भारतीय शेतकरी कामगार पक्ष

१७ वे अधिवेशन

बुधवार दि . ९ ऑगस्ट आणि गुरुवार दि . २ ऑगस्ट २०१८

(स्थळ : भाई उद्धवराव पाटील नगर , स्टेशन रोड, कर्णपुरा देवी मंदिर मैदान, औरंगाबाद .)

राजकीय ठरावाचा मसुदा

जागतिक परिस्थिती

मंदी आणि आर्थिक अरिष्टातून सावरू न शकलेली जागतिक आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस डबघाईला येत चालली आहे आणि यावर ठोस तोडगा न सापडल्याने युद्धखोरी , वर्णविव्देष , धर्मांधता आणि सांस्कृतिक संघर्ष पेटवत ठेवून मूळ प्रश्नांना बगल देण्याचे काम अव्याहतपणे चालू आहे . उदारमतवादी विचारसरणीवर दहशतवादी उपायांनी आपले वर्चस्व गाजवण्यासाठी विकसित देशातील भांडवली शक्ती विकसनशील देशांतील लोकशाहीवर घाला घालत आहेत . २०१७ साल तुर्कस्तान , सीरिया , येमेन आणि अन्यत्र ठिकाणी बॉम्बस्फोट आणि हवाई हल्ले , दहशतवाद , शस्त्रास्त्रांची शर्यत , साम्राज्यवादांतर्गत विरोधाभास आणि परस्परसंवाद , तसेच सर्व देशांच्या लोकांविरुद्ध दडपशाही आणि अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ अशा घटनांनी गाजले . २०१८ अस्थिर वातावरणात उजाडले आणि दिवसेंदिवस प्रतिगामी होत चाललेल्या साम्राज्यवादी शक्ती नियंत्रित करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मात्र या सर्वांना न जुमानता आपला नफा करून घेतला .

अमेरिकेतील घडामोडी- फॅसिस्ट शक्तींना बळकटी

प्रसारमाध्यमे तसेच इतर आस्थापनांचा विरोध असूनही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय अमेरिकेच्या आत आणि बाहेर सर्वानाच एक आश्चर्याचा धक्का होता . ६० % पेक्षा कमी मतदान होऊन ४५ वे अमेरिकी राष्ट्रपती म्हणून ते केवळ २५ % मते मिळवून निवडून आले . ओबामा यांच्या डेमोक्रेटिक राजवटीच्या ८ वर्षांत कामगार आणि मध्यमवर्गावरील संकटे वाढत होती तेव्हा ट्रम्प यांनी बेरोजगार आणि दारिद्रय निर्मूलनाचे गाजर दाखवून आपण कामगार आणि मध्यमवर्गीयांचा तारणहार व भ्रष्ट वॉल स्ट्रीट प्रतिष्ठानचा प्रतिस्पर्धी म्हणून स्वत : ला सादर केले. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेतील चालू संकटांच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिम, मेक्सिकन , काळे आणि महिलांविरुद्ध सतत गरळ ओकूनही विजय मिळवला . त्यांच्या मतप्रणालीचा ठळक पाठिंबा कमी श्रेणीच्या कामगार वर्गातून दिसतो. कारण या वर्गाला आकर्षित करण्यासाठी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत संरक्षकपणा आणण्याचे वचन देऊन परदेशातून अमेरिकेत येणाऱ्यांसाठी नोकऱ्या बंद करण्याचे आश्वासन दिले . डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय हे अर्थव्यवस्थेतील सध्याच्या स्थितीच्या विरोधातही मत आहे यात काही शंका नाही . सामाजिक संरक्षणामुळे अमेरिकेच्या सरासरी मजूर वर्गाला टेबलवर अन्न ठेवण्याची चिंता करण्याची गरज नसली तरी बेरोजगारीची पातळी उच्च आहे . हे बदलण्याची आशा म्हणून ट्रम्पला सत्ता बहाल करण्यात आली . घसरत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला सावरून ट्रम्प काहीतरी चमत्कार करतील , अशी भाबडी आशा आता फोल ठरली आहे . त्यांच्या आर्थिक धोरणांनी आधीच नफा कमावणाऱ्या कंपन्यांना चांगले दिवस आले तरी बेरोजगारी , सार्वजनिक आरोग्याची हेळसांड , गरीब व श्रीमंतांमधली वाढती दरी यासारख्या मूलभूत प्रश्नांवर ट्रम्प यांना अजूनही उपाय सापडलेले नाहीत .

ब्रेक्झिट व ट्रम्पचा विजय या घडामोडी , जागतिकीकरणापासून स्वतःचे संरक्षण करण्याच्या दिशेने जगातील अग्रगण्य आर्थिक महासत्ता कशा चालत आहे याबद्दल स्पष्ट विधान करतात . जगातील सर्वात मोठ्या आर्थिक शक्ती आणि साम्राज्यवादी गटाचे नेते- अमेरिका आणि ब्रिटन हे दोन्ही देश आता स्वत : ला जागतिक आर्थिक संकटांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत . ते त्यांच्या अर्थव्यवस्था बाह्य परिणामांपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःभोवती भौतिक आणि आर्थिक भिंती बांधत आहेत.

मजूर वर्ग जगभरात लढत आहे . २०१६ मध्ये जागतिक स्तरावर कामगारांच्या संपाची संख्या इतिहासातील सर्वात जास्त होती, तरीही कामगार वर्गाच्या आकांक्षा पूर्ण करणारे कोणतेही ठोस राजकीय पर्याय उदयास येताना दिसत नाहीत . युरोप व लॅटिन अमेरिकेत, तसेच भारतासारख्या आशियातील देशात उजव्या ताकदी वाढत आहेत . या फॅसिस्ट शक्तींना ट्रम्पच्या विजयामुळे अधिकच बळ मिळालेले आहे . फ्रान्स , जर्मनी या देशातील निवडणुकीत उजव्या शक्तींच्या विजयाची पुनरावृत्ती होईल असे वाटत होते , फ्रान्समध्ये उजव्या शक्तींची पिछेहाट झाली आणि जर्मनीत मात्र उजव्या विचारधारेकडे झुकणाऱ्या पक्षांची सत्ता अबाधित राहिली . यामुळे जगातील कष्टकरी जनतेने जागरुक राहून आर्थिक संकटामुळे निर्माण झालेल्या लोकक्षोभाला सत्ताधारी वर्गाने आपल्या फायद्यासाठी कसे यशस्वीपणे वापरले याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे . त्यासाठी कामगार आणि कष्टकरी लोकांना राजकीयदृष्ट्या सक्षम करावे लागेल कारण साम्राज्यवादी व्यवस्थेस पर्याय अशा अचूक व शक्तिशाली डाव्या विकल्पांच्या अनुपस्थितीत उजव्या शक्ती जगभर वाढत आहेत .

डाव्या विचारांची वाटचाल

जागतिक स्तरावर ऑक्टोबर समाजवादी क्रांती शताब्दी साजरी केली जात आहे . त्यातून शिकलेले घडे घेऊन सध्याच्या ठोस परिस्थितीनुसार सिद्धांत आणि क्रांतीचा विकास करणे सर्वच डाव्या पक्षांना आवश्यक आहे . लोकशाही आणि समाजवादाकडे वाटचाल करणारे खरे पर्याय साम्राज्यवादाच्या सखोल अभ्यासावर आधारित असावे लागतील.आजच्या परिस्थितीत सर्वसामान्यपणे योग्य वैचारिक संघर्ष उभारून नवीन सिद्धांत विकसित करण्याची गरज आहे.

आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीचा इतिहास असे शिकवतो की वर्गीय लढायांमध्ये अनेक जटील चढ - उतार येतात. भांडवलशाही व्यवस्थेने सुरुवातीपासूनच कामगारांवर वर्चस्व गाजवण्यासाठी हरेक चळवळ दडपून टाकली. ते प्रथम मनोराज्यमय समाजवादी प्रवृत्तीविरुध्द आणि नंतर सुधारवादी आणि अराजकतावादी प्रवृत्तींच्या विरुद्ध होते. मार्क्स आणि एंगेल्स यांनी वैज्ञानिक समाजवादाचा सिद्धांत आणि कृती यांचे महत्त्व विषद केले. पॅरिस कम्युनकडून स्फूर्ती घेऊन फर्स्ट इंटरनेशनल व सेकंड इंटरनॅशनलची पुनर्रचना केली. पण जेव्हा भांडवलशाही साम्राज्यवादी मक्तेदारीत बदलली, तेव्हा डावी चळवळ बऱ्याच प्रमाणात त्या आव्हानांचा सामना करण्यास अयशस्वी ठरली व संपूर्ण जागतिक कम्युनिस्ट चळवळ संपण्याचा धोका निर्माण झाला. अशावेळी साम्राज्यवादाचे वैज्ञानिकदृष्ट्या मूल्यमापन करुन क्रांतीचा सिद्धांत पद्धती पुढे ठेवण्यात लेनिन यशस्वी ठरले. क्रांतीचा केंद्रबिंदू साम्राज्यवादाच्या कमकुवत दुव्यामध्ये म्हणजेच मोठ्या संख्येने वसाहती म्हणून दबलेल्या देशांकडे वळला आहे, असे विश्लेषण त्यांनी केले होते.

रशियातील क्रांती आणि सोविएत सत्तेची स्थापना, त्यानंतर चीनमधील क्रांती यांनी साम्राज्यवादाला मोठे हादरे दिले. यातून स्फूर्ती घेऊन जगभर डाव्या चळवळींनी जोर पकडला व १९५० च्या सुमारास समाजवादी चळवळीने उत्तम प्रगती केली. जवळपास ३ दशके एक तृतीयांश लोक समाजवादी देशांमध्ये राहात होते. मार्क्सच्या काळापासून वारंवार असे निदर्शनास आले आहे की, कामगार वर्गाने राजकीय शक्ती हस्तगत करणे हा समाजवादी संक्रमणाचा पाया बनू शकती. भांडवलशाही साम्राज्यवादी व्यवस्थेसाठी पर्याय हा कोणत्याही अर्थी भांडवलशाही व्यवस्थेची कॉपी असू नये. १९९१ नंतर साम्राज्यवाद्यांनी जागतिकीकरण लागू केल्यानंतर, नव - उदारमतवादी शासनकाळात कामगार - कष्टकरी वर्ग सतत आव्हानांना सामोरा जात आहे. कट्टर संघर्षातून प्राप्त केलेले जवळजवळ सर्वच लोकशाही हक्क व ट्रेड युनियनचे अधिकार हिरावले जात आहेत. कॉन्ट्रैक्ट लेबर सिस्टीम आणि हायर अँड फायरच्या धोरणांमुळे संघटित क्षेत्रात कामगारांची संख्या वेगाने कमी होत आहे. श्रमिक वर्ग मजुरी मिळवणारा गुलाम झाला आहे आणि असंघटित क्षेत्रात कामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक काळे कायदे लागू करून आर्थिक मागण्यांसाठी संघर्ष, संघटना बनविण्याचा अधिकार दडपला जात आहे. सांप्रदायिक, जातीय , पुनरुज्जीवनवादी भावना , दारू , मादक पदार्थाचे व्यसन आणि अराजक प्रवृत्तींचे रोपण करून कामगारवर्गाला विभागले जात आहे .

जागतिकीकरण आणि युद्धखोरी

९० च्या दशकात सोविएत युनियनचा पाडाव झाल्यानंतर मुक्त व्यापार धोरणाची लाट जगभर पसरली आणि त्यातून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक यांच्यावर नियंत्रण असलेल्या अमेरिकेने आपले प्रभावक्षेत्र वाढवले. आशिया, लॅटिन अमेरिका अन आफ्रिकेतल्या अनेक देशांना आर्थिक किंवा लष्करी ताकद वापरून आपले अंकित बनवले.

अमेरिकेने सुरू केलेले तथाकथित दहशतवादाविरुद्धचे युद्ध आशिया आणि आफ्रिकेतील नवीन भागात पसरले. अफगाणिस्तान आणि इराक या दोन्ही देशांविरुद्धचे जुने युद्ध दोन दशकानंतरही सुरूच आहे. सद्दाम हुसेनला संपवून इराकवर कब्जा केल्यानंतर यूएस - नाटो युतीने लिबियाला लक्ष्य केले आणि मुअम्मर गद्दाफीला संपवले. आता सीरियामध्ये शासन बदलवण्यास ते व्यस्त आहेत. त्याचप्रमाणे, पाकिस्तानात अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनला ठार केल्यानंतर, अमेरिका आणि त्याचे सहयोगी, फ्रान्स आणि ब्रिटन हे आता आफ्रिका खंडात सर्वत्र अल कायदाची भुते शोधण्यात व्यस्त आहेत . खाणी आणि तेल उत्पादनांचे संरक्षण करण्याच्या मिषाने व स्थानिक शासकांना सुरक्षित करण्यासाठी पश्चिमी सैन्याने माली आणि नायजरमध्ये प्रवेश केला आहे. आफ्रिकन कमांड (AFRICOM ) आधीच पेंटागॉनच्या ताब्यात आहे , ज्यामुळे अमेरिकन सैन्य आफ्रिकेतील ३५ देशांमध्ये उपस्थित आहे . आफ्रिकेतील समृद्ध संसाधनांचा साठा आणि आफ्रिकन देशांबरोबर चीनच्या वाढत्या आर्थिक संबंधांना तोंड देण्यासाठी फ्रान्स आणि ब्रिटन यांच्या सक्रीय सहकार्याने अमेरिकेच्या आक्रमक धोरणाचा पाठपुरावा केला जात आहे. अमेरिकेने उत्तर कोरियावरही लष्करी कारवाई करण्याची धमकी दिली आहे.

अमेरिकेच्या लागोपाठ जगातील युद्ध आणि आक्रमणाचा दुसरा स्रोत इस्त्रायल हा अमेरिकेचा आशियातील सर्वात विश्वासार्ह लष्करी मित्र आहे. इस्लामला जगाचा मुख्य शत्रू म्हणून जाहीर करण्यात आणि विशेषतः अरब जगावर नियंत्रण ठेवण्यात अमेरिकेला इस्राएलचा मोठा पाठिंबा आहे. सर्व आंतरराष्ट्रीय शांतता करार आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावांना मूठमाती देऊन इस्त्रायल पॅलेस्टाईनवर कब्जा करत आहे आणि सतत युद्ध - अपराध घडवत आहे. इराक आणि लिबिया सध्या अमेरिकेच्या नियंत्रणाखाली आहेत. सीरिया अमेरिकी नेतृत्वाखालील नवीन सरकारच्या प्रतीक्षेत आहे आणि इराणला अमेरिका आणि इतर नाटो शक्तींनी घेरले आहे त्यामुळे इस्रायलला सध्या त्याचा विस्तार करण्यासाठी एक महान राजकीय आणि लष्करी संधी आहे. पॅलेस्टिनी प्रदेशाचा कब्जा, गाझावर झालेले हल्ले, निष्पाप पैलेस्टिनी लोकांच्या हत्या आणि अत्यावश्यक सेवा आणि व्यवस्थेचा प्रचंड नाश करुन इस्राएल स्पष्टपणे पॅलेस्टिनींना त्यांच्या भूमीतून परागंदा व्हायला भाग पाडत आहे. पॅलेस्टाईन एका विशाल छळ आणि मृत्यू छावणीमध्ये रूपांतरित झाले आहे. संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीच्या ठरावाद्वारे पॅलेस्टाईन राज्याचे सार्वभौमत्व ओळखून पॅलेस्टाईनला सदस्य नसलेल्या पर्यवेक्षक राज्याचा दर्जा बहाल करून त्याला मान्यता देण्यात आली आहे. या प्रस्तावाला पाठिंबा देणारी १३८ मते मिळाली तर ९ मते विरुद्ध (अमेरिकेसह , इस्त्रायल आणि कॅनडा ) आणि ४१ खंडित ( ब्रिटन व जर्मनीसह ) झाली . पॅलेस्टिनी लोक हा एक मोठा नैतिक आणि मानसिक विजय मानतात. अमेरिका - इस्त्रायलचा संबंध शांती आणि स्वातंत्र्याचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि जगभरातील साम्राज्यविरोधी शक्तींनी या जोडगोळीविरुद्ध लढा देण्याची आवश्यकता आहे .

नवीन जागतिक आव्हाने

आर्थिक संकट व अमेरिकेच्या नेतृत्वाखालील कायमस्वरुपी युद्धाच्या खुमखुमीबरोबर आज जगभरातील भांडवलशाहीसमोर ऊर्जा संकट आणि पर्यावरणीय आपत्ती उभी आहे. अमेरिका आणि त्याचे पाश्चिमात्य सहयोगी तेल, वायू आणि कोळसा यासारख्या महत्वाच्या उर्जेच्या स्रोतांवर आपली पकड घट्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. तिसऱ्या जगातील देशांतल्या जमिनीवर ताबा ठेवून आपली स्वतःची उर्जेची गरज भागविण्यास जैव - इंधनाच्या लागवडीसाठी ते धडपड करत आहेत. त्यामुळे विकसनशील देशांची कृषी अर्थव्यवस्था, अन्न सुरक्षा व सार्वभौमत्वाचा नाश होत आहे. दहशतवादाविरुद्धचे तथाकथित युद्ध हे जागतिक संसाधनांवर आणि ऊर्जा अर्थव्यवस्थेवर मक्तेदारी ठेवण्याची लढाई आहे. दरम्यानच्या काळात, अणुऊर्जाविषयक अणुप्रकल्पाचे धोके समजल्यामुळे प्रगत भांडवलदार देश मोठ्या प्रमाणात अधिक सुरक्षित आणि स्वस्त ऊर्जेच्या स्रोतांकडे वळले, परंतु चेर्नोबिल आणि फुकुशिमा यासारख्या आपत्तीनंतरही अमेरिका आणि इतर मोठमोठ्या आण्विक शक्ती भारतासारख्या देशांना त्यांचे कालबाह्य परमाणु तंत्रज्ञान विकण्यात गुंतलेले आहेत.

ग्लोबल वॉर्मिंग किंवा हवामानातील बदल हा केवळ भविष्यातील धोका नाही पण पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या जीवनावर त्याचा परिणाम दिसू लागलेला आहे. १९९७ च्या क्योटो प्रोटोकॉलने पर्यावरणाच्या हानीला प्रामुख्याने जबाबदार असलेल्या विकसित देशांकरिता कार्बन डाइऑक्साइड आणि अन्य हरितगृह (ग्रीन हावज) वायूंचे प्रति व्यक्ती उत्सर्जन कमी करण्यासाठी एक लक्ष्य निर्धारित केले . परंतु अमेरिका आणि इतर काही प्रगत राष्ट्रांनी क्योटो प्रक्रियेला खीळ घातली. २०११ मध्ये डरबनमध्ये झालेल्या वातावरणीय बदल परिषदेत दरडोई प्राप्तीचा मापदंड रद्द करून चीन आणि भारत यासारख्या देशांवर असमान भार टाकण्यात ते यशस्वी झाले. अशा प्रकारे हवामान संकटाला तोंड देण्यासाठी समन्यायी तत्वांना तिलांजली देऊन प्रगत राष्ट्रांनी त्यांच्या सर्व विषारी कचकऱ्यासाठी डंपिंग ग्राउंड म्हणून तिसऱ्या जगाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत विकासाच्या मॉडेलची लढाई म्हणून प्रगत राष्ट्रांच्या दादागिरीला आव्हान देणे आवश्यक आहे.

