भारतीय शेतकरी कामगार पक्ष

७ वे अधिवेशन – मोमिनाबाद

दि.२६,२७ व २८ मे १९६१

राजकीय ठरावाचा मसुदा

प्रस्तावना

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाने भारताच्या राजकीय , सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे मूल्यमापन करण्याचा तीन वेळा प्रयत्न केला आहे . या गेल्या १२-१३ वर्षांच्या कालखंडात पक्षाने केलेले हे मूल्यमापन अनुभवावरून ठरले आहे , ही गोष्ट स्वाभिमानपूर्वक नमूद अचूक करण्यासारखी आहे. आवडीच्या अधिवेशनात सत्ताधारी काँग्रेस पक्षाने समाजवादी समाजरचना निर्माण करण्याची घोषणा केली आहे . इतकेच नव्हे , तर या घोषणेला लोकसभेत ( मंजूर करून मान्यताही मिळविली आहे . या अशा प्रकारच्या समाजवादी समाजरचनेच्या निर्मितीसाठीच नियोजन आहे , असाही डांगोरा काँग्रेस पक्षाकडून पिटला जात आहे . गेल्या १४ वर्षांच्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाने वेळोवेळी आखलेली धोरणे व राजसत्तेद्वारे त्यांची केलेली अंमलबजावणी यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा समाजवाद कसा फसवा - बेगडी व मृगजलवत आहे , त्याचे स्पष्ट चित्र जनतेसमोर ठेवणे आज अत्यावश्यक झाले आहे . काँग्रेसच्या या तथाकथित समाजवादी समाजरचनेच्या घोषणेचा बुरखा फाडून तिचे खरेखुरे स्वरूप तपासण्याची आज नितांत गरज निर्माण झाली आहे . ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या कालखंडात भारतामध्ये आंदोलन , दडपशाही प्रतिकार , रक्त आणि अश्रू या गोष्टी नित्याच्याच झाल्या होत्या . कित्येक तपांच्या या अग्निदिव्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश साम्राज्यशाहीचा अस्त झाला व स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज फडकविला गेला . या महान क्षणाची भारतीय जनता असीम आतुरतेने वाट पाहत होती . स्वराज्याच्या कल्पनेलाच सुराज्याची मोहक कल्पना जोडण्यात आली होती . काँग्रेसने १ ९ ३० सालापासून सुराज्याची गोंडस चित्रे जनतेसमोर रंगविली होती . त्यामुळे त्यागाचे व बलिदानाचे सार्थ चीज झाले म्हणून आलेल्या स्वातंत्र्याचे जनतेने सहर्ष स्वागत केले व सुराज्याच्या निर्मितीकडे ती आशाळभूत नजर लावून बसली . त्या क्षणापासून आज उणीपुरी १४ वर्षे होत आली . राष्ट्रीय आंदोलनाचे पुढारीपण काँग्रेसकडे असल्यामुळे या १४ वर्षांत जनतेने काँग्रेसला राज्यकर्त्यांचा मान दिला आहे . १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व घटक राज्यांत व मध्यवर्ती सरकारात काँग्रेसच्या हाती अधिकारसूत्रे आली . १९५७ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत केरळशिवाय सर्व राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाले . कम्युनिस्टांची केरळमधील राजवट येनकेन प्रकारेण संपविल्यानंतर घटक राज्यात व मध्यवर्ती सरकारात काँग्रेस पक्षच सत्तारूढ झालेला आहे . ब्रिटिशांच्या हाती राजसत्ता असताना राज्ययंत्रणा म्हणजे जनतेच्या स्वातंत्र्याच्या , स्वाभिमानाच्या ऊर्मी दडपून टाकण्याचे एक साधन , हत्यार म्हणून तिचा वापर करण्यात येत होता . पोलीस राज्य एवढेच तिचे स्वरूप जनतेस दिसत होते . इतर राष्ट्रांत मात्र जनतेची प्रगती करणारे , राष्ट्राचे सार्वभौमत्व व जनतेचा स्वाभिमान यांचे संरक्षण करणारे , समाजाचा आर्थिक , सांस्कृतिक विकास घडवून आणणारे ' राज्ययंत्र ' असू शकते , हा अनुभव तेथील जनता अनुभवीत होती . त्यामुळे राज्ययंत्रणा समाजाच्या राजकीय , आर्थिक , सांस्कृतिक प्रगतीचे एक साधन व्हावे ही भारतीय जनतेची एक सार्वत्रिक अपेक्षा होती . स्वराज्य व सुराज्य या कल्पनेमागे हीच भावना होती . त्यामुळे राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यांनीच राज्ययंत्रणेची सूत्रे हाती घेतल्याने ही भावना भारतीय जनतेत वाढीस लागणे अगदी अपरिहार्य होते . या पार्श्वभूमीवर व कसोटीवर गेल्या १४ वर्षांच्या काळामध्ये भारतीय राज्ययंत्रणा राबविणाऱ्या काँग्रेस पक्षाचा जनतेला आलेला अनुभव तपासून पाहण्याची आज वेळ आली आहे . राज्ययंत्र अगर सरकार या संस्थेविषयी नागरिकांत एक प्रकारचा दरारा असतो . त्या दराऱ्याच्या साहाय्याने समाजघटकांच्या कारभारास वळण लावण्याचे काम राज्ययंत्रणेमार्फत करता येते . दंडनीतीच्या साहाय्याने समाजनीती ठरविणे हे सर्वसामान्यपणे राज्ययंत्रणेचे कार्य असते . याच तत्त्वाचा विकास होत आधुनिक काळात राज्ययंत्र हे समाजघडणीचे एक साधन बनत गेले आहे . राज्ययंत्र भिन्नभिन्न समाजघटकांना कोणते व कसे वळण लावण्याचा प्रयत्न करते , त्यावरून राज्ययंत्रणेचे स्वरूप समजून येण्यास मदत होते . राज्ययंत्रणेवर तिचे नियंत्रण करणाऱ्या पक्षाच्या धोरणाचा प्रभाव पडणे अपरिहार्य असते . किंबहुना राज्ययंत्रणा हे त्या पक्षाचे साधन असते . काँग्रेसने राज्ययंत्रणेचा साधन म्हणून वापर केला आहे . गेल्या १४ वर्षांत राज्ययंत्रणेच्या साहाय्याने भारतीय समाजाची विशिष्ट घडण बनविण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे . त्यामुळे काँग्रेस पक्षाचे धोरण स्वरूप व राज्ययंत्रणेमार्फत त्याने आपल्या धोरणाची केलेली अंमलबजावणी या दोहोंचा विचार करून समाजाची घडण करणाऱ्या राज्ययंत्रणेचे मूल्यमापन केले पाहिजे . ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध लढणाऱ्या भारतीय जनतेचे नेतृत्व स्वीकारणाऱ्या काँग्रेसचे स्वरूप सर्वसंग्राहक अशा लोकशाही संघटनेचे होते . त्यामुळे समाजातील भिन्नभिन्न घटक काँग्रेसच्या झेंड्याखाली नि : संकोचपणे आंदोलनात भाग घेत होते . सत्ता स्वीकारानंतर काँग्रेसनेत्यांनी काँग्रेसच्या सर्वसंग्राहक स्वरूपात बदल करण्याचा कसोशीने प्रयत्न केला व थोड्याच अवधीत तिचे मर्यादित राजकीय पक्षात रूपांतर केले . काँग्रेसच्या नेतृत्वाने हा बदल करण्याची तयारी सुरू केल्याबरोबर काँग्रेसला भांडवलदारी हितसंबंधांचे रक्षण करणारा पक्ष असे स्वरूप येण्याची प्रक्रिया झपाट्याने सुरू झाली ; त्यामुळे राष्ट्रीय आंदोलनात आघाडीवर असलेल्या समाजवादी व पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये स्थान राहणे अशक्य झाले . साहजिकच असे कार्यकर्ते काँग्रेसपासून दूर झाले . त्यांची जागा काँग्रेसच्या पुढारीपणाने भांडवलदारी धोरणाची तरफदारी करणारे कार्यकर्ते जमा करून भरून काढली . काँग्रेसच्या नेतृत्वापुढे केवळ मान तुकविणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्यांची भरती काँग्रेसमध्ये होणे अपरिहार्य होते . त्याग , निष्ठा , चारित्र्य व सचोटी या पूर्वीच्या कसोट्यांना काँग्रेस संघटनेत स्थान राहिले नाही . एकजात होयबां ' ची तेथे एकच भाऊगर्दी उसळली ! अशा कार्यकर्त्यांचा संच साथीला घेऊन काँग्रेसचे नेतृत्व समाजघडणीच्या कामाला लागले आहे . या संधीचा फायदा समाजातील संधिसाधू प्रवृत्तीच्या माणसांनी घेतला ; एवढेच नव्हे , तर त्यांनी काँग्रेसमधील आपले स्थान अटळ केले . एवढेच नव्हे , तर त्यांनी काँग्रेस पक्षावरच आपल्या धोरणाची पकड बसविली आहे . स्वातंत्र्यसंपादनाच्या वेळी भारतातील अर्थव्यवस्था मागासलेलील होती . सरंजामी हितसंबंध जिवंत होते . औद्योगिक विकास फारसा झालेला नव्हता . शेतीपद्धती मागासलेली होती . दुष्काळ , दारिद्र्य , बेकारी , अज्ञान , रूढी , वर्णाश्रम यांनी समाजव्यवस्था बुजबुजलेली होती आणि या अशा समाजव्यवस्थेवर सत्ता गाजविणारी राज्ययंत्रणा नोकरशाही पोलिसी छापाची होती . राज्ययंत्रणेच्या या निदानाबाबत भारतातील सर्व विचारवंतांचे , मुत्सद्यांचे व राजकीय पुढाऱ्यांचे एकमत होते . स्वातंत्र्यसंपादना नंतरच्या काळात ही अर्थव्यवस्था , समाजव्यवस्था आमूलाग्र बदलण्याची घोषणा सरकारने केली . त्यासाठी दोन पंचवार्षिक योजना पूर्ण केल्या . या योजनांच्या काळात एकूण दहा हजार कोटी रुपये खर्च केले . या योजनांचा आढावा घेऊन सरकारच्या घोषणा किती प्रमाणात मूर्त झाल्या हे तपासले पाहिजे . त्यासाठी नियोजनाचे सरकारी सूत्र , पद्धती , अंमलबजावणी व त्याचे परिणाम यांचा विचार केला पाहिजे .

हेच का ते नियोजन ?

सरकारने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी नियोजनाचा पाया किंवा उद्दिष्ट म्हणून जे सूत्र स्वीकारले आहे , त्याचे वर्णन तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्यात पुढीलप्रमाणे दिले आहे : “ डिसेंबर १ ९ ५४ मध्ये लोकसभेने असे जाहीर केले आहे की , ' समाजवादी पद्धतीची समाजरचना ' निर्माण करणे हे आर्थिक धोरणाचे सर्वसाधारण उद्दिष्ट असले पाहिजे . त्यानुसार , सामाजिक धोरणे व आर्थिक प्रगतीच्या पद्धती निश्चित करताना खाजगी नफा अथवा मूठभर लोकांचे हितसंबंध हा मूलभूत निकष लावता कामा नये , तर संपूर्ण समाजाचे हित हाच निकष असला पाहिजे . म्हणून सध्या अस्तित्वात असलेल्या सामाजिक व आर्थिक घटकांच्या राष्ट्रीय विकासातील त्यांच्या भूमिकेवरून विचार करण्यात आला पाहिजे . आपण डोळ्यांसमोर ठेवलेली सामाजिक उद्दिष्टे हे घटक ज्या मर्यादेपर्यंत पूर्ण करू शकत नसतील त्या मर्यादेपर्यंत यांच्यात बदल करण्यात आला पाहिजे . अथवा त्यांच्या जागी नवीन संस्था स्थापन करण्यात आल्या पाहिजेत . सामाजिक व आर्थिक संस्थांची पुनर्रचना करताना संपूर्ण समाजाच्या वतीने याबाबतची बहुतांश जबाबदारी सरकारवरच येऊन पडते . आपण स्वत : किती वाटा उचलावयाचा याची आखणी सरकारला करावी लागते आणि सर्व उपलब्ध साधन न - सामुग्रीचा समन्वित विकास घडवून येईल अशा प्रकारे खाजगी क्षेत्रातील आर्थिक घडामोडींचे सरकारला नियमन करावे लागते . सरकार जी धोरणे आखते त्याद्वारे ते समाजातील दुबळ्या वर्गाचे हितसंबंध राखीत असते व समाजातील इतर थरांच्या बरोबर हे दुबळे थर येतील अशाप्रकारे शक्य तेवढ्या लवकर हे सामर्थ्य त्यांच्यात निर्माण करावयाचे हे काम सरकारला करावयाचे असते ." सरकारने स्वीकारलेल्या या तत्त्वाच्या कसोटीवर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे चित्र तपासले तर पुढील महत्त्वाचे निष्कर्ष निघतात . सरकारने नियोजनाद्वारे अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करताना तिचे सरकारी अगर सार्वजनिक क्षेत्र ( Pub lic Sector ) व खाजगी क्षेत्र ( Private Sector ) असे विभाग केले आहेत . हे दोन विभाग करताना सर्व आर्थिक क्षेत्रांत सरकारने राष्ट्रहिताचा विचार करून नियंत्रण ठेवण्याची भूमिका घेतलेली आहे . पण गेल्या दहा वर्षांत भांडवल गुंतवणुकीचे जे चित्र दिसते तेच मूलत : या तत्त्वाशी विसंगत अगर या तत्त्वांचा धुव्वा उडविणारे ठरले आहे . पहिल्या व दुसऱ्या योजनेच्या काळात सरकारी क्षेत्रात अनुक्रमे २४०० व ३८०० कोटी इतकी रक्कम गुंतविण्याची योजना होती . तसेच खाजगी क्षेत्रात अनुक्रमे १६०० कोटी व २४०० कोटी रुपये गुंतविण्याची योजना होती . पण प्रत्यक्षात सरकारी क्षेत्रात १५६० कोटी व ३६५० कोटी रुपये अनुक्रमे दोन्ही योजनांत गुंतविण्यात आले व खाजगी अनुक्रमे १८०० कोटी व ३१०० कोटी रुपये गुंतविण्यात आले . सरकारी क्षेत्रातील उद्दिष्ट गाठणे साध्य झाले नाही ; पण खाजगी क्षेत्रात मात्र ९०० कोटी रुपये अधिक गुंतविण्यात आले . याचा अर्थ अंदाज चुकला असा नसून नियोजनाच्या भांडवलदारी धोरणाचा तो अपरिहार्य परिपाक आहे . आमचे नियोजनकार म्हणतात , “ दारिद्र्यातून वर येऊ इच्छिणाऱ्या , प्रचंड अशा वाढीच्या प्रक्रियेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या राष्ट्रासाठी प्रदीर्घ व सतत असे प्रयत्न करण्याची अतिशय आवश्यकता असते . या कारणामुळेच पहिल्या पंचवार्षिक योजनेत विकासाची समस्या सोडविण्यास २५ अथवा ३० वर्षे लागतील असा अंदाज धरण्यात आला होता आणि लगतचा ५ वर्षाचा अवधी हा या संदर्भात स्थूलमानाने आखण्यात आला होता ." परंतु पंचवार्षिक योजना आखताना त्या दीर्घ मुदतीच्या विकासाच्या योजनांशी सलग व निगडित असल्या पाहिजेत हे सूत्र प्रत्यक्षात उतरलेले दिसत नाही . हे योजनेतील अग्रक्रमाच्या बाबी ठरविण्यातील विसंगतीवरून दिसून येत आहे . पहिल्या योजनेत शेती उत्पादनाला अग्रहक्क देण्यात आला . दुसऱ्या योजनेत उद्योगधंद्यांस अग्रहक्क मिळाला आणि तिसऱ्या योजनेत पुन्हा शेती व वीजपुरवठा या बाबींना अग्रहक्क देण्यात येत आहे . हा जो अग्रहक्काच्या विसंगतीचा प्रकार आहे , त्यामुळे नियोजनाच्या मूलभूत तत्त्वाबाबतच सवाल निर्माण झाला आहे . भारत सरकारने दोन्ही योजनांच्या काळात भांडवल गुंतविण्याचे जे इष्टांक धरले होते ते राष्ट्रीय उत्पादनाच्या अनुक्रमे ७ वै ११ टक्के इतके होते . पण ते पुरे करण्यासाठी एकूण गुंतवणुकीच्या रकमेपैकी परकीय मदत व कर्ज पहिल्या व दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळात अनुक्रमे १० व २१ टक्के घ्यावे लागले . कर्ज व परकीय मदतीचा भाग काढल्यास हे इष्टांक पूर्ण करण्यास सरकारला अपयश आले आहे असेच दृष्टोत्पत्तीस येईल . इतकेच नव्हे , तर राष्ट्रीय उत्पन्नाचा ठरलेला हिस्सा गुंतवावा असे ठरल्यानंतर भांडवलनिर्मितीसाठी कोणत्या विभागाच्या कोणत्या उत्पन्नावर हा बोजा बसविला जात आहे हे पाहिले तर परिस्थिती भयानक आहे . सर्वसामान्य समाजाच्या जीवनखर्चात कपात करून किती भांडवलनिर्मिती होऊ शकते व धनिकांचे नफे वापरल्यास किती भांडवल निर्मिती होऊ शकते याचा विचार नियोजन मंडळाने के लाच नसेल असे म्हणता येणार नाही . पण सर्वसामान्य जनतेच्या जीवनखर्चात कपात करून अगर जीवनोपयोगी वस्तूंवर कर वाढवून भांडवलनिर्मिती करण्याचे धोरणच सरकारने हिरीरीने अवलंबिले आहे . सामान्य नागरिकास द्याव्या लागणाऱ्या अप्रत्यक्ष कराचे प्रमाण सारखे वाढत आहे व प्रत्यक्ष उत्पन्नावरील कराचे प्रमाण घटत आहे .

