हिंदुस्थानच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीत मूलभूत फरक घडवून आणल्याशिवाय सर्वसाधारण जनतेला स्वातंत्र्य आणि सुबत्ता यांचा लाभ होणार नाही . या दृष्टीने पाहता लोकशाही क्रांतीच्या कार्यक्रमात खालील प्रमुख गोष्टींचा उल्लेख करता येईल

१ ) ब्रिटिश साम्राज्यशाहीशी असलेले सर्व संबंध तोडून टाकून संपूर्ण स्वातंत्र्य प्रस्थापित करणे .

२ ) अँग्लो - अमेरिकन साम्राज्यशाहीला विरोध करणाऱ्या व शांत आघाडीत सामील असलेल्या , कामगार , शेतकरी आणि पिळला गेलेला मध्यमवर्ग यांचे लोकशाही सरकार प्रस्थापित करणे .

३ ) जनतेला संपूर्ण स्वातंत्र्य व लोकशाही यांचे अधिकार देणारी आणि मूलभूत आर्थिक हक्कांना संरक्षण देणारी घटना तयार करणे .

४ ) राष्ट्राच्या स्वयंनिर्णयाच्या हक्काला मान्यता देणे , भाषेच्या पायावर हिंदुस्थानाची पुनर्घटना करणे .

५ ) अल्पसंख्याकांची भाषा , संस्कृती इत्यादींना घटनेने संरक्षण देणे .

६ ) राजेशाही व सरंजामशाही अवशेष नष्ट करणे .

७ ) सर्व त - हेची आर्थिक , राजकीय आणि सांस्कृतिक दडपशाही नष्ट करणे .

८ ) हिंदुस्थान व पाकिस्तान या दोन्ही देशांतील श्रमजीवी जनतेच्या प्रगतीच्या हिताच्या दृष्टीने या दोन्ही राष्ट्रांनी परस्पर साहाय्य करणे .

९ ) काहीही मोबदला न देता जमीनदारी नष्ट करून जमिनीची फेरवाटणी करणे , शेतकऱ्यांचे कर्ज व सावकारी नष्ट करणे , शेतमजुराला पुरेसे जीवनवेतन देणे . १० ) बँका , उद्योगधंदे , वाहतुकीची साधने , मळे , खाणी इत्यादी निरनिराळ्या व्यवसायांत गुंतविलेले परकीय भांडवल जप्त करणे . ११ ) मोठे मोठे धंदे , बँका इन्शुअरन्स कंपन्या या राष्ट्राच्या मालकीच्या करणे , त्यावर कामगारांचे अधिकार राहतील अशी व्यवस्था करणे , कामगाराला पुरेसे जीवनवेतन , सात तासांचा दिवस , वृद्धपणी पेन्शन , आजारपणात भत्ता इत्यादी . १२ ) प्रत्येकाला काम मिळण्याचा हक्क असणे . १३ ) खाजगी धंद्याच्या नफ्यावर नियंत्रण . १४ ) दडपशाहीचे सर्व कायदे रद्द करणे . १५ ) नोकरशाही नष्ट करून त्याच्या जागी निवडल्या जाणाऱ्या व त्यांना परत बोलावण्याचा अधिकार जनतेला असलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करणे . १६ ) सर्वांना शस्त्रे वापरण्याचा हक्क देणे व जनता लष्कराची निर्मिती . १७ ) प्राथमिक व दुय्यम शिक्षण सक्तीचे व फुकट करणे , उच्च शिक्षणाचा बोजा कमी करणे . १८ ) स्त्रियांना समान हक्क , समान कामास समान वेतन , हे तत्त्व अमलात आणणे . हा कार्यक्रम डोळ्यांसमोर ठेवूनच आपण आपले निरनिराळ्या आघाडीवरचे कार्य ठरविले पाहिजे .