माहिती तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व क्रांतीमुळे, विशेषत: इंटरनेट व संचारणाद्वारे माहितीचा व्यापक प्रसार प्रचंड प्रमाणात वाढला . साम्राज्यविरोधी आणि कॉर्पो रेटविरोधी प्रतिकारशक्ती प्रचंड प्रमाणात सर्वत्र पसरत आहे. कॉर्पोरेट - साम्राज्यवादी रहस्ये जगापुढे आणल्यामुळे या नवीन माध्यमाच्या प्रचंड क्षमतेची सुरुवात झाली आहे. भौतिक तसेच वैचारिक दृष्टीने सामाजिक आणि राजकीय संघटन निर्माण करण्याचे ते एक प्रभावी साधन बनले आहे म्हणून भांडवलदार वर्ग आणि शासन इंटरनेटवरील स्वातंत्र्य रोखण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. या षडयंत्रावर मात करण्यासाठी आणि भांडवलदार कॉर्पोरेट - साम्राज्यवादी शक्तीविरुद्ध चालू असलेल्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या स्वातंत्र्याचा विस्तार करणे हे जगभरातील लोकांसमोर एक आव्हान आहे.

अमेरिकन वर्चस्ववाद विरुद्ध बहुविधता

संपूर्ण जगावर कायमस्वरूपी वर्चस्व गाजवण्याचे स्वप्न अमेरिकेने नेहमीच उराशी बाळगलेले आहे. आर्थिक क्षेत्रात हे सर्वात मोठे आव्हान आहे. सध्याच्या मंदीमुळे अमेरिकेला जोरदार फटका बसला आहे, तर चीन आता जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनत आहे. २०२० पर्यंत अमेरिकेला मागे टाकून क्रयशक्ती समानतेच्या निकषावर जगातील ती सर्वात मोठी अर्थव्यवस्था मोजली जाईल. उच्च पातळीवर परस्परावलंबी असूनही दोन्ही शक्तीमधील आर्थिक विरोधाभास स्पष्टपणे दिसून येत आहेत. जागतिक व्यापार संघटनेसारखे युरोपियन युनियनचे एक स्वतंत्र अस्तित्व मान्य केले गेले तर, अमेरिकेपेक्षा तो समूह आधीच मोठा आहे. ब्रिक्स, (ब्राझील, रशिया , चीन , भारत , दक्षिण आफ्रिका ) एक शक्तीशाली आर्थिक गट म्हणून उदयास आला असला तरी त्याची सुरुवातीची चमक आर्थिक मंदीमुळे फिकट पडली आहे . जागतिक बँक सहा प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणून ब्राझील, रशिया, भारत आणि चीन यांच्याव्यतिरिक्त दक्षिण कोरिया आणि इंडोनेशिया यांना मान्यता देते.

जी -७ (यू.एस, यू. के, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि जपान ) ने जी -२० परिवर्तित होताना अनेक उदयोन्मुख अर्थव्यवस्थांची भरती करण्यासाठी पुढाकार घेतला . पण अमेरिकेच्या हाती असलेले सर्वात मोठे आर्थिक शस्त्र म्हणजे आंतरराष्ट्रीय चलन म्हणून डॉलरला मिळालेली सर्वमान्यता. ज्यावेळी डॉलरच्या वर्चस्वाचा अंत करून त्याला काही पर्यायी व्यवस्था निर्माण होईल त्यावेळी अमेरिकेची मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात येईल आणि जागतिक समानतेच्या दृष्टीने ते आवश्यकही आहे.

लष्करी आणि राजकीय क्षेत्रामध्ये अमेरिकेची मक्तेदारी कायम असली तरीही बहुविधतेकडे वाटचाल करण्यात सर्वच देशांना स्वारस्य आहे. चीन, आणि यू.एस.एस.आर.च्या विभाजनपासून जन्माला आलेली नवीन रशियाः युरोपियन युनियनचा विस्तार व एकत्रीकरणातून उदयास आलेल्या अन्य देशांचा समावेश असलेल्या संघटना यातून मुख्यत्वे बहुविधतेचा कल दिसून येतो. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील जागतिक युतीचा उदय दहशतवाद विरोधातून झाला. परंतु इराक आणि अफगाणिस्तानमध्ये मोठी वित्तीय हानी सोसावी लागल्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला व या भागात अमेरिकेची पकड सैल पडू लागली आहे. रशिया आणि चीनच्या संयुक्त आणि सशक्त विरोधामुळे इराण आणि आता सीरियाच्या बाबतीत अमेरिकेला आपल्या मर्जीनुसार कृती करणे शक्य झाले नाही. अनेक इतर क्षेत्रीय देशांचे शक्तिशाली गटही आता विकसित होत आहेत.

आंतरराष्ट्रीय परिस्थिती बहुविधतेच्या दिशेने झुकत असताना संपूर्ण जगभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिकार आणि लोकनिषेध दिसून येतो. दोन मूलभूत विरोधाभास यातून प्रतिबिंबित होतात. प्रगत भांडवली देशांमध्ये कामगार आणि भांडवलदार यांच्यातला विरोधाभास तसेच साम्राज्यवाद आणि तिसऱ्या जगातील देशांमधील विरोधाभास. बाजारपेठ काबीज करून नफेखोरीचे उद्दिष्ट असलेल्या या व्यवस्थेतून आतंकवाद आणि साम्राज्यवादी हस्तक्षेप यांना मोकळे रान मिळत आहे.

डावी विचारधारा - चीन आणि लॅटिन अमेरिका

१९७८ सालापासून शासनाच्या थेट हस्तक्षेपामुळे चीन एका नियमित बाजार अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाढला आहे. चिनी वैशिष्ट्यांसह एक वेगळी समाजसत्ता निर्माण केल्याचा दावा तेथील शासन व कम्युनिस्ट पक्षाकडून केला जातो. मोठ्या प्रमाणात बाजारपेठी अर्थव्यवस्था स्वीकारल्यामुळे चीनमधील सामाजिक तसेच क्षेत्रीय असमानता यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, परंतु ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात प्रभावी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे . बाजारपेठेतील प्रो - प्रायव्हेट कॅपिटल रिफॉम्र्स मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेत आणल्यामुळे स्वाभाविकपणे मूलभूत अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. सत्ताधारी पक्षाची राजकीय धोरणे तसेच त्यांच्या सदस्यांचे आचरण व भ्रष्टाचार यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच जबरदस्तीने जमीन अधिग्रहण आणि कामाच्या परिसरातील दयनीय स्थिती, बहुराष्ट्रीय व खासगी कारखान्यातील आणि खाण कामगारांचे कमी वेतन, वारंवार होणारी ग्रामीण बंडखोरी असे अनेक प्रश्न तिथे उद्भवले आहेत .

चीन आज साम्राज्यवादी शक्तीविरुद्ध लढण्याचे केंद्र म्हणून मागे पडले आहे आणि या पार्श्वभूमीवर लॅटिन अमेरिका जागतिक स्तरावरील डाव्या चळवळीची एक सशक्त गढी म्हणून उदयास आली आहे. अलीकडील काळात लॅटिन अमेरिकन लोकांनी नव - उदारमतवादी घोरणांचा निर्भयपणे विरोध करणाऱ्या आणि साम्राज्यवादी प्रवृत्तींना सामोऱ्या जाणाऱ्या अनेक सरकारांची निवड केली आहे. बोलिव्हिया आणि व्हेनेझुएला यांनी प्रमुख उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले आहे आणि एक्वादोरने अमेरिकेचे सैन्य तळ बंद केले आहेत . काही दशकांपूर्वी अमेरिकेच्या पाठिशी असलेल्या चिलीच्या हुकूमशाही सरकारपासून ते अजेंटिनापर्यंत नव - उदारमतवादी धोरणांच्या हिंसक अंमलबजावणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात हे लक्षणीय आहे . क्युबा आणि व्हेनेझुएला यांनी संयुक्तपणे बोलीवरीयन अलायन्स फॉर अवर अमेरिका ( ALBA ) ह्या आघाडीची स्थापना केली आहे . ज्यामध्ये आता बोलिव्हिया , एक्वादोर आणि निकारागुआसह आठ सदस्य राष्ट्र आहेत . क्षेत्रीय आर्थिक एकात्मतेचे उद्दिष्ट असलेली ही आघाडी अमेरिकेच्या वर्चस्वीक व्यापाराला एक नवीन पर्याय तयार करीत आहे . लॅटिन अमेरिकन एकीकरण वाढविण्यासाठी आणि अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी ALBA चे अनुकरण अमेरिकेतील यूएसए आणि कॅनडा वगळता ब्राझील व कॅरिबीयन देशांचा समावेश असलेल्या CELAC या ३३ देशांच्या गटाने केले आहे .

१९ व्या शतकात सर्वप्रथम वसाहतवादाविरुद्ध बंड करणारा व लॅटिन अमेरिकेतल्या कित्येक देशांचा जनक असलेला सायमन बोलीवार हा येथील जनतेचे प्रेरणास्थान आहे . २१ देशातील जनतेला वंदनीय वाटणारा हा महानायक शिवाजी महाराजाप्रमाणे गनिमी युद्धात वाक्बगार होता . त्याच्या नावाने सुरु केलेल्या लॅटिन अमेरिकेच्या वैचारिक एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला बोलीवारियन क्रांती या नावाने ओळखले जाते .

क्यूबा लॅटिन अमेरिकन लोकांसाठी प्रेरणास्रोत आहे . साम्राज्यवाद्याचा प्रतिकार आणि या प्रदेशात एकता निर्माण करणाऱ्या फिडेल कॅस्ट्रो यांनी पाच दशकानंतर क्युबाचे विद्यमान अध्यक्ष व क्युबा कम्युनिस्ट पक्षाचे प्रथम सचिव म्हणून राउल कॅस्ट्रो यांचा मार्ग सुकर केला, कॅस्ट्रोच्या निधनानंतरही तेथील राजकीय परिस्थितीत स्थैर्य आहे . १९९० पासून क्युबाने शेतीमधील पर्यावरणीय पद्धती विकसित केल्या आणि त्यातून देश अन्न सार्वभौमत्वाच्या मार्गाकडे जात आहे. क्युबाने अलीकडेच काही आर्थिक सुधारणांची अंमलबजावणी केली , त्यात मर्यादित खासगी उद्योजकांचाही समावेश आहे .

वेनेझुएलानंतर चीनने क्युबाशी व्यापारी संबंध वाढवले आहेत व तो क्युबाचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष शुगो चावेझ यांच्या निधनाने व्हेनेझुएलाची जनता आणि बोलीवारियन क्रांतीसमोर एक नवीन आव्हान उभे केले आहे . चावेझच्या पहिल्या टर्ममध्ये सुरू झालेला सामाजिक - आर्थिक सुधारणांचा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे . व्हेनेझुएला देशात आर्थिक असमानता स्तर सर्वात कमी आहे आणि गरीबी ७०.८ % ( १९९६ ) पासून २१ % ( २०१० ) पर्यंत कमी झाली आहे . बॅरिओ अंडेट्राॅ या प्राथमिक आरोग्य - काळजी कार्यक्रमाअंतर्गत ७,००० क्लिनिकमध्ये ८,३०० पेक्षा जास्त क्युबन डॉक्टरांचा समावेश आहे . त्यांनी १४ लाख लोकांचे जीव वाचवले आहेत. २१ व्या शतकातील समाजवाद स्थापनेच्या घोषित लक्ष्याने व्हेनेझुएलातील बोलीवरीयन क्रांतीची प्रक्रिया वेग घेत आहे . अमेरिकेने व्हेनेझुएला लोकांच्या विरोधात २००२ मध्ये कटाची कारवाई केली. त्या अयशस्वी प्रयत्नांनंतर आता अन्य मार्गांनी अमेरिका तेथील राज्यसत्तेवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नात आहे परंतु १९९८ पासून लोकशाहीची गती वाढल्याने व्हेनेझुएलात लोकांचा राजकीय सहभाग वाढला आणि अस्थिरतेविरुद्ध शक्तिशाली प्रतिबंध म्हणून जनता कार्यरत आहे.

लॅटिन अमेरिकेतील डाव्या चळवळीतील एक प्रमुख प्रभावकेंद्र म्हणून बोलिव्हिया उदयाला आले आहे. राष्ट्राध्यक्षा इव्हो मोरालेस यांनी डिसेंबर २००५ मध्ये ५४ टक्के. मतदानासह निवडणुका जिंकल्या आणि २००९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही ६४ टक्के मते प्राप्त करून ते सत्तेवर आले. त्यानंतर राज्यघटनेत बदल करण्यात आले आणि इव्हो मोरालेस यांना तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. २०१४ च्या निवडणुकांत ६१ टक्क्यांच्यावर मते मिळवून ते पुन्हा सत्तेवर आले. डाव्या विचारसरणीच्या लोकप्रियतेचा तो विजय आहे. डाव्या विचारांचे समर्थन करणारी स्थानिक लोकांची चळवळ बोलिव्हियामध्ये मोठी भूमिका बजावत आहे.

डाव्या पक्षाच्या लोकप्रियतेला पुष्टी आणि मजबुती देणारी अजून एक घटना म्हणजे इक्वाडोरमधील सार्वत्रिक निवडणूक. इक्वाडोरचे विद्यमान अध्यक्ष राफाएल कुरेंय यांनी २०१७ च्या फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रपती निवडणुकीत प्रचंड विजय मिळविला. राफाएल कुरेय यांनी अत्यंत क्रूर नव - उदारमतवादी जागतिकीकरणाचा सामना करण्यासाठी लटिन अमेरिकेची एकता करण्याची मागणी केली आहे. सामाजिक खर्च वाढवून गरिबीमध्ये लक्षणीय घट करण्याबरोबरच विदेशी कर्ज बेकायदेशीर घोषित केल्याने कुरैय सरकारने अमेरिकेच्या हस्तक्षेपाबद्दल एक ठळक भूमिका घेतली आहे. इक्वाडोरच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणाऱ्या इक्वाडोरमधील अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्यांना बाहेर घालवून विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांना लंडनमध्ये इक्वाडॉरियन दूतावासात आश्रय दिला गेला.

लॅटिन अमेरिकेतील डाव्या साम्राज्यवादविरोधी आणि समाजवादी संघटित शक्तीची एक दीर्घ परंपरा आहे. तथापि, अमेरिकी साम्राज्यवादापासूनचा धोका कमी झाला नाही, तसे नसते तर जून २००९ मध्ये होंडुरासचे राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल झियाला यांच्याविरुद्ध अमेरिकेच्या गुप्त आणि अप्रत्यक्ष पाठिंब्याशिवाय लष्करी कट होऊन त्यांना सत्ताच्यूत करणे शक्यच नव्हते. झियाला यांनी किमान वेतनवाढ यासारख्या लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी केली होती. लॅटिन अमेरिकन लोक अत्यंत सावध आहेत. आफ्रो - लॅटिन अमेरिकन आणि स्थानिक लोक सहकारी संघटना, कामगार संघटना, शेतकरी संघटना , महिला संघटना आणि सामाजिक चळवळी यांच्या माध्यमातून सक्रियपणे घराणेशाही साम्राज्यवाद्याच्या विरोधात संघटित होऊन सतत लढत आहेत.

युरोप, आफ्रिका आणि आशिया

युरोपमधील अनेक डावे पक्ष एकत्र आले आहेत. २००४ पासून त्यांची तीन अधिवेशने आजपर्यंत झाली. युरोपच्या काही भागांमध्ये युवकांच्या चळवळीचे पुनरुत्थान आणि मजूर वर्गाच्या डाव्या पक्षांच्या पुनरुज्जीवनाची आशा पल्लवित झाली आहे. युरोझोन संकटाच्या तीव्र पार्श्वभूमीवर हे घडत आहे ( युरोपीय संघातले १७ देश युरो हे सामान्य चलन म्हणून वापरतात . तर युरोपियन युनियनचे १० सदस्य देश त्यांच्या स्वत : च्या चलनाचा वापर करतात ) युरोझोनमध्ये युवक बेरोजगारीचा दर २२ % आहे . (इटली ३० % पेक्षा जास्त, पोर्तुगाल, स्लोवाकिया, ग्रीस आणि स्पेनमध्ये ५० % पेक्षा अधिक) . अलिकडील निवडणुकीत युरोपियन डाव्यांचे सर्वोत्तम प्रदर्शन ग्रीसमध्ये पाहिले गेले, जिथे सिरिझा (एक डझनपेक्षा जास्त डावे पक्ष व संघटना यांची युती) एक प्रमुख पक्ष म्हणून उदयास म्हणून आला, सध्या ३०० सदस्यांच्या सदनात त्यांचे ७१ निर्वाचित सदस्य आहेत आणि तो विरोधी पक्षाची भूमिका प्रभावीपणे बजावत आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिल्यास तीव्र आर्थिक संकटाच्या काळात अति उजव्या शक्तींचा उदय होतो. युरोपातील डाव्यांना एकाच वेळी वर्ण - वंशवादी, स्थलांतरित जनताविरोधी, तसेच इस्लामविरोधी राजकारणी डावपेचांना तोंड द्यावे लागत आहे. ग्रीसमधील निवडणुकीत ७ % मते व १३ जागा जिंकून आलेल्या नाझीवादाचा पुरस्कार करणाऱ्या गोल्डन डॉन या पक्षाचा उदय झाला.

दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद राबवणाऱ्या राजवटीचा पराभव करून डाव्या पक्षाने एक महत्वाचा विजय मिळवला होता. सत्ताधारी आफ्रिकी नैशनल कांग्रेस (एएनसी) आणि दक्षिण आफ्रिकन ट्रेड युनियन काँग्रेस यांच्यासोबत दक्षिण आफ्रिकन कम्युनिस्ट पार्टी (एसएसीपी) त्रिपक्षीय आघाडीत आहे. पण एसएसीपी आणि दक्षिण आफ्रिकन ट्रेड युनियन कांग्रेस यांच्याबरोबर वैचारिक संबंध असूनही, आफ्रिकी नॅशनल काँग्रेस नेतृत्वाखालील सरकार जोरदारपणे नव - उदारमतवादी धोरणाची अंमलबजावणी करीत आहे आणि कामगारवर्ग कठोर दडपणाचा सामना करत आहे. जोहान्सबर्गजवळ मारिकानामध्ये ३४ प्लॅटिनम खाणकामगारांच्या धक्कादायक हत्याकांडामुळे वर्णभेद कालखंडाच्या क्रुरतेच्या स्मृती पुन्हा एकदा समोर आल्या , एएलसी शासनाने पोलिसांविरुद्ध कारवाई करण्याऐवजी वर्णभेद - काळाचा कायदा लावण्याचा निर्णय घेतला . ज्यामुळे ३४ कामगार मारले गेले आणि ७८ गंभीर जखमी झाले . एसएसीपी आणि दक्षिण आफ्रिकन ट्रेड युनियन काँग्रेस संघटनांनी कामगार चळवळ विस्कळीत केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेत कम्युनिस्टांचा एक नवीन टप्पा सुरू झाला आहे आणि आता ते प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत आहेत . केवळ बहुराष्ट्रीय कंपन्या आणि कॉर्पोरेट - साम्राज्यवादीच नव्हे तर कम्युनिस्ट समर्थनासह चालणारे सरकार हेही एक मोठे आव्हान बनले आहे .

