कर्जदारांकडून बळजबरीने वसूल केलेली रक्कम परत : शेतकरी कामगार पक्षाच्या दणक्याने बजाज फायनान्स नमले

कर्जदारांकडून बळजबरीने वसूल केलेली रक्कम परत : शेतकरी कामगार पक्षाच्या दणक्याने बजाज फायनान्स नमले पुणे (१६ ऑक्टोबर):लाॅकडावून च्या काळात बजाज फायनान्सने कर्जदारांच्या बँक खात्यातून ७ ते ८ हजार रुपये बळजबरीने बाऊन्सिंग चार्ज वसुल केले होते.शेतकरी कामगार पक्षाच्या दणक्यानंतर सदर चार्ज कर्जदारांना परत करणे सुरू केले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे पुणे शहर चिटणीस (अध्यक्ष) सागर आल्हाट यांच्याकडे शहरातील अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारी केलेल्या असल्याने पुण्याच्या विमाननगर येथील बजाज फायनान्स कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ८ ऑक्टोबर रोजी शेतकरी कामगार पक्षातर्फे कायदेशीर दणका देत निवेदन देऊन समज देण्यात आली होती. सदर निवेदनातील मागणीवर कारवाई करीत काल बजाज फायनान्स कंपनीने…

डिस्टीलरी प्रकल्पासाठी घेतलेले पैसे शेतकऱ्यांना परत करा: अन्यथा राज्यभर आंदोलन

डिस्टीलरी प्रकल्पासाठी घेतलेले पैसे शेतकऱ्यांना परत करा: अन्यथा राज्यभर आंदोलन साखर आयुक्तांना शेतकरी कामगार पक्षाचा इशारा पुणे: इंदापूर तालुक्यातील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पासाठी प्रति टन ५० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांकडून घेतलेली रक्कम संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ परत करण्यात यावेत अन्यथा महोदय याप्रकरणी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार तथा पुणे जिल्हा चिटणीस भाई राहुल पोकळे यांनी साखर आयुक्तांना दिला आहे. पुण्याच्या शिवाजीनगरस्थित साखर आयुक्तांना लिहिलेल्या निवेदनात भाई राहुल पोकळे यांनी म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मौजे तांदुळवाडी येथील शेतकऱ्यांचा ऊस सन २००८ –…

शेकापच्या ‘ढोल बजाओ’ आंदोलनाची बँक प्रशासनाने घेतली दखल: जिल्हाभरातील बँकांना दिले कर्ज वितरणाचे आदेश

  शेकापच्या ‘ढोल बजाओ’ आंदोलनाची बँक प्रशासनाने घेतली दखल: जिल्हाभरातील बँकांना दिले कर्ज वितरणाचे आदेश गडचिरोली: ऐन रोवणी हंगाम भरात असताना जिल्ह्यातील बँका पीक कर्जासाठी विविध कारणे देवून शेतकऱ्यांना नागविण्याचे काम करीत असल्याने बँकांच्या अड्डेलतट्टू कारभाराचा निषेध आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी ७ तारखेला गडचिरोली येथील सर्व बँकांच्या जिल्हा शाखांसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. शेतकरी कामगार पक्षाने दिलेल्या इशाऱ्याची जिल्हा बँक प्रशासनाने गंभीर दखल घेत जिल्ह्यातील सर्व बँकांना शेतकऱ्यांना नागविण्याचा प्रकार थांबवून तात्काळ कर्जमंजूरी व वितरण करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच यानंतरही शेतकऱ्यांचे कर्जप्रकरणी अड्डेलतट्टूपणाचे…

शेतकऱ्यांच्या पीक कर्जासह विविध प्रश्नावर शेकापचे जिल्हाभरात अन्नत्याग आंदोलन

शेतकऱ्यांच्या पीक कर्जासह विविध प्रश्नावर शेकापचे जिल्हाभरात अन्नत्याग आंदोलन: महामारीत बँकांकडून शेतकऱ्याची पिळवणूक – भाई गुंड बीड (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका व बीड जिल्हा मध्यवर्ती बँक पिक कर्ज देण्यासाठी जाणीवपूर्वक विलंबा सह, टाळाटाळ करत असून, ना हरकत प्रमाणपत्र शक्तीचे करत असल्याने, शेतकऱ्यांना पीककर्जापासून वंचित राहावे लागत आहे. स्टेट बँक ऑफ हैदराबाद,भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा आदी बँकांनी असला तरी अद्याप दहा टक्के देखील पीक कर्ज वाटप केले नाही. परंतु या बँका शेतकऱ्यांना कागदपत्र च्या नावाखाली विनाकारण चकरा मारायला लावत असून संकटात सापडलेला शेतकरी बँकेत फाईल दाखल करून सुद्धा पिकांना खुरपणी,खत, फवारणी पैस्या आभावी करू…