कराचे शेकडा प्रमाण

कर ------------------ प्रत्यक्ष ------------------ अप्रत्यक्ष

१९४८।४९ ------------------ ३४.४ ------------------ ५२.२

५०/५१ ------------------ २८.८ ------------------ ५३.४

५४/५५ ------------------ २६.५ ------------------ ५८.४

५७/५८ ------------------ २५.१ ------------------ ६१.१

५९।६० ------------------ २४.४ ------------------ ६२.९

करांचे उत्पन्न

दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास प्रत्यक्ष करांचे उत्पन्न १९४८-४९ साली २३९ कोटी रु . चे होते ; ते १९५९ -६० साली ३४८ कोटी रु . झाले . याउलट , अप्रत्यक्ष करांचे उत्पन्न १९४८-४९ साली ३६२ कोटी होते ; ते १९५९ -६० साली ८९९ कोटी रुपयांपर्यंत चढले . सर्वसामान्य जनता आजपर्यंत लादलेल्या कराच्या ओझ्याखाली अक्षरश : मेटाकुटीस आली असून यापुढे करबोजा वाढविण्याची मर्यादा संपली सर्वसामान्य जनतेची पिळवणूक करणारी करपद्धती आहे , असे अनेक शाखज्ञांनी कबूल केले असूनही हीच काँग्रेस सरकारकडून अवलंबिण्यात आली आहे . एवढेच नव्हे , तर भांडवलनिर्मितीचा हाच एकमेव मार्ग आहे , अशी सरकारची व नियोजन मंडळाची धारणा भांडवलनिर्मिती होऊ शकते त्या विभागाच्या आहे ; आणि त्यामुळे ज्या विभागाकडून धनिकांच्या हातातील संपत्ती मोकळी ठेवण्यात आली आहे . साहजिकच सरकारतर्फे भांडवल गुंतविण्याचा इष्टांक पूर्ण झाला नाही व खाजगी क्षेत्रात इष्टांकापेक्षा २५ टक्क्याहून जास्त पैसा गुंतविण्यासाठी मोकळा राहिला . त्यामुळे आवश्यक अशा राष्ट्रीय योजनांसाठी भांडवलाचा तुटवडा पडला . तसेच तुटीच्या अर्थभरण्याची पद्धती व परकीय सरकारकडून कर्ज काढून भांडवल उभारणे या मार्गाचा सरकारने अवलंब केला आहे . गेल्या दहा वर्षांत भारत सरकारने २०९१ कोटी रुपयांचे कर्ज परकीय सरकारकडून मिळविले आहे व ६३६ कोटी रुपये परकीय मदतरूपाने घेतले आहेत . या परकीय कर्जाचा फार मोठा भाग अमेरिका , इंग्लंड , कॅनडा वगैरे भांडवलदारी राष्ट्रांकडून घेण्यात आलेला असून त्या कर्जावरील व्याजाचा दर ३१/२ टक्क्यांपासून ५३ / ४ टक्क्यांपर्यंत आहे . आपल्या परकीय कर्जाचा जवळजवळ ८० % भाग भांडवलदारी देशांकडून घेण्यात आला आहे , तर रशिया वगैरे समाजवादी देशांकडून २० टक्क्यांहून कमी कर्ज घेण्यात आले आहे , हे लक्षात ठेवले पाहिजे . समाजवादी राष्ट्रांकडून मिळालेल्या कर्जावरील व्याजाचा दर फक्त २१/२ टक्के आहे. सरकारने गुंतविलेल्या ५२१० कोटी रुपयांपैकी फार मोठा भाग परकीय कर्जाचा आहे , हे स्पष्ट निदर्शनास येते . राष्ट्रीय उत्पन्नावरील हा करांचा बोजा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत सतत वाढत जाणार आहे . याशिवाय मध्यवर्ती सरकार व घटक राज्ये यांनी देशात उभारलेली कर्जे वेगळीच आहेत . म्हणून राष्ट्रीय उत्पन्नातील ११ टक्के भाग भांडवलनिर्मितीला उपयोगी पडतो हा सरकारी दावा किती दिशाभूल करणारा आहे हे चटकन ध्यानी येईल .

दोन पंचवार्षिक योजनांमुळे झालेली उत्पादनवाढ सरकारने जाहीर केली आहे . त्यात औद्योगिक उत्पादनाच्या वाढीचे प्रमाण मोठे दिसणे साहजिकच आहे . भारताची योजनापूर्व काळातील औद्योगिक अवस्था लक्षात घेतली , की या वाढीच्या प्रमाणाच्या आकड्यांवर सहजच प्रकाश पडतो . पण सरकारतर्फे व खाजगी उद्योगपतींमार्फत जे भांडवल गुंतविण्यात आले आहे त्या प्रमाणात मात्र ही वाढ झालेली नाही हेही नमूद करण्यासारखे आहे . शेती उत्पादनातील वाढ ही अशीच पोकळ व दिशाभूल करणारी आहे . भारताची लोकसंख्या गेल्या १० वर्षांत २७ टक्क्याने वाढली आहे व सरकारने जाहीर केल्याप्रमाणे शेतीच्या उत्पादनात ४० टक्क्याने वाढ झाली आहे असे मानल्यास १९५० साली जेवढी अन्नधान्याची गरज भागविली जात होती तेवढी तरी १९६० सालात भागविली जात आहे का ? प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्या बारा वर्षांत म्हणजे १९५९ अखेर १५०० कोटी रुपयांच्या अन्नधान्याची आयात भारत सरकारला करावी लागली . १९६० साली भारताला अमेरिकेबरोबर १ कोटी ७० लक्ष टन ( किंमत ६०० कोटी रु . ) अन्नधान्याच्या आयातीसाठी करार करावा लागला . आणि तरीही भारतीय नागरिकांना अजून अर्धपोटी आणि उपासमारीच्या छायेत जीवन कंठावे लागत आहे , हे लक्षात घेतल्यास नियोजनाच्या काळात अन्नधान्याच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली , हा सरकारचा दावा निखालस खोटा आहे हे तेव्हाच लक्षात येईल . भारतासारख्या परंपरागत शेतीप्रधान देशात शेती उत्पादनाचा खरा विकास पाहावयाचा झाल्यास भारतात दर एकरी उत्पादन वाढले आहे का हे पाहिले पाहिजे . सरकारने उत्पादनवाढीच्या मोठ्या योजना पाणीपुरवठा , खतपुरवठा , कर्जपुरवठा , बक्षिसे व मदत हाती घेऊनसुद्धा दर एकरी त्या प्रमाणात उत्पादन का वाढत नाही ? - या समस्येचा मागोवा घेणे आज जरूर झाले आहे. पहिल्या दोन्ही योजनांचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला हे सांगताना नियोजन मंडळ म्हणते- “ राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या गतीत वाढ करणे , कामधंदे मिळवून देण्याच्या संधीत वाढ करणे , मिळकत आणि संपत्ती यांच्यातील तफावत कमी करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होण्यास प्रतिबंध करणे या गोष्टींवर योजनेने विशेष भर दिला आहे." शेती व औद्योगिक उत्पादनाची अनिश्चित अवस्था , परकीय कर्ज व मदत यांचा राष्ट्रीय नियोजनावरील पगडा , आर्थिक विकासासाठी व भांडवलनिर्मितीसाठी गृहीत धरलेला कमकुवत आधार , या गोष्टींचा विचार केल्यास , राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती वाढली , काम मिळण्याची संधी वाढली , उत्पन्नातील व मिळकतीतील विषमता कमी झाली व आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण टाळण्यात यश आले , असा जो नियोजन मंडळाने निष्कर्ष काढला आहे तो किती तकलुपी आहे हे सहज लक्षात येण्यासारखे आहे . याउलट नियोजनाचा फायदा समाजातील कोणत्या घटकाला मिळाला आहे हे तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे . नियोजन मंडळामार्फत त्यासाठी एक चौकशी समिती नेमण्याचा प्रसंग यावा याचा अर्थच असा , की एकंदर समाजाची आर्थिक घडी समाधानकारक बसत असलेली दिसत नाही . समाजातील श्रीमंत थराला नियोजनाचा अधिक फायदा उचलता आला व त्याचा बोजा सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या थरावर लादण्यात आला हे स्पष्ट झाले आहे.

कारण पहिल्या दोन्ही योजनांपूर्वी असलेली बेकारी वाढली आहे . या दोन्ही योजनांमध्ये काम देण्यासाठी जो इष्टांक ठरविला होता तो पूर्ण करता आला नाही . दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत ८० लाख औद्योगिक क्षेत्रातील बेकारांना काम देण्याचा संकल्प सोडण्यात आला होता . परंतु ६५ लाख बेकारांसाठीच रोजगारधदा उपलब्ध करण्यात आला . याचाच स्पष्ट अर्थ असा की , तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीलाच १५ लाख औद्योगिक क्षेत्रातील बेकार कामासाठी हात पसरून तयार आहेत . तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत जरी १ कोटी ५ लक्ष औद्योगिक क्षेत्रातील बेकारांची सोय लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत १ कोटी ५० लक्ष नवीन औद्योगिक क्षेत्रातील बेकारांची फलटण काम द्या ' म्हणून मागणी करताना दिसणार आहे . शिवाय शहरी व खेडूत विभागातील अर्धबेकारांची संख्या १ कोटी ५० लाखावर गेली आहे ही गोष्ट ध्यानी घेतल्यावर गेल्या पंचवार्षिक योजनांची बेकारी निवारणाबाबत फलश्रुती काय झाली हे सहज कुणाच्याही ध्यानी येईल . शेतमजुरांची संख्या अशीच वाढत आहे आणि त्यांचे दरडोई उत्पन्न कमी झाले असून दरडोई कर्ज मात्र वाढत चालले आहे . ही वस्तुस्थिती पुढील तक्त्यावरून सहज समजून येईल .

स्वतः च्या मालकीची जमीन नसलेले शेतकरी व शेतमजूर यांच्या उत्पादनाचा व खर्चाचा तक्ता

१९५०/५१ ----------- ५५/५६ ----------- शेकडा वाढ (+)

अ) रोज मजुरी ----------- रु.पैसे रु.पैसे ----------- शेकडा घट (-)

१) पुरुष ----------- १.०९ ----------- ००.९६ ----------- (-) १३.५

२) स्त्री ----------- ०.६८ ----------- ००.५९ (-) १५.२

३) मुले ----------- ०.७० ----------- ००.५३ ----------- (-) ३२.०

ब)कुटूंबाचे उत्पन्न ----------- ४४७.०० ----------- ४३७.०० ----------- (-) २.२

क)कुटूंबाचा खर्च ----------- ४६१.०० ----------- ६१८ ----------- (+) ३४.०

कुटूंबाच्या अंदाज १४.०० ----------- १८१.००

पत्रकातील तुट

ड) कर्जबाजारी ----------- ४५% ----------- ६४%

कुटूंबाचे प्रमाण

इ) प्रत्येक कर्जबाजारी ----------- ४७.०० ८८.०० ----------- + (८७.२)

कुटुंबाचे सरासरी कर्ज (नॅशनल सॅंपल सर्वे सी.एस.ओ.) याच्या उलट धनिकांच्या बँकामधील ठेवी वाढल्या , कंपन्यांचे नफे वाढले , खाजगी क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात इष्टकांपेक्षा अधिक भांडवल गुंतविण्यात आले . बँकांच्या भांडवलात व औद्योगिक कंपन्यांच्या नफ्यात झालेली वाढ पुढील तक्त्यावरून दिसून येईल.

सर्व व्यापारी बँका ( कोटी रुपये )

वर्ष वसूल झालेले ठेवी

भांडवल व गंगाजळी

१९५१-५२ ----------- १११६ ----------- ८३९

१९५९ -६० ----------- २२६३ ----------- १८८३

खाजगी कंपन्यांचे वसुलीभांडवल

वर्ष कोटी रुपये

५०-५१ ------------ २०८

५५-५६ ------------ ३३३

५८-५९ ------------ ७२५

५९-६० ------------ ७८१

१००१ औद्योगिक कंपन्यांनी वाटलेला नफा (कोटी रुपये )

वर्ष ------------ कोटी रु .