आशियामध्ये साम्यवादी चळवळीतील सर्वात प्रचंड वाढ नेपाळमध्ये पाहिली गेली . तिथे राजेशाहीचे उच्चाटन करण्यासाठी आणि रिपब्लिकन संक्रमणाची प्रक्रिया सुरू करण्यात साम्यवादी नेतृत्वाखालील जनसमुदाय यशस्वी ठरला . संविधानाच्या प्रक्रियेची २००८ पासून फारच थोडी प्रगती झालेली असली तरी चार पंतप्रधानांनी आधीच पदभार स्वीकारला आहे आणि जवळपास सर्व शक्य असलेल्या संयोजनांचा आधीच प्रयत्न केला गेला आहे . सर्वसमावेशक राजकारणातील गुंतागुंत वगळता दोन मुद्दे विशेषतः आव्हानात्मक ठरले आहेत- रिपब्लिकन नेपाळमधील नक्षलवादी लष्कराच्या कॅडरचे संघटन आणि पुनर्वसन आणि रिपब्लिकन पद्धतीत नेपाळच्या फेडरल तत्त्वांची अंमलबजावणी. पहिला मुद्दा हा सोडवला गेला आहे परंतु दुसऱ्या मुद्यावर चर्चा सुरु आहे . कारण नवीन व्यवस्थेखाली आतापर्यंत वंचित / अल्पसंख्य असलेले वर्ग आता नवीन संधी व सामाजिक ओळख शोधत आहेत . असेंब्लीच्या नव्या निवडणुकांची देखरेख करण्यासाठी विद्यमान मुख्य न्यायमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अंतरिम सरकारशी सर्व प्रमुख पक्ष सहमत झाले आहेत . भारत आणि नेपाळ यांच्यात समान संबंध प्रस्थापित होऊन नेपाळ एक लोकशाही प्रजासत्ताक म्हणून प्रस्थापित होणे गरजेचे आहे . नेपाळच्या प्रजासत्ताक संक्रमणाच्या प्रक्रियेला अडथळा आणणाऱ्या किंवा नेपाळमध्ये कुठल्याही प्रकारचे भारतीय वर्चस्व वाढविण्याच्या कोणत्याही संभाव्य हस्तक्षेपाविरुद्ध आपण सावध राहिले पाहिजे .

पाकिस्तान अत्यंत कठोर व अस्वस्थ परिस्थितीतून जात आहे . अफगाणचे संकट पाकिस्तानमध्ये पसरले गेले आहे आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी पाकिस्तान अमेरिकेला पाठिंबा देत आहे. तरीही अमेरिकेने पाकिस्तानचा सार्वभौमत्वाचा भंग केला आहे आणि देशाला घातक ड्रोन हल्ल्यांसह ढवळून काढले आहे. पाकिस्तानमधील शिया समुदायावर, विशेषकरून बलुचिस्तानमध्ये, सगळीकडून सतत हिंसक हल्ले होत आहेत. तथापि पाकिस्तानातील न्यायव्यवस्थेने अत्यंत समर्थपणे भूमिका बजावली आहे. गेल्या वर्षी राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाच्या अवमानाबद्दल पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांना निर्दोष ठरविले होते आणि या जानेवारीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असलेले तत्कालीन पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांना अटक झाली. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या जुलै महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन सर्वसमावेशक निर्णयाद्वारे पदच्युत होण्याचा आदेश दिला, ज्यामुळे देशातील अस्थिरतावादी राजकारणास आणखी एक धक्का बसला . दरम्यान इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीतून सत्तेवर आलेल्या सरकारने पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पुढची सार्वत्रिक निवडणूक होत आहे . ताहीर उल कादरी या कॅनडा स्थित मूळ पाकिस्तानी वंशाच्या एका धर्मगुरूने पाकिस्तानात परत येऊन भष्टाचारमुक्त व मवाळ पाकिस्तान निर्माण करण्याची घोषणा दिली आहे. भारतातील अण्णा हजारेंच्या आंदोलनाबरोबर बरेचजण याची तुलना करत आहेत . माजी क्रिकेटपटू इम्रान खान राजकारणात सक्रीय आहे आणि अमेरिकन ड्रोन हल्ल्यांचा त्यांच्या तेहरिक ए इन्साफ या पक्षाने जरूर निषेध केला आहे. परंतु लष्करी आस्थापनाबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांना संशयाच्या नजरेने पाहिले जाते. पाफिस्तान पीपल्स पार्टीची परिस्थिती वाईट आहे . नवाझ शरीफचा पाकिस्तान मुस्लिम लीग हा पंजाब प्रांतातील आपल्या मक्तेदारीमुळे सत्ता टिकवून आहे. नॅशनल असेम्ब्लीमधील एकूण २७२ जागापैकी १४१ जागा या प्रांतात आहेत व इथे काही पिढीजात जमीनदार व धार्मिक नेते अनेक वर्षांपासून सत्ता गाजवत आहेत. सुरुवातीला परवेझ मुशर्रफ यांना पाठिंबा देणाऱ्या या सरंजामदारांनी २०१३ च्या निवडणुकात नवाझ शरीफ यांना पाठिंबा दिला. यावेळी ते इम्रान खानच्या तेहरिक ए इन्साफमध्ये सामील झाले आहेत. ज्या लोकांच्या मक्तेदारीला विरोध म्हणून १९९६ साली पक्षाची स्थापना केली, त्याच लोकांबरोबर हात मिळवण्यास पक्षांतर्गत विरोध असूनही ' मला ही निवडणूक आता जिंकण्यासाठीच लढवायची आहे ' असे मत इम्रान खानने बीबीसीबरोबर बोलताना व्यक्त केले .

पंजाबातील सरंजामदार व लष्कराच्या पाठिंब्याने यावेळी इम्रान खान सत्तास्थानी येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. एक आधुनिक व नवीन चेहरा म्हणून अमेरिकेलाही ते सोयीचे आहे. अमेरिका आणि चीन यांच्यादरम्यान सुरु असलेल्या तणावात पाकिस्तान ओढला जात आहे आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेला टेकू देण्यासाठी पाकिस्तानी सत्ताधारी वर्गाला दोघांचीही गरज आहे.

अफगाणिस्तानमधील अमेरिकन - नाटो सैन्य मोहीम आता ११ वर्षांपेक्षा अधिक काळ चालू आहे. अमेरिकन - नाटो सैन्याने २०१४ च्या अखेरीस एक्झिट प्लॅन आणि सैन्य काढून घेण्याच्या मुद्यावरही चर्चा केली. २०१४ नंतरही अफगाणिस्तानमधील सोयी सुविधा व लष्करी तळ अमेरिकन सैन्यासाठी वापरण्याकरिता अमेरिकेने अफगाणिस्तानबरोबर एक कायमस्वरुपी धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. अमेरिकेचा एक सहकारी म्हणून अफगाणिस्तानमध्ये भारतानेही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. पाश्चिमात्य देशांच्या कमी हस्तक्षेपामुळे अफगाण प्रश्नावरून भारत व पाकिस्तान यांच्यात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. आधीच या दोन देशांदरम्यान काश्मीर प्रश्नावरून चकमकी चालू आहेत. अफगाणिस्तानच्या प्रश्नावरून संबंध अजूनही तणावपूर्ण होतील व अमेरिकेच्या हस्तक्षेपाची गती वाढेल. त्यामुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर होईल. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या संपूर्ण सार्वभौमत्वाचे पुनस्थापन आणि त्यांच्या भविष्याचे निर्धारण करण्यासाठी अमेरिकन- नाटो सैन्य हटवणे गरजेचे आहे तरच या प्रदेशातील शांतता टिकेल . भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांती आणि मैत्रीचे महत्त्व समजावून घेऊन भारतात उन्मादपूर्ण वातावरण निर्माण करण्याच्या कारवायांपासून आपण जागरुक राहिले पाहिजे.

श्रीलंकेच्या राजपक्षे सरकारने एका निरंतर वंशवादविरोधी मोहिमेद्वारे एलटीटीईला नेस्तनाबूत केले. नोव्हेंबर २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंतर्गत चौकशी अहवालात प्रकाशित झालेल्या अंदाजानुसार नागरिकांच्या जीवितहानीची संख्या ७०,००० पर्यंत जाऊ शकते. विश्व बँकेच्या अहवालानुसार २००९ पासून एलटीटीईबरोबरच्या निर्णायक युद्धानंतर सुमारे एक लाख श्रीलंकन तामिळ नागरिक परागंदा झाले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेने युद्धाविषयक समस्येवर मात करण्यासाठी श्रीलंका सरकारला विनंती केली होती परंतु श्रीलंकेच्या सरकारने सलोखा आयोग स्थापन करून श्रीलकेच्या सैनिकांना क्लीनचिट दिली. अलीकडेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार समितीने आणखी एक ठराव मांडला ज्यात आयोगाच्या कामकाजात स्पष्ट पूर्वग्रह व अमानुषता असून त्यावर आंतरराष्ट्रीय चौकशी सुचविण्यात आली, परंतु श्रीलकेने हा सौम्य अहवालही झिडकारला, श्रीलंकन सरकारच्या सलोखा संकल्पनेने श्रीलंकेच्या तमिळांना सिंहल श्रेष्ठत्व स्वीकारण्याचे आवाहन केले आहे, पण श्रीलंकेचे तमिळ अजूनही मृतांची संख्या मोजत आहेत . श्रीलंकन तमिळ समुदायांच्या अधीनतेच्या आधारावर श्रीलंकेत सलोखा निर्माण होऊ शकत नाही.

भारताच्या पूर्वेतील शेजारी, बांगलादेश आणि म्यानमारशी असलेल्या संबंधांचे महत्त्व देखील गेल्या दोन दशकांपासून भारत सरकारने लुक ईस्ट धोरणाचा पाठपुरावा केल्याने परराष्ट्र धोरणाचा एक मुख्य पैलू म्हणून उदयास आले आहे. आसियान देशांपर्यंत पोहोचण्यासाठी या धोरणाचा वापर करताना आर्थिक सुरक्षिततेबरोबर बंडखोर गटांना बांगलादेश आणि म्यानमारमध्ये आश्रय घेण्यास प्रतिबंध करून ईशान्येकडील बंडखोरांना नियंत्रित केले जाते. म्यानमारमधील लोकशाही पुनस्थापनेच्या सुरुवातीला लुक ईस्ट पॉलिसीनुसार भारताने सैन्य अधिकाऱ्यांबरोबर घनिष्ठ संबंध निर्माण करणे सुरू केले. लोक - विरोधी चळवळ नेता आंग सान सू ची यांना २०१० मध्ये स्थानबद्ध करण्यात आले. २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकात त्यांच्या पक्षाने ४६ पैकी ४३ जागा जिंकून सत्ता मिळविली परंतु म्यानमारमधील लोकशाही कायम राहील, याची शाश्वती देता येत नाही. त्या देशात धार्मिक आणि जातीय अल्पसंख्याकांच्या हक्कांचे प्रश्न लोकशाहीला आव्हान आहे. सांप्रदायिक हिंसेमुळे हजारो रोहिंग्या मुस्लिमांना देशातून पळून जाऊन धायलंड , बांगलादेश , किवा मलेशियामध्ये आश्रय शोधणे भाग पडले आहे . म्यानमारचे नव्याने निवडलेले सरकार अद्याप रोहिंग्यांच्या अधिकार आणि सुरक्षेसाठी स्पष्टपणे आश्वासन देत नाही. म्यानमार मधील रोहिंग्या निर्वासितांच्या प्रश्नांवर रा. स्व. संघाच्या सरकारले देशातील वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. रोहिनग्यांच्या विस्थापनाचे मूळ कारण तेथील समृद्ध साधनसंपत्तीवर कब्जा मिळवण्यासाठी केलेले हल्ले हे आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या दबावामुळे आणि सरकारमधील काही घटक नाराज होऊ नयेत यासाठी संघाने आपल्या अखत्यारीतील कडव्या संघटनांचा उन्माद आवरला.

चार दशकांपूर्वी मुक्तिसंग्रामात घडलेल्या युद्धाच्या गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा देण्यासाठी बांगलादेश मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत आहे. आजच्या वातावरणातील मुक्तीयुद्धाच्या भावनिक पुनरुत्थानामुळे जातीयवादी व धार्मिक उजव्या शक्ती एकटया पडत आहेत आणि नव - उदारमतवादी आर्थिक संरचनेलाही एक आव्हान निर्माण होत आहे. कारण स्वस्त मजुरीचे केंद्र म्हणून बडे बहुराष्ट्रीय भांडवलदार येथील जनतेचे व्यवस्थितपणे शोषण करत आहेत. पण शासन आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी व जमात ए इस्लामी यांच्यातली चुरस, पोलीस गोळीबारात होणाऱ्या हिंसक हत्या, हिंदू व बौद्ध या अल्पसंख्यांक्यांबरोबर पत्रकार, पुरोगामी विचारवंत यांचे खून यांनाही ऊत आलेला आहे.

सध्याच्या जागतिक घडामोडी दर्शवतात की आज साम्राज्यवादी यंत्रणा अधिक अमानुष, लष्करवादी, सतत दडपशाही करणारी आणि समाजावर पोसलेल्या परजीवी बांडगुळासारखी आहे. साम्राज्यवादी देशांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तंत्रज्ञानात, वित्तपुरवठा आणि बाजारपेठांमध्ये वाढ होत आहे. साम्राज्यवादी देशांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. बहुराष्ट्रीय कंपन्या, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या माध्यमातून साम्राज्यवादी देशांनी आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतल्या देशांवर कब्जा केलेला आहे. जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाच्या त्रिसूत्रीमुळे त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि विशेषतः विकसनशील देश यांच्यावर कब्जा मिळवणे सोपे झाले आहे.

राष्ट्रीय परिस्थिती सत्ताधाऱ्यांतील चढाओढ

भारताच्या सांप्रत आर्थिक, राजकीय व सामाजिक परिस्थितीचे विवेचन करण्याआधी स्वातंत्र्योत्तर घडामोडींवर प्रकाशझोत टाकणे क्रमप्राप्त ठरते. १९४७ नंतरच्या काळात तेलंगणा व इतरत्र ठिकाणी कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या संघर्षावर क्रूरपणे दडपशाही करण्याबरोबर इतर विविध मागण्यांसाठीच्या सर्व लोक चळवळी दाबून टाकत एका बाजूला काँग्रेस सरकारने जमीनदारी कायदा बदलून सुधारित जमीन धारणा धोरणांची अंमलबजावणी केली. समाजवादी विचारधारेने उभ्या केलेल्या आव्हानाला तोंड देण्यासाठी अमेरिकेच्या किनेसियन धोरणाच्या धर्तीवर विविध कल्याणकारी धोरणांची अंमलबजावणी केली. देशातील लोकचळवळी आणि असंतोषाला घाबरलेल्या भारतीय शासनाने अमेरिकेच्या हरित क्रांतीची अंमलबजावणी केली. नवीन जमीन धारणा कायदे आणून जुन्या सरंजामी जमीनदारांना बदलून भांडवलशाही पद्धतीला चालना देण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करण्यासाठी तयार असलेला नवीन जमीनदार वर्ग निर्माण केला, यातून जागतिक पातळीवर साम्राज्यवादी व्यवस्थेबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकत्रीकरणाची गती वाढली .

दलाल, नोकरशहा , बुर्ज्वा आणि जमीनदार वर्गाच्या नेतृत्वाखाली भारतीय शासनाच्या या धोरणांमुळे , आर्थिक - सामाजिक विरोधाभास तीव्र होत गेले व ते विविध प्रकारे प्रकटही झाले . जमीन सुधारणा कायद्यांनी भूमीहीन शेतकऱ्यांना जमीन तर दिली नाहीच पण केवळ एक नवीन जमीनदार वर्ग तयार केला केंद्र व राज्य सरकारांनी चालविलेल्या आर्थिक धोरणामुळे अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ , वाढती बेरोजगारी आणि गुन्हेगारी यातून जनतेवर जास्तच बोजा पडला व असुरक्षितता निर्माण झाली ; तसेच असमान विकास वेगाने वाढला . काश्मीर आणि ईशान्येकडील लोकांनी आत्मनिर्धारित अधिकारांसाठी संघर्ष वाढविला आणि कामगार, शेतकरी आणि इतर वर्ग त्यांच्या अधिकारांकरिता असंख्य लढे देऊ लागला तेव्हा काँग्रेस सरकारने कठोर दडपशाहीचे धोरण अवलंबिले , अनेकदा काळा कायदा लागू केला आणि नागरी वस्तीत सैन्य तैनात केले . शासक वर्गामधील विरोधाभास तीव्र झाल्यामुळे, १९७५-७७ दरम्यान देशांतर्गत आणीबाणी जारी करण्यात आली .

यामुळे सत्ताधारी वर्ग आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांमधील विरोधाभास विकोपाला जाऊन केंद्र आणि राज्यांमध्ये काँग्रेसच्या एकाधिकाराची मक्तेदारी संपुष्टात आली. १९८० च्या दशकामध्ये आर्थिक परिस्थिती खालावली व रिझर्व्ह बँकेतल्या गंगाजळीने तळ गाठला . दुसऱ्या बाजूने सांप्रदायिक जातीआधारित राजकारणाचा वेग वाढला. नव - वसाहतवादाच्या प्रभावाखाली असलेल्या भारताने स्वतःला साम्राज्यशाही शक्तींना गहाण ठेवले व यातून तीन उलथापालथ झाली. एका बाजूला भारतीय शासन अमेरिकन साम्राज्यवादाच्या दहशतवादी युद्धा ' मध्ये सक्रीय भागीदार बनले तर दुसऱ्या बाजूने मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व बाबरी मशीद पाडल्यामुळे सत्ताधारी वर्गाने जनतेचे ध्रुवीकरण सुरु केले. दरम्यान, अमेरिकेच्या साम्राज्यवादाने जागतिक राजकारणात स्वतःची मक्तेदारी वाढवण्याच्या हेतूने पुरस्कृत केलेल्या ' नव - उदारमतवादी ' धोरणाचे भारतीय शासकवर्गात सतत स्वागत केले .