*कामगार आघाडी*

१९४९ च्या नोव्हेंबर महिन्यात जी कॉमिनफॉर्मची बैठक झाली तिला अहवाल सादर करताना कॉ . टॉग्लियाटी याने असे सांगितले की , “ सर्व कम्युनिस्ट पक्षाचेच नव्हे तर कामगार ( Workers Party ) समाजवादी पक्षातील डावे गट यांचे कर्तव्य हे आहे की , साम्राज्यशाहीचे नवे युद्ध पेटविण्याचे धोरण हाणून पाडण्यासाठी , नागरिक स्वातंत्र्याचा नाश थांबविण्यासाठी आणि कामगारवर्गाचे जीवनमान कायम ठेवून वाढविण्यासाठी , आवश्यक असलेल्या सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी कामगारवर्गाची एकजूट ही पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाची गोष्ट आहे . " ( • कम्युनिस्ट पक्षाच्या इन्फर्मेशन ब्युरोने नोव्हें . १९४९ च्या अधिवेशनात मंजूर केलेले रिपोर्ट व ठराव , पा . ४८. ) प्रत्येक देशावर होणारे साम्राज्यशाहीचे हल्ले परतवून लावण्यासाठी “ कामगारवर्गाच्या एकजुटीपासून आरंभ करणेच योग्य होईल . " s ( ऽपान ५१. ) वरील मूलभूत सूचनेप्रमाणे पाहता कामगारवर्गाची एकजूट घडवून आणण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत . या दृष्टीने कामगारवर्गाचा जो भाग समाजवादी पुढारीपणाखाली आहे त्याला एकजुटीचे महत्त्व आपण सतत पटवून देत राहिले पाहिजे . समाजवादी , कम्युनिस्ट , आपला पक्ष इत्यादींच्या पुढारीपणाखाली असणाऱ्या कामगारांची एकजुट त्यांच्या दैनंदिन लढ्यातूनच होऊ शकेल . या दृष्टीने कामगारांच्या मूलभूत प्रश्नांवर लढे उभारून त्यासाठी कामगारांच्या संयुक्त फॅक्टरी कमिट्या , गावकमिट्या इत्यादी तयार केल्यानेच एकजूट घडून येईल.

कामगारवर्गात काम करीत असतांना,कामगाराच्यात एकजूट घडवून आणणे हाच आपल्या कामाचा उद्देश असला पाहिजे . आवश्यक तथ नव्या युनियन्स काढणे व जुन्या युनियन्सना एकत्रित करण्याचा प्रयत्न करणे हे प्रश्न आपण वरील उद्देश डोळ्यांसमोर ठेवूनच सोडविले पाहिजेत . हे सर्व करीत काम एकजूट घडून येईल . कामगारवर्गात करीत असताना , म्हटल्याप्रमाणे , होणाऱ्या असताना टॉग्लियाटी यांनी " कोणत्याही रीतीने व्यक्त संधिसाधूवादाविरुद्ध अविरतपणे व न डगमगता लढा करणे व कामगारवर्गाच्या चालविलेल्या लढ्यात अडथळा आणणाऱ्या पंथप्रवृत्तीचे करण्यासाठी निकराचा प्रयत्न करणे आवश्यक आहे . ' उच्चाटन + ( + कम्युनिस्ट पक्षाच्या इन्फर्मेशन ब्युरोने नोव्हें . १९४९ च्या अधिवेशनात मंजूर केलेले रिपोर्ट व ठराव . पान ५२. ) एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की , कामगारवर्गाच्या एकजुटीवरच लोकशाही क्रांतीच्या मोर्चावर कामगारवर्गाचे प्रमुख प्रस्थापित करण्यात येणारे यश अवलंबून आहे व या ..... यशावरच लोकशाही क्रांतीचे यश अवलंबून आहे .

आजच्या परिस्थितीत कामगारवर्गाच्या मूलभूत मागण्या खालीलप्रमाणे आहेत -

१ ) कामगाराचा कमीत कमी पगार ८० रु . महिना व कारकून , कुशल कामगार यांना १२५ रु . महिना .

२ ) संपूर्ण प्रमाणात महागाईभत्ता .

३ ) कामाची शाश्वती आणि काम करण्याचा हक्क यांना मान्यता .

४ ) १ महिन्याची भरपगारी हक्काची रजा , २० दिवसांची भरपगारी कॅज्युअल लीव्ह व म्हातारपणी पेन्शन .

५ ) बदली कामगार कायम करणे .

६ ) ७ तासांचा दिवस आणि ४० तासांचा आठवडा .

७ ) बेकारीविरुद्ध शाश्वती .

८ ) १ ९४८-४९ सालासाठी सर्व धंद्यांत ४ ॥ महिन्यांचा बोनस .

९ ) फॅक्टरीत युनियनचे काम करण्यास परवानगी .

१० ) कामगार , शेतकरी , विद्यार्थी , स्त्रिया यांच्या सर्व पुढाऱ्यांची मुक्तता , त्याचप्रमाणे शे . का . पक्ष , कम्युनिस्ट पक्ष , समाजवादी पक्ष इत्यादी पक्षांच्या कार्यकर्त्यांची मुक्तता .

११ ) संपाच्या व ट्रेड युनियनच्या हक्कावर गदा आणणाऱ्या सर्व कायद्यांना विरोध .