१९५५ ------------ ३९

१९५६ ------------ ४२

१९५७ ------------ ४२

१९५८ ------------ ४६

--------------------

याचा सरळ अर्थ असा की , या योजनांचा जास्तीत जास्त फायदा धनिकवर्गालाच मिळाला आहे . आर्थिक विषमता कमी करण्याची घोषणाही याच पद्धतीने बेगडी ठरली आहे . शेती विभागात सरंजामी मालकी नष्ट करण्याची सरकारची घोषणा होती . पण राज्य सरकारांनी या घोषणेचा पूर्णपणे बट्ट्याबोळ केला आहे . सरंजामदारांची सामाजिक प्रतिष्ठा काही प्रमाणात या घोषणेमुळे कमी झाली , ही गोष्ट खरी असली तरी त्यांचे हितसंबंध बहुतांशी अबाधित राहिले आहेत . याउलट कायद्यांच्या फटींचाफायदाघेऊन सरंजामदारी हितसंबंधांनी प्रत्यक्ष जमीन कसणारांना फार मोठ्या प्रमाणात जमिनीवरून हुसकावून देऊन हे कायदे निष्फळ ठरविले आहेत . सरंजामदारी हितसंबंधीव त्यांचे पाठीराखेयांची विपरीत नीती ग्रामीण अर्थरचनेच्या संकल्पित उद्दिष्टांना सुरुंग लावायलाच कारणीभूत झाली आहे . या अशा उच्चाटनामुळे बेकार झालेल्या शेतकऱ्यांचा प्रचंड विभाग पाहिल्यावर संपूर्णपणे नागविले गेलेले शेतकरी - शेतमजूर यांचा विभाग एकीकडे आणि यंत्रसामुग्री , खते , पाणी यांचा वापर करून शेतमजुरांच्या श्रमावर शेती उभारू पाहणारा सुधारलेला ( ? ) शेतकरी दुसरीकडे , असा देखावा दिसून येत आहे . तो पाहिल्यानंतर विषमता कमी होत आहे , असे म्हणण्याचे धाडस कोण करील ? बेकार , भुकेकंगाल कामगारांचा प्रचंड तांडा एकीकडे तर नव्या कंपनी जीवनाचा आस्वाद घेत बॅन्कठेवी वाढविणारा धनिकवर्ग दुसरीकडे असे हे आर्थिक विषमतेचे भीषण चित्र दिसत आहे . चालू जमान्यात सरंजामदार , संस्थानिक , पेढीसावकार हे कदाचित दिसत नसतील ; पण कोट्यवधी रुपयांचे भांडवल उभारणाऱ्या कंपन्या भारतात सर्व ठिकाणी दिसत आहेत . या नव्या कंपन्या व बँका यांचे जाळे विणले जात असतानाच त्यांची केंद्रीकरणाची प्रक्रियाही सुरू आहे . या सर्व संघटित आर्थिक व्यवहाराचे नियंत्रण करणाऱ्या अगदी थोड्या मक्तेदार कंपन्या असून त्या राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर आपली जबरदस्त पकड बसवीत आहेत . खाजगी उद्योगधंद्यांतील भांडवलाचे वर्चस्व एकीकडे वाढत असताना त्याच क्षेत्रात परकीय खाजगी भांडवलाचे प्रमाण वाढत आहे . १९४८ साली भारतात परकीय कंपन्यांचे २५५ कोटी रु . भांडवल होते ते १९५८ साली ५७० कोटी रु . इतके झाले . हे भांडवल भारतीय खाजगी भांडवलाच्या साहाय्यानेच वाढत आहे . किंबहुना सरकारी धोरणाचाच तो परिणाम आहे . परकीय कंपन्यांचे नफे भारतात गुंतविण्याची मुभा दिल्याबरोबर भारतीय व परकीय भांडवलाच्या युतीच्या कंपन्या भारतात वाढू लागल्या आहेत . या कंपन्यांच्या नोकरवर्गाचे हिंदीकरण करण्याची शक्ती जरी भारत सरकारने ठेवली असली तरी या कंपन्या भारतातील एकंदर अर्थकारणावर प्रचंड परिणाम घडवून आणीत आहेत . आणि त्यामुळे ‘ स्वयंपूर्ण व बळकट अर्थव्यवस्था ' या नियोजन मंडळाच्या घोषणेलाच या धोरणामुळे सुरुंग लागला आहे . नियोजनकाळातील दहा वर्षांचा हा अनुभव आहे . उत्पादन वाढत आहे ; पण त्याचा वेग वाढू शकत नाही . उत्पादनवाढीबरोबर एकंदर समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजीखालावत चालली आहे . कंपन्यांचे नफे , बँकांतील ठेवी वाढत असल्या तरी कामगारांचे जीवन अधिकच दरिद्री होत आहे . एकीकडे औद्योगिक क्षेत्राची धडाक्याने उभारणीव पुनर्रचना होत आहे , तर दुसरीकडे कामावरून फेकले जाणारे व कामाची अपेक्षा आणि कुवत असलेलेमजूर यांची संख्या दिवसेंदिवस फुगत आहे . एकीकडे शेतीसुधारणेवर सरकारी खर्च वाढत आहे तर दुसरीकडे अमेरिकेतून दरवर्षी होणारी धान्य - आयात वाढत आहे . धान्याचे उत्पादन वाढत असतानाच धान्याच्या किमतीतील चढउतार वाढून शेतीव्यवसाय हा जुगार ठरत आहे . राष्ट्रीय उत्पन्न वाढत आहे हे एक चित्र तर देशातील दारिदय वाढत आहे हे दुसरे चित्र . राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत ही विसंगती कशामुळे निर्माण झाली ? देशात नियोजित अर्थव्यवस्था असताना अर्थव्यवस्थेत हे असे अराजक का वाढू पाहत आहे ? नियोजनाचे म्हणून जे आर्थिक धोरण सरकारने स्वीकारले आहे , त्या धोरणाचा हा अपरिहार्य परिणाम आहे ; आणि या परिणामावर पांघरूण घालण्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे . सरकारने योजनेद्वारे वेगवेगळ्या शिक्षण योजना आखून सध्याच्या अर्थव्यवस्थेला पोषक अशा नव्या वर्गाची निर्मिती झपाट्याने चालू केली आहे . हा नवा वर्ग या अर्थव्यवस्थेचे गोडवे गात आहे आणि श्रम करणाऱ्या सर्व विभागांना राष्ट्राच्या हितासाठी कष्ट करण्याचा सवंग सल्ला देण्यात येत आहे . एवढेच नव्हे , तर जीवनमानात कपात करून राष्ट्रीय भांडवल उभे करण्यास साहाय्य करायला तयार व्हा , असा आदेशही देण्यात येत आहे . आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी , असा हा सरकारी प्रचारयंत्रणेचा खाक्या आहे. नियोजनाची घोषणा देण्यात येत असली तरी राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्याची योजनाबद्ध भूमिका स्वीकारण्यास काँग्रेस सरकार तयार नाही. पहिली पंचवार्षिक योजना सुरू होताना सरंजामी हितसंबंध हा आर्थिक प्रगतीच्या मार्गातील अडथळा होता , तो दूर करून नव्या अर्थव्यवस्थेचा पाया घालण्याची गरज होती ; परंतु हे कार्य झाले नाही . -

सरकारचे नियोजनाचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे

“ सामाजिक व आर्थिक संस्थांची पुनर्रचना करताना आपण स्वत : किती वाटा उचलावयाचा याची आखणी सरकारला करावी लागते आणि सर्व उपलब्ध साधनसामुग्रीचा समन्वित विकास घडून येईल अशा प्रकारे खाजगी क्षेत्रातील घडामोडींचे सरकारला नियमन करावे लागते . ” खाजगी विभागात सरकारच्या कल्पनेप्रमाणे मोठमोठे खाजगी उद्योगधंदे एवढेच येत नसून लक्षावधी शेतकरी , कारागीर , व्यापारी व लहान धंदेवाले हेही येतात . या विभागाच्या कार्यशक्तीला नियमित करून सरकार या देशात समाजवादी पद्धतीची समाजरचना आणू पाहत आहे . भारतातील या सर्व धंद्यांची अवस्था अशी आहे , की तळच्या समान घटकापासून वरपर्यंत प्रत्येक विभाग कमीअधिक प्रमाणावर दुसऱ्याच्या श्रमावर व पिळवणुकीवर आपला जीवनक्रम चालवीत असतो . शेतकरी , शेजमजूर कारागीर व कूळ यांच्या पिळवणुकीवर शेतीधंदा व त्यावरचा खंड खाणारा विभाग - जमीनदार , सरंजामदार , सावकार - अवलंबून आहे . कामगारांच्या पिळवणुकीवर उद्योगधंद्यातील सर्व लहानमोठे विभाग जगत असतात व सर्वात मोठे धंदेवाले सर्व समाजाच्या पिळवणुकीवर जाणाऱ्या विभागाच्या म्हणजे कामगार , शेतकरी , कारागीर व शेतमजूर यांच्या श्रमातून निर्माण होणारा नफा , खंड अगर दलाली ही पिळणाऱ्या वर्गाच्या घशात जात असते . यात सरकारी करांची भर केली म्हणजे या पिळवणुकीचे चित्र पूर्ण होते . ही पिळवणूक थांबविण्यासाठी सरकारने काय केले आहे ? ही पिळवणूक थांबविण्याऐवजी या सर्व विभागांच्या कार्यशक्तींना वळण लावण्याची भूमिका घेणे याचा अर्थ पिळवणुकीवर जगणाऱ्या विभागांना पिळवणूक करण्याची संधी देणे हा तर आहेच ; पण त्याशिवाय त्यांना अर्थव्यवस्थेवरील त्यांचा पगडा शाबूत ठेवण्यास मदत करण्यासारखे आहे . गेल्या दहा वर्षांत या वर्गांवर सरकारने कोणते बंधन ( ! ) घातले असेल तर ते एकच , की ही सारी पिळवणूक कायद्याच्या चाकोरीत आणून बसविली आहे ! सरंजामी हितसंबंधांना भांडवली उत्पादन पद्धतीचा पेहराव चढविण्याचा प्रयत्न केला आहे ; व त्यांना नवे संघटित भांडवलदारी जीवन निर्माण करण्याची संधी पूर्णपणे दिली आहे . त्यामुळे सरंजामदार , जमीनदार , सावकार , तालुकदार यांचे स्वरूप व चेहरे मात्र बदललेले दिसत आहेत . त्यांची पिळवणुकीची नवीन पद्धती रूढ होत आहे . देशाचे औद्योगिकीकरण करण्याच्या नावाखाली खाजगी उद्योगधंद्यांत शिरणाऱ्या या सर्व कंपन्यांना सरकारचे खास संरक्षण व सवलती मिळत आहेत आणि त्यामुळे हा विभाग अधिक संघटित होऊन सरकारच्या नियंत्रणाचे स्वरूप ठरवून घेत आहे . यावरून खाजगी उद्योगशक्तींचे सरकारने नियमन करण्याऐवजी या शक्तींचे सरकारवर दडपण येत असून हा नवा संघटित औद्योगिक खाजगी विभाग राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे भवितव्य ठरवीत आहे . या परिस्थितीतून बाहेर पडण्याऐवजी सरकार दुष्ट वर्तुळात अधिकाधिक गुरफटत आहे . एवढेच नव्हे तर समाजाचे प्रतिनिधी म्हणून कायद्याच्या व दंडुक्याच्या दबावाखाली सर्व समाजाला या नव्या खाजगी संघटित उद्योगवाल्यांच्या हवाली करीत आहे . आणि त्यामुळे एकंदर राष्ट्रीय अर्थव्यवस्था या बड्या कंपन्या व त्यांचे नियंत्रण करणाऱ्या बड्या भांडवलदारांच्या व परकीय भांडवलाच्या वर्चस्वाखाली येत आहे . सरकारच्या तथाकथित नियोजनाचा गेल्या दहा वर्षांचा हा दृश्य परिणाम आहे . या सर्व व्यवहाराच्या कैचीत राष्ट्रीय अर्थव्यवस्था घुटमळत आहे ! सरकारने उद्योगधंदे व व्यवसाय यात सरकारी व सहकारी विभाग सुरू केला आहे . गेल्या दहा वर्षांत सरकारी क्षेत्रात प्रामुख्याने पोलाद , लोखंड , खाणी , यंत्रसामुग्री , खते , सिमेंट व वाहतूक हे धंदे घेतले आहेत . सहकारी क्षेत्रात शेती व जीवनोपयोगी वस्तूंचे उत्पादन यांना प्राधान्य दिले आहे . सरकारच्या या प्रयत्नाचे प्रत्यक्ष फल म्हणून होणारे उत्पादन तिसऱ्या योजनेत मिळणार आहे असे सांगितले जाते . या दोन्ही विभागांच्या साहाय्याने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला समाजवादी वळण लागले जाईल अशी कल्पना आहे . पण ते अद्यापि स्वप्नच आहे . याउलट या क्षेत्रांत सरकारने जी संघटना उभी केली आहे ती नोकरशाही व बड्या कंपन्या यांच्या साहाय्याने उभी केली आहे . त्यामुळे हा विभाग राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे समाजवादी भवितव्य ठरवील , अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे . उलट खाजगी कंपन्या ज्या क्षेत्रात शिरू शकत अगर धजत नाहीत असाच हा विभाग आहे . कारण या क्षेत्रात नफेखोरीला फारच थोडा वाव आहे . त्यामुळे या क्षेत्राचे भवितव्य अजून खाजगी उद्योगक्षेत्रातील बड्या पुंजीपतींच्या हातात आहे . सहकारी क्षेत्रातील संघटनेची व धोरणांची आजची अवस्था खऱ्या अर्थाने सहकारी जीवनाचा पाया ठरू शकत नाही . या क्षेत्रातील उद्योगधंद्यांना सरकारी आश्रय आहे , म्हणूनच ते तग धरू शकतात . त्यांना स्वत : ची अशी ताकद निर्माण झालेली नाही . आणि नजीकच्या भविष्यकाळात ती तशी निर्माण होण्याची शक्यताही दिसत नाही . राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग शेतीव्यवसाय असल्यामुळे त्याचा स्वतंत्रपणे विचार करणे आवश्यक आहे . शेतीव्यवसायात गेल्या दोन्ही योजनांच्या काळात सरकारने १७१२ कोटी रुपये गुंतविले . एवढा मोठा खर्च होऊनही शेतीच्या उत्पादनात त्या प्रमाणात वाढ होत नाही याचे कारण शोधण्याची वेळ आली आहे , असे सरकारला अजूनही वाटत नाही ? तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत शेतीव्यवसायाला अग्रहक्क देण्यात आला आहे . या व्यवसायात अधिक पैसा , अधिक खते , अधिक पाणी दिले म्हणजेच उत्पादन वाढते , अशी सरकारची समजूत आहे . परंतु प्रत्यक्षात शेती कसणाऱ्या शेतकऱ्याला सरकारी योजनेचा फायदा मिळालेला नाही . शेतीव्यवसायातील उत्पादकवर्ग जो शेतमजूर , शेतकरी यांच्या मूलभूत प्रश्नांचा या दोन्ही योजनांमध्ये कोठेच गंभीरपणे विचार केला गेला नाही . तिसऱ्या योजनेत तेच धोरण मागील पानावरून पुढे चालू करण्यात आले आहे . यावरून एक गोष्ट निर्विवादपणे सिद्ध झालेली आहे की , जमीनदार , सावकार , व्यापारी व सरकार हे शेतकऱ्यांची सर्व बाजूंनी पिळवणूक करीत आहेत . जमिनीचा खंड व सारा ही उत्पादनातील नफ्यावर बसविलेली नसून मालकीहक्काबद्दल बसविलेली आहेत . त्यामुळे जे उत्पादन होईल त्याचा ठराविकभाग जमीनमालकवसरकार यांना द्यावा लागतोच . भांडवली उत्पादन पद्धतीतसुद्धा ही करपद्धती विसंगत आहे . सरकारने ' कसेल त्याची जमीन ' ही घोषणा केली . पण प्रत्यक्षात जमीनमालक , जमीनदार व सरंजामदार यांनी खऱ्या शेतकऱ्यास जमिनीवरून हुसकावून लावले आहे . राहिलेल्या कुळांची अवस्था अनिश्चित आहे . त्यामुळे सद्य : स्थितीत व्यवसाय म्हणून शेती करणाऱ्यांचे प्रमाण कमी कमी होत असून जमिनीची मालकी ठेवून मजुरांकरवी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिकाधिकवाढत आहे . या विभागाकडे असलेल्या जमिनीचे प्रमाणही वाढू लागले आहे . शेतमजुरांच्या पिळवणुकीवर हा व्यवसाय अवलंबून राहू लागला आहे . ही पिळवणूक थांबविल्याशिवाय दुसरे उपाय ही पिळवणूक थांबविल्यानंतर शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज आहे . आज जमीन ही उत्पादनाचे साधन आहे , या भावनेने तिच्याकडे पाहण्याऐवजी ती जीवनाची शाश्वती प्रतिष्ठा आहे , या भावनेनेच पाहिले जाते . त्यामुळे जमिनीचा उत्पादनाकडे पूर्ण उपयोग करावयाचा झाल्यास प्रत्यक्ष कसणाऱ्या शेतकऱ्याकडेच जमिनीची मालकी असली पाहिजे व त्यांना सहकारी पद्धतीवर शेतीव्यवसाय उभारण्यास मदत केली पाहिजे . ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जमिनीसंबंधी कायदे बदलले पाहिजेत . आज अस्तित्वात असलेले कायदे हा मालकीसंबंधीचा बदल घडवून आणू शकत नाहीत . काँग्रेस पक्षाने नागपूरच्या अधिवेशनात शेतीचा प्रस्ताव मंजूर केला आहे . अन्नधान्याच्या उत्पादनवाढीसाठी व औद्योगिकधंद्याकरिता लागणाऱ्या कच्च्या मालाचा भरपूर प्रमाणात पुरवठा होण्यासाठी नजीकच्या काळात सहकारी शेती हाच एक मार्ग आहे , ही गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही . पण सहकारी शेतीसाठी जी प्राथमिक तयारी करावी लागते ती अधिकारारूढ काँग्रेस पक्षाने केलेली नाही अगर ती करण्याची त्याची तयारी नाही . " जमिनीच्या मालकीवर कमाल मर्यादा घाला व " १ ९ ५७ साली सांगितलेले त्यासंबंधी त्वरित कायदे करा , " असे नियोजन मंडळाने असूनसुद्धा निरनिराळ्या राज्यांत तत्संबंधी कायदे पास करण्याचे काम अजून चालूच आहे . सरकारच्या या धोरणाची चाहूल लागताच आणि सरकारने अंगीकारलेल्या दिरंगाईचा फायदा घेऊन बहुसंख्य जमीनदारांनी बनावट वाटप , बक्षीसपत्रे , दान व विक्रीचे व्यवहार इत्यादी विविध मार्गांनी आपल्या जमिनीचे फार मोठ्या प्रमाणावर हस्तांतर केले आहे . काँग्रेस सरकारच्या कमाल मर्यादा धोरणाला मुळातच असा सुरुंग लागला आहे . तसे पाहिले तर यासंबंधी पास झालेल्या व होत असलेल्या कायद्यांनीसुद्धा खऱ्याखुऱ्या अर्थाने मालकीसंबंधात अभिप्रेत असलेला बदल होणार नाही . कमाल मर्यादा ठरविताना शेतकरी कुटुंबाची श्रमशक्ती लक्षात घेण्याऐवजी त्या जमिनीतून मिळणारे उत्पन्न हेच पायाभूत मानण्याची भूमिका काँग्रेस सरकारने स्वीकारल्यामुळे जमीनधारणेची कमाल मर्यादा ही अवास्तव ठरविण्यात आली आहे . असेच पाच माणसाहून अधिक माणसे असणाऱ्या कुटुंबाला दर एक जादा व्यक्तीच्या मागे कमाल मर्यादेच्या १/६ इतकी अधिक जमीन धारण करण्याची मुभा असून अशा रीतीने जास्तीत जास्त कमाल मर्यादेच्या दुप्पट जमीन धारण करण्याची सवलत देण्यात आली आहे . केवळ देखरेख करून मजुराकरवी शेती करवून घेणारासुद्धा शेतकरीच आहे , अशी ऐसपैस व भोंगळ व्याख्या केल्यामुळे खऱ्या अर्थाने स्वत : कसणारांना जमीन मिळण्याची सुतराम शक्यता नाही . ज्यांच्याकडे मोठ्या जमिनीची मालकी आहे त्यांच्याकडे जमीन चांगल्या तऱ्हेने कसण्यासाठी श्रमशक्ती नाही . त्याउलट लाखो शेतमजूर व लहान शेतकरी , ज्यांच्याजवळ अमाप श्रमशक्ती आहे , त्यांना कसण्यासाठी जमीन नाही . श्रमशक्ती व जमीन यांची सांगड घातली पाहिजे . जमीनमालकीचे केंद्रीकरण नष्ट केल्यावाचून म्हणजेच जमिनीच्या मालकीसंबंधात बदल केल्याशिवाय शेतीव्यवसायातील सध्याचे अराजक नष्ट होणार नाही व शेती उत्पादनही वाढणार नाही . आपल्या देशातील जमीनमालकीच्या केंद्रीकरणाची स्थिती पुढील तक्त्यावरून दिसून येईल .

