वैनगंगेला आलेला महापूर कृत्रिम: शेतकऱ्यांच्या हजारो कोटींच्या पिकांच्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा

शेतकरी कामगार पक्षाने नरेंद्र मोदी,उध्दव ठाकरे यांच्याकडे केली मागणी गडचिरोली: गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण ३३ दरवाजे उघडून वैनगंगा नदीला आणल्या गेलेला कृत्रीम पूर व त्यामूळे नागपूर , भंडारा , चंद्रपूर , गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी काठावरील गावातील शेतकऱ्यांचे हजारो कोटी रुपयांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार असणाऱ्यांवर खडक कारवाई करा, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा गडचिरोली जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पूर्व विदर्भात असलेल्या गोसेखूर्द राष्ट्रीय प्रकल्पाचे संपूर्ण…

शेकापचा ७३ वा वर्धापन दिवस राज्यभरात उत्साहात साजरा

शेकापचा ७३ वा वर्धापन दिवस राज्यभरात उत्साहात साजरा पुन्हा नव्या जोमाने पक्ष संघटना बळकट करण्याचा भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केला आशावाद   अलिबाग: रायगडसह संपूर्ण राज्यभरात रविवारी शेतकरी कामगार पक्षाचा ७३ वा वर्धापनदिन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत मी आता ६५ वर्षाचा झालोय,तरीही मी थकलेलो नाही, मी मरगळलेलो नाही,नव्या उमेदीने,नव्या जोशाने पुन्हा शेकाप उभारणीसाठी प्रयत्न करतोय,नव्या पिढीनंही आपले योगदान द्यावे,असे भावनिक आवाहन केले. या कार्यक्रमाला जिल्हा चिटणीस ऍड,आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, पं.स.सभापती…