*शेतकरी आघाडी*

वासाहती अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांची परिस्थिती नेहमी खालावतच जात असते . जमिनीचे तुकडे पडणे , तिचा मगदूर कमी होणे , शेतकऱ्याचे कर्ज वाढणे हे सर्व त्या अर्थव्यवस्थेचे परिणाम असतात . गेल्या वर्षी हिंदुस्थानात १८० कोटी रुपयांचे धान्य आणावे लागले.ऽ ही परिस्थिती एकदम आलेली नाही . या एकंदर परिस्थितीचा अर्थ असा आहे , की हिंदुस्थानातील शेतीच्या धंद्यात ज्याला फाजील उत्पादनाचे अरिष्ट म्हणतात ते येणेच शक्य नाही . हिंदुस्थानातील शेतीच्या धंद्याची ही विशिष्ट परिस्थिती या आघाडीवर कार्य करताना आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे . ( ऽ कॉमर्स , डिसेंबर १९४९ चा अंक ) हिंदुस्थानला १५ ऑगस्ट १९४७ रोजी जे स्वातंत्र्य मिळाल्याचा पुकारा करण्यात आला , त्यामुळे हिंदुस्थानच्या वासाहतिक अर्थव्यवस्थेत बदल झालेला नाही . शेतीचा व्यवसाय खालावतच चाललेला आहे . अशा परिस्थितीत शेतीतील अर्थसंबंधात आमूलाग्र फरक केल्याशिवाय शेती सुधारणे शक्य नाही . आजचे सरकार या मूलभूत सुधारणा घडवून आणण्यास असमर्थ आहे . हे काम जनतेचे लोकशाही सरकारच करू शकेल . कामगाराप्रमाणे शेतकरी हा काही एकजिनसी वर्ग नाही . त्यांचे निरनिराळे थर आहेत आणि प्रत्येक थराचे स्थान निरनिराळे आहे . आजच्या शेतीव्यवस्थेत शेतकऱ्यांचे चार थर पडतात .

*१ ) शेतमजूर :* स्वत : जवळ काहीही शेती नसलेला व केवळ दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करून पोट भरणारा असा हा वर्ग आहे . या वर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . शेतकऱ्यांतील हा सर्वात क्रांतिकारक थर आहे . कामगारवर्गाचा हा जोरदार दोस्त असतो . याचे हितसंबंध इतर शेतकरीवर्गाशी काही बाबतीत काहीसे विरोधक असल्याने या वर्गाच्या स्वतंत्र संघटना केल्या पाहिजेत . आणि सर्वात शेतकरीवर्गाच्या संघटनेत वर्गाने महत्त्वाचे स्थान घेतले पाहिजे . आजची महागाई लक्षात घेऊन जीवनमान ठरविणे ही या वर्गाची विशेष मागणी आहे . शेतकरीवर्गाच्या म्हणून ज्या इतर सर्वसाधारण मागण्या आहेत , त्याला हा वर्ग अर्थात पाठिंबाच देतो ; कारण त्या मागण्या मिळण्याचा फायदा यालाही होणारच असतो .

*२ ) गरीब शेतकरी :* शेतीच्या व्यवसायावर पोट न भरल्याने ज्याला काही काळ मजुरी करावी लागते असा शेतकरी हा गरीब शेतकऱ्यात मोडतो . शेतमजुराखालोखाल क्रांतिकारक असा हा थर असतो . लोकशाही क्रांतीचा कणा असलेली शेतकरी क्रांती यशस्वी करण्यात शेतमजूर व गरीब शेतकरी यांचा पुढाकार असतो .

*३ ) मध्यम शेतकरी :* स्वत : चे व स्वत : च्या कुटुंबाचे पोषण होईल इतकी जमीन असलेला शेतकरी . हा थर जनतेच्या लोकशाही क्रांतीत कामगारवर्गाचा दोस्त असतो . वर्गाशी चांगले सहकार्य असणे ही आवश्यक गोष्ट आहे . त्याचे व शेतमजुरांचे संबंध काहीसे विरोधी असतात . परंतु अंतिम दृष्टीने विचार करता शेतमजुराच्या पाठीमागे जाण्यातच त्याचे हित आहे ही गोष्ट या थराला सतत पटवून दिली पाहिजे .

*४ ) श्रीमंत शेतकरी :* खेडेगावच्या विशिष्ट वासाहतिक अर्थरचनेमुळे शेतकरी चळवळीच्या पहिल्या काळात त्या चळवळीवर या थराचे वजन असते व ते कायम ठेवण्याचा प्रयत्न हा थर करीत असतो . हे पुढारीपण शेतकरी चळवळीला घातक ठरणारे असते . म्हणून हे पुढारीपण नष्ट करणे जरूर आहे . पण वासाहतिक अर्थव्यवस्थेमुळे शेतीच्या धंद्याची होणारी वाताहत व त्यातच आर्थिक अरिष्टाचे जबर ओझे यामुळे हैराण झालेल्या या थरातील बराच मोठा विभाग कामगारवर्गाच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या लोकशाही क्रांतीला उपयोगी पडण्याचा संभव असतो . सबब त्यापैकी आपल्याबरोबर येण्यास तयार असेल तेवढा विभाग शक्य तेथपर्यंत बरोबर नेण्याचे योग्य ते प्रयत्न पक्षाने केले पाहिजेत . ' कसेल त्याची जमीन ' ही आपली शेतकरीवर्गाबाबतची आजच्या काळातील मध्यवर्ती घोषणा आहे . शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत .

१ ) मोबदला न देता जमीनदारी नष्ट करणे , जमिनीचे राष्ट्रीयीकरण करणे व तिची फेरवाटणी करणे .

२ ) उत्पादनाला लागणारा खर्च व सर्वसाधारण नफ्याचा दर ध्यानात घेऊन धान्याच्या किमती ठरविणे .

३ ) शेतीच्या धंद्याला व शेतकऱ्याच्या उपजीविकेला लागणाऱ्या वस्तू त्याला परवडतील अशा भावात मिळण्याची सोय करणे .

४ ) कुळाला योग्य संरक्षण मिळेल अशा रीतीने कुळकायद्यात दुरुस्ती करणे .

५ ) जुने कर्ज रद्द करणे , शेतीच्या व्यवसायातील वेळोवेळी लागणारे कर्ज मिळण्याची व्यवस्था करणे. आज देशातील सर्वच ठिकाणचा शेतकरी सारखाच जागृत नाही म्हणून वरील मागण्यांसाठी कराव्या लागणाऱ्या चळवळीची अवस्थाही निरनिराळी करणे . राहणार आहे . दक्षिण व उत्तर सातारा , नगर , बेळगाव व कोल्हापूर येथील शेतकऱ्यांच्या राजकीय जागृतीचा विचार करता त्याला लढ्याच्या वरच्या मार्गाकडे झपाट्याने नेणे शक्य आहे ते आपण केले पाहिजे . कुलाबा , रत्नागिरी , मराठवाडा , नागपूर , व - हाड अशा ठिकाणी खोती किंवा जमीनदारी अस्तित्वात असल्याने तेथील शेतकरी अत्यंत पिळला गेला आहे . या कारणाकरिता आर्थिक मागण्यांसाठी लढा देण्यास त्याला संघटित करणे जास्त सुलभ व शक्य आहे व तसे प्रयत्न केले पाहिजेत .

*अस्पृश्य शेतमजूर व शेतकरी*

लोकशाही क्रांतीला व शेतकरी संघटनेला अडथळा करणारी अस्पृश्यता ही एक प्रमुख सामाजिक परिस्थिती आहे . म्हणून अस्पृश्यता नष्ट करणे ही आपल्या चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे . परंतु देवळात जाण्यास परवानगी देऊन किंवा हॉटेले खुली करून अस्पृश्यता नष्ट होत नाही . त्यासाठी स्पृश्य व अस्पृश्य शेतकऱ्यांना व कामगारांना आर्थिक मागण्यांवर एकत्र संघटित करून त्यांचे एकत्रित लढे लढविले पाहिजेत . खेडेगावातील अस्पृश्य हे मुख्यत : शेतमजूर बनलेले आहेत . अशा परिस्थितीत शेतमजुरांच्या युनियन्समध्ये व शेतकरी सभांत अस्पृश्य शेतमजूर व शेतकरी यांना एकत्र आणण्याचा आपण कटाक्षाने प्रयत्न केला पाहिजे . अस्पृश्य समाज हा क्रांतिकारक आणि लढाऊ आहे . त्याला आपल्या चळवळीत आणण्याचा आवश्यक तो प्रयत्न न करणे म्हणजे आपण लोकशाही क्रांतीचा घात केल्यासारखे होणार आहे . म्हणून अस्पृश्य समाजाला शेतकऱ्यांच्या आर्थिक लढ्यात सामील करून घेवूनच आपण पुढे गेले पाहिजे.त्यासाठी आपण स्पृश्य किसान- कामगारांना या अस्पृश्य किसान-कामगारांशी एकजूट करण्याचे शिक्षण देवून धर्माच्या किंवा जाती-श्रेष्ठत्वाच्या कल्पनेने मारल्यामुळे त्यांच्याकडून अस्पृश्य कामगारांना जो त्रास होतो तो बंद करण्यासाठी खास प्रयत्न केले पाहिजेत . आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अस्पृश्य समाजाशी अधिक समरस होऊन त्यांना मार्क्सवादी बनविले पाहिजे . अस्पृश्य समाजाला मार्क्सवादी विचारसरणी पटली तरच , चार शिकलेल्या मुलांना नोकऱ्या मिळणे जरूर असले तरी केवळ या नोकऱ्यांनीच सबंध समाजाची होणारी सामाजिक व आर्थिक पिळवणूक थांबणार नाही , अशी त्यांना जाणीव होऊन ते क्रांतीसाठी इतर श्रमजीवी जनतेशी एकजूट करण्यासाठी उमेदीने पुढे येतील .