एकर ------------- एकूण जमीन ------------- एकूण जमिनीशी मालकांशी शेकडा प्रमाण शेकडा प्रमाण.

१ एकरापर्यंत ------------- १६.८ ------------- १.०

१ एकराहून अधिक ------------- ४२.३ ------------- १४.५

पण ५ एकरापर्यंत ------------- ३५.३ ------------- ५०.१

५ एकराहून अधिक पण २५ एकरापर्यंत ------ ------------- ४.६ ------------- १८.४

२५ एकरांहून अधिक पण ५० एकरांपर्यंत

५० एकरांपेक्षा जास्त ------------- १.० ------------- १६.०

( लँड रिफार्म पॅनेलचा अहवाल , मे १९५८ )

याशिवाय ज्यांच्याजवळ स्वत : च्या मालकीची एक गुंठाही जमीन नाही असे शेतमजूर व त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची संख्या ४॥ कोटी आहे . सहकारी शेती यशस्वी होण्यासाठी सहकारक्षेत्रात काम करणाऱ्या लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांचा संच असला पाहिजे . सहकारी शेती करू इच्छिणारे सभासद आर्थिकदृष्ट्या थोड्याफार फरकाने समान पातळीवर असले पाहिजेत . पण काँग्रेसच्या चालू धोरणामुळे कमाल मर्यादा धारणेपर्यंत अगर तिच्या दुप्पट जमीन असणारे बडे शेतकरी व ज्यांच्याजवळ एखाददुसरा एकर जमीन असलेले गरीब शेतकरी आणि केवळ मजुरी करून पोट भरणारा दरिद्री शेतमजूर या साऱ्यांचा समावेश सभासद म्हणून गावच्या सहकारी शेतीसंस्थेत होणार आहे . या सहकारी शेतीमध्ये ज्यांची जमीन जास्त असेल त्यास त्या जमिनीच्या प्रमाणात उत्पादनात हिस्सा मिळणार आहे व मजुरांच्या पदरात जितके दिवस काम केले असेल त्यांचा रोजंदारीचा हिशेब पडणार आहे . याचा सरळ अर्थ असा होतो , की शेतीव्यवसायातील आर्थिक विषमता कमी होणार नसून उलटपक्षी तिच्यावर सहकारी शेतीच्या गोंडस नावाखाली शिक्कामोर्तब होणार आहे .

काँग्रेसच्या या तथाकथित सहकारी शेतीसंस्थेचे सभासद होण्याची श्रीमंत शेतकऱ्यांस मोकळीक असल्यामुळे असल्या संस्थेत साहजिकच श्रीमंत शेतकऱ्यांचे वर्चस्व राहणार आहे . काँग्रेसच्या सहकारी शेतीमध्ये श्रमाला प्राधान्य मिळणार नसून जमिनीच्या मालकीला मानाचे स्थान मिळणार आहे . त्यामुळे प्रत्यक्ष घाम गाळणारास उत्पादनातील फारच थोडा वाटा मिळणार असून प्रत्यक्ष कष्ट न करणाऱ्या श्रीमंत शेतकऱ्यांच्या हिश्श्याला सिंहाचा वाटा जाणार आहे . त्यामुळे कष्टकरी विभाग साहजिकच या सर्व व्यवहारामध्ये उदासीन राहणार आहे . शेतमजूर व गरीब शेतकरी यांच्या नशिबी काँग्रेसच्या सहकारी शेतीसंस्थेत वेठबिगारी येणार आहे , असा स्पष्ट इशारा देणे भाग पडत आहे .

सहकारी शेतीपद्धती खऱ्याखुऱ्या अर्थाने रूढ करण्याच्या दृष्टीने पुढील गोष्टी तातडीने अमलात आणल्या गेल्या पाहिजेत :

१ ) जमीनमालकीसंबंधात मूलगामी बदल करून प्रत्यक्ष कसणाराच्या मालकीचीच जमीन केली पाहिजे.

२ ) शेतमजूर व लहान शेतकरी यांना सहकारी शेतीसाठी एकत्र करून त्यांना सर्व प्रकारचे सरकारी साहाय्य देणे .

३ ) वरील प्रकारच्या सहकारी शेतीसंस्थेचे सभासद होण्यास श्रीमंत शेतकऱ्यांना मज्जाव करणे .

४ ) सर्वप्रथम सहकारी शेतीस पोषक वातावरण तयार होण्यासाठी शेतमजूर व भूमिहीन यांना सरकारी पडीत जमिनी देऊन त्यांच्या सहकारी शेतीसंस्था स्थापन करणे व त्यांना योग्य तो आवश्यक भांडवली

५ ) बाजारपेठेत सहकारी उत्पादनांची गळचेपी होऊ नये म्हणून शेतीमालाला योग्य भाव येईल अशी यंत्रणा निर्माण करणे.

६ ) सहकारी शेतीसंस्थेत समाविष्ट असलेली जमीन वैयक्तिक कसणुकीपेक्षा किफायतशीरपणे कसली जाते व सहकार जीवन लागणारा शेतकरी जास्त उत्पादन काढून सुखी जीवनाची वाटचाल करू लागतो हे सामान्य शेतकऱ्याला प्रात्यक्षिकाने पटवून देणे.

शेतीव्यवसायाचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्या व्यवसायांतून भांडवलनिर्मिती करणे हा होय . शेती व्यवसायात आज होणारी तथाकथित भांडवलनिर्मिती शेतकऱ्यांना स्वत : च्या किमान गरजांमध्ये कपात करून करावी लागते . त्याला कारण म्हणजे शेती उत्पादनाची बाजारपद्धती होय . या बाजारपद्धतीमध्ये शेती उत्पादनाच्या किमती उत्पादनखर्चाच्या प्रमाणात ठरत नसून त्या सट्टेबाजांच्या लहरीवर अवलंबून असतात . त्यामुळे शेतीव्यवसाय कायम आतबट्याचा झालेला आहे . ही अवस्था नाहीशी करण्यासाठी शेती उत्पादनाच्या किमती ठरविताना शेती उत्पादनाचा भांडवली खर्च व शेतीत काम करणाऱ्या शेतकरी व शेत मजुरांच्या जीवनवेतनाचा विचार करूनच त्या ठरविल्या पाहिजेत . तसेच नफेखोर दलाल - अडत्यांचे उच्चाटन करून शेतीमालाचा व्यापार सरकारने आपल्या हाती घेतला पाहिजे . पण नियोजन मंडळ अगर सरकार या प्रश्नाचा मूलभूत पद्धतीने कधीच विचार करीत नाही व करू शकत नाही .

कारण सरकारची याबाबतची भूमिका अशी आहे , की शेतीमालाच्या किमती वाढल्या की औद्योगिक उत्पादनाच्या खर्चात वाढ होते . त्यामुळे आज सरकार औद्योगिक व शेती उत्पादनाच्या किमतीत समतोल न ठेवता औद्योगिक क्षेत्राला अग्रहक्क देत आहे . शेतीमालाच्या किमती व औद्योगिक मालाच्या किमतीतील तफावत एकसारखी वाढत आहे . खाली दिलेल्या तक्त्यांमध्ये शेतीमाल व औद्योगिक माल यांच्या घाऊक किंमतींचा निर्देशांक दिला आहे , त्यावरून या किमतीचा समतोल साधण्यासाठी सरकारने कोणताही पद्धतशीर प्रयत्न केलेला नाही हे स्पष्ट होईल.

औद्योगिक मालाच्या घाऊक किमतीचा निर्देशांक

१९५२-५३=१००

वर्ष ---------- ५३-५४ ---------- ५९-६०

कापड ---------- १०३ ---------- ११५

पेंड ---------- १०४ ---------- १४०

खनिज पदार्थ ----------१०९ ---------- १४८

लोखंड व पोलाद वस्तू ---------- १०८ ---------- ९९

मशीनरी ---------- १४६ ---------- १११

शेतीमालाचे घाऊक किमतीचा निर्देशांक

१९५२-५३= १००

वर्ष ---------- अन्नधान्य ---------- कडधान्य

५३-५४ ---------- ८९ ---------- ७२

५९-६० ---------- १०३ ---------- ८७

आज शेतीव्यवसायात गुंतविण्यात येणारी रक्कम ही भांडवल ठरत नसून व्यवसाय जगविण्याचे पूरक अन्न ठरत आहे . त्यामुळे साहजिकच अजिबात निकालात निघत चाललेला शेतकरी , शेजमजूर आर्थिकदृष्ट्या जास्त जास्तच खंगत पिचत चालला आहे. जोपर्यंत शेतीच्या उत्पादनाला स्वयंपूर्णतेचा व स्वावलंबीपणाचा मूलभूत पाया दिला जात नाही , तोपर्यंत राष्ट्राची उत्पादनक्षमता आजारी माणसाच्या जीवनासारखी राहणार आहे . आणि त्यामुळे सतत वरचे अन्न व औषध यावरच ही उत्पादनपद्धती जगविण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे . परकीय मदतीचे या उत्पादनपद्धतीत साहाय्य घेतले जाते त्याचे खरे इंगित हेच आहे . गेल्या दहा वर्षांच्या काळात भारतात आलेले परकीय भांडवल हा त्याचाच एक परिपाक आहे . भारतीय अर्थव्यवस्थेला स्वावलंबी करण्याचा एक मार्ग म्हणून परकीय भांडवल स्वीकारण्यात येत नसून राष्ट्रीय उत्पादनव्यवस्थाअनैसर्गिक पद्धतीने जगविण्याचे ते एक साधन ठरले जात आहे . त्यामुळे व्यसनात सापडलेल्या माणसाला जसे त्या व्यसनाचे दास व्हावे लागते तसे गेल्या दहा वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेला परकीय भांडवलाचे दास्यत्व पत्करावे लागले आहे . तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मसुदा सरकारने प्रसिद्ध केला आहे . या योजनेत दहा हजार कोटी रुपये खर्च करण्याची प्रथम कल्पना आहे . वाढलेल्या किमतीचा विचार केल्यास ही रक्कम खऱ्या अर्थाने याहीपेक्षा कमी होणार आहे . या रकमेवरून ही योजना महत्त्वाकांक्षी आहे की दुबळी आहे , हे ठरविण्याचा हास्यास्पद प्रयत्न केला जात आहे . पण या योजनेचे भवितव्य परकीय कर्ज व परकीय भांडवल यावर अवलंबून आहे , ही अर्थमंत्र्यांनी दिलेली कबुली म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दिवाळखोरीचा स्पष्ट पुरावा आहे . राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची ही परावलंबी अवस्था होत असताना नियोजन मंडळाने स्वयंपूर्ण , स्वावलंबी व समर्थ अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे घोषवाक्य सतत जनतेसमोर ठेवले आहे . हे घोषवाक्य फक्त कागदावर राहत असून नियोजन मंडळाने ठरविलेली उद्दिष्टे पार पडत नाहीत . उलट राष्ट्रीय अर्थव्यवस्था दरवर्षी वाढत्या वेगाने कोलमडलेली आहे . तिसऱ्या योजनेचे अंतिम चित्र बाहेर येईल त्या वेळी सध्याच्या मसुद्यांत कदाचित काही बदल होईल . पण त्यामुळे पहिल्या दोन योजनांपेक्षा मूलभूत वेगळी भूमिका घेतली जाणार नाही हे नि : संशय . दुसऱ्या योजनेत औद्योगिक क्षेत्राला अग्रहक्क होता . आता पुन्हा शेती व वीज यांना अग्रहक्क देण्यात येणार , असे सांगण्यात येत आहे . किती रक्कम खर्च झाली आहे अगर होणार आहे यावर योजनेची भव्यता व यश अवलंबून नाही , तर भारतीय अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या अवस्थेतून बाहेर येऊन नैसर्गिक जीवनाचा मार्ग आक्रमण करणार आहे काय , हा खरा प्रश्न आहे . त्याचे उत्तर ' नाही ' हेच द्यावे लागेल . राष्ट्रीय अर्थव्यवस्थेची ही परावलंबी , दुबळी व आतबट्ट्याची अवस्था निर्माण होत असताना खाजगी क्षेत्रातील उद्योगधंद्यांचे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने नियमन व नियंत्रण करून राष्ट्रीय साधनसामुग्री वाढविण्याचे कार्य होणार नसून या अर्थव्यवस्थेत अराजकता माजणार आहे आणि या परिस्थितीत मक्तेदार भांडवलदार व त्यांच्या कंपन्या व बँका यांचा अर्थव्यवस्थेवरील पगडा वाढणार आहे . सरकारच्या तथाकथित नियोजनाचेच हे खरे परिणाम आहेत व ते आता स्पष्ट दिसू लागले आहेत .