मुक्त अर्थव्यवस्थेचे अरिष्ट

गेल्या दोन दशकात भारतीय शासनसंस्थेने जवळजवळ सर्व कल्याणकारी राज्य धोरणे सोडून दिली आहेत . कामगार वर्गाने मिळवलेले सर्व हक्क सत्तारूढ वर्ग हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे . कंत्राटी कामगार प्रणाली व सर्व क्षेत्रांमध्ये हायर अंड फायर ' पॉलिसी लादत आहे . सार्वजनिक वितरण व्यवस्था ( पीडीएस ) जवळजवळ संपली आहे . बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगसमूहांना उद्योग , सेवा , पायाभूत सुविधांच्या उभारणीत आणि घाऊक व किरकोळ व्यापारात संपूर्ण वर्चस्व देण्यात आले आहे .

शेतीक्षेत्रात मुक्त भांडवलाला कोणत्याही निर्बंधाशिवाय गुंतवणुकीची परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे जमिनीची मालकी कमीतकमी हातात जमा होत आहे. एसईझेड, नवीन औद्योगिक केंद्र , रिअल इस्टेट लॉबी आणि जमीनमाफिया यांच्याद्वारे जमिनीच्या मालकीतून अधिकाधिक जनतेला वगळले जात आहे . शिक्षण, आरोग्यसेवा तसेच इतर सेवा यांचे खासगीकरण आणि व्यावसायिकरण क्रूर वेगाने होत आहे. या पॉलिसीच्या परिणामी, जागतिक साम्राज्यवादी व्यवस्था व भारतीय अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण झपाट्याने पुढे जात आहे. जागतिक वित्तीय संकटाच्या पार्श्र्वभूमीवर जागतिक आणि विशेषतः अमेरिकेच्या साम्राज्यवादाच्या इतिहासात या एकात्मतेचे गंभीर परिणाम आता सर्व क्षेत्रात जाणवत आहेत. मंदी आणि उदासीनता भारतासारख्या देशांना जलदगतीने विळखा घालत आहे आणि यातून शासक वर्ग आणि त्यांचे राजकीय प्रतिनिधी यांचे आतापर्यंतचे मोठे दावे फोल ठरत आहेत.

परराष्ट्र घोरणातील पुरोगामी तत्त्वांना मूठमाती देऊन दलाल, भांडवलदार , नोकरशाही व जमीनदार वर्ग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राज्य अमेरिकेच्या साम्राज्यवादाशी आपले रणनीतिक संबंध वाढवित आहे . मोदींची इस्त्रायल भेट म्हणजे याच नीतीचा परिपाक होता, अर्थव्यवस्थेला पोखरणाऱ्या बड्या उद्योगसमूहांना अभय दिले जाते आणि त्यांनी निर्माण केलेली तूट सरकार जबरदस्तीने जनतेकडून वसूल करत आहे . लाखो कामगारांना नोकऱ्यांतून बाहेर फेकले जात आहे . १६ व्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या राजवटीत या सर्व समस्या वाढल्या आहेत.

स्वातंत्र्यानंतर भारतातील बुर्ज्वा वर्गाने लोकशाही क्रांती करण्यासाठी पुढाकार घेतला नाही . आवश्यक सामाजिक आणि भौतिक पायाभूत सुविधांची उभारणी करण्यास ते असमर्थ ठरले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण इतिहासात सामान्य कष्टकरी आणि आर्थिक दृष्टीने दुर्बल असलेल्या वर्गाला समाविष्ट करून घेणारी वाढ कधीच दिसली नाही, मीडिया आणि बुर्ज्वा अर्थतज्ज्ञांनी मुक्त अर्थव्यवस्थेचे कितीही समर्थन केले आणि परकीय भांडवलाचा प्रवाह सुरू करण्यासाठी अर्थव्यवस्थेला खुले करण्यासाठी कितीही प्रचार केला तरी भारताच्या वाढीचा दर ७.५ टक्क्यांवरून ५.७ टक्क्यांवर घसरला आहे. या तथाकथित विकासामुळे फक्त काही उच्च मध्यमवर्गीय लोकांचाच फायदा होऊ शकतो. भारतातील अब्जाधीशांची संख्या जास्त वाढली आहे आणि गरीबीमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होताहेत आणि गरीब अधिक गरीब होताहेत . काँग्रेस आणि भाजपची आर्थिक धोरणे समानच आहेत, त्यांच्यात कुठलाच फरक नाही,

जागतिक अर्थव्यवस्थेत नफा आणि नफ्याचा दर वाढवण्यासाठी नवे बाजार वृद्धिंगत केले जातात. परंतु दुसऱ्या बाजूने युरोपियन युनियनसारखे व्यापार गट समान क्रमाने तयार केले जातात. तीव्र संकटांच्या वेळी हे गट नक्कीच फुटून जाऊ शकतात. भारतासारख्या गरीब देशातील स्वस्त कामगारांचे शोषण करण्यासाठी जागतिक तसेच इथले भांडवलदार नेहमीच सज्ज असतात . गेल्या काही दशकांत कॉर्पोरेट एकाधिकाराने औद्योगिक उद्योगांचा नफा वाढवण्यासाठी त्यांना चीन, ब्राझील , भारत आणि इतर देशांत आणले परंतु ही पद्धत अयशस्वी ठरली . वाढत्या पत घसरणीने भारतीय अर्थव्यवस्थेवर ताबा मिळवला आहे. बडे उद्योग व्यवसायात नवीन गुंतवणुकीसाठी नाखूष असून गेल्या दोन दशकांच्या तुलनेत उद्योगांसाठी बँकांचे कर्जही मोठ्या प्रमाणात घटले आहे.

'शायनिंग इंडिया ने कामगार वर्ग आणि विशेषत: ग्रामीण शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे. भेदभाव त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. आणि ते गरीबीमध्ये पिचत आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात आत्मघातकी प्रवृत्ती वाढत आहे . १९९७ पासून २,००,००० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सध्याच्या संकटामध्ये, भारतीय शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे . ते कर्जबाजारीपणात अडकले आहेत आणि तेच त्यांच्या आत्महत्यांचे मूळ कारण आहे. शेतीमाल उत्पादनाचा खर्च जास्त आणि किमती कमी झाल्यामुळे शेतीमाल व्यवसायावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. व्यापाराचे उदारीकरण आणि शेतीमधील कॉर्पोरेट सेक्टरचा प्रभाव याच्यामुळे हे घडलेले आहे . १९९८ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने मोन्सॅटो, कारगील आणि इतर मोठ्या महामंडळासाठी बियाण्याचे बाजार उघडले . ही बियाणे, खते आणि कीटकनाशके वापरल्याने उत्पादन खर्च वाढला. या बिया जतन करून त्यांचे पुनरुज्जीवन करता येत नाही, जेणेकरून ज्या कंपन्यांकडे पेटंट असेल त्यांच्याकडून प्रत्येक नवीन हंगामासाठी शेतकऱ्यांना नवीन बियाणे खरेदी करावे लागतात . मोन्सँटो आणि इतर कंपन्यांनी GMO बियाणे विकसित आणि वितरित करून आत्महत्या आधारित अर्थव्यवस्था तयार केली आहे. आत्महत्यांचे प्रमाण दरवर्षी केवळ महाराष्ट्रातच ४००० इतके भयानक आहे. देशाच्या उर्वरित राज्यात समान परिस्थिती आहे. कर्जबाजारीपणाच्या या दुष्टचक्रापासून मुक्त करण्यासाठी शेतकरी संघर्ष करत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या यशस्वी चळवळीनंतर मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आणखी एक चळवळ उभी केली आहे.

मोदी सरकारचे अपयश

मोदी सरकारची ४ वर्षाची राजवट खुद सत्ताधारी अभिजात वर्गाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली. या वर्गाने निवडणूक प्रचारावर कोट्यवधी रुपये खर्च केले होते. कॉर्पोरेट क्षेत्र नाजूक स्थितीत आहे. ढासळत्या अर्थव्यवस्थेसाठी निश्चलनीकरण एक नवीन संजीवनी देईल, असा दावा केला जात होता. परंतु नरेंद्र मोदीनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा तडकाफडकी तुघलकी निर्णय घेतला तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला जाईल, अशी भीती सामान्य माणसापासून अर्थतज्ञापर्यंत सर्वांनीच व्यक्त केली होती . बिगरसरकारी , खासगी , असंघटित तसेच सेवा उद्योगात प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढेल अशीही चिंता व्यक्त केली गेली होती तीही तंतोतंत खरी ठरली . सध्या बँका आणि कॉर्पोरेट सेक्टरचा ताळेबंद अनिश्चित परिस्थितीमध्ये आहे. भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बैंक ( आरबीआय ) ने बँकांना त्यांच्या खराब कर्जाशी गंभीरपणे निपटायची सक्ती केली . बॅंकांचा नफा खालावत आहे व हे एक गंभीर संकट आहे . बॅंकर्स आणि धोरणकर्त्यांनी या संकटातून मुक्त होण्याची त्यांची आशा गमावली आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात नफा कमकुवत होत आहे. २०१६ मध्ये खाण क्षेत्र ०.४ % तर कृषी व बांधकाम क्षेत्राने अनुक्रमे १.८ आणि १.५ % इतकी घसरण केली. प्रचलित आर्थिक प्रणाली अयशस्वी झाली आहे त्यामुळे कामगार वर्ग तिचा लाभ घेऊ शकत नाही. तथाकथित उच्च विकासदराच्या फसव्या दाव्यांनी अखेरीस भारतीय समाजात सामाजिक - आर्थिक विरोधाभास समोर आणले आहेत .

भारतीय मध्यमवर्गाची सामाजिक - सांस्कृतिक मूल्ये पूर्णपणे वासना, लोभ आणि स्वार्थ यांच्यावर केंद्रित केली जात आहेत. उपभोक्तावादाने संपूर्ण समाजाचा ऱ्हास केला आहे. आज भारतीय समाजासाठी निष्ठा, करुणा ही मूल्ये परकी झालेली आहेत. ढासळत्या जीवन मानकांमुळे माध्यमवर्ग हैराण होत आहे. जीवनमानाचा स्तर टिकवण्यासाठी तो कर्जाच्या चक्रात अडकलेला आहे आणि सध्याच्या आर्थिक प्रणालीचा ऐतिहासिक विकास तिच्या मर्यादेपर्यंत पोहोचला आहे. प्रचलित प्रणालीमध्ये कोणत्याही सुधारणांसाठी आणखी जागा उरलेली नाही. बुर्ज्वा अर्थशास्त्रज्ञही सध्याच्या संकटातून बाहेर पडायचा मार्ग दाखवू शकत नाहीत.

देश अशांत परिस्थितीतून जात आहे . एकीकडे नव - उदारमतवादी धोरणात वाढ होत आहे आणि त्यातून उद्भवलेली संकटे कॉर्पोरेट भांडवलदार व शासन जनतेवर ढकलत आहेत. त्यामुळे लोकांच्या रागाचा उद्रेक होत आहे. मुक्त बाजारपेठेतील असमान स्पर्धा आणि असंघटित क्षेत्राची होणारी ससेहोलपट नजरेआड करुन शासक वर्गाने आर्थिक वाढीच्या दराचा दाखला देऊन धोरणे कशी योग्य आहेत, याचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला परंतु आता वाढीचा फुगा फुटून एक दशकात सर्वात कमी विकासदर नोंदला जात आहे. कृषी आणि उत्पादन क्षेत्र कोलमडून पडण्याच्या बेतात आहे तर सेवाक्षेत्रही सुस्तावलेले आहे.

सरकारने जाहीर केलेली मुख्य आर्थिक आकडेवारी पाहिल्यास, गेल्या तीन वर्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्रदर्शन सुमार आहे. २०१४ च्या सुरुवातीस आपल्या निवडणूक भाषणात मोदींनी आश्वासन दिले होते त्याच्या विसंगत चित्र दिसत आहे. जीडीपीची गणना आणि औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची गणना करण्यासाठी रिफायनिंग पद्धती वापरल्यानंतरही मोदी सरकारची ३ वर्षांतील कामगिरी संपुआच्या शेवटच्या दोन वर्षांपक्षा निकृष्ट आहे. पदभार घेतल्यानंतर काही महिन्यातच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विश्वासाने घोषित केले होते की अर्थव्यवस्थेचा विकासदर आधी कमी होता आणि तो वेगाने वाढत आहे. तीन वर्षांनंतर त्यांच्या दाव्यांचा फोलपणा समोर येत आहे . नवीन रोजगार निर्माण करण्याच्या बाबतीत यूपीएच्या शेवटच्या तीन वर्षांत जेवढे रोजगार निर्माण झाले त्याच्या निम्म्याहूनही भाजपच्या ३ वर्षांच्या राजवटीत झाले नाहीत. कामगार मंत्रालयाने दर तिमाही जाहीर केलेल्या आकडेवारीबद्दल मोदी सरकार संतप्त झालेले आहे. तीन वर्षांत एनडीए सरकार बेरोजगारीचा प्रश्न हाताळू शकलेले नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने केलेल्या अभ्यासाप्रमाणे मोर्दीच्या पहिल्या दोन वर्षात दहा लाखाहून अधिक नोकल्या गमावल्या गेल्या. २०१४-१५ मध्ये देशातील एकूण रोजगारांच्या संख्येत ७.७ लाख घसरण झाली आहे आणि २०१५-१६ मध्ये ती ३.८ लाखांनी खाली आली आहे. मुद्रा बँकेच्या कर्जापोटी ७.५ कोटी गरीबांना ३.१५ लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यालाच स्वयंरोजगार समजावे असा हास्यास्पद दावा मोदी सरकारने केला. परंतु या पोर्टफोलिओचा बराच भाग आधीपासून म्हणजे मोदी सत्तेवर येण्याआधीपासून अस्तित्वात होता. आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून मुद्रा बँकेकडे हा पैसा हस्तांतरीत केला गेला होता. याशिवाय, ज्या व्यक्तींनी मुद्रा बैंककडून ५ लाखांपर्यंतचे कर्ज घेतले आहे ते आधीपासूनच स्वयंव्यावसायिक श्रेणीत होते. आणि इतरांना रोजगार देण्याइतके त्यांचे व्यवसाय मोठे नाहीत.

कृषी क्षेत्रात तर सरकारने ' यू टर्न ' केला आहे. आकडेवारीनुसार, एनडीएच्या तीन वर्षात शेतीमध्ये १.७ % वाढ झाली . संपुआच्या सरत्या तीन वर्षांमध्ये कृषी क्षेत्राने ३.५ % वाढीची नोंद केली होती . सर्व शेतकऱ्यांच्या खर्चाच्या ५० % नफा देण्याचे मोदी यांनी आश्वासन दिले होते. आता २०२२ पर्यंत शेतकऱ्यांची कमाई दुप्पट होईल आणि याचा अर्थ २०२२ पर्यंत प्रत्येक वर्षी उत्पन्नामध्ये किमान १० ते १२ टक्के वाढ होईल , असा दावा त्यांनी केला आहे . शेती उत्पन्नात गेल्या तीन वर्षामध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण वाढ न दाखवल्याने हे कठीण आहे , असे खुद नीती आयोगाने मान्य केले आहे . गेल्या सहा महिन्यांत बँक कर्जवाढीचा दर चार टक्क्यांच्या आसपास आहे , जो गेल्या ६० वर्षांत सर्वात कमी आहे . नवउदारमतवादी धोरणानुसार बहुराष्ट्रीय कंपन्यांना मोदी सरकारने दरेक सार्वजनिक क्षेत्रात शिरकाव करण्यासाठी संधी दिली आहे. सरकारी आकडेवारीनुसार २०१६-१७ पर्यंत भारतातील थेट परदेशी गुंतवणूक ( एफडीआय ) ६०.०८ अब्ज डॉलर होती जी २०१५-१६ मधील ५५.६ अब्ज डॉलरच्या रेकॉर्डपेक्षा ५ अब्ज डॉलर अधिक आहे . दुसऱ्या बाजूने देशभक्तीचा डंका पिटून ' मेक इन इंडिया'च्या नावावर जनतेची दिशाभूल केली जाते. काही संघप्रणीत संघटनांनी मोदींच्या आर्थिक धोरणांना वरवरचा विरोध केला असला तरी आतून त्यांची एकी मजबूत आहे. त्यांचे बेगडी देशप्रेम सध्याच्या आर्थिक नीतीमुळे उघडे पडत आहे.

काळ्या अर्थव्यवस्थेची साफसफाई करणे हा एनडीएचा दावा होता. देशाबाहेर बेकायदेशीर काळा पैसा आणण्यासाठी कायदा व २०१६-१७ मध्ये अनेक आयकर घोषणा अशा कठोर उपाययोजनांनंतरही सरकारला अघोषित उत्पन्नावरील कर मिळताना दिसत नाही. निश्चलनीकरणाच्या योजनेचे गंभीर परिणाम भारताच्या अनौपचारिक उद्योगांवर झाले आहेत. अनौपचारिक क्षेत्रात रोजगाराच्या नुकसानाची कबुली द्यायला मोदी सरकार नकार देत आहे. सरकारच्या आकडेवारीप्रमाणे, जीडीपी वाढीचा दर बाजारभावानुसार २०१५-१६ मधील ८.२ टक्क्यांवरून २०१६-१७ मध्ये ७.१ टक्क्यांवर आणि २०१७-१८ मध्ये ६.६ टक्क्यांवर आला आहे. आणि जागतिक आर्थिक वातावरण बरोखरच अत्यंत अनुकूल आहे. अमेरिकेसह सर्वाधिक विकसनशील देशांमध्ये या काळात त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये घट झाली आहे आणि तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. या तुलनेने अनुकूल वातावरणातही भारतीय अर्थव्यवस्था वाढली नाही. भारताच्या निर्यातीत प्रत्यक्षात २०१४ च्या आधीच्या पातळीवरून घसरण झाली आहे. २०१३-१४ मध्ये मालवाहतुकीची भारताची निर्यात ३१४.४ अब्ज डॉलर्स होती. २०१७-१८ मध्ये ती अधिकृतरित्या ३०२.८ डॉलर अब्ज इतकी जाहीर केली गेली. दरम्यानच्या काळात आयात ४५०.२ अब्ज डॉलरनी वाढून ४५ ९ .७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे, ज्याचा अर्थ वस्तूंच्या व्यापारात तूट १३५.८ डॉलर अब्जांवरुन १५६.८ अब्ज डॉलर झाली आहे.