विद्यार्थी*

जनतेच्या लोकशाही क्रांतीत विद्यार्थ्यांना बरेच स्थान आहे . त्यांना राजकारणातून दूर ठेवण्याचा प्रयत्न ब्रिटिश राज्यकर्त्यांनी केला त्याप्रमाणे काँग्रेस सरकारही करीत आहे तो आपण हाणून पाडला पाहिजे . सरकारच्या धोरणाने विद्यार्थ्यांवरील फीचा बोजाही भयंकर वाढला आहे . सरकारने केलेल्या फीवाढीमुळे कित्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा आली आहे . ही फी- वाढ करण्याच्या मुळाशी काही विशिष्ट वर्गाच्या हाती असलेली शिक्षणाची पक्षपाती मक्तेदारी त्याच वर्गाच्या हाती अबाधितपणे दीर्घकाल टिकविण्याचा कावा आहे . कामगार , शेतकरी व गरीब मध्यमवर्गीयांची मुले फीवाढीमुळे अडाणी किंवा अर्धशिक्षित राहिली तरच वरच्या वर्गाच्या हाती राज्ययंत्रातील महत्त्वाच्या जागा राहून त्यांचे पिळवणुकीचे काम सोपे होणार आहे . सबब हा डाव ओळखून या फीवाढीविरुद्ध विद्यार्थीवर्गाचा लढा उभारणे अत्यंत जरुरीचे होऊन बसले आहे . त्याचबरोबर विद्यार्थीवर्गाला राजकीय परिस्थितीची जाणीव करून देऊन त्याला कामगार , शेतकरी व इतर श्रमजीवी जनतेच्या लढ्यात सामील करून घेणेही आवश्यक आहे . विद्यार्थी संघाप्रमाणेच , बोर्डिंगे , सहकारी सोसायट्या इत्यार्दीमार्फत विद्यार्थ्यांना मदत करून त्यांना संघटित करण्याच्या कार्यातही आपल्या पक्षातील विद्यार्थी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे .

स्त्री संघटना*

खेडेगावातील शेतकरी स्त्रियांना संघटित करण्याचे विशेष प्रयत्न झाले पाहिजेत . शेतकरी समाजातील हा जवळजवळ निम्मा भाग जर आपल्या चळवळीतून दूर राहिला तर आपली लोकशाही क्रांती यशस्वी होणे कठीण जाणार आहे . आपल्यातील स्त्री कार्यकर्त्यांनी या दृष्टीने ताबडतोब कामाला लागले पाहिजे व त्यांना शेतकरी सभा व शेतमजूर संघ यात सामील करून घेतले पाहिजे . शहरातूनही श्रमिक स्त्रियांचा एक मोठा वर्ग आहे . त्यांनाही त्यांच्या व्यावसायिक संघटनांतून आपण संघटित केले पाहिजे . नर्सेस , शिक्षिका , घरकाम करणाऱ्या स्त्रिया याप्रमाणे निरनिराळ्या स्वतंत्र संघटना करून त्यांच्या मागण्यांसाठी लढे उभारले पाहिजेत . ही स्त्रियांची चळवळ उभारताना आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रथम आपल्या घरातील माता , भगिनी व पत्नी यांना जागृत करून व स्वातंत्र्य देऊन चळवळीत प्रथम ओढले पाहिजे . क्रांतिकारक चळवळीची पताका घेऊन बाहेर पडलेल्या कार्यकर्त्यांना प्रथम क्रांती आपल्या घरात करावी लागते . स्वत : च्या घरात प्रतिगामीपणाचा काळोख कायम ठेवून दुसऱ्याच्या घरात क्रांतीचा उजेड पाडण्याची भाषा ढोंगीपणाची असून अशा ढोंगी कार्यकर्त्यांकडून क्रांती होणे अशक्य आहे .