परराष्ट्र संबंध व आंतरराष्ट्रीय

परिस्थिती भारताच्या अंतर्गत आर्थिक व सामाजिक अवस्थेची चर्चा केल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचा मागोवा घेणे आवश्यक आहे . गेल्या १४ वर्षांचा कालखंड जागतिकराजकारणात शीतयुद्धाचा काल ' म्हणूनच मानला जात आहे . जुनी साम्राज्यशाही , भांडवलदारी , वसाहतवादी चौकट टिकवून धरणारी अमेरिका , इंग्लंड , फ्रान्स आदी राष्ट्र एका बाजूला , तर समाजवादाचे निशाण घेऊन जाणारे रशिया आदी कम्युनिस्ट राजवटी असलेले देश दुसऱ्या बाजूला असे या शीतयुद्धाचे स्वरूप आहे . या शीतयुद्धाच्या कालखंडात अनेक नवी स्वतंत्र राष्ट्रे उदयास येत आहेत म्हणून या नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांच्या धोरणास या कालखंडात महत्त्व येणे क्रमप्राप्त आहे . नव्या जगाची उभारणी कोण करणार हा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात महत्त्वाचा प्रश्न आहे . परकीय हुकमतीखालील राष्ट्र स्वतंत्र होणे याचा अर्थ , साम्राज्यवादी , वसाहतवादी चौकटीला धक्का बसणे हा आहे . जगातील स्वातंत्र्यवादी जनतेच्या सामर्थ्यापुढे स्वातंत्र्याचामार्ग रोखून ठेवणे म्हणजे आत्महत्या करणे होय , याची दखल साम्राज्यवादी राष्ट्रांना नाइलाजाने व्यावी लागत आहे . या स्वातंत्र्याच्या उठावास समाजवादी राष्ट्रे मदत करीत आहेत . त्यामुळे या राष्ट्रांना आपली उभारणी करण्याचा मार्ग सुलभ होऊ लागला आहे . समाजवादी राष्ट्रांची वाढती उत्पादनक्षमता , विज्ञानाची प्रगती यामुळे स्वतंत्र राष्ट्रांना मदत करणे त्यांना आता शक्य झाले आहे . भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळात जगभर स्वातंत्र्य आंदोलनास जोराची चालना मिळाली . विशेषतः आशिया व आफ्रिका या खंडांत या आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले आहे . साम्राज्यवाद्यांनी आपल्या हुकमतीचे जे तट ठिकठिकाणी उभारले होते , ते या स्वातंत्र्य आंदोलनामुळे उद्ध्वस्त होऊ लागले आहेत . स्वातंत्र्यउठावाची ही प्रचंड लाट आता अमेरिकेच्या किनाऱ्यावर जाऊन आदळण्यास वेळ लागणार नाही . स्वातंत्र्याची लाट उसळत असता साम्राज्यवादी राष्ट्रे आपल्या बचावासाठी कम्युनिस्टद्वेषाचा वापर करीत आहेत . जगावर येऊ घातलेले कम्युनिझमचे साम्राज्य थोपवून धरून जगाच्या पाठीवर लोकशाही , व्यक्तिस्वातंत्र्य यांचे रक्षण करण्याची जबाबदारी अमेरिके वर येऊन पडलेली आहे , ही घोषणा अमेरिकेच्या परराष्ट्रीय धोरणाचे सूत्र बनलेली आहे . इतकेच नव्हे , तर कम्युनिस्ट साम्राज्यवादाला थोपवून धरण्याच्या नावाखाली अमेरिका आदी राष्ट्रे जगाच्या कानाकोपऱ्यात लष्करी तळ उभारीत आहेत . लष्करी करार करीत आहेत . त्याच धोरणाची दुसरी बाजू म्हणजे आर्थिक मदत -कर्जे- देऊन या नव्या स्वतंत्र राष्ट्रांना आपल्या गटात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत . पण अमेरिका आदी राष्ट्रांचे हे धोरण स्वातंत्र्याच्या आड येत असल्याचे त्यांच्या अनुभवास येऊ लागले आहे . त्यामुळे या धोरणास कडवा विरोध होत आहे . साम्राज्यवादी राष्ट्रांना एकीकडे या दुहेरी उठावास तोंड द्यावे लागत आहे , तर दुसरीकडे अंतर्गत अर्थव्यवस्था टिकवून धरण्याचा प्रयत्न करावा लागत आहे . महायुद्धात हिटलरविरुद्ध विजय मिळविल्यामुळे व त्यानंतर उत्पादनक्षमतेत सतत वाढ केल्यामुळे समाजवादी राष्ट्रांची प्रतिष्ठा या कालखंडात वाढली आहे . स्वातंत्र्यवादी राष्ट्रांना रशिया आदी समाजवादी राष्ट्रांनी मदतीचा हात पुढे केल्यामुळे नव्या स्वतंत्र राष्ट्रांत या राष्ट्रांबद्दल व समाजवादी विचारसरणीबद्दल सहानुभूती व आपुलकी वाढली आहे . यामुळे नव्याने स्वतंत्र झालेली ही राष्ट्रे व समाजवादी राष्ट्रेयांचे सहकार्य होऊ लागले आहे . भारत चीन मैत्रीचा करार , बांडुंग परिषद , आफ्रिका , आशिया खंडांतील राष्ट्रांची परिषद हे त्या सहकार्याचे दृश्यफल होते . नव्याने स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांनासुद्धा या सहकार्याने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात प्रतिष्ठा लाभली एवढेच नव्हे , तर स्वातंत्र्यवादी जनतेचा आवाज उठविणारी ही शक्ती आहे , अशी मान्यता मिळू लागली . साम्राज्यवादी राष्ट्रांना हा एक शह निर्माण झाला आहे . पण हे सहकार्य फार काळ टिकून राहू शकले नाही . स्वातंत्र्यवादी राष्ट्रांचे नेतृत्व चीनने आपल्याकडे घेतल्याची भूमिका घेतली आणि त्यामुळे स्वतंत्र राष्ट्रे व समाजवादी राष्ट्रे यांच्यात नकळत स्पर्धा सुरू झाली . तिबेटमधील प्रतिगाम्यांचा उठाव झाला . लामाने भारतात आश्रय घेतला . भारत - चीनच्या सरहद्दीवर दोस्त म्हणविणाऱ्या भारत - चीनच्या सैनिकांत संघर्ष झाले . त्या वेळी चीनने भारताच्या प्रदेशावरच कब्जा केल्याचे सिद्ध झाले आणि त्यातून भारत - चीन सीमातंटा सुरू झाला . चीनने शेजारच्या इतर राष्ट्रांशी सीमेचा प्रश्न सामोपचाराने सोडविला ; पण भारताबरोबर हा प्रश्न समझोत्याने सोडविण्याची भूमिका न घेता दुराग्रही भूमिका तर घेतलीच शिवाय भारताच्या सीमेवर लष्करी ताकदीचा वापर करून पंचशील कराराचा भंग केला . चीन व भारत यांच्यातील हा संघर्ष आणि रशिया व चीन यांच्यातील वैचारिक मतभेद यामुळे स्वातंत्र्य व शांतता यासाठी प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रांच्या संबंधात एक प्रकारची कटुता निर्माण झाली आहे . म्हणून या राष्ट्रांमध्ये सहकार्याचे जे वातावरण तयार झाले होते त्याला या घटनांमुळे धोका निर्माण झाला आहे . याचा फायदा साम्राज्यवादी राष्ट्रांनी घेणे साहजिकच आहे . चीनला युनोत मान्यता देण्याच्या प्रश्नावर अमेरिकेने शेवटी ताठर धोरण घेतले व साम्राज्यवादी धोरण आक्रमक स्वरूपात पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे . पण या धोरणाचा समाजवादी राष्ट्रांनी तर निकराने प्रतिकार केलाच ; पण नवस्वतंत्र राष्ट्रांनीसुद्धा नापसंती दर्शविली . क्युबा , अल्जेरिया व कांगो यांमधील साम्राज्यवाद्यांच्या कारवाया पाहिल्यास समाजवादी स्वतंत्र राष्ट्रातील मतभेदाचा फायदा उठविण्याचा प्रयत्न साम्राज्यवादी राष्ट्रांनी केला असे दिसून येईल . परंतु सोव्हिएट युनियन व त्यास साथ देणाऱ्या राष्ट्रांनी निर्णायक भूमिका घेतल्यामुळे त्यांचे हात काही प्रमाणात रोखले गेले . " स्वातंत्र्य व शांतता या चळवळींना पाठिंबा देणे म्हणजे कम्युनिस्ट गटास पाठिंबा देणे , ” असा प्रचार साम्राज्यवादी राष्ट्रांनी व त्या देशांतील विचारवंतांनी पूर्वीपासूनच सुरू केला आहे . आज तर तो फार मोठ्या प्रमाणात चालू आहे . भारतात या प्रचाराला स्वतंत्र , जनसंघ आदी पक्षांनी व भांडवलदारांनी जोरात साथ दिली आहे . एवढेच नव्हे , तर अमेरिका आदी साम्राज्यवादी राष्ट्रे व त्यांच्या कळपात असलेली पाकिस्तानसारखी राष्ट्रे यांच्याबरोबर मैत्रीचे व लष्करी करार केले पाहिजेत , असा उघड प्रचार त्यांनी सुरू केला आहे . भांडवलदारधार्जिण्या वर्तमानपत्रांनी ही मोहीम हाती घेतली आहे . सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला आहे. अशा या परिस्थितीत स्वतंत्र भारत काय भूमिका घेणार याच्याकडे सर्व राष्ट्रांचे लक्ष असल्यास नवल नाही . परकीय हुकमतीखाली भारताने शंभर वर्षे काढली आहेत . तिच्याविरुद्ध निकराचालढा दिला आहे . त्यामुळे स्वातंत्र्यासाठी काय मोल द्यावे लागते हे भारताला पूर्णपणे ठाऊक आहे . साहजिकच जगात कोठेही स्वातंत्र्यासाठी उठाव झाला , की भारतीय जनतेला आनंद वाटतो व ती त्या उठावाचे स्वागत करते . जनतेची ही भावना असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर व राजसत्तेवर वर्चस्व गाजविणाऱ्या भांडवलदारवर्गाला परराष्ट्रीय भांडवलदारांची मदत घेतल्याशिवाय जगता येणे शक्य नाही . त्यामुळे त्यांचा ओढा साम्राज्यवाद्यांकडे असणे अपरिहार्य आहे . या परस्परविरोधाचा भारत सरकारच्या परराष्ट्रीय धोरणावर प्रभाव पडला आहे . “ स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा ; पण साम्राज्यवादी राष्ट्रांना विरोध न करणे , ” हे भारत सरकारच्या परराष्ट्रीय धोरणाचे सूत्र आहे . यालाच ' कुठल्याही गटात सामील न होण्याची परराष्ट्रीय नीती ' असे म्हटले जाते . हे धोरण प्रत्यक्ष नकारात्मक असले तरी त्यालाच पंचशील ' हे नाव देऊन “ आम्हाला सर्व राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवायचे आहेत , ' अशी घोषणा करण्यात येत आहे . पारतंत्र्यात खितपत पडलेली जनता जसजशी मुक्त होत जाईल तसतशी साम्रज्यवाद्यांची ताकद कमी होत जाणार आहे . म्हणून साम्राज्यवादी राष्ट्रे कुठल्याही स्वातंत्र्यवादी चळवळीला निकराचा विरोध करतात . साम्राज्यवाद्यांचा हा विरोध मोडून काढण्याची जबाबदारी एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारत सरकारचीही आहे . परंतु भारत सरकार एवढे निर्धाराचे धोरण स्वीकारीत नाही . एवढेच नव्हे , तर कित्येक वेळेला तटस्थ राहते . अल्जेरिया व व्हिएटनाम आदी देशांच्या स्वातंत्र्य चळवळीबाबत भारत सरकारने स्वीकारलेले धरसोडीचे धोरण हे त्याचे प्रतीक आहे . कांगो प्रकरणातसुद्धा भारताने अशीच त्रयस्थ भूमिका घेतली . त्यामुळे आफ्रिकेत व एकंदर स्वातंत्र्यवादी जनतेत भारताची बदनामी होण्याचा प्रसंग आला होता . पारतंत्र्यातून मुक्तता ही जशी वसाहतीतील जनतेची हाक आहे तशीच जागतिक शांतता ही अखिल मानवसमाजाची आंतरिक तळमळ आहे . गेल्या दोन युद्धांच्या अनुभवानंतर व नवीन उपलब्ध झालेल्या प्रचंड विध्वंसक अण्वस्त्रांच्या निर्मितीमुळे यापुढचे युद्ध म्हणजे ' सर्वस्वाचा विनाश ' ही गोष्ट सर्वमान्य झाली आहे . असे असले तरीही युद्धाचा धोका कमी झालेला नाही . त्यामुळे शांतता ही बाब सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात काल्पनिक राहिलेली नसून सर्व मानवसमाजाच्या जीवनाशीच ती निगडीत झालेली आहे . भारतासकट सर्व नवीन स्वतंत्र झालेल्या देशांना राष्ट्रउभारणीसाठी शांततेची अत्यावश्यकता आहे . भारत सरकारने या प्रश्नाबाबत स्वीकारलेलेधोरण असेच परस्परविरोधी आहे . शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशिया आदी राष्ट्रांनी केलेल्या प्रयत्नांत सहभागी होणे म्हणजे कम्युनिस्ट राष्ट्रांना पाठिंबा देणे असा अर्थ लावून शांततावादी शक्ती कमकुवत ठेवण्याचा प्रयत्न भारत सरकारने केला आहे . अशा रीतीने भारत सरकारने आपल्या परराष्ट्रीय नीतीचे सूत्र म्हणून स्वातंत्र्य व शांतता यांचा स्वीकार केला असला तरी स्वातंत्र्य व शांतता यांचे कट्टे शत्रू साम्राज्यवादी त्यांना विरोध करण्याचा प्रसंग आला की भारताने वेळोवेळी माघार घेतली आहे . भारत सरकारच्या परराष्ट्रीय नीतीत आणखी अशाच काही परस्परविरोधी गोष्टी आहेत . ब्रिटिश कॉमनवेल्थचे सभासदत्व व रुपया आणि पौंड यांची घातलेली सांगड ही भारताच्या स्वातंत्र्यवादी भूमिकेस कलंक लावणारी घटना आहे . एवढेच नव्हे , तर त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यावरच मर्यादा पडल्या आहेत . भारत स्वतंत्र झाल्यावर इंग्लंड , अमेरिका आदी भांडवलदारी राष्ट्रांतील कंपन्यांना भारत सरकारने उद्योगधंदे काढण्यास उत्तेजन दिले आहे ; त्यामुळे या कंपन्यांनी भारताच्या औद्योगिक क्षेत्रातसुद्धा आपले स्थान बळकट केले आहे . एवढेच नव्हे , तर भारतातील औद्योगिक क्षेत्रात हळूहळू मक्तेदारीचा दुष्ट प्रभाव पाडण्यास सुरुवात केली आहे . भारत सरकारच्या परराष्ट्रीय धोरणाचे दुष्परिणाम आज प्रत्यक्षात स्पष्ट जाणवत नसले तरी हळूहळू साम्राज्यवादी राष्ट्रांच्या पंजाखाली भारत खेचला जात आहे ; त्यामुळे साम्राज्यवादी राष्ट्रातील आर्थिक पेचप्रसंगाचा परिणाम भारतातील अर्थव्यवस्थेला भोगावा लागत आहे . भारताचे स्वातंत्र्य , सार्वभौमत्व अबाधित , निष्कलंक राखणे , परकीय भांडवलाचे व कंपन्यांचे वर्चस्व झुगारून देणे , जागतिक स्वातंत्र्य - शांतता यासाठी खास प्रयत्न करणे हे भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे सूत्र असले पाहिजे . स्वातंत्र्य व शांतता यांचा पाठपुरावा करताना कम्युनिस्ट राष्ट्रांना पाठिंबा द्यावा लागतोवसाम्राज्यवादी राष्ट्रांचा विरोध पत्करावा लागतो म्हणून भारताने बिचकण्याचे कारण नाही . स्वातंत्र्य व शांतता यांच्याच बाजूने भारताने निर्धाराने आपली ताकद उभी केली पाहिजे . भारताच्या सरहद्दीचा प्रश्न हा भारत सरकारच्या परराष्ट्रीय धोरणाचा आज गाभा ठरत आहे . भारत - चीन मैत्रीच्या करारातून पंचशील ' तत्त्वाचा जन्म झाला ; पण चीनने या तत्त्वाला हरताळ फासला . भारताने तीच भूमिका घ्यावी असे प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष प्रयत्न परकीय व देशीभांडवलदारांकडून होत आहेत . या दडपणास भारत सरकार बळी पडले तर हा प्रश्न सुटणार नसून तो अधिकाधिक गुंतागुंतीचा होणार आहे . यासाठी भारताने आपल्या सार्वभौमत्वास बाध न आणता चीनवर आंतरराष्ट्रीय शांततावादी शक्तींचे दडपण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे . भारताच्या भूमीवर - गोमांतकावर - पोर्तुगिजांचा अजूनही ताबा आहे . भारत सरकारने गोव्यातील स्वातंत्र्य चळवळीच्या पाठीत खंजीर खुपसल्यामुळे तेथील स्वातंत्र्य चळवळ धोक्यात आली आहे . भारत सरकार गोव्यात प्रत्यक्ष सैन्य पाठवून जरी गोमांतकाची मुक्तता करणार नसले तरी तेथील स्वातंत्र्य चळवळीला संपूर्ण पाठिंबा देण्याची भूमिका भारत सरकारने स्वीकारली पाहिजे . गोमांतकमुक्तीचा हाच एकमेव मार्ग आहे . संयुक्त राष्ट्रसंघटना साम्राज्यवादी राष्ट्रांच्या दबावामुळे नवोदित स्वतंत्र राष्ट्रांचा आवाज दडपून टाकू लागली आहे . त्यामुळे स्वातंत्र्य व शांतता ही दोन उद्दिष्टे घेऊन जन्मास आलेल्या या आंतरराष्ट्रीय संघटनेचा स्वातंत्र्य व शांततावादी शक्तींना आवश्यक तो उपयोग होऊ शकत नाही . नवोदित स्वतंत्र राष्ट्रांपैकी एक प्रमुख राष्ट्र म्हणून भारताने साम्राज्यवाद्यांचे वर्चस्व कमी करण्याचा निकराचा प्रयत्न केला पाहिजे .