नव्या पर्यायाची अनिवार्यता

देशातील जवळपास अर्ध्या लोकसंख्या दारिद्रयरेषेखाली आहे, ज्यातील २५ % संपूर्णपणे निराधार आहे. ६०-७० % संपत्ती १० % पेक्षा कमी लोकांच्या हातात एकवटलेली आहे. महागाई वाढीमुळे मोठ्या प्रमाणावर जनतेचा त्रास वाढला आहे. आदिवासी, दलित, महिला आणि इतर सर्व अत्याचारग्रस्त वर्ग भरडले जात आहेत. याबरोबरच, साम्राज्यवादी निर्धारित ' विकासविषयक धोरणांनी पर्यावरणाचा विनाश केला आहे ज्यामुळे जागतिक तापमानवाढीवर परिणाम होत आहे. नव वसाहतवादी लूट, दडपशाही आणि अंतर्गत विरोधाभास तीव्रतेने वाढत आहे. विद्यमान लोकविरोधी, प्रतिक्रियावादी राज्य नष्ट करून खरीखुरी लोकशाही प्रस्थापित करणे अनिवार्य झाले आहे.

भारतात कामगार व शेतमजूर वर्ग मोठया संख्येने असून त्यांना संघटित केल्याशिवाय व त्यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही क्रांती घडविल्याशिवाय समाजवादी क्रांतीच्या दिशेने प्रगती करणे अशक्य आहे. क्रांतीपूर्व चीन, रशिया किंवा जेथे क्रांती झाली आहे, अशा इतर कोणत्याही देशापेक्षा भारतातील कामगार वर्गाची संख्या अनेक पटींनी जास्त आहे. म्हणूनच कामगार वर्गाच्या चळवळीने येथे अधिकाधिक महत्व प्राप्त केले आहे. उदारीकरण - खाजगीकरण यांच्या कात्रीत सापडलेल्या असंघटीत क्षेत्रात कंत्राटी व इतर कामगारांच्या लोकसंख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. शेती व्यवसायाला अवकळा आल्याने ग्रामीण भागातील जनता मोठ्या प्रमाणात शह्यांच्या दिशेने नोकरीसाठी धाव घेत आहे. एक नवीन आधुनिक औद्योगिक सर्वहारा वर्ग उदयाला येत आहे. उद्योगबंदी, आधुनिकीकरण, आउटसोर्सिंग, व्हीआरएस इत्यादी पोरणांमुळे संघटित क्षेत्रात कामगार आणि कर्मचाऱ्यांची संख्या वेगाने कमी होत आहे. कामाचे नियमीत तास वाढवून, वेतन कमी करणे , सेवेची सुरक्षा व सामाजिक सुरक्षा यांचा अभाव यामुळे संघटित क्षेत्रातील कामगार सतत हवालदिल झालेले आहेत . कामगारवर्गावर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. स्थानिक, राज्यव्यापी आणि देशव्यापी संघर्षावर लक्ष केंद्रित केल्यास कामगार वर्गाच्या उन्नतीसाठी अनुकूल वातावरण आहे.

काँग्रेस असो किंवा भाजप, दोन्ही पक्ष वर्गविरोधाच्या भानगडीत कधीच पडले नाहीत . काँग्रेसने आपल्या वर्गसमन्वयाला धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा चढवला तर संघप्रणित भाजपने सामाजिक समरसतेचा. १९९० नंतरच्या मुमत नवउदारमतवादी अर्थव्यवस्थेला अनुसरून सार्वजनिक उद्योग, खाणी अल्पदरात खासगी उद्योगांना विकणे , सरकारी नियम पायदळी तुडवत उद्योग चालवणे , कामगार हक्क न मानणे , शेतकऱ्यांकडून जमिनी बळकावणे आणि या सगळ्याला विकास म्हणून आपल्या मुठीत असलेल्या प्रसारमाध्यमांतून मिरवणे हेच या नव उदारमतवादी अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे .

भाजपचे धर्माधिष्ठित फॅसिस्ट सरकार सत्ताधारी वर्गाच्या मनाची प्रतिक्रियावादी प्रतिकृती आहे. भारतात क्रांतिकारक पर्यायही पुढे येताना दिसत नाही. लोकशाही व धर्मनिरपेक्षतेच्या घोषवाक्याचे कामगार वर्गामध्ये कोणतेही आकर्षण नाही. डावी आघाडी आणि कम्युनिस्ट पक्ष यांचे नेतृत्व थिटे पडत आहे. विद्यार्थी पारंपरिक बुर्ज्वा राजकारणात रस घेत नाहीत परंतु जेएनपूतील नेत्रदीपक संघर्ष म्हणजे वंचित असलेल्या समाजातील तरुणाईचा उद्रेक आहे. काश्मीर अजूनही शासक वर्गाच्या विरोधात बंड करत आहे व काश्मिरी जनता भारतीय उद्योग स्वीकारण्यास तयार नाही. सत्तापारी वर्ग जनतेच्या अफाट सामर्थ्याला घाबरत आहे. म्हणूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भाजपचे सरकार गोवंश विक्री बंदीसारखे वाद निर्माण करून जनतेची दिशाभूल करत आहे. अति उजव्या विचारसरणीच्या एका विशिष्ट गटाला संतुष्ट करण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामागे गुरांच्या कत्तलीचा प्रामुख्याने व्यवसाय करणाऱ्या मुसलमान समुदायाला आर्थिकदृष्ट्या अपंग करण्याचे एक षडयंत्र आहे. पण यातून गोपालन करणारा, बहुसंख्य हिंदू असलेला शेतकरी वर्ग जास्त भरडला जाणार आहे.

संसदेतील संख्याबळाच्या आधाराने लोकशाही व नागरी हक्कांची पायमल्ली करून संविधान बदलण्याचे प्रयत्न चालू आहेत. हिंदू राष्ट्रसारख्या पोकळ सांस्कृतिक कल्पना लोकांसमोर ठेवून पुन्हा एकदा उच्चवर्णीय वर्ग देशाला मध्ययुगीन विचारांकडे घेऊन जात आहे. धर्माच्या नावाने हिंसाचार, हत्या, खंडणी यासारख्या प्रकारांना ऊत आला आहे. गोरक्षकांनी चालविलेला भगवा आतंकवाद, सनातनी प्रवृत्तींनी संविधानाला दिलेले आव्हान या बाबी कष्टकरी समाजाला आणि बहुजन समाजाला दुभंगून टाकत त्यामुळे पुरोगामी, लोकशाही आणि समाजवादाची मूल्ये पुरस्कृत करणाऱ्या संघटना व व्यक्ती यांना पद्धतशी टार्गेट केले जात आहे . तडीपारीचे आणि जातीय हिंसा व हत्या घडवल्याचे गंभीर आरोप असलेली व्यक्ती आज सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षस्थानी आहे. धार्मिक गुन्हेगारी आणि दंगलीतील आरोपी योगी आदित्यनाथ हे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. अर्थव्यवस्थेला अपयश आले तर मोदी आपली लोकप्रियता सांभाळण्यासाठी सांप्रदायिक तणाव अजून वाढविण्याचा प्रयत्ल करतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सरकार चालवणानऱ्या नेत्यांवर अंकुश असलेल्या बड्या देशी आणि विदेशी कॉर्पोरेट भांडवलदार यांच्यामधील विरोधाभास दिवसेंदिवस तीव्र होत आहे. विद्यमान सरकारच्या खास मर्जीने उद्योग जगतातील अंबानी आणि अदानी या दोघांना खास सवलती आणि सरकारी कंत्राटे दिली जात असल्याने इतर उद्योगसमूह अस्वस्थ आहेत. रामदेव, राम रहीम, श्री श्री रवी शंकर अशा आध्यात्माचे व्यापारीकरण करणाऱ्या अनेक व्यक्तींना मोदी सरकारले अब्जाधीश बनण्यासाठी सर्व नियम शिथिल करून देशातील जमीन आणि संसाधने त्यांच्या दिमतीस उपलव्य केली आहेत.

आपल्या चुकांवर पांघरुण घालण्यासाठी समाजात तेढ निर्माण करून जनतेचे लक्ष विचलित करणाऱ्या सनातनी आणि मूलतत्ववादी संघटनांना दडपशाही आणि गुन्हेगारीसाठी मुक्त परवाना दिलेला आहे. भाजप हा एक केवळ मुखवटा आहे, ज्याच्यात आज मोदी लाटेमुळे वाहून आलेले इतर पक्षांतील अनेक नेते बुजगावण्यासारखे सत्ता भोगत आहेत. खरी सूत्र संघाच्या हातात आहेत. भारताची राज्यघटना बदलून हिंदूराष्ट्राचा पुरस्कार करणारी राज्यव्यवस्था भारतात आणण्याचे त्यांचे स्वप्न फार जुने आहे. मोदींच्या रुपाने त्यांना एक नवीन नायक मिळालेला आहे. परंतु जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठातील निवडणुकांचे निकाल पाहता तसेच पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर मालेल्या निदर्शनात तरुणाईचा लक्षणीय सहभाग पाहता नवीन पिढी मोदी आणि भाजपच्या फसव्या राजकारणाला ओळखू लागल्याची चिन्हे दिसत आहेत. वर्ग समन्वयवादाच्या भूमिकेतून कोणताही पर्याय सुचवणे शक्य नाही. जनविरोधी नव उदार घोरणे समजून घेऊन आणि त्यांची समीक्षा करुन ठोस भूमिका घेण्याची आणि त्यातून नवीन पर्याय महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवायची सुसंधी आपल्यासमोर आहे.

स्थानिक राजकीय - आर्थिक परिस्थिती

महाराष्ट्रातील राजकीय सत्तांतरानंतर साडेतीन वर्षांचा कालावधी लोटला आहे . एवढ्या कालावधीत पूर्वीचे सत्तेतले विरोधात आणि विरोधातले सत्तेत बऱ्यापैकी रुळू लागल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप - शिवसेनेच्या सरकारकडून एखाद - दुसरा अपवाद वगळून दर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय केले जात आहेत, घोरणे ठरविली जात आहेत. घोषणा होत आहेत. दुसऱ्या बाजूला सरकारचा प्रत्येक निर्णय जनसामान्यांच्या कसा विरोधात आहे. शेतकऱ्यांसाठी कसा घातक आहे. हे पूर्वी केवळ पत्रकार परिषदातून सांगितले जायचे. तेथे आता विरोधी पक्ष, खास करून शेकापक्षासह डाव्या व लोकशाहीवादी पक्षांनी रस्त्यावरची जनआंदोलने संघटित करणे सुरू केल्याचेही स्पष्ट आहे.

शेती प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष

शेतकरी कर्जमुक्त करू असे सांगायचे. मात्र, प्रत्यक्षात या सरकारने शेतकनऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्षच केले आहे. हा देश शेतकऱ्यांचा आहे. ही ओळया नष्ट करण्याचे प्रयत्न सरकार करीत आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतःच एक इव्हेंट कंपनी आहेत . शेतकरी कर्जमुक्ती करण्याचे ते प्रयत्न करीत नाहीत. उद्योजकांचे कर्ज मात्र माफ केले जाते. नोटाबंदीचा निर्णय घेतला तो फसला. काळा पैसा आलाच नाही. काळा पैसा बाहेर काढू , असे वारंवार सांगत त्यांनी उद्योगपतींना सावध केले . उद्योगपती सावध झाले. नोटाबंदीमुळे पतसंस्था , जिल्हा बॅंका संकटात आणल्या . शेतकऱ्यांची पिके वाया गेली. पिके सडली . शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही . डिजिटल इंडियाच्या घोषणा करीत त्या माध्यमातून लुटण्याचा प्रयत्न सुरु आहे . सरकारच्या विरोधात बोलणान्यांना देशद्रोही ठरवले जाते.

काळ्या पैशावर नोटाबंदीचा या सरकारचा उपचार हा खरे चोर मोकाट आणि गरीबांवर बेरोजगारीचा घाव घालणारा ठरला आहे. नोटाबंदीने नेमके काय साधले? आता एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, नोटाबंदीमागे सरकारचा उद्देश बिलकुल साफ नव्हता. काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद आणि बनावट नोटाना लक्ष्य करण्याचे कथित उदिष्ट केवळ नोटाबंदीतून साधले जाऊ शकत नाही, हे हा अघोरी निर्णय मोदींनी जाहीर केला, त्या दिवसापासून देश - विदेशातील अनेक अर्थतज्ज्ञांनी सांगितले . प्रत्यक्षात घडलेही तसे. परंतु या दोन महिन्यात अर्थव्यवस्थेला. छोटे - मोठे व्यापार व लघुउद्योगाना, असंघटित व रोजंदारी कामगार, शेतकरी, शेतमजूर, सहकार क्षेत्राला देशोधडीला लावले. मोठे मासे काही गळाला लागले नाहीत. आणि देशाचा महत्वाच्या आर्थिक कण्याचे कधीही भवन येणारे नुकसान मात्र केले गेले.

हमीभाव, आयात - निर्यात धोरणामध्ये शेतकरीविरोधी सूर आळवणारे सरकार निश्चलनीकरणादरम्यान शेतकऱ्यांचा विचार करणे हे केवळ अशक्य होते . त्यामुळे दुष्काळाची झळ सोसलेल्या शेतकऱ्यांना सुकाळातही निश्चलनीकरणाचे चटके बसले. खरीपातल्या शेतमालाची बाजारात आवक सुरु झाल्याबरोबर सरकारने निश्चलनीकरण केल्यामुळे सोयाबीन , तूर , मूग , डाळिंब , संत्रा , कांदा , बटाटा , भाजीपाला आदी प्रमुख शेतमालाचे दर गडगडले ; पण त्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकन्यांनी नांगरट , बियाणे , खते , मजुरी यासारख्या गोष्टीवर यापूर्वीच खर्च केला होता . असे अतिशय निष्ठुरपणे एकापाठोपाठ एक निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला कात्री लावली. हे होत असताना शेतकऱ्यांनाही आपल्या ताटात वाढलेले नक्की कोण खाते आहे याची कल्पना येत नव्हती. मात्र जेव्हा ताटातले संपले आणि पोटही भरले नाही तेव्हा शेतकरी आक्रमक होऊन कर्जमाफीसाठी रस्त्यावर आले. तेव्हा काही राज्य सरकारांना नाइलाजास्तव कर्जमाफी करणे भाग पडले.

सरकारची चुकीची धोरणे हे शेतीधंदा दिवाळखोरीत जाण्याचे प्रमुख कारण आहे. त्यातच सध्याच्या केंद्र व राज्यातील सरकारचे शेतीबद्दलचे अगाध अज्ञान आणि उदासीनतेची भर पडली आहे. त्याचाच अपरिहार्य परिणाम म्हणजे ठराविक कालावधीनंतर कर्जमाफीची मागणी जोर धरते . सरकार हस्तक्षेप करून शेतीमालाचे भाव सातत्याने पाडत आले आहे . डाळी व कडधान्याची खुली आयात , गव्हाचे आयात शुल्क शून्यावर आणणे , शेतीमालावर वेळोवेळी निर्यातबंदी लादणे , अनुदानांनी स्वस्त झालेला शेतीमाल आयात करणे , स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींना नकार देणे , नोटाबंदी आदी निर्णयाने सरकारनेच शेतकऱ्यांना गलीतगात्र करून सोडले आहे . परिणामी , दुष्काळासारख्या आपत्तीचा सामना करण्याचे त्राण शेतकऱ्यांमध्ये उरलेले नाही . शेतक-यांच्या कर्जबाजारीपणाला आणि आत्महत्यांना म्हणूनच सरकारच जबाबदार आहे.

देशभरात २०१५ मध्ये १२ हजार ६०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांचे अच्छे दिनवाले सरकार सत्तेवर असताना मागील दोन अडीच वर्षांमध्ये शेतकरी आत्महत्यांमध्ये ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विकासाचा टेंभा मिरविणाऱ्या महाराष्ट्रात, इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. राज्यात २०१६ मध्ये तीन हजार ५२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत . राज्यात व देशात कर्जमाफीला विलंब म्हणजे आणखी आत्महत्या, अशी ही विदारक परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज फेडण्याची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागेल, दीर्घकालीन उपायांच्या सबबीखाली त्यांना ती आता पुढे ढकलता येणार नाही.

शेतकरी असो वा अर्थव्यवस्थेतील अन्य कुठलाही घटक, त्याला सरकारी अनुदान - कर्जमाफीच्या कुबड्या आधार देतात, मात्र आत्मविश्वास देऊ शकत नाहीत, याची शेतकरी कामगार पक्षालाही जाणीव आहे . खुल्या बाजारात व्यवहार करून कमावलेला नफाच शेतकऱ्याला आत्मविश्वास देतो, आपला व्यवसाय वाढवण्याची गुंतवणूक करण्याची प्रेरणा देतो. शेतकऱ्यांना सिंचन , यांत्रिकीकरण अथवा अन्य गोष्टींवर गुंतवणूक करण्याची उमेद त्यातून मिळते . यातूनच अर्थव्यवस्था मजबूत होत जाते. मात्र सपध्याचे शेतीविषयक धोरण हे शेतकऱ्यांचे खच्चीकरण करणारे आहे. या धरसोडीच्या धोरणामुळे शेतक-यांनी आत्मविश्वास गमावला आहे. दुसऱ्या बाजूला सामाजिक पातळीवर बदलांची वावटळ जोराने घोंघावत असल्याने पूर्वी आधाराला असणाऱ्या गावगाड्याच्या पद्धतीच्या चिंध्या झाल्या आहेत. यातूनच निर्माण झालेल्या कोंडीतून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. शेती व्यवसायात तगून राहून बाजारपेठेतून नफा मिळवू हा आत्मविश्वासच लोपला आहे, त्यासाठी कर्जमाफीच्या मागणीवरील सुकाणू समितीच्या मोहिमेत शेकापची अग्रणी भूमिका राहिली. तथापि सरसकट कर्डमाफीची मागणी असताना, फडणवीस सरकारने आकड्यांचा खेळ सुरू केला. मूळात खोटी आकडेवारी आणि कर्जमाफीची प्रक्रिया किचकट व क्लिष्ट करण्याने ऑक्टोबर २०१७ सरल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हाती काही लागेल अशी शक्यता दिसून येत नाही.

जल-विकासाचे वाटोळे

सिंचन घोटाळा, दुष्काळ, विविध स्तरांवरील जलसंघर्षाच्या संख्येत व तीव्रतेत होत असलेली वाढ आणि शेतीतील अरिष्टात दडलेला पाणी - प्रश्न या स्फोटक पार्श्वभूमीवर जलक्षेत्रात सुधारणा व पुनर्रचना करण्याची नितांत गरज आहे . मुख्यमंत्री फडणवीस हे राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी निरनिराळ्या घोषणा करीत असतात. सौर कृषी योजना असो वा शेततळ्यांची घोषणा तर झाल्या, पण पुढे त्याचा म्हणावा तसा पाठपुरावा झालेला नसल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना कधी मिळणार, याविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे .

' मागेल त्याला शेततळे ' नावाची योजना जाहीर करुन एक लाख अकरा हजार एकशे अकरा शेततळी पूर्ण करण्याचा संकल्प सोडला . प्रत्यक्षात जेमतेम ५५० शेततळी पूर्ण झाली आहेत . किती मोठी ही तफावत? आंध्र प्रदेशने ५४,८२९ आणि झारखंडने ४७,३७७ शेततळी पूर्ण केली म्हटल्यावर महाराष्ट्राची स्थिती अतिशय निराशाजनक वाटते.वास्तविक पाहता शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील वीज वितरण व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे . वीज कायदा २००३ अन्वये प्रत्येक वीज ग्राहकाला मोजून वीज दिली पाहिजे व विजेचे बिल त्याप्रमाणेच आकारले पाहिजे . तसेच प्रत्येक ग्राहकाला अखंडित वीजपुरवठा केला पाहिजे . राज्यातील एकूण ४० लाख पंपांपैकी सोळा लाख पंपांना मीटर बसविलेले नाहीत व ज्यांना मीटर आहेत त्यांना मीटरप्रमाणे बिल दिले जात नाही . बिले वेळेवर दिली जात नाहीत . पुरेशी वीज उपलब्ध असताना कायमस्वरूपी खंडित वीजपुरवठा केला जातो . या सर्वांचा परिणाम म्हणून शेतकरी बिले भरत नाहीत . वास्तविक पाहता शेतकरी नियमित पैसे भरत होते . असे म्हणण्याचे कारण म्हणजे , शेतक - यांनी केलेली मीटर हटाव मोहीम ' . आलेले वीज बिल परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी ही मोहीम हाती घेतली होती .

शेतीपंपांना चोवीस तास वीजपुरवठा का नाही , असा प्रश्न विचारला असता असे उत्तर मिळते की , जर चोवीस तास वीजपुरवठा केला तर शेतकरी जास्त पाणी उपसतील व पाण्याची पातळी खोल जाईल . हे अतिशय चुकीचे आहे . कारण असा विचार दुसऱ्या कोणत्याही ग्राहकांच्या बाबतीत केला जात नाही . फडणवीस सरकारच्या लाडक्या जलयुक्त शिवार योजनेतही हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचे आरोप आहेत . मूळात या सरकारच्या अनेक योजना या कंत्राटदारांच्या तुंबड्या भरण्यासाठीच असतात , असे अनेकप्रसंगी दिसले आहे . त्यामुळे शिवारे जलयुक्त होण्याऐवजी , अधिकाधिक मलिदा कसा ओरबाडता येईल , असेच योजनेच्या अंमलबजावणीत सर्वत्र व सर्व स्तरावर आढळून आले आहे . म्हणूनच मर्जीतील कंत्राटदारांवर किती उधळले , किती बंधारे बांधले गेले . त्यातून जलसाठा किती झाला , याचा तपशील पारदर्शकतेचा आव आणणाऱ्या फडणवीसांना अद्याप देता आलेला नाही .

रोजगारावर गंडांतर

' आयटी ' क्षेत्रातील नोकऱ्यांना लागलेली उतरंड सुरूच राहण्याची भाकिते आणि महाराष्ट्राचा आयटीवरच राहिलेला भर यांचा ताळमेळ लावणार कसा असा प्रश्न आहे . कॉग्निझंट , इन्फोसिस , विप्रो ही आयटी क्षेत्रातील बडी नावे राज्यात कार्यरत आहेत . या कंपन्यांमधील हजारो कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली शिवाय हजारोंच्या नोकऱ्यांवर आज टांगती तलवार आहे . राज्याच्या २०१६-१७ सालच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार , राज्यात ४८७ आयटी पार्कना परवानगी दिली गेली आहे . पुण्यात सर्वाधिक १७२ , नवी मुंबईसह बृहन्मुंबई १६२ , ठाणे १४० , नागपूर ५ , नाशिक ५ , औरंगाबाद ३ आणि वर्षा १ अशा या आयटी उद्योग केंद्रांतून १३.६६ लाख नोक-या निर्माण होणे अपेक्षित आहे . सध्या याच केंद्रात देशी - बहुराष्ट्रीय अशा सुमारे तीन हजार सॉफ्टवेअर कंपन्यांमधून साडेसहा - सात लाख जणांना थेट रोजगार उपलब्ध होत आहे . गेली काही वर्षे दरसाल लाख - पाऊण लाख रोजगारनिर्मिती एकट्या आयटी व आयटीपूरक सेवा क्षेत्रातून झाली असल्याचे आकडेवारी तपासली असता ध्यानात येते . इतरत्र नोकऱ्यांचे स्रोत आटले असताना आयटीतील आहे , तो रोजगारही गमावला जात असल्याचे चित्र निश्चितच त्रासदायक आहे.

उद्योगप्रधान राज्याच्या अर्थव्यवस्थेत भरीव योगदान देणाऱ्या या क्षेत्रात अलीकडे होत असलेला रोजगाराचा संकोच अस्वस्थ करणारा आहे . २०१६ साल सरत असताना अभियांत्रिकी क्षेत्रातील महाकाय लार्सन अॅन्ड टुबो ' समूहाने १४,००० कर्मचाऱ्यांना कमी केले . एकूण कर्मचारी संख्येच्या ११.२ टक्के मनुष्यबळ घटविणारी ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी कर्मचारी कपात होती . मंदावलेला व्यवसाय , वाढते डिजिटायझेशन व स्वयंचलितीकरण , पर्यायाने अनावश्यक ठरलेले मनुष्यबळ ताळ्यावर आणणाऱ्या घोरणात्मक निर्णयाचे अनुसरण लार्सन अॅन्ड टुब्रोसह अनेक बडे उद्योग करीत आहेत . महिंद्र अँड महिंद्र , टाटा मोटर्सनेही १,५०० जण कमी केले . येस बँकेने २,५०० लोकांना कमी केले , एचडीएफसी बँकेचे ११,००० नोकऱ्यांना कात्री लावण्याचे नियोजन आहे . म्हणजे आज आयटी क्षेत्रातील रोजगार जात्यात आहे म्हटले , तर सुपात असणाऱ्या संकटग्रस्त नोकऱ्यांचे प्रमाण अधिक भयावह आहे .

सततच्या दुष्काळ , नापिकी व घोरण दिवाळखोरीने आधीच शेती अर्थव्यवस्थेचा पुरता बोजवारा वाजला आहे . शेतीबाबतचा हिरमोड आणि सुस्तावलेली ग्रामीण अर्थव्यवस्था रोजगार संधी निर्माण करेनाशी झाली आहे . निश्चलनीकरणासारख्या सरकारनिर्मित आपत्तीने त्यात भर टाकली . रोजगाराचा मुख्य स्रोत असलेल्या लघु उद्योगाचे जमेल तितके कंबरडे या वांझोट्या निर्णयाने मोडून काढले . नोटाबंदीच्या तडाख्याच्या परिणामी भिवंडी , मालेगावातील वसोद्योगातील निम्मे रोजंदारी कामगार घरी बसविले गेले . सोलापूर , इचलकरंजी , धारावी , उल्हासनगर व तत्सम केंद्रांमध्ये जवळपास अशीच दारुण स्थिती आहे . आजही येथील अनेक उद्योग या तडाख्यातून पुरते सावरले आहेत , असे अद्याप तरी दिसून येत नाही . काम मागणारे हात ज्या गतीने वाढत आहेत , त्या गतीने रोजगाराची व्याप्ती वाढत नाही आणि ही तफावत अवांछनीय सामाजिक समस्येच्या स्फोटासाठी दारूगोळा भरण्याचे काम करीत आहे . आरक्षणासाठी झालेली ताजी लाख - लाखाची आंदोलने शांततापूर्ण राहिली असली , तरी सामाजिक सलोख्याला ग्रहण लागल्याची द्योतक आहेत . कामाच्या शोधात भटकती करणारे तांडे ' गावागावातून शहरांना धडका देऊ लागलेत , हे चित्र सामाजिक स्वास्थ्यासाठी अपकारकच आहे . यातील एखाद्या तांड्याला जरी त्याच्या संघटित संहारक शक्तीचा प्रयोग करून पाहावा वाटणे आणि त्यातून स्फोटक परिस्थिती निर्माण होणे केव्हाही शक्य आहे. संभाव्य धोके ओळखले नाहीत, तर अराजकाला आमंत्रण निश्चितच !

पण सरकारचे ध्यान या समस्येकडे नाहीच . त्याऐवजी विध्वंसकारी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, नाणार प्रकल्प , बुलेट ट्रेम, समृद्धी महामार्ग , या सारख्या भूलथापांचे गुलाबी चित्र रंगविले जात आहे . तसे भाजप सरकार लोणकढी थापा मारण्यात पटाईतच . परंतु बुलेट ट्रेन आल्याने रोजगार निर्मिती होईल , यासारखी दुसरी मोठी थाप नसेल , जैतापूर प्रकल्प असो , वा बुलेट ट्रेन किंवा समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प म्हणजे राज्याच्या उरावर बसणारे अत्यंत महागडे प्रकल्प . शिवाय या संबंधाने परदेशी म्हणजे फ्रेंच व जपानी प्रवर्तकांशी झालेल्या करारांमध्ये भूमीपुत्रांना नोकऱ्या मिळणार नाहीत , हे स्पष्टच आहे . म्हणजे खिळ्यापासून ते अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक अशी प्रकल्पांसाठी बहुतांश सामग्री विदेशातून येणार इतकेच काय प्रकल्पाच्या भांडवली खर्चासाठी कर्जही विदेशी बँकांच पुरविणार . शिवाय रोजगारही विदेशी अभियंते आणि कारागीरांनाच मिळणार . म्हणजे हे महागडे प्रकल्प उरावर ओढवून घेऊन , विदेशस्थांना आपली खुली लूट करून उखळ पांढरे करून घेण्याचे उघड कारस्थानच आहे .

भ्रष्ट शासनाची फडणवीशी कला...

आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार हा सध्या राजकीय व्यवस्थेत तग परून राहण्याची एक अपरिहार्यता बनली असावी , इतकी त्याची सत्ताधाऱ्यांमध्ये लागण झाली आहे . उठसूठ स्वच्छ व पारदर्शक शासनाची घशाला कोरड पडेपर्यंत ओरड करणारे सध्याचे फडणवीस सरकार त्याला अपवाद नाही . किंबहुना गेल्या तीन वर्षात या सरकारमधील अनेक मंत्र्यांची ज्या संख्येने भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे आली आहेत , ते राज्यातील आजवरच्या कोणत्याही सत्ताधाऱ्यांबाबत घडलेले नाही . सप्रमाण पटलावर आणली गेलेली ही प्रकरणे ज्या निर्लज्जपणे दडपली जात आहेत , ते पाहता भ्रष्ट शासन कलेचा वारसा या सरकारने मागील सरकारकडून अल्पावधीत अवगत केला आणि त्यात ते पारंगतही झाल्याचे दिसून येते . मागील सरकारपासून चालत आलेल्या घोटाळ्यांबाबत बोंब करूनच भाजप - सेना सरकारने राज्यात सत्ता मिळविली . त्या जुन्या भ्रष्टाचार प्रकरणांचा छडा लावणे सोडाच उलट नव्या सरकारातील अनेक मुखंडांनी मागील पानावरून पुढे याप्रमाणे जनतेच्या पैशाच्या लुटमारीसाठी चढाओढ सुरू केल्याचे दिसत आहे. या सरकारातील अनेक मंत्र्या - संत्र्यांची ज्या संख्येने भ्रष्टाचार , आर्थिक गैरव्यवहार , पदाच्या आर्थिक लाभासाठी गैरवापराची प्रकरणे पुढे आली आहेत , तसे यापूर्वी राज्यातील सत्ताधाऱ्यांबाबत क्वचित घडले असावे .

पंकजा मुंडे , एकनाथ खडसे , राजकुमार बडोले, विष्णू सावरा , प्रकाश मेहता , सुभाष देसाई असे अनेक मंत्री अडकले आहेत . एकनाथ खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला . १९९५ मध्ये शिवसेना - भाजप युती सरकार आल्यावर मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले , चौकशा , आयोग स्थापन झाले , राजीनामे झाले . पण न्यायाच्या दृष्टीने काहीच घडत नसल्याचे दिसले आणि कालांतराने सत्ता गेली . आताही विनोद तावडे , गिरीश बापट , संभाजी निलंगेकर पाटील , बबन लोणीकर आदी मंत्र्यांच्या विरोधात आरोप झाले . विरोधकांनी आवाज उठविला किंवा चौकशीची मागणी केली गेली . पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीची आवश्यकता नाही , असे स्पष्ट करीत सर्व मंत्र्यांना अभय दिले .

भ्रष्टाचाराविरोधात लढण्याच्या वल्गना करीत प्रदीर्घ काळानंतर राज्यात सत्तेवर आल्यावर ज्या कणखरपणे , प्रामाणिकपणे सरकार चालविणे आवश्यक आहे . मंत्री व प्रशासनावर मुख्यमंत्री फडणवीस यांची तशी पकड नाही . वर्षभरातच अनेक मंत्र्यांवर आरोप झाले व खडसे यांचा राजीनामा घ्यावा लागला . गेल्या काही वर्षात भूखंड , जमिनींचे अनेक गैरव्यवहार मुंबईसह राज्यात झाले व त्यात मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री अडकले . राज्यातील विरोधी पक्ष या नात्याने ही प्रकरणे पुढेही लावून घरली तर याचे आपल्याला राजकीय बळ मिळेल .

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील या घोटाळ्यासंदर्भात कुणावरही कारवाई झाली नाही म्हणून तेव्हाचे विरोधी पक्षनेते व आताचे सत्ताधारी खवळले आणि त्यांनी या मुद्यावरून सरकारला धारेवर धरले . सत्ता मिळाली तर विशेष पथक नेमून हा घोटाळा खणून काढू , ही घोषणा तेव्हा करणारे आज मुख्यमंत्री आहेत ; त्यांनी शब्द पाळला व १५ जानेवारी २०१६ ला वरिष्ठ पोलीस अधिकारी व्यंकटेशम यांच्या नेतृत्वात चौकशी पथक स्थापन केले . गरीब विद्यार्थ्यांच्या नावावर स्वत: चे उखळ पांढरे करून घेणारे राज्यभरातील संस्थाचालक आता गजाआड जातील , असा विश्वास अनेकांना वाटला , पण प्रत्यक्षात घडले उलटेच ! या पथकाला चौकशीसाठी येणार खर्चाची तरतूदच सरकारने केली नाही . सामाजिक न्याय व आदिवासी विकास खात्याने यासाठी लागणारे मनुष्यबळ काला कधीच उपलब्ध करून दिले नाही . शिक्षण संस्था व सरकारी कार्यालयांचे लेखापरीक्षण करण्याची गरज असताना , चौकशी पथकाला लेखापरीक्षकच दिले गेले नाहीत . राज्यभरातील लुटारू शिक्षणसंस्थांची पोलीस चौकशी करणे हा पथकाचा दुसरा पर्याय संस्थाचालकांनी उच्च न्यायालयातून स्थगनादेश घेत पहिल्या दहा दिवसांत हाणून पाडला . हा स्थगनादेश तातडीने सरकारी वकिलांकरवी हटवावा , ही पथकाची विनंती सरकारने गांभीर्याने घेतली नाही .

सत्ताधारी व बिल्डरांचे साटेलोटे

'तत्त्वांशी कधीही तडजोड नाही , वेळ आली तर सत्तेवर लाथ मारीन ' , असे तडाखेबंद वाक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात वारंवार ऐकविले . गेल्या तीन वर्षांत त्यांची अशी शाब्दिक फटकेबाजी नेहमीचीच . मात्र उक्तीप्रमाणे कृती केल्याची उदाहरणे फार कमी . भाजपने विरोधी पक्षात असताना राजकारणी व बिल्डरांचे साटेलोटे असल्याचे आरोप काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसवर केले . त्या पार्श्वभूमीवर राजकीय शुद्धीचे उदक सोडलेल्या भाजपकडून वादग्रस्त गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता , उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी झाली . मात्र ' आरोप सिद्ध झाल्यावर राजीनाम्याचे पाहू ' ही काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचीच भूमिका घेऊन आपणही वेगळे नाही , हेच मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले . माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची चौकशी झोटिंग आयोगाकडून झाली . त्यास वर्ष लागले व महिना उलटून गेला तरी जनहित लक्षात घेऊन केलेल्या चौकशीचा अहवाल पारदर्शी कारभाराच्या वल्गना करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी उघड केलेला नाही. आपण कर्तव्य बुद्धीने एखाद्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि तो नेमका कुणा वरिष्ठांचा नातेवाईक असावा, अशी भीती सध्या पोलीस दलात पसरली आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील सगळ्या शहरांमध्ये भर रस्त्यावर पोलिसाला बदडून काढण्याच्या घटनांची मालिकाच दिसून येते . तरीही राज्याचे गृह खाते आपल्याच पोलीस कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या या हल्ल्यांकडे मात्र मख्यपणे पाहत बसले आहे. सत्तेचा, पदाचा आणि अधिकाराचा असा माज सध्या राज्यातील सगळ्या शहरांमध्ये थेट रस्त्यावर दिसू लागता आहे. पोलिसांवरच हात उगारण्याचे प्रकार वाढत असताना राज्याचे गृह खाते उपाययोजना करीत नाही. यातून कायदा पायदळी तुडवण्याची मानसिकता आणखीच वाढते आहे.

सर्वस्तरीय घसरण

मुंबई विद्यापीठातील परीक्षांचे निकाल लावण्यातील गोंधळाने सप्टेंबर सरला तरी मागील शैक्षणिक वर्षातील अनेक परीक्षांचे निकाल विद्याध्यांच्या हाती पडलेले नाहीत. ज्यांचे निकाल लावले गेले तेही अर्धवट व त्रुटींनी युक्त असल्याने हजारो विद्यार्थी - पालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागलेच. शिवाय अनेक विद्याथ्यांच्या भविष्याविषयीच्या स्वप्नांचाही चुराडा झाला . याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सरकारवर कोरडे ओढले आहेत.

महाविद्यालयीन शिक्षणाचा असा बोजवारा उडाला असताना, राज्यातील शालेय शिक्षणातील विकासातही मोठी घसरण झाली आहे . राज्यात मागील तीन वर्षात शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात लोकसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात खर्च वाढला असला तरी त्या तुलनेत अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. शालेय शिक्षण, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून इतर ठिकाणी एकूण अर्थसंकल्पाच्या खर्चात प्राथमिक शिक्षणासाठी ३२ टक्के आणि माध्यमिकसाठी ४३ टक्क्यांची वाढ झाल्याचे दाखवण्यात येत असले तरी राज्यातील शाळांत आवश्यक सोयी - सुविधा आणि त्यासाठीचा अपुरेपणा भयानक आहे .

शिक्षणाच्या बाजारीकरणात जिओसारख्या अजून जन्माला देखील न आलेल्या एका शिक्षण संस्थेला भारतातील अग्रगण्य शिक्षणसंस्था ठरवून सरकारने तिच्यावर १० कोटी रुपयांची खैरात केली . युजीसीसारखी उच्च शिक्षाणावर नियंत्रण ठेवणारी संस्था बरखास्त केली जात आहे . मनुवादी शिक्षणाच्या जोडीला , देशातील शिक्षणक्षेत्रात अराजक माजवण्याचा हा कुटील डाच आहे .