*मध्यमवर्ग*

शहरातील व खेडेगांवातील मध्यमवर्ग यांची संघटना निरनिराळी होते . खेडेगावातील मध्यमवर्गात प्राथमिक शिक्षकाला महत्त्वाचे स्थान आहे . प्राथमिक शिक्षक हा शेतकरीवर्गातूनच आलेला असल्याने त्याचा शेतकरी संघटनेला चांगला उपयोग होतो . प्राथमिक शिक्षकांची संघटना त्यांच्या पहिल्या संपानंतर विस्कळित झाली आहे . आपण ती पुन्हा संघटित केली पाहिजे . शहरांतील मध्यमवर्गात बुद्धिजीवी व्यवसायी लोकांचा मोठा भरणा असतो . त्यांच्याही व्यावसायिक संघटना करून त्यांच्या आर्थिक मागण्यांभोवती त्यांचे लढे निर्माण केले पाहिजेत . दक्षिण हिंदुस्थानातील मुंबई व मद्रास प्रांतातून या गरीब मध्यमवर्गातील ब्राह्मण जातीच्या लोकांना आपल्या पक्षापासून अलग करण्यासाठी काही भांडवलदार , सरंजामदार यांचे हस्तक आपल्या पक्षावर ' जातीय पक्ष ' वा ' ब्राह्मणांचा द्वेष करणारा पक्ष ' असा आरोप करीत आहेत . भांडवलशाहीपूर्व पिळवणुकीवर आधारलेल्या धर्मामुळे प्राप्त झालेल्या जातीय श्रेष्ठतेमुळे ब्राह्मण जातीतील मोठा विभाग इतर जातींना कमी लेखून स्वत : च्या मोठेपणाच्या अहंकाराने भरलेला आहे . हा त्यांचा अहंकारच त्यांनी सोडून देणे जरूर आहे . आजच्या जगात जातीय श्रेष्ठत्वाच्या कल्पना उराशी बाळगून ते आपला घातच करून घेत आहेत . त्या वर्गाच्या या जातीय श्रेष्ठत्वाच्या कल्पनेवर हल्ला करणे म्हणजे काही ब्राह्मणांचा द्वेष करणे नव्हे . धर्म आणि जन्म यामुळे निर्माण होणारी जातीयता संपूर्णपणे बाजूला ठेवून सर्व कामगार , शेतकरी , गरीब मध्यमवर्ग यांची एकजूट होण्यावरच आपल्या लोकशाही क्रांतीचे यश अवलंबून आहे . आपल्या पक्षाची ही भूमिका ब्राह्मण जातीतील श्रमजीवींना पटवून त्यांचे गैरसमज दूर करणे व त्यांना वर्गीय चळवळीत खेचणे हे आपले कर्तव्य आहे . *पक्ष संघटना :* आज इतिहासाने जी जबाबदारी आपल्या पक्षावर टाकली आहे , तिचा विचार करता पहिली आणि तातडीची गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते ती म्हणजे आपल्या पक्ष संघटनेतील कमकुवतपणा होय . आपला पक्ष म्हणजे मार्क्स लेनिनवादी पक्ष आहे . परंतु मार्क्सवादी पक्ष हे विशेषण लावल्याने पक्ष मार्क्सवादी होत नाही ; त्यासाठी मार्क्सवादी तत्त्वज्ञान आत्मसात करावे लागते व लेनिन स्टालिन यांनी पक्ष संघटनेचे जे नियम सांगितले त्याप्रमाणे पक्ष संघटना उभारावी लागते . या दृष्टीने त्या पायावर आपल्या पक्षाची संघटना बांधणे व बळकट करणे ही आवश्यक गोष्ट आहे . पक्ष संघटना जर व्यवस्थित आणि कोणत्याही संकटाला तोंड देण्याइतकी बळकट नसेल तर आपल्या जबाबदाऱ्या आपण पार पाडू शकणार नाही .

*मार्क्सवादावरील मूलभूत ग्रंथांचा अभ्यास*

क्रांतिकारक तत्त्वज्ञानाशिवाय क्रांतिकारक पक्ष असू शकत नाही . मार्क्सवादी तत्त्वज्ञान हे कामगारवर्गाचे क्रांतिकारक तत्त्वज्ञान आपण आत्मसात केले पाहिजे . त्यासाठी मार्क्स , एंगल्स , लेनिन , स्टालिन यांच्या ग्रंथांचा अभ्यास करणे जरूर आहे . या कामगारवर्गाच्या महान पुढाऱ्यांनी जे कार्यदर्शन केले तेच सर्व मार्क्सवादी पक्षांचा पाया आहे . या पुढाऱ्यांच्या मूलभूत ग्रंथांवर आधारून वेळोवेळी जागतिक परिस्थितीत होणाऱ्या फरकाची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय क्रांतिकारक संघटनापूर्वी तिसरी इंटरनॅशनल व आता कॉमिनफॉर्म- जगातील कम्युनिस्ट पक्षाना मार्गदर्शन करीत असते.या संघटनांनी वेळोवेळी जे प्रबंध व ठराव पास केले तेही प्रबंध व ठराव मुख्यत : इंग्रजी भाषेत प्रसिद्ध झालेले आपण आत्मसात केले पाहिजेत . हे मूलभूत ग्रंथ व वरील आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहेत . याचा परिणाम असा झाला आहे , की मार्क्सवादी तत्त्वज्ञान हे इंग्रजी शिकलेल्या लोकांची एकप्रकारे मिरासदारी होऊन राहिली आहे . कम्युनिस्ट व समाजवादी पक्षाचे पुढारीपण मूलत : निरनिराळ्या तव्हेने मध्यमवर्गीय असण्याचे हेच कारण आहे . ही परिस्थिती आपण पालटली पाहिजे . या मूलभूत ग्रंथांची मराठी भाषेत भाषांतरे करणे व ती सर्वसाधारण श्रमजीवी जनतेच्या स्वाधीन करणे जरूर आहे . असे केल्यानेच हे तत्त्वज्ञान आपण श्रमजीवी वर्गापर्यंत पोचवू शकू . भाषांतरे करणे हे एक प्रमुख कार्य मानले तरी त्याबरोबर चळवळीच्या मार्गांनी मार्क्सवाद जनतेपर्यंत नेणे जरूरच आहे . वेळोवेळी शिबिरे घेणे , आपल्या वर्तमानपत्रात शक्य तितक्या व शक्य तेव्हा या गोष्टी मांडणे याचा अवलंब आपण केलाच पाहिजे . *कार्यकर्ते*: मार्क्सवादाच्या शास्त्रीय अभ्यासाबरोबरच आजची सर्वात मोठी गरज पक्षाला कोणती असेल तर ती कार्यकर्त्यांची . मार्क्सवादाचा अभ्यास केलेले , मार्क्सवादी पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते तयार करणे ही आपल्या पक्षाची आजची मूलभूत घोषणा आहे . जितके कार्यकर्ते जास्त व खंबीर त्या मानानेच कोणत्याही पक्षाची ताकद वाढत असते . मार्क्सवादी पक्ष हा जनतेचे पुढारीपण करणारा पक्ष असतो या दृष्टीने पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा त्या त्या भागातील जनतेचे पुढारीपण घेण्यास लायक असणे अत्यंत जरूर असते . यासाठी कार्यकर्ते तयार करण्याचा प्रयत्न तातडीने झाला पाहिजे . त्यासाठी शिबिरे वगैरे घेण्याची तातडीने सोय झाली पाहिजे . कार्यकर्ते तयार करताना स्त्री समाजातील कार्यकर्ते तयार करण्याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे . शेतकरीवर्गातील जवळजवळ निम्मा भाग स्त्रियांचा असतो आणि म्हणून शेतकरी संघटनेत खियांना विशेष स्थान आहे . स्त्रियांच्यात प्रचार करून त्यांना शेतकरी संघटनेत सामील करून घेणे हे अत्यंत जरुरीचे काम करण्यासाठी आपण स्त्री कार्यकर्ते ताबडतोब तयार केले पाहिजेत .

पक्षाच्या कामाची पद्धत

पक्षाच्या कामाची पद्धत ही लोकशाही मध्यवर्ती तत्त्वावर आधारलेली असली पाहिजे . पक्षांतर्गत संपूर्ण लोकशाही , प्रत्येक निवडणूक आणि पदाधिकारी व सर्वसाधारण सभासद यांना सारखेच हक्क असणे , टीका , आत्मटीकेचा प्रत्येकाला अधिकार ही लोकशाही मध्यवर्तीत्वाची वैशिष्ट्ये आहेत . पक्षातील लोकशाही मध्यवर्तीत्वाचा नाश झाला की पक्षात हुकूमशाही येते व त्याची वाढ खुंटते . कार्यकर्ते तयार करणे व पक्षाच्या कामाला मार्क्सवादी पद्धत लावणे या दोन्ही परस्परावलंबी गोष्टी आहेत . चांगल्या कार्यकर्त्याशिवाय पक्षाच्या कामाला मार्क्सवादी व्यवस्थेत स्वरूप येत नाही आणि मार्क्सवादी पक्षात काम केल्याशिवाय कार्यकर्ते तयार होत नाहीत . मार्क्सवादी पक्षाची पहिली आवश्यक गोष्ट योजनाबद्धता ही आहे . पक्षाच्या कोणत्याही सभासदाने किंवा सेलने ( Cell ) करावयाचे काम नेहमीच योजनाबद्ध असले पाहिजे . प्रत्येक गोष्ट हाती घेताना आपले मुख्य कार्य कसे पुढे जाईल याकडे लक्ष ठेवूनच हाती घेतले पाहिजे . लहर वाटली म्हणून एखादी गोष्ट करणे याला मार्क्सवादी म्हणत नाहीत . ती मध्यमवर्गीय अपप्रवृत्ती आहे . ती झाडून टाकण्याचा आपण अत्यंत कसोशीने प्रयत्न केला पाहिजे . कोणत्याही कामाची योजना आधी आखणे , ती नीट तपासून पाहणे , नंतर त्याबरहुकूम कार्य करण्याचा आटोकाट प्रयत्न करणे ही मार्क्सवादी पक्षाच्या कामाची पद्धत आहे . अशा रीतीने कामाला योजनाबद्ध स्वरूप यावयाचे म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांचीही विभागणी करावी लागते . प्रत्येक कार्यकर्त्याला चर्चा करून त्याचे काम नेमून देणे जरुरी आहे . कामाची व्यवस्थित विभागणी केली नाही तर पक्षाची प्रगती होणार नाही . पक्षाच्या खालच्या कमिट्यांनी वरच्या कमिट्यांना व वरच्या कमिट्यांनी खालच्या कमिट्यांना आपल्या कामाचे अहवाल सादर करणे जरूर आहे . त्याशिवाय एकंदर कामाचा अंदाज करणे व योजनाबद्ध काम करणे व टीका , आत्मटीका पद्धतीने लोकशाही मध्यवर्तीत्व राखणे शक्य होत नाही . पक्षाच्या कामाचा मूळ बिंदू सेल हा असला पाहिजे . प्रत्येक सभासदाने सेलमध्ये काम केले पाहिजे आणि सेलपद्धतीने काम केले पाहिजे . या कामाच्या पद्धतीतूनच कार्यकर्ते तयार होत असतात . सेलमार्फतच नेहमी पक्ष जनतेशी संबंध ठेवीत असतो . म्हणून सेलमार्फत काम करण्याची पद्धत आपण जितकी आत्मसात करू तितकी आपल्या पक्षाला जास्त बळकटी येणार आहे . पक्षाचे काम कामगार , शेतकरी , विद्यार्थी , मध्यमवर्ग , स्त्रिया इत्यादी निरनिराळ्या भागात चालत असते . पक्षाच्या प्रत्येक सभासदाने कोठल्यातरी विभागावर काम केलेच पाहिजे . आपला मार्क्सवादी पक्ष हा कामगार - शेतकरी राज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे . म्हणूनच ही गोष्ट आवश्यक आहे . टीका व आत्मटीका हा मार्क्सवादी पक्षाचा गाभा आहे . केलेल्या चुकांचे विवेचन करणे , त्यावर टीका करणे यामुळेच मार्क्सवादी पक्षाची बळकटी वाढत असते . व्यक्तीचे पुढारीपण नाहीस करून पक्षाचे , पक्षाच्या तत्त्वज्ञानाचे , पक्षाच्या धोरणाचे , पक्ष कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे पुढारीपण जर श्रमजीवी जनतेला द्यावयाचे असेल तर टीका व आत्मटीका एवढाच एक मार्ग आहे . जगातील कामगारवर्गाला आदर्शभूत झालेल्या सोव्हिएट युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाची प्रगती याच मार्गाने झाली आहे . पक्षाचे काम झपाट्याने वाढविण्याच्या दृष्टीने सर्व वेळी पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते निर्माण करून त्यांना जनतेच्या निरनिराळ्या विभागांत कामाला लावले पाहिजे . प्राथमिक अवस्थेत निदान जेथे शक्य आहे तेथे पक्षाचे निरनिराळ्या जिल्ह्यांचे व तालुक्यांचे चिटणीस जरी सर्ववेळ काम करणारे असतील तरी त्यामुळे पक्षाच्या कामाला लवकर स्वरूप येईल . परिस्थिती जसजशी बिकट होत जाईल तसतशी आपल्यावरची सरकारची दडपशाही वाढत जाईल . या दडपशाहीला तोंड देऊन पक्ष संघटना कायम ठेवण्याचे व बळकट करण्याचे कार्य करण्यासाठीही सर्ववेळ काम करणारे कार्यकर्ते तयार करण्याची जरुरी आहे . पक्षाच्या उभारणीत जनतेला फार मोठे स्थान आहे . पक्षाची संघटना तिच्या वर्तमानपत्राभोवती निर्माण होत असते . परंतु ' जनसत्ते'ला पक्ष संघटनेचे , जनताजागृतीचे अशी दोन्ही कामे करावयाची आहेत . याच दृष्टीने आपल्या ' जनसत्ता ' साप्ताहिकाची प्रगती झाली पाहिजे . पक्षाची उभारणी पैशाशिवाय अशक्य आहे . जनतेमधून पैसे मिळविणे हे पक्ष सभासदाचे एक महत्त्वाचे काम असते . ज्या श्रमजीवी जनतेसाठी आपण कार्य करतो त्यांनीच पक्षप्रेमाने आपणास मदत केली पाहिजे . ही दृष्टी ठेवूनच कार्यकर्त्यांनी सतत फंड वसूल करीत राहिले पाहिजे व पक्षाचा दैनंदिन कारभार चालण्यास आवश्यक लागणारा पैसा उभा केला पाहिजे .