अर्थव्यवस्थेचे स्वरूप

भारत स्वतंत्र झाला त्या वेळी भारताची अर्थव्यवस्था अविकसित किंवा मागासलेली व सरंजामी हितसंबंधांवर आधारलेली होती . आज ती जशीच्या तशीच आहे , असे म्हणता येणार नाही . भारतीय अर्थव्यवस्थेचे मागासलेले स्वरूप फारसे बदलले नसले तरी सरंजामी हितसंबंध प्रत्यक्षात दिसेनासे झाले आहेत . शेतमजुरांचा तांडा पूर्वीपेक्षा वाढत आहे . भांडवली पद्धतीने म्हणजे वेतन - मजुरीने - यंत्रसामुग्री , सुधारलेली खते यांच्या साहाय्याने शेती करणारा नवा शेतकरी विभाग निर्माण होऊ लागला आहे . औद्योगिक क्षेत्रात वाढ झालेली असून कामगार व त्यांच्या मालिकेत येऊ इच्छिणारांची संख्या दिन - प्रतिदिन वाढत आहे . कसबी व सुशिक्षित कामगार वाढू लागला आहे . सरकारी व खाजगी कचेऱ्यांतून काम करणारा कर्मचारी - शिक्षक असा मध्यमवर्ग वाढीस लागला आहे . समाजात हे नवे विभाग वाढत असताना दुसऱ्या बाजूला अस्पृश्य व स्पृश्य शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर कामावाचून हात हलवत बसला आहे . सामाजिक व आर्थिक अशा दोन्ही चक्रातून वेळी पिचून निघत आहे . समाजाच्या वेगवेगळ्या थरांचे हे स्वरूप बदलत असता कारखाने , धरणे , वीजनिर्मिती , रस्ते व रेल्वे या सर्वांत वाढ होत आहे . पण सर्वांचा उपयोग बहुसंख्य समाजाची आर्थिक अवस्था सुधारण्याच्या कामी न होता त्यांची अधिक पिळवणूक करण्याकडेच होत आहे . अशा प्रकारे अर्थव्यवस्थेत व समाजव्यवस्थेत होणारे बदल हे बदलच समाजाला पुन्हा खाली नेत आहेत . भारत स्वतंत्र झाला त्या वेळेपेक्षा आज अधिकदारिद्र्य , अधिक बेकारी , अधिकटंचाई व महागाई दिसत आहे . ही लक्षणे केवळ मागासलेल्या अर्थव्यवस्थेची नसून भांडवलदारी समाजपद्धतीची ती अपरिहार्य अपत्ये आहेत . काँग्रेसच्या कारभाराचा गेल्या १४ वर्षांचा हा अनुभव आहे . एका बाजूने राष्ट्रीय उत्पादन वाढले असे ढोल बडवण्यात येत आहेत , तर दुसऱ्या बाजूने परकीय कर्ज व भांडवल यांची कित्येक पटीने वाढ झाली आहे . सरकारी व सहकारी उत्पादनक्षेत्राचा व्याप वाढत आहे , असा दावा करण्यात येत आहे , तर दुसऱ्या बाजूने खाजगी क्षेत्राला ऐसपैस संरक्षण देण्यात येत आहे . एवढेच नव्हे तर कंपन्या व बँका यांच्यावर खाजगी मक्तेदारी भूमिती श्रेणीने वाढत आहे . एका बाजूला औद्योगिक प्रगतीची गर्जना करण्यात येत आहे तर दुसऱ्या बाजूला महागाई आणि टंचाई हररोज , हरघडीला वाढत आहे आणि बेकार , अर्धबेकार भुकेकंगाल यांची संख्या सारखी फुगत आहे . सरंजामी हितसंबंध संपल्याची घोषणा एकीकडे ऐकू येते , तर दुसरीकडे जमिनीवरून हुसकल्या गेलेल्या शेतकऱ्यांचा प्रचंड लोंढा शेतमजुरांच्या तांड्यात सामील होताना दिसत आहे . शेतीचे उत्पादन वाढले आहे , असा आवाज एका बाजूने ऐकू येतो , तर दुसरीकडे परदेशी धान्याची आयात वाढत असल्याचे दिसून येत आहे . एकीकडे आर्थिक विषमता कमी होत असल्याचा डांगोरा पिटला जात आहे , तर दुसरीकडे भांडवलदारांचे , कंपन्यांचे व बँकांचे नफे सारखे फुगत चालले आहेत . योजनांच्या खर्चाचे आकडे कोटींनी जाहीर होत आहेत , तर लाचलुचपत , वशिलेबाजी , गफलती यांचे प्रकार दररोज चव्हाट्यावर येत आहेत . सामाजिक व सांस्कृतिक विकास होत असल्याचे गुलाबी चित्र रंगविण्यात येते , तर दुसरीकडे सामाजिक गुन्ह्यांची संख्या वाढत आहे . एकीकडे सामाजिक समता प्रस्थापित करण्याची भाषा एकीकडे तर दलित समाजाच्या आम्हाला माणूस म्हणून जगू द्या , ' या आर्त किंकाळ्या दुसरीकडे . लोकशाही , सत्य , न्याय यांचा जप एकीकडे तर सत्ताबाजी , कलंकित कारस्थाने रचणाऱ्यांच्या कारवाया दुसरीकडे ! हे स्वतंत्र भारतातील समाजव्यवस्थेचे उघडेनागडे , चित्र आहे . या निराशजनक चित्राच्या पार्श्वभूमीवर एकच आशेचा किरण दिसत आहे ; आणि तो म्हणजे हे चित्रभारतीय जनतेला पसंत नाही . आपले हजारोकष्टाळू हात सरसावून जनता हे ओंगळ चित्र टरकन फाडण्यासाठी धडपडत आहे . सरकारच्या प्रत्येक जनताविरोधी धोरणाला लढाऊ जनतेने कणखर विरोध केला आहे . आजही ती तसा करीत असून पुढेही ती हेच करणार आहे . गेल्या १४ वर्षांत जनतेने सरकारच्या सर्व जनताविरोधी कारवायांचा प्रतिकार केला आहे . अगदी नजीकच्या काळात राज्य पुनर्रचना आंदोलनात भाषिक राज्यासाठी भारतात सर्वत्र जनता खवळून उठली . जनतेच्या इच्छेविरुद्ध लादण्यात आलेले निर्णय राज्यकर्त्यांना बदलणे भाग पडले . त्यामुळे जनता संघटितरीत्या उठली तर नवी समाजउभारणी शक्य आहे , हे सिद्ध झाले आहे . भांडवलदारी समाजपद्धतीच्या आगमनाबरोबरच जुन्या समाजव्यवस्थेला तडे पडणे साहजिकच आहे . त्यामुळे जुन्या सरंजामी व्यवस्थेचे पुजारी अगतिक होऊन या नव्या बदलावर हल्ले करीत आहेत व त्या आधारे राजकीय सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न करीत आहेत . जनसंघ , स्वतंत्र पक्ष यांचे प्रयत्न व वेगवेगळ्या धार्मिक संघटनांचे , मुस्लिम लीगचे पुनरुज्जीवन व धर्मअभ्युदय संस्थांचा उदय हा या प्रयत्नांचा पुरावा आहे . समाजाच्या आर्थिक दुरावस्थेचा फायदा घेऊन या संघटना समाजाला मागे नेण्याचा प्रयत्न करीत असतात . एवढेच नव्हे , तर राज्ययंत्रासच सुरुंग लावण्याचा उद्योग करतात . पण या सर्व संघटनांचे उद्दिष्ट समाजाच्या प्रगतीचा मार्ग रोखून धरण्याचे असते व आहे . आज काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिलेले बडे मक्तेदार हे देखील नव्या समाजउभारणीच्या मार्गातला एक प्रचंड अडथळा आहेत . हा अडथळा दूर केल्याखेरीज स्वातंत्र्यलढ्याच्या काळात जनतेने जे स्वराज्याचे स्वप्न चितारले होते ते साकार होणार नाही . काँग्रेस समाजाला भांडवलदारी स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत आहे , तर जनसंघ आदी जुन्या परंपरेचे पक्ष काँग्रेसच्या या प्रयत्नांस रोखून धरीत आहेत . जनसंघादी पक्षांच्या प्रतिगामी धोरणास विरोध करणारी काँग्रेस स्वत : ला प्रगतीची पुरस्कर्ती म्हणवीत आहे . भारताला अधोगतीला नेणाऱ्या या दोन प्रवृत्ती आपले आसन बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहेत . या दोन्ही प्रवृत्तींशी मुकाबला करू शकेल अशी पिळल्या जाणाऱ्या श्रमजीवी जनतेची प्रभावी संघटना सध्या भारतात नाही . गेली ३० वर्षे श्रमजीवी जनतेचा पक्ष म्हणून कम्युनिस्ट पक्ष भारतात काम करीत आहे . पण प्रतिगामी प्रवृत्तींना आळा घालण्याचे सामर्थ्य आज त्या पक्षात नाही . एवढेच नव्हे , तर कम्युनिस्ट पक्ष गेल्या ३० वर्षांच्या चुकीच्या नागमोडी धोरणामुळे जनतेपासून अनेक वेळा अलग पडला आहे . लोकशाही , समाजवाद या घोषणा करणारे अनेक पक्ष भारतात आहेत . पण त्या सर्व पक्षांत या घोषणांच्या कार्यक्रमाबद्दल एकमत नाही . आणि त्यामुळे या पुरोगामी चळवळीत जनता आत्मविश्वासाने उतरत नाही . या सर्वांचा परिणाम राजकीय चळवळीवर दिसत असल्यास नवल नाही . काँग्रेसने सर्व पुरोगामी धोषणांचा पुरस्कार केला आहे . लोकशाही , समाजवाद , सहकारी शेती व तदनुषंगिक सर्व घोषणा काँग्रेसने आपल्या ठरावाद्वारे केल्या आहेत . पुरोगामी पक्षांनीही याच घोषणा केल्या आहेत . पण काँग्रेसने या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी जो कार्यक्रम आखला आहे तो पाहिल्यास घोषणा आणि कृती यांत संपूर्ण परस्परविरोध दिसतो . काँग्रेसच्या या धोरणास सर्व पुरोगामी पक्ष विरोध करतात ; पण विरोधाचे मूलभूत स्वरूप जनतेला पटवून देण्यास हे पुरोगामी पक्ष असमर्थ ठरतात . नेमका याच संधीचा फायदा जनसंघ , स्वतंत्र या पक्षांनी गेल्या पाच वर्षांत उचलला आहे . काँग्रेसच्या धोरणामुळे जशी प्रतिगामी प्रवृत्तींना संधी मिळत आहे , तशीच पुरोगामी शक्तींच्या कमकुवतपणामुळेही प्रतिगामी शक्तीला संधी मिळत आहे . काँग्रेसला जनतेच्या पुरोगामी शक्तीपेक्षा प्रतिगामी शक्ती अधिक जवळच्या आहेत . काँग्रेसचे धोरण व कामगार यामुळे प्रतिगामी पक्षांना जनतेसमोर येण्यास संधी मिळत आहे . भांडवली समाजपद्धतीमुळे या प्रतिगामी शक्तींना वाव मिळणार आहे . काँग्रेसने या पक्षांविरुद्ध लढण्याचा कितीही आव आणला तरी तो पोकळच राहणार आहे . कारण काँग्रेस या प्रतिगामी शक्तींविरुद्ध लढण्याचा आव आणीत असतानाच त्यांच्याबरोबर संधान बांधीत आहे व बांधणार आहे .