अनुसूचित जाती व जमातीच्या विद्याथ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची तसेच प्रतिपूर्ती आणि केंद्राच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची रक्कम शिक्षण संस्था, सरकारी बाबू यांनी संगनमताने कशी लाटली , याचा सविस्तर उहापोह सरकारी अहवालातूनच पुढे आला आहे . राज्य शासनाने नेमलेल्या विशेष चौकशी पथकाच्या अंतिम अहवालातील वस्तुस्थितीनुसार, मुंबई -१७६ कोटी , पुणे -४६१ कोटी , नाशिक -६५३ कोटी , औरंगाबाद- १३४ कोटी , लातूर- ९२ कोटी , अमरावती- ५६ कोटी आणि नागपूर- ४०७ कोटी असा कैक हजार कोटी रुपये फस्त करण्यात आले . ही रक्कम या संस्थाचालकांकडून वसूल करा , अशी शिफारस या पथकाने केली आहे . सध्या मुलीच्या परदेशी शिष्यवृत्ती प्रकरणामुळे चर्चेत आलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या खात्याच्या कारभाराची लक्तरे या अहवालात वेशीवर टांगण्यात आली आहेत. सोबतच आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याही खात्यात ही शिष्यवृत्ती वितरण करताना कसा घोळ झाला , तेही या अहवालात सप्रमाण दाखवून देण्यात आले आहे .

राज्याचे महसुली उत्पत्रही घटले आहे . त्यातच विकासाच्या नावाखाली समृद्धी मार्ग , बुलेट ट्रेन व तत्सम महागड्या आणि कर्जाऊ प्रकल्पांची कास सरकार धरत आहे . अन्नधान्य , भाजीपाला व अन्य चीजवस्तूंच्या किमती वाढल्याने , लोकांना महागाई चांगलीच भरडून काढत आहे . त्यात बेगड़ी विकास प्रकल्पांसाठी जनतेवर कररूपाने आणखी बोजा लादण्याचे सरकारचे प्रयत्न वेळीच उधळून लावले पाहिजेत .

सत्ताधारी युतीच्या काही मंत्र्यांवर विशेषत भाजपच्या काही मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे - अनियमिततेचे आरोप होऊ लागले आहेत . भाजपच्या एका मंत्र्याला त्यावरून मंत्रीपद गमवावे लागले . दोन मंत्र्यांविरोधांत चौकशी सुरू झाली आहे . त्याच वेळी काही सामाजिक प्रश्न टोकदारपणे पुढे आले आहेत . कोपर्डी बलात्कार प्रकरण आणि त्या पाठोपाठ मराठा मोर्चा आंदोलनाने महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण ढवळून काढले . याच युती सरकारने पूर्वी ( १९९५ साली ) गोवंश हत्याबंदी कायदा केला आणि आता त्याच्या अंमलबजावणीस त्यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही . शनिशिंगणापूरमधील शनी चौऱ्यानजीक महिलांच्या प्रवेशाचा प्रश्न असो किंवा ठाण्यात बेमुर्वतखोरपणे वाहतुकीचे नियम मोडून गाडी चालवणाऱ्या एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने भर रस्त्यात महिला पोलिसाला तोंडातून रक्त येईपर्यंत केलेली मारहाण असो , महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नात , विशेषतः महिलांच्या समानतेच्या हक्कासंदर्भात काही ठोस भूमिका घेण्यास मुख्यमंत्री व हे संपूर्ण सरकार निष्प्रभ ठरले असल्याची अनेक उदाहरणे गेल्या साडेतीन वर्षांत घडली आहेत . सामाजिक अत्याचाराच्या, त्यावरून सामूहिक हिंसाचार व दंगलींच्या प्रकरणांमध्ये भगव्या युतीचे सरकार सत्तेत आल्यापासून निरंतर वाढ झाली आहे. दलित तरुण, खासकरून शिक्षित वर्गात, विद्यार्थी - युवकांमध्ये प्रचंड स्वरूपाची अस्वस्थता दिसून आली आहे . कोपर्डी बलात्काराचे दुर्दैवी प्रकरण आणि त्यालाच प्रतिक्रिया स्वरूपात सुरू झालेला मराठा मोर्चा यामुळे या अस्वस्थतेत आणखीच भर पडत आली आहे. दलित विरुद्ध मराठा अशी तेढ निर्माण व्हावी असे दोन्ही कंपूमध्ये आपले छुपे हस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घुसविले. पण दोन्हीकडील समंजस नेतृत्वामुळे हा बामणी कावा वेळीच उधळून लावला गेला. भीमा कोरेगावमध्ये दंगल घडवून आणणारे मास्टरमाइंड संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना सरकार पक्षाकडून अभय मिळाले तर विरोधकांना नक्षलवादी संबोधून, मानवाधिकारांना धाब्यावर बसवून त्यांची रवानगी तुरुंगात केली जात आहे .

विचारस्वातंत्र्याच्या अधिकाराचा संकोच हा सत्ताबळ प्राप्त झालेल्या उजव्या विचाराच्या राजकीय शक्तींडून सर्रास सुरू आहे . डॉ . नरेंद्र दाभोळकर , काँग्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांपर्यंत तपास पोहोचल्याचे दिसत असताना , निर्णायक पाऊल टाकापला हे उजवे सरकार पजावत नाही . उलट परखड भूमिका , मते मांडणाऱ्या धर्मनिरपेक्ष विचारांच्या लेखक , कार्यकत्यांना सनातन्यांकडून ' मॉर्निग वॉकला जाऊन दाखवा अशा उघड धमक्या दिल्या जात आहेत . मुंबईतील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसारख्या देशातील नामांकित संस्थेत डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक व्याख्यानमालेसाठी निमंत्रित करण्यात आलेल्या जेएनयूमपील एका प्राध्यापकाचे व्याख्यान ऐनवेळी रद्द केले जाते . हाच प्रकार नागपूर विद्यापीठात कॉ. सीताराम येचुरी यांच्या व्याख्यानासंदर्भात घडला. (जो अर्थात नियोजित वेळी सभा करून हाणून पाडला गेला. ) ' राष्ट्रवादा'च्या नावाने अलिखित फतवे निघत आहेत . उजव्यांचेच सरकार असल्याने त्याला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही .

राज्यातील निवडणुका : सेना - भाजप उणे-अधिक

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून राज्यात भाजपची ताकद वाढत गेली . विधानसभा निवडणुकांनंतरचे भाजपच्या राजकीय वर्चस्वाचे परीक्षण हे २०१६ साल सरत असताना झालेल्या नगरपालिका निवडणुकातून केले गेले . नगरपालिका निवडणुकांमध्येही सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक जिंकून भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले . नोटाबंदीसारख्या लहरी व गरीब - शेतकऱ्यांना मारक ठरलेल्या निर्णयानंतर झालेल्या निवडणुकांचे निकाल हे राजकीयदृष्ट्या धक्कादायकच होते . विशेषतः तोपर्यंतच्या सव्वा - दीड वर्षात पालघर जिल्हा परिषदेचा अपवाद वगळता सर्व मोठ्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपच्या पदरी अपेक्षित यश आलेले नव्हते .

मात्र २०१४ च्या मोदी लाटेत , ज्या पक्षाने राज्यात १११ पेक्षा अधिक जागा कधी लढविल्या नाहीत , त्या पक्षाचे राज्याच्या विधानसभेत आज १२३ आमदार आहेत . याच लाटेत पश्चिम महाराष्ट्रातील ५८ पैकी ( नगरसह ) २४ मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार निवडून आले आहेत . हाच कल कायम ठेवण्याकरिता भाजपला सहकार क्षेत्रातील मतदारांचा विश्वास संपादन करावा लागणार आहे . परंतु भाजपच्या वाढत्या वर्चस्वाचा सर्वाधिक जाच आणि कोंडी त्यांच्या मित्रपक्षांचीच विशेषत : शिवसेनेचीच केली आहे .

नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली असे चित्र रंगविले गेले . या निवडणुकांमध्ये भाजप सर्वोच्च स्थानी दिसत असला , तरी भाजपचे हे यश तसे चौफेर असल्याचे मानता येणार नाही . संख्याबळाने सर्वाधिक ५१ नगराध्यक्ष भाजपचे आले असले , तरी त्यातील ३८ नगराध्यक्ष हे विदर्भ व पुणे विभागात आहेत . मराठवाडा , कोकण व उत्तर महाराष्ट्रात भाजपला तितके यश मिळालेले नाही . याचाच अर्थ या निवडणुका म्हणजे नोटबंदीवरील कौल आणि त्यावर जातीय समीकरणांची कोणतीही छाप पडलेली नाही , असा काढता येणार नाही . केवळ प्रचाराची यंत्रणा , सतेतला पक्ष आणि त्यामुळे हाती असलेल्या यंत्रणेचा मतदारांना लुभावण्यासाठी सर्रास वापरातून हा कौल आल्याचे प्रथमदर्शनी मान्य करावे लागेल .

कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्ताधारी पक्षाला लाभदायकच ठरतात . या वेळीही तेच झाले. शिवाय एक राजकीय कावा म्हणून सत्ताधारी भाजपने थेट निवडणुकीची पूर्वी फसलेली पद्धत पुन्हा हट्टाने पुनरुज्जीवित केली. याचा परिणाम म्हणून भाजप व शिवसेना या दोन्ही सत्तेतल्या पक्षांना १४७ पैकी ७६ ठिकाणी नगराध्यक्षपदी यश आले. किंबहुना नोटाबंदीने ठिकठिकाणच्या भाजप नेत्यांना व्यावहारिक संधी मिळवून दिली. पालिकांच्या थकीत करांचा भरणा करण्यासाठी जुन्या पाचशे व हजारांच्या नोटांचा वापराला परवानगी देण्याच्या निर्णयाचा वापर हा मतांच्या खरेदीसाठी कल्पकतेने केला गेला. मतदारांना करमुक्त करण्याची मोहीम फत्ते झाली, पालिकांच्या तिजोरीत रक्कम जमा झाली आणि वर भाजपला त्याचा राजकीय फायदा झाला . नगरसेवकपदाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकल्या असल्या तरी कांग्रेसचे केवळ २१ नगराध्यक्षच निवडून आले आहेत. अत्यंत विपन्नावस्थेतल्या काँग्रेसला मतांचे समीकरण जुळवताना प्रचंड कसरत करावी लागली, तर या निवडणुकीने राष्ट्रवादीच्या भविष्यातल्या अस्तित्वाविषयी विचार करायला लावणारे संकेत दिले आहेत. मराठवाडा वगळता राष्ट्रवादीचे सर्व बालेकिल्ले उद्ध्वस्त झाले आहेत. राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपने जोरदार मुसंडी मारत दिग्गजांच्या ताब्यातल्या नगरपालिकांमध्ये कमळ फुलवले आहे . याचा परिणाम म्हणून पक्षातल्या युवा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नैराश्याचे वातावरण आहे.

रत्नागिरी आणि सिंधदुर्ग या कोकणातील दोन जिल्ह्यांमध्ये भाजपची पाटी कोरी आहे . भाजपची ताकदही मर्यादित आहे . नगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेचेच वर्चस्व राहिले . येथील सर्व जागा लढवण्यासाठी पात्र उमेदवार मिळण्याचीसुद्धा भाजपपुढे मारामार होती . तथापि रायगड जिल्ह्याचे वेगळेपण या निवडणुकीतही अधोरेखित झाले .

रायगड व सांगोल्यातील यश

रायगड जिल्ह्याने आपली परंपरा कायम ठेवताना , अपेक्षेहून अधिक शेकापच्या पारड्यात मतांचा कौल टाकला . अलिबाग नगरपालिकेवर अनेक वर्षांपासून शेकापची सत्ता असली तरीही एखाद - दुसऱ्या जागेवर विरोधी उमेदवाराला विजय मिळत होता . यंदा मात्र चार दशकांहून अधिक काळ अलिबाग नगरपालिकेतील शेकापच्या सत्तेला , जनतेने यंदा शंभर टक्के यश देणारा ऐतिहासिक कौल दिला . इतकेच नव्हे विरोधकांना पडलेल्या मतांची आकडेवारी पाहता , नगराध्यक्षांपासून , येथील १७ नगरसेवकांपर्यंतचा प्रत्येक विजय हा खास लक्षणीय ठरला . अलिबागप्रमाणे शेकापने नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत रायगड जिल्ह्यात खोपोली आणि श्रीवर्धनमध्ये आघाडी करून सत्ता कायम राखली आहे .

देशात आणि राज्यात कितीही आणि कसलेही राजकीय वारे वाहत असले . कोणतीही लाट असो पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात केवळ शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्याचेच वादळ घोंघावणार हे गेल्या काही निवडणुकांमधून वारंवार सिद्ध झाले आहे . शेकापच्या विरोधात उभे राहिलेल्या उमेदवारांचा मग ते भाजपचे असोत वा शिवसेनेचे त्यांना चारी मुंड्या चीत करण्याची किमया येथील मतदारांनी केली . अनेक पंचायत समित्यांमध्ये भाजपला भोपळाही फोडता आला नाही . येथील १५ पंचायत समित पैकी १२ ठिकाणी भाजपला मतदारांनी भोपळा दिला . राज्यात सर्वत्र भाजप - सेना या भगव्या दुक्कलींचा जनतेपुढे सवतासुमभा असला तरी रायगडात शेकाप - राष्ट्रवादीला हरविण्यासाठी यांची युती होती , हे विशेष . अनेक जि.प. गटात शेकापने कैक वांची विजयी परंपरा कायम राखलीच,तर अनेक नव्या जागाही बळकावल्या ,

गावा-गावात असलेल्या कार्यकरयांची फळी : तसेच प्रचाराचे योग्य नियोजन या जोरावर शेकाप जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष मला आहे . शेकापने ५१ पैकी २७ जागांवर विजय मिळवला . मागील निवडणुकीत शेकापचे १९ सदस्य होते . पनवेल , पेण , अलिबाग हे बालेकिल्ले सर केलेच , शिवाय शेकापने कर्जत , सुधागड , मुरुड , रोहा , माणगाव , पोलादपूर या तालुक्यामध्येही जिल्हा परिषदेच्या जागा जिंकत ताकद दाखवून दिली आहे . पक्षाचा राजकीय प्रभाव वाढल्याचे हे निश्चितच घोतक आहे . दुसरीकडे पनवेल व उरण वगळता उर्वरित १७ तालुक्यामधून जिल्हा परिषदेत भाजपचा एकही सदस्य निवडून आलेला नाही .

सोलापूर जिल्ह्यातील सांगोले तहसीलमध्ये शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादी कनिम पक्षाची गेल्या अनेक वर्षापासून युती आहे. सांगोले नगरपालिकेमध्ये २० सदस्य आहेत त्यापैकी शेकाप व राष्ट्रवादीचे मिळून १७ सदस्य आहेत तर शिवसेना व काॅंग्रेसचे ७ सदस्य आहेत . नगराध्यक्ष म्हणून मात्र शिवसेनेच्या महिला उमेदवार निवडून आल्या आहेत.

सांगोले जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापचे जिल्हा परिषद राष्ट्रवादीचे २५ शिवसेनेचे २ निवडून आले आहेत. तसेच सांगोले पंचायत समिती निवडणुकीत शेकापचे १० , राष्ट्रवादीचे २ व शिवसेनेचे ४ सदस्य निवडून आलेले आहेत . पंचायत समितीच्या महिला सभापती शेकापच्या व उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत. पंचायत समिती १९७२ पासून शेकापच्या हातात ठेवण्यात यश मिळाले आहे.

डाव्या, परिवर्तनवादी शक्तींची पीछेहाट शोचनीय

आता एकुण राज्याच्या निवडणूक निकालाविषयी विचार करायला हवा.महाराष्ट्रात पालिका निवडणुकात भाजपाला जे प्रचंड यश मिळाले आहे ते चौकीत करणारे आहे. मात्र प्रस्थापितांना धक्का आणि भाजपला कौल असे जे चित्र या निकालाचे रंगविले जाते ते वस्तुस्थितीला धरून नाही. राज्यात भाजप सरकार सत्तारूढ झाल्यानंतरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील ही सर्वात मोठी निवडणूक झाली आहे. कधी नव्हे ते पश्चिम महाराष्ट्रातही भाजपने अनेक नगरपालिकांवर वर्चस्व प्रस्थापित केले. एकंदर कौलाचे अनेक अर्थ भाजपाकडून निश्चित काढले जातील. केंद्र व राज्य सरकारच्या कामांना मतदारांनी पसंती दिली, नोटाबंदीच्या निर्णयाला विरोधकांचा विरोध त्यांच्यावरच उलटला वगैरे . पण हे दावे तथ्यहीन आहेत. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या हे खरे, पण त्यातील निम्म्याहून अधिक (४४८ नगरसेवक ) भाजपचे परंपरागत प्राबल्य असलेल्या विदर्भातून त्यांनी जिंकल्यात हेही तितकेच खरे . तथापि सत्तेतील त्यांचा भागीदार असलेली शिवसेना राज्यभरात सर्वत्रच चौथ्या क्रमांकावर फेकली गेली हेही नजरेआड कसे करता येईल ?

त्या उलट डाव्या, परिवर्तनवादी शक्तींची पीछेहाट शोचनीय आहे . याचे गांभीर्याने व सखोल विश्लेषण करायला हवे. केवळ मतदान यंत्रांचा घोटाळा म्हणून विषय संपवून टाकणे योग्य नाही. प्रस्थापित भाजप - सेना या पक्षांनी नागरी प्रश्नांवर मतदाता जागरण केले नाही की सत्तेवर असताना नागरी प्रश्नावर काय काम केले तेही सांगितले नाही . पक्षाचे जाहीरनामे फार सरस होते असेही नाही. तरीही ते मोठ्या प्रमाणावर निवडून आले. पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या काही सभांना माणसेच नव्हती म्हणून सभा रद्द केल्या पण तिथे त्यांचे उमेदवार निवडून आले. त्या उलट नाशकात राज ठाकरेच्या प्रचंड सभा झाल्या पन तेथे मनसेचे उमेदवार निवडून आले नाहीत.

१९९० नंतर महाराष्ट्रात शिवसेना - भाजपचा जोर वाढला. १९९५ मध्ये युतीची सत्ता आली तरी सहकार चळवळीत पुतीला प्रवेश करता आला नाही. विधानसभेच्या ५८ जागा असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात युतीला कपीच फारसे यश मिळाले नव्हते ( अपवाद २०१४ ची विधानसभा निवडणूक ) . यातूनच भाजपने आता सहकार चळवळीवर लक्ष केंद्रित केले आहे . राष्ट्रवादी किंवा काॅंग्रेसचे वर्चस्व एका रात्रीत मोडून काढणे शक्य नसले तरी हळूहळू त्यात पाय पसरण्याची भाजपची योजना आहे . या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत .

सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत साम - दाम - दंड - भेद यांचा वापर हा एक भाग झाला . निवडणूक जिंकण्याचे तंत्र असाही एक प्रकार विकसित झाला आहे . ज्या तंत्राचे जाणकार , सल्लागार तयार झाले आहेत . निवडणूक प्रक्रिया एक बाजारू समरस झाली आहे . यातून लोकशाहीच्या मूलभूत ढाच्यालाच धक्का पोहोचून अराजकसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका दिसत आहे . या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र सुधारणा करण्याचा विचार , चर्चा आज सुरु करने गरजेचे आहे .

आपले राजकारण हे निवडणूक पल्याड दृष्टी ठेवणारे आहे . हेही तितकेच खरे . जनतेच्या लढाईत तडजोडीला , तहाला , माघारीला जागा नाही... ती लढावीच लागेल . अनेक प्रसंगी लालबावट्या खाली एकवटणारे आपण तो प्राणपणाने लढली आणि जिंकलो आहे . रायगडात जे आपण शक्य करून दाखविले त्याचा कित्ता राज्यात इतरत्र गिरविला जाऊ शकतो . आपण ज्या वर्ग , वर्ग , जात , स्त्रीदास्य मुक्ती क्रांतीचे स्वप्न पाहतो तो लढा दीर्घकाळ व निरंतर सुरू राहणारा आहे . आज वर्तमानात तो लढा झाकोळला असेल . रंग बाकी आहे आणि अवघड वाटत असले तरी अशक्य काही नाही , हे आपणच दाखवून देणार हे निश्चितच!

शिवसेनेची संभ्रमावस्था

महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना - भाजप युती तुटली . त्यानंतर तीव्र मतभेद आणि सत्तास्पर्धेच्या राजकारणात गेल्या अडीच - तीन वर्षात दोन्ही पक्ष एकमेकांपासून कमालीचे दुरावले गेले . नगरपालिका , जिल्हा परिषद , महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे किंबहुना एकमेकांविरोधात लढले . शिवसेनेचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्याचे भाजपने प्रयत्न सुरू आहेत . तेव्हापासून शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांचा आरोप आहे की , राष्ट्रीय पक्षांनी प्रादेशिक पक्षांचे राजकारण आणि त्यांचे अस्तित्व संपवण्याचा विडा उचललाय . अनेकदा मुलाखती आणि पत्रकार परिषदांमध्ये त्यांनी प्रादेशिक पक्षांच्या ऐक्याचे महत्व विषद केले आहे . पण अद्याप उद्धव ठाकरेंनी यासंबंधी स्वतःहून पुढाकार घेतलेला नाही . यापुढे आणखी सत्तेत रमलो तर भाजपविरोधक ही स्पेसही गमवावी लागेल ही भीतीही आहे . पक्षाचा चेहरा प्रादेशिक असावा की राष्ट्रीय हा संभ्रमही शिवसेना व तिच्या नेतृत्वापुढे आहेच , पन्नाशीचा उंबरठा ओलांडलेल्या शिवसेनेत सध्या गोंधळाचे वातावरण आहे . भाजपबरोबर सत्तेत राहायचे की बाहेर पडायचे हेही ठरविता येत नाही .

बहुजनवादी राजकीय फेरजुळणी

मराठा क्रांती मोर्चाबाबत शेतकरी कामगार पक्षाची भूमिका सुरुवातीपासून सुस्पष्ट आहे . या मोर्चासाठी लोटणारा लाख - लाखभर जनसागर पाहता, या उद्रेकाला एका विशिष्ट जातीच्या उठावाचे स्वरूप सांगितले गेले. तरी त्यात लाखोंच्या संख्येने सहभागी होणारा शेतकरी समुदाय हा जातीच्या अस्मितेपोटी सामील झालेला नाही, हे एका परिवर्तनवादी चळवळीचे पाईक म्हणून आपण समजून घेतले पाहिजे . या उद्रेकाला मूलत: च मोठ्या सामाजिक - आर्थिक परिवर्तनाची आस आहे. म्हणूनच आरक्षणातील वाटेकरी बनू पाहतोय म्हणून मराठा विरुद्ध ओबीसी अशी झुंज लावून देऊन अथवा अट्रॉसिटीच्या प्रश्नावर दलितांना भडकावून हा उद्रेक दडपला किंवा तो भरकटला जाईल , असा कुणाचा समज असेल तर त्यातून त्यांचा भ्रमनिरासच होईल . शेतकरी कामगार पक्षाने दाखविलेल्या राजकीय परिपक्वतेचे द्योतक म्हणूनच की काय मराठा क्रांती मोर्चे संघटित करण्यातील अग्रणी प्रवीण गायकवाड आणि संभाजी ब्रिगेडच्या हजारो कार्यकत्यांनी शेकापक्षात प्रवेश केला . राजकीय पर्याय म्हणून शेकापशीच नाळ जोडणे त्यांनी पसंत केले. पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या प्रांगणात राजमाता जिजाऊ भोसले यांच्या जयंतीदिनी हा राज्याच्या राजकारणाला नवीन दिशा देणारा घटनाक्रम उभ्या महाराष्ट्राने अनुभवला . शेतकरी कामगार पक्षाने ज्या भूमीत स्थापना होऊन मूळ धरले आणि तेथूनच या नवप्रवर्तनाला सुरवात झाली ही सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे .

या घटनेचे राज्याच्या राजकारणात दूरगामी व लक्षणीय पडसाद उमटतील , हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही . सद्य राजकारणाला केंद्रात व राज्यातील भगव्या सत्ताधाऱ्यांकडून जे संकुचित फॅसिस्ट - ब्राह्मण्यवादी आणि उघड भांडवलशाही धार्जिणा रंग दिला जात आहे . त्याला प्रत्युत्तर देण्याची ताकद एकवटत आहे याची ही घटना द्योतक आहे . शेकापक्षाने स्थापनेपासून फुले - राजर्षि शाहू - आंबेडकरांना अभिप्रेत बहुजनवाद आणि मार्क्स - लेनिन यांचा वर्ग - जाती - स्त्रीदास्यापासून मुक्त क्रांतीची कास धरली आहे . या प्रयत्नांना मूर्तरूप देणारी वैचारिक जुळणूक म्हणजे ही घटना आहे .

महाराष्ट्रात गेल्या अडीच - तीन दशकात बेफाम शहरीकरण सुरू आहे . या बदलांना प्रामुख्याने शेतकरी समाज असलेला मराठाच बळी पडलेला आहे . जमिनी विकल्यामुळे तात्पुरती श्रीमंती आली , पण मिळालेल्या संपत्तीचे भांडवलात रूपांतर करण्याची कला या कष्टकरी शेतकरी समाजाला माहीत नव्हती व त्याच्या आत्मकेंद्री नेतृत्वाने ही कला त्याला शिकवली देखील नाही . त्यामुळे जमिनीतून कमावलेली सगळी संपत्ती अनुत्पादक बाधीत खर्च झाली . सततचा दुष्काळ, उत्पादन खर्चामध्ये सतत होत असलेली वाढ व उत्पादनाला मिळणारा तुटपुंजा मोबदला यामुळे शेती असताना शेतीच्या कौशल्यासोबत हा समाज दरिद्री राहिला . परंतु शेती असेपर्यंत कुशल गणल्या गेलेल्या या समाजातील स्त्री - पुरुष पैसे संपल्यानंतर अकुशल ठरले. आणि जो स्वाभिमान होता, जी पत होती तो दोन्हीही शहरीकरणात नष्ट झाली . महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी ९० टक्क्याच्या वर शेतकरी कुणबी - मराठा व बहुजन समाजाचे आहेत . गेल्या वीस वर्षांत असा स्वाभिमान व पत गमावलेल्यांची संख्या कैक पटीने वाढली आहे . इतिहासात पहिल्यांदाच मराठा समाज हा समाज म्हणून एकत्र आला त्यामागे ही गमावलेली पत पुन्हा मिळविण्याचा ध्यास मोठा आहे . कोपडींची दुर्दैवी घटना निमित्त ठरली पण या समाजात वर्षानुवर्षे व्यवस्थेच्या विरोधात निर्माण झालेल्या असंतोषाला यातून वाट मिळालेली आहे.

शेतीचे संकट व ग्रामीण व शहरी बेरोजगारीचा प्रश्न मराठा मोर्चाच्या केन्द्रस्थानी आला. कोणाच्याही राखीव जागांना धक्का न लावता आम्हाला राखीव जागा मिळाल्या पाहिजेत, त्यासाठी घटनेत बदल करण्याची गरज असली तर ती केली पाहिजे हा आवाज जोरदारपणे यायला लागला . मराठा व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनिर्णित ठेवला आहे. तसेच २०१४ च्या निवडणुकी अगोदर पंढरपूर ते बारामती या धनगर समाजाच्या मोर्चामध्ये सामील झालेल्या लाखाहून अधिक तरुणांपुढे त्यावेळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व सध्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमचे सरकार आले तर पनगर समाजाला पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षण दिले जाईल , अशी घोषणा केली पण मराठा आरक्षणासारखा तो प्रश्न तसाच लोंबकळत ठेवला आहे . शाहू - फुले - आंबेडकरांच्या प्रेरणेतून स्वीकारलेल्या वैचारिक बैठकीच्या दृष्टीने राजकारण साकारण्यासाठी बहुजनांचे हित सांभाळणारा पक्ष म्हणून प्रवीण गायकवाड , आणि संभाजी ब्रिगेडमध्ये कार्यरत त्यांच्या सहकाऱ्यांनी शेकापची नैसर्गिक निवड केली . अनेक तळच्या चळवळीतून घडलेले एक अभ्यासू , समंजस नेतृत्व , पुरोगामी चळवळीशी एकनिष्ठता , उत्कृष्ट वक्ता अशी गायकवाड यांची प्रतिमा आहे . पुरोगामी चळवळीशी असलेली त्यांची नाळ शेकापमध्ये आल्यावर अधिकच वृद्धिंगत होईल आणि अर्थातच पक्षाचा राजकीय प्रभावही विस्तारेल , ताबडतोबीच्या फायद्यासाठी घडून आलेला हा घटनाक्रम निश्चितच नाही .

फुले शाहू - आंबेडकरांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे . या दूरच्या राजकीय - सामाजिक लढाईचे बिगुल पुण्यात शनिवारवाड्यातील सभेत फुकले गेले आहे .

पक्षापुढील उद्दिष्ट्ये आणि आव्हाने

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कष्टकरी , कामगार , शेतकरी आणि वंचित घटकांचे खरेखुरे प्रतिनिधित्व करणारे पक्ष म्हणून सत्ताधारी भाजप - शिवसेना किंवा विरोधक काँग्रेस - राष्ट्रवादी यांची गणाना केलीच जाऊ शकत नाही , कम्युनिस्ट पक्षाचे प्रभावक्षेत्र फारच मर्यादित आहे . मनसेसारखा पक्ष भूमीपुत्रांच्या नावावर धनदांडग्यांचेच प्रतिनिधित्व करत आहे . अशा परिस्थितीत लोक लढयाची दीर्घ परंपरा असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला महाराष्ट्रातील राजकीय पोकळी भरून काढण्याची एक मोठी संधी आहे . आज राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या वर्गाला आकृष्ट करण्यासाठी जोरदार वैचारिक व राजकीय मोहिमा सुरू करण्याच्या संधी उपलव्य आहेत . नव उदारमतवादी धोरण , शेतकऱ्यांचे प्रश्न , नवीन निर्माण होणाऱ्या शहरी बेरोजगारांचे प्रश्न , भ्रष्टाचार , बुद्धीजीवी व स्त्रियांवरील वाढते हल्ले , प्रस्तावित परमाणु प्रकल्प , विकास प्रकल्पांसाठी जनतेचे विस्थापन इत्यादीच्या विरोधात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्स्फूर्त संघर्ष सुरु आहेत . आपण अशा प्रश्नांवर सतत जागरूक राहून जनतेच्या बाजूने उभे राहिले पाहिजे . शासनाच्या नीती धोरणावर मूलभूत प्रश्न विचारले पाहिजेत . इतर विरोधी पक्षांप्रमाणे अदानी - अंबानी यांना तोंडदेखला विरोध करायचा , पण नवउदार धोरणाची चिकित्सा करायची नाही , हिंदुत्वाचा विरोध करायचा पण सर्व छापाचे सांप्रदायिक गणंग पोसायचे अशा घरसोड वृत्ती आपण स्वीकारल्या तर जनता आपली गणना त्यांच्यातच करेल . गेल्या दोन दशकांपासून जनता हे पर्याय वापरून थकलेली आहे . अशावेळी पक्षाने आपले वेगळे अस्तित्व पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याची वेळ आलेली आहे.

राजकीयदृष्ट्या आणि संघटनात्मकदृष्ट्या पक्षाला सक्रीय ठेवण्याकरिता वैचारिक - राजकीय शिक्षण आणि प्रशिक्षण यांना प्राधान्य दिले पाहिजे . मार्क्सवाद हा एक पोथीनिष्ट सिद्धांत नाही , परंतु आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय आणि स्थानिक स्तरावर ठोस परिस्थितीत होणाऱ्या बदलाचे विवेचन करून सतत कृती करण्यासाठी मार्गदर्शक असे एक तत्व आहे . शेतकरी कामगार पक्षाला मार्क्स , फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांच्या त्रिसूत्रीचा मोठा वारसा आहे . अलीकडच्या काळात मूलतत्त्ववादी शक्तींच्या वाढणाऱ्या ताकदीला वेगवेगळ्या स्तरांवरून पर्यायी विचारांचे सक्षम आव्हान मिळाले नाही . खुद्द फुलेंच्या महाराष्ट्रात त्यांचे विचार योग्यपणे समाजातील विविध घटकांपुढे न पोहोचल्याने जातीयवादी व धर्माध शक्तींनी बहुजन समाजातील युवा वर्गाला आपल्या जाळ्यात ओढले आहे.

कामगार वर्ग

नव्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या परिघात कामगार आणि कामगार संघटनेचे स्वरूप बदलत आहे . भारतीय मजदूर संघ ही संघप्रणित कामगार संघटना आणि कांग्रेसप्रणित इंटक यासारख्या तसेच अनेक राजकीय नेतृत्वाच्या दावणीला बांधलेल्या कामगार संघटना विदेशी गुंतवणुकीला विरोध करत नाहीत आणि साम्राज्यवादी जागतिकीकरणांतर्गत ' विकासाच्या नावाखाली साम्राज्यवादी हितसंबंधांकडे कामगार वर्ग आणि देशांचे हित गहाण ठेवण्यास सक्रियपणे मदत करतात . कम्युनिस्ट पक्षाच्या कामगार संघटना नव उदारमतवादी धोरणांना विरोध जरूर करतात परंतु आर्थिक मागण्यांच्या लढ्यात गुंतून राहिल्याने आणि अशा मागण्यांची पूर्तता करून देणाऱ्या अनेक संधीसाधू कामगार संघटनांनी कामगारांना आपल्या जाळ्यात ओढल्याने कामगार वर्गाला राजकीयदृष्ट्या सचेतन बनवण्याचे त्यांचे यत्न थिटे पडत आहेत . कामगार वर्गावर वाढत जाणाऱ्या हल्ल्यांविरोधात सक्रीय प्रतिकार करण्यास तसेच राजकारण करण्यासही ते असमर्थ ठरत आहेत . पक्षाला कामगारांच्या राजकारणाकरता एक कार्यक्रम तयार करावाच लागेल . शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे . शहरातील संघटित आणि असंघटित कामगाराबरोबर बेरोजगार युवकांचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे . त्या सर्वांना एका सूत्रबद्ध कार्यक्रमात सहभागी करून डाव्या विचारांचे बीज त्यांच्यामध्ये पेरले पाहिजे , नागरी भागात कामगार हा पक्षाचा कणा असला पाहिजे.

शेतकरी वर्ग

सर्वात प्रथम सहा दशकाहून अधिक काळातील अधिक निओ - वसाहतवादी , नव - उदारमतवादी घोरणांद्वारे वेगाने , शेतीक्षेत्रात झालेल्या प्रचंड बदलांचा अभ्यास करुन शेतीविषयक कार्यक्रम तयार केला पाहिजे . दुसरे म्हणजे , शेतकरी , विशेषतः कृषी कामगार , भूमिहीन आणि गरीब शेतकरी यांच्या राज्यस्तरावर शेतकरी चळवळी तयार करुन त्यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे . कृषी क्रांतीकारक कार्यक्रमाच्या अनुसार , शेती कामगार , मध्य , गरीब आणि भूमीहीन शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने संघर्ष सुरू करण्यासाठी गाव पातळीपासून सुरू होणाऱ्या जमीन संघटना समित्या तयार करणे क्रमप्राप्त ठरते. पक्षाची शेतकरी संघटना ( शेतकरी सभा ) पुनरुज्जीवित करून तिच्या मार्गदर्शनाखाली या सर्व बाबी कराव्या लागतील . शेतक-यांची कर्जमाफी , शेतमालाला किमान हमी दर , समन्यायी पाणी वाटप , शेतकऱ्यांसाठी विशेष सवलती यासारख्या मागण्या तर आहेतच परंतु शेतमजुरांचे आणि भूमीहीन शेतकन्यांचे प्रश्नही आपल्याला घ्यावे लागतील . वेठबिगारी , भरमसाठ व्याज , सांप्रदायिक तसेच जाती आणि लिंग आधारित शोषणाच्या विरोधात लढा द्यावा लागेल . वाढीव मजुरी , बंजर जमीन वितरण , वन ठेकेदारांच्या दादागिरीला विरोध यासाठीही संघटित होणे आवश्यक आहे . तात्काळ मागण्यांसाठी मोहिमा आणि संघर्ष करताना , तातडीच्या आणि मूलभूत मागण्यांमधील दुवा स्थापित केला जावा . त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या जमिनी विकासाच्या नावाने बळकावून त्यांचे जबरदस्तीने विस्थापन करण्याविरुद्ध संघर्ष करावा लागेल .

महिला वर्ग

पक्षाचे प्रेरणास्थान असलेल्या महात्मा फुलेंनी महिला सक्षमीकरणाचा भारतात सर्वप्रथम पाय रोवला. मार्क्सच्या सिद्धांतानुसार स्त्री जातींचे शोषण मानवाच्या इतिहासातील एक मूलभूत शोषण आहे . भारतीय समाजात स्त्रीचे होणारे शोषण धर्माने आणि जातीव्यवस्थेनेही अधिष्ठित केलेले आहे . सध्याच्या अर्थव्यवस्थेत स्त्रीच्या प्रतिमेचे बाजारीकरण आणि व्यवसायिकीकरण होणे स्वाभाविक आहे . जवळजवळ सर्वच जनचळवळी आणि डाव्या संघटना यांनाही जवळपास ५० टक्के घटक असलेल्या या वर्गाचे प्रभावी संघटन घडवण्यात फार मोठे यश आलेले नाही .

भारतातील स्त्रियांची स्थिती साम्राज्यवादी देशांशी तुलना