या जनतेच्या मोर्चाचे उद्दिष्ट काय ?

स्वातंत्र्योत्तर काळात बळकट होणाऱ्या संघटित भांडवलदारवर्गाने भारतीय स्वातंत्र्य परकीय भांडवलाचे दास केले आहे वस्वत : ची भारतीय समाजावरील पकड , नोकरशाही राज्ययंत्रणेच्या साहाय्याने बळकट करून सर्व समाजाला भरडून काढण्याचा सपाटा चालविला आहे . सरकारी औद्योगिक विभागाला संपूर्णपणे परावलंबी केले आहे . छोट्या उद्योगधंद्यांना आपल्या पूर्ण नियंत्रणाखाली आणले आहे . मक्तेदार भांडवलदारांच्या या कारवायांचा प्रतिकार करून भारतीय स्वातंत्र्य व सार्वभौमत्व निष्कलंक राखणे- बळकट करणे , पुरोगामी शक्तींचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी लोकशाही बळकट करणे व एकंदर समाजशक्तींना एकत्रित शाश्वत सुखाच्या समाजवादाच्या- मार्गाकडे नेणे , हे या मोर्चाचे उद्दिष्ट असले पाहिजे . तथापि जनतेची ही प्रचंड एकजूट बांधण्यापूर्वी या एकजुटीच्या मार्गातील अडचणींची जाणीव ठेवली पाहिजे . भारतीय समाज जातींनी व धर्मानी विभागलेला आहे . जगण्यासाठी एकाच अर्थव्यवस्थेखाली तो चिरडला जात असला तरी वर्णाश्रम चौकट , परंपरा व रूढी यापासून तो संपूर्णपणे मुक्त झालेला नाही ; आणि त्यामुळे प्रतिगामी शक्ती त्याची ऐनवेळी विभागणी करू शकतात . खेड्यात राहणारा स्पृश्य - अस्पृश्य शेतमजूर , एकाच शेतात काम करीत असला तरी त्याला जमीनदार परस्परविरोधात उभा करू शकतो . एकाच कारखान्यात ब्राह्मण , क्षत्रिय , वैश्य व शूद्र काम करीत असले , सारखेच पिचून निघत असले तरी त्यांची एकजिनसी संघटना होऊ शकत नाही . आर्थिकदृष्ट्या एकाच पातळीवर असलेला समाज सामाजिकदृष्ट्या विभागलेला असतो . त्यामुळे त्याची खरी एकजूट होऊ शकत नाही . आणि ही एकजूट झाल्याशिवाय जनतेची खरीखुरी ताकद निर्माण होणार नाही . म्हणून श्रमजीवी जनतेच्या संघटनांचे कार्यक्षेत्र आर्थिक मागण्यांपुरतेच मर्यादित असून भागणार नाही , तर ते आर्थिक व सामाजिक असे दुहेरी असले पाहिजे . सामाजिक अन्यायाविरुद्ध या संघटनांनी तेवढ्याच दक्षतेने निशाण उभारले पाहिजे . यात एकांगीपणा टाळण्याचा कसोशीचा प्रयत्न प्रथमपासून केला पाहिजे . जुन्या समाजव्यवस्थेचा अवशेष असलेला जमीनदार , सावकार , जमीनदाराच्या सामाजिक व आर्थिक दडपणाखाली असलेला लहानमोठा जमीनमालक आणि या सर्वांच्या तळाशी असलेला लहान शेतकरी , कूळ शेतकरी हे सर्व विभाग शेतकरी म्हणूनच जगतात . याशिवाय खेड्यात राहणारा स्पृश्य - अस्पृश्य , आदिवासी , मागासलेले इतर समाज , कारागीर , बलुतेदार या सर्वांचा मिळून ग्रामीण समाज बनतो . हा सर्व समाज सध्याच्या अर्थव्यवस्थेत आर्थिकदृष्ट्या भरडला जात आहे . पण दैनंदिन जीवनात तो परस्परविरोधी वाटचाल करतो . प्रत्यक्ष स्वत : च्या जीवनावर हल्ला होईपर्यंत तो दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करीत नाही ; आणि त्यामुळे सर्वांच्या दुःखात सहभागी होऊन त्याविरुद्ध संघटित होण्यास व लढ्यास त्यास प्रवृत्त करणे , हे या एकजुटीचे उद्दिष्ट असले पाहिजे . या एकजुटीच्या आधारावर ग्रामीण जीवनात सामाजिक रूढी , प्रतिष्ठा यांच्या साहाय्याने ग्रामीण समाजावर वर्चस्व गाजविणाऱ्या व आर्थिकदृष्ट्या तुलनेने सधन असलेल्या विभागाचे वर्चस्व कमी करून सर्व ग्रामीण समाज संघटित केला पाहिजे . गिरण्या - कारखान्यांतील कामगारवर्ग आज वाढत आहे . ग्रामीण जीवनातून हुसकला जाणारा भुकेकंगाल , कामगार म्हणून कारखान्यात उद्योगास लागला , की आपली परिस्थिती थोडी सुधारली म्हणून सुस्कारा सोडतो व त्या मजुरीच्या साहाय्याने खेड्यातील स्वकुटुंबीयांचे जीवन सांभाळण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्यामुळे वाढत्या बेकारीच्या दिवसांत नोकरी टिकविणे हे त्याला अत्यंत महत्त्वाचे वाटते . या सर्वच कामगारवर्गाला संघटित करणे अतिशय कठीण आहे . भारतातील कामगार संघटनांचा अनुभव फारसा उत्साहवर्धक नाही . या सर्व श्रमजीवी जनतेची एकजूट करताना व्यावसायिक संघटनांची ( Trade Unions ) काय भूमिका असावी हा भारतात महत्त्वाचा प्रश्न आहे . व्यावसायिक संघटनेचा अर्थ एखाद्या विशिष्ट व्यवसायातील कामगारांचे मालक - मजूर संबंधातून निर्माण झालेले प्रश्न सोडविणे एवढाच केला जात आहे . भारतातील फार मोठा कामगार विभाग कुठल्या ना कुठल्या व्यावसायिक संघटनेत आहे ; पण तरीही तो संघटित नाही , समर्थ नाही , ही गोष्ट स्पष्ट आहे . कामगारवर्गाच्या अनेक व्यावसायिक संघटना आहेत एवढेच याचे कारण नाही ; तर या संघटना बांधणाऱ्या पक्षांचा किंवा संघटकांचा दृष्टिकोन सदोष आहे . या संघटना आपल्या व्यवसायाव्यतिरिक्त इतर समाजापासून अलग पडलेल्या असतात . सामुदायिक प्रश्नावर कामगार व जनतेचे इतर विभाग यांचे सहकार्य घडवून आणणे आणि त्याच वेळी कामगारांच्या फक्त व्यवसायी जीवनापेक्षा एकंदर आर्थिक , सामाजिक , सांस्कृतिक जीवनाचे प्रश्न हाताळणे असे दुहेरी कार्य एकाच वेळी होत राहिले तरच या संघटना परिणामकारक ठरतील ; एवढेच नव्हे , तर त्या एकंदर समाजाची ताकद वाढवतील . कामगारांच्या , शेतमजुरांच्या अगर मध्यमवर्गीयांच्या संघटना उभ्या करताना हा दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे . वर उल्लेखिलेल्या दृष्टिकोनातून कामगार , शेतमजूर , शेतकरी व मध्यमवर्ग यांच्या संघटना बांधण्याचा व त्यांचे एकमेकांशी आणि इतर समाजाशी सहकार्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर जनतेची ताकद प्रभावी ठरेल व त्याच आधारावर मक्तेदार , भांडवलदार व त्यांची पाठीराखी काँग्रेस यांच्याविरुद्ध जनतेची एकजूट उभी करता येईल . ही प्रभावी ताकद उभी राहिल्यास प्रतिगामी संघटनांना धडकी बसेलच पण या मक्तेदार भांडवलदारांचा दास बनलेले अनेक समाज विभाग , छोटे धंदेवाले , मध्यमवर्ग , सधन शेतकरी हे त्यांच्यापासून अलग होण्यास या समाजविभागांना कोणतेही आकर्षण नाही . कारण , या मक्तेदार भांडवलदारांना व प्रतिगामी शक्तींना शह देईल अशी जनतेची एकजुटीची प्रभावी संघटना नाही . जनतेच्या एकजुटीच्या प्रयत्नांचा विचार करताना पुरोगामी भूमिकेवर काम करणाऱ्या पक्षांच्या सहकार्याचा व एकजुटीचा प्रश्नही महत्त्वाचा आहे . जनतेच्या एकजुटीचे हे एक साधन आहे .

पुरोगामी पक्षांचे सहकार्य

भारतीय स्वातंत्र्य , सार्वभौमत्व , लोकशाही व समाजवाद या रोखाने भारतीय समाजाची वाटचाल झाली पाहिजे , अशी भूमिका घेणारे अनेक पक्ष भारतात आहेत . पण या सर्व पक्षांत काही मूलभूत प्रश्नांवर मतभेद आहेत ; एवढेच नव्हे , तर परस्परांबद्दल दांडगा अविश्वास आहे . संयुक्त आघाडीचे भारतात जेवढे प्रयत्न झाले ते सर्व या अविश्वासाच्या वातावरणात गाडले गेले आहेत ; आणि या पक्षांच्या सहकार्याचा व एकजुटीचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असला तरी तो अतिशय कठीण वगुंतागुंतीचा झाला आहे . संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातून संयुक्त महाराष्ट्र समितीसारखी जनतेची प्रभावी आंदोलन निर्माण करणारी - काँग्रेसचा पाडाव करणारी - संघटना निर्माण झाली ; पण वर वर्णिलेल्या अविश्वासाच्या वातावरणामुळेच तिला तडे गेले आहेत . इतर राज्यांतही असे प्रयत्न झाले ; पण ते अयशस्वी ठरले आहेत . या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर या पक्षांच्या सहकार्याचा व एकजुटीचा प्रश्न विचारात घेतला पाहिजे . भारतात अशी पुरोगामी भूमिका घेणारे अनेक पक्ष आहेत . त्यात कम्युनिस्ट पक्ष व प्र . स . पक्ष हे मोठे पक्ष आहेत . त्यामुळे अशा प्रयत्नांनंतर होणाऱ्या संघटनेचे नेतृत्व कोणाकडे असावे असा पहिला वादाचा प्रश्न उपस्थित होतो व प्रत्येक पक्ष स्वत : कडेच नेतृत्व आले पाहिजे , असा आग्रह धरतो . भारतीय राजकारणात हे नेतृत्व करण्याची कुठल्याही एका पक्षाची ताकद नाही आणि त्यामुळे संघटनाही नाही व नेतृत्वही नाही , अशी या पक्षांची अवस्था झाली आहे . हे दोन्ही पक्ष जितक्या लवकर या वस्तुस्थितीची जाणीव करून घेतील तेवढे बरे . प्र . स . पक्ष व कम्युनिस्ट पक्ष या दोन्हीही पक्षांनी नेतृत्वाचा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता एकजुटीचा प्रयत्न केला व संयुक्त नेतृत्वाची उभारणी केली तर हा प्रयत्न यशस्वी व टिकाऊ होईल . या दोन्ही पक्षांकडून हे प्रयत्न नजीकच्या काळात केले जाणार नाहीत म्हणून इतर पक्षांनी स्वस्थ बसणे धोक्याचे आहे . इतर पक्ष जरी लहान असले तरी त्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून एकजुटीच्या राजकारणाला चालना मिळू शकेल . समान दर्जा , संयुक्त नेतृत्व आणि कार्यक्रम या भूमिकेवर असा प्रयत्न केला पाहिजे . शेतकरी कामगार पक्ष जरी लहान कार्यक्षेत्रात काम करीत असला तरी पक्षाने आजवर या दृष्टीने खूपच प्रयत्न केले आहेत व येथून पुढेही पक्षाने हा प्रयत्न चालू ठेवला पाहिजे . एका बाजूने जनतेची एकजूट व दुसऱ्या बाजूने पुरोगामी पक्षांची एकजूट या दुहेरी प्रयत्नाने प्रतिगामी शक्तींचा प्रतिकार करण्यासाठी जनतेचा मोर्चा बांधणे शक्य आहे . हा मोर्चा बांधताना साहजिकच श्रमजीवी जनतेच्या उद्ध्वस्त होत असलेल्या जीवनाचे संरक्षण करणे व नव्या समाज उभारणीसाठी त्याला कार्यक्षम करणे ही दोन कठीण कामे करावी लागणार आहेत . श्रमजीवी जनतेला किमान जगण्यासाठीसुद्धा काँग्रेस राजवटीशी व भांडवलदारी चौकटीशी लढत द्यावी लागणार आहे . जनतेच्या दैनंदिन जीवनाच्या मागण्या ज्या ज्या वेळी उठविल्या जातात त्या त्या वेळी जनतेच्या ताकदीचा प्रत्यय काँग्रेसला येतो व जनतेची ही ताकद चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जातो ; त्यामुळे दैनंदिन प्रश्नासाठीसुद्धा काँग्रेसशी व राज्ययंत्रणेशी मुकाबला करणे अगत्याचे आहे , याची जाणीव जनतेला करून दिली पाहिजे . या लढ्यात जनतेचा विजय होईल हा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे . जनतेत हे सामर्थ्य व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कुशल नेतृत्वाची आज अत्यंत गरज आहे . विधिमंडळात जनतेची बाजू मांडून काँग्रेसशी मुकाबला करणाऱ्या प्रतिनिधींची जशी गरज आहे तशीच जनतेला संघटित करून आंदोलनाचे मोर्चे उभारणाऱ्या संघटकांचीही तेवढीच गरज आहे . या दोघांच्या सहकार्याने समाज संघटित व समर्थ करता येईल .

कार्यक्रम

जनतेच्या पुरोगामी मोर्चाचे उद्दिष्ट व तो संघटित करण्याच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आणि या पुढील मार्ग यांचा आतापर्यंत विचार झाला . त्यावरून पुढील कार्यक्रमावर यापुढे जनचळवळी उभारण्याचा प्रयत्न झाला पाहिजे .

भांडवलनिर्मिती व नियोजन

१ ) राष्ट्रीय अर्थव्यवस्था स्वतंत्र , स्वावलंबी व समर्थ बनविण्यासाठी राष्ट्रीय संपत्ती , साधनसामुग्री यांचा योग्य अंदाज घेऊन अर्थव्यवस्थेची पुनर्रचना केली पाहिजे . या हेतूनेच नियोजन झाले पाहिजे .

२ ) अर्थव्यवस्था स्वावलंबी करण्यासाठी भांडवल उभारणीच्या प्रश्नाला महत्त्व राहणार आहे . हे भांडवल पुढील मार्गाने उभे करता येईल .

३ ) परकीय कंपन्या , परराष्ट्र व्यापार व वाहतूक , मोठ्या बँका यांचे राष्ट्रीयीकरण करणे .

४ ) देशी मक्तेदार कंपन्या व भांडवलदारांच्या नफ्यावर नियंत्रण करून ठराविक प्रमाणापेक्षा अधिक झालेला नफा सरकारी भांडवलात जमा करणे.

५ ) मूलभूत उद्योगधंदे उभारण्यासाठी फक्त सरकारी पातळीवरच कर्ज मिळविणे .

६ ) देशी कंपन्या व भांडवलदार यांना मिळणारा नफा ठराविक क्षेत्रातच गुंतविण्याची सक्ती करणे .

७ ) सरकारी क्षेत्रातील उद्योगधंदे व व्यवसाय यात सध्या होणारी उधळपट्टी व अकार्यक्षमता नष्ट करणे , ते उद्योगधंदे व व्यवसाय काटकसरीने , कार्यक्षमतेने व किफायतशीरपणे चालतील अशी यंत्रणा निर्माण करणे व त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे .

८ ) सध्याच्या करपद्धतीत अप्रत्यक्ष कर - आकारणीवर अवास्तव भर देण्यात आला असल्याने समाजातील गोरगरीब थरावर करांचा फार मोठा बोजा पडतो . ही करपद्धती आमूलाग्र बदलून प्रत्यक्ष कर - आकारणीचा अधिकाधिक अवलंब केल्यास करपद्धती न्याय्य व वाजवी होईल . प्रत्येक व्यक्तीची कर देण्याची कुवत लक्षात घेऊन करआकारणी झाली पाहिजे .

९ ) सध्या बहुतेक करांचे उत्पन्न केंद्र सरकारच्या तिजोरीत जाते व राज्य सरकारे ही केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानावर अवलंबून रहात असल्याने त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा दर्जा प्राप्त होऊ लागला आहे . करवसुलीचे हे केंद्रीकरण रद्द करण्याची आवश्यकता आहे .

१० ) मालाच्या आयातीवर व नफ्याच्या निर्यातीवर निबंध घालून परदेशी जाणाऱ्या भांडवलाला आळा घालता येईल .

औद्योगिक विकास

१ ) अर्थरचनेची पुनर्व्यवस्था करावयाची झाल्यास राष्ट्रातील मूलभूत उद्योगधंद्यांत प्रामुख्याने वाढ झाली पाहिजे . पण सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीधंद्याची जी अवस्था आहे ती पाहिल्यास उद्योगधंदे व शेती यांचा समतोल राखणे , हे उत्पादन पद्धतीचे सूत्र असले पाहिजे . त्यासाठी सर्व मूलभूत उद्योगधंदे , बँकिंगचा व्यवसाय व परराष्ट्र व्यापार यावर सरकारची पूर्ण मालकी असली पाहिजे . या क्षेत्रातील नवीन सर्व कारखाने व भांडवल नियंत्रण करणाऱ्या सर्व संस्था या सरकारच्या संपूर्ण मालकीच्या असल्या पाहिजेत.

२ ) खाजगी क्षेत्रातील उद्योगधंद्यांतील उत्पादन व त्या उत्पादनाच्या किमती यावर सरकारचे नियंत्रण असले पाहिजे . खाजगी क्षेत्रात सध्या असलेली व्यवस्थापक पद्धती ( Managing Agency ) पूर्णपणे बंद केली पाहिजे .

३ ) दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी वाढत्या प्रमाणात सहकारी पद्धतीवर कारखाने उभारले पाहिजेत .

४ ) सध्या उद्योगधंद्यांचे व कारखान्यांचे प्रादेशिक केंद्रीकरण झाले आहे . त्यामुळे आर्थिक विकासाच्या दृष्टीने स्थानिक विभागाचा समतोल राखला जात नाही . म्हणून साधनसामुग्रीची उपलब्धता , कच्च्या मालाचा पुरवठा इत्यादींचा विचार करून भारताच्या सर्व विभागांत उद्योगधंदे व कारखाने विखुरले पाहिजेत व अशा उद्योगधंद्यांत आणि कारखान्यांत प्रामुख्याने स्थानिक विभागांतील लोकांनाच व्यवसाय उपलब्ध केला पाहिजे.

५ ) सरकारी उद्योगधंद्यांची व्यवस्था नोकरशाहीच्या हाती न सोपवता क्रमाक्रमाने कामगारांची त्यातील भागीदारी वाढविली पाहिजे . हेच तत्त्व खाजगी उद्योगधंद्यांना लावून त्या क्षेत्रातील कामगारांनाही व्यवस्थापनेत भागीदारी मिळाली पाहिजे .

*शेतीव्यवसाय

धान्यपुरवठ्याच्या दृष्टीने स्वावलंबी आणि ग्रामीण समाजाची क्रयशक्ती वाढविणारी शेती उत्पादन पद्धती उभी करता आली पाहिजे या दृष्टीने जमीन संबंधात प्रथम आमूलाग्र बदल करावे लागतील .

१ ) ' कसेल त्याची जमीन ' ही घोषणा अमलात आणण्यासाठी शेतीव्यवसायात प्रत्यक्ष श्रम करणाऱ्याकडेच जमिनीची मालकी व मशागत सोपविली पाहिजे व शेतीव्यवस्था सहकारी पायावर उभी केली पाहिजे .

२ ) शेती उत्पादन व औद्योगिक उत्पादन यांचा समतोल राखण्यासाठी शेती उत्पादनाच्या किमती ठरविल्या पाहिजेत . या किमती ठरविताना शेतकऱ्यास येणारा उत्पादनखर्च व त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे .

३ ) अशा रीतीने ठरविलेल्या किमती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शेतीमालाचा व्यापार State Trad ing Corporation सारख्या सरकारी संघटना व तळाशी सहकारी संघटना यांच्याकडे असला पाहिजे . शेतीमालाचा ' वायदे बाजार ' बंद केला पाहिजे .

४ ) निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेला शेतीव्यवसाय स्वावलंबी होण्यासाठी पाणीपुरवठा व जमीनसुधारणा हे कार्यक्रम तातडीने हाती घेतले पाहिजेत . याबाबत मोठ्या योजनेपेक्षा लहानलहान योजनांना प्राधान्य दिले पाहिजे . शेतीव्यवसायात कसबी उत्पादनपद्धतीचा अवलंब करून दर एकरी उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे .

५ ) शेतीच्या उपयोगी असलेली यांत्रिक अवजारे भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईपर्यंत शेती उत्पादनासाठी उपलब्ध मनुष्यबळाचा पुरेपूर वापर केला पाहिजे . या मनुष्यबळाच्या साहाय्याने पाटबंधाऱ्याच्या , जमीनसुधारणेच्या , पीक संरक्षणाच्या इत्यादी योजना पार पाडल्या पाहिजेत .

कामगार आणि ग्रामीण मजूर*

१ ) कामगारास जीवनवेतन मिळाले पाहिजे ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वच कामगारांची सार्वजनिक मागणी आहे . भारतात या जीवनवेतनाचे प्रमाण काय असावे हा चर्चेचा विषय आहे . कामगारांचे वेतनमान सुधारल्यास फक्त कामगारांचेच जीवन सुधारते असे नसून एकंदर समाजाच्या क्रयशक्तीवरच त्याचा परिणाम होत असतो . म्हणून कामगारांचे वेतन हे जीवनोपयोगी वस्तूंच्या प्रचलित किमतीशी जोडले गेले पाहिजे याचा अर्थ कामगारास आज जीवनवेतन मिळाले पाहिजे .

२ ) यांत्रिक सुधारणा करीत असता बेकारी व कामवाढ होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे .

३ ) कामगार - मालक संबंध सुधारावयाचे असतील तर कामगारांची संघटित ताकद वाढली पाहिजे . म्हणून मजूरविषयक कायद्यात कामगार संघटना कमकुवत करणारे जे दोष आहेत ते काढून टाकले पाहिजेत .

४ ) ग्रामीण जीवनात शेतमजुरांची वाढती संख्या व बलुतेदार , कारागीर यांची वाढती बेकारी लक्षात घेता ग्रामीण समाजाचा ४० टक्के विभाग आज अर्धबेकार आहे . या विभागाला काम देण्याचा त्याचप्रमाणे त्यांचे जीवनवेतन ठरविण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे . ग्रामीण मजुरांचे वेतन ठरविण्याची तर गरज आहेच ; पण ठरलेले वेतन मिळण्याच्या हमीचाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे . शेतीव्यवसायात अधिक श्रमशक्ती वापरण्याची भूमिका घेतल्यास त्यातील बऱ्याच मोठ्या विभागास काम मिळणे शक्य होईल . राहिलेल्या विभागास काम मिळण्यासाठी लहान उद्योगधंदे , शेतीविकासाच्या योजना इत्यादी हाती घ्याव्या लागतील . ठराविक वेतनाची हमी मिळण्यासाठी ' मजूर संघ ' संघटित करून त्यांना सरकारी मान्यता मिळण्याची आवश्यकता आहे .

समाजविकास*

आजच्या अर्थव्यवस्थेत श्रमजीवी समाजाच्या जगण्याच्या किमान गरजासुद्धा पूर्ण होऊ शकत नाहीत . त्यामुळे शिक्षण , आरोग्य , सांस्कृतिक विकास इत्यादी गोष्टी त्याच्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत . या क्षेत्रात व्यक्तिगत प्रयत्न करणे शक्य असले तरी सामुदायिक प्रयत्नांची गरज असतेच . हे सामुदायिक प्रयत्न सरकारी रीत्याच होणे आवश्यक आहे . सरकारने या सोयी मोफत उपलब्ध केल्या पाहिजेत . सध्याच्या अर्थव्यवस्थेत श्रमजीवी जनतेच्या जीवनखर्चाचा बोजा त्यामुळे थोडा कमी होईल .

सामाजिक समस्या*

भारताची प्रचलित अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत असली तरी सामाजिक चौकट वर्णाश्रम , धार्मिक रूढी व परंपरा यांनी बुजबुजलेली आहे . ही चौकट नव्या अर्थव्यवस्थेच्या मार्गातील एक मोठी धोंड आहे . ही समाज चौकट यंत्रयुगामुळे हादरत असली तरी नवी समाजबांधणी होईतोपर्यंत काही सामाजिक समस्या अपरिहार्यपणे राहणार आहेत . पुरोगामी चळवळीच्या पुरस्कर्त्यांनी यातून मार्ग काढला पाहिजे . जगण्यासाठी समाजातील सर्व वर्णातील थर आर्थिकदृष्ट्या एकाच पातळीवर येत असले तरी ते सामाजिक दृष्ट्या विभागलेले असतात . यापैकी अस्पृश्य व मागासलेल्या समाजाचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा आहे . तो सोडविण्यासाठी पुढील कार्यक्रम घेणे जरूर आहे . या समाजाची आजची आर्थिक दुरावस्था कमी केल्याशिवाय या समाजातील आत्मविश्वास जागा होणार नाही . म्हणून या समाजाच्या आर्थिक लढ्यांना स्पृश्य समाजातील श्रमजीवी जनतेने सक्रिय पाठिंबा दिला पाहिजे . स्पृश्यास्पृश्य समाजात सामाजिक समतेचे वातावरण तयार करण्यासाठी व्यावसायिक संघटनांनी आर्थिक मागण्यांबरोबरच सामाजिक प्रश्नांनाही महत्त्व दिले पाहिजे . स्पृश्यास्पृश्य अगर इतर मागासलेल्या कामगारांच्या संयुक्त वसाहती स्थापन झाल्या पाहिजेत . खेड्यांची पुनर्रचना करतानाही हेच सूत्र अमलात आणले पाहिजे . स्पृश्यास्पृश्य अगर इतर मागासलेल्या समाजाच्या सामाजिक , आर्थिक व राजकीय संघटनांमध्ये सहकार्य निर्माण करण्याचा प्रयत्न हेतुपूर्वक झाला पाहिजे .

*सरकारबाबत भूमिका*

वरील कार्यक्रमाच्या आधारे जनतेच्या चळवळी संघटित करीत असताना जनचळवळीच्या दबावाखाली हे सरकार जनतेच्या काही मागण्या मान्य करण्याची शक्यता असते ; अगर भांडवलदारी समाजरचना निर्माण करताना श्रमजीवी जनतेच्या चळवळीची धार बोथट करण्यासाठी भांडवलदार - सरकार काही सामुदायिक सोयी उपलब्ध करण्याची शक्यता असते ; त्यामुळे वैधानिक लोकशाहीच्या काळात सरकारचा कारभार , नियोजन याबद्दल काय भूमिका असावी असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो.

" वैधानिक लोकशाहीत जनचळवळीच्या सामर्थ्याच्या जोरावर भांडवलदारांवर मात करण्याची शक्यता असते , " असे शेतकरी कामगार पक्षाने आपल्या शेगाव येथील अधिवेशनात जाहीर केले होते . त्याला अनुसरून या प्रश्नाचा विचार केला पाहिजे . जनचळवळी संघटित करताना प्रथमत : किमान सामुदायिक मागणीवर जनता संघटित होऊ शकते व त्यामुळे काही मागण्या पदरातही पडतात ; पण यातून जनतेला अधिक मूलभूत मागण्यांवर संघटित करण्याचा प्रयत्न न केल्यास जनता तेथेच थांबते . इतकेच नव्हे , तर भांडवलदारी समाजातसुद्धा श्रमजीवी जनतेचे प्रश्न सुटू शकतात , अशा भ्रमात ती वावरू लागते . याचा फायदा काँग्रेस संघटना आज घेत आहे . समाजविकास , कामगार विमा योजना , ग्रामीण वाहतूक , लहान पाटबंधारे , शाळा , दवाखाने इत्यादी जनतेच्या मागण्या पुरविणे भांडवलदारांना हिताचे व शक्य होणारे असे आहे . पण ते तेवढ्याच जोरावर या नव्या समाजरचनेत , काँग्रेसच्या कारभाराखाली , जनतेचे प्रश्न सुटू शकतात , असा दावा काँग्रेस कार्यकर्ते करतात . एवढेच नव्हे , तर पुरोगामी चळवळीचे कार्यकर्तेसुद्धा जनतेला एवढ्या मर्यादेपर्यंतच संघटित करून त्यातच स्वत : ला गुरफटून घेतात ; पण हा धोका टाळला पाहिजे . दैनंदिन व तातडीच्या मागण्या मान्य करून घेण्यामागे जे प्रयत्न केले जातात त्यांच्यातूनच जनतेत मूलभूत मागण्यांसाठी अधिक तीव्र आंदोलनाचा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे . काँग्रेस हे टाळण्यासाठी नवीन नवीन पर्याय शोधीत राहणार आहे . राज्यकारभाराचे विकेंद्रीकरण हा त्याचा एक नवा नमुना आहे . सरकारच्या या विकेंद्रीकरणाच्या योजनेमुळे नोकरशाहीचा वरचष्मा कमी होणार नसला तरी भांडवली राजसत्तेच्या चौकटीत भागिदारी करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढणार आहे . पण या संस्था अगर कमिट्यायात काम करताना जनतेचे चळवळीचे सामर्थ्य वाढविणे हे मूलभूत सूत्र पुरोगामी कार्यकर्त्यांनी सतत डोळ्यापुढे ठेवले पाहिजे . लोकशाहीच्या या जमान्यात भांडवलदारांचे वर्चस्व संपूर्णपणे झुगारून देईपर्यंत नियोजन अगर राजसत्ता ही त्यांच्या हातातील साधने राहणार आहेत . जनतेच्या चळवळीपुढे काही प्रश्नांवर भांडवलदार शरण येत असले तरी एवढ्यानेच हुरळून न जाता भांडवलदारांवर पूर्णपणे मात करीपर्यंत व नव्या समाजाची उभारणी करीपर्यंत जनचळवळीचे सामर्थ्य सतत वाढवीत राहिले पाहिजे . शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर जनतेचे हे दैनंदिन आणि मूलभूत ज्वलंत प्रश्न उभे आहेत . या प्रश्नांवर जनचळवळी उभारण्याची हाक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देत आहे . पक्षाच्या नाशिक येथील अधिवेशनात महाराष्ट्रामध्ये ‘ पर्यायी नेतृत्व देण्याची ' सार्थ घोषणा पक्षाने केली होती . तिचा पाठपुरावा गेल्या वर्षभरात पक्ष कार्यकर्त्यांनी निष्ठेने व जिद्दीने केला आहे . ती दुर्दम्य निष्ठा व असीम जिद्द शेतकरी कामगार पक्षाचे श्रमजीवी जनतेतील मानाचे स्थान कायम करील असा विश्वास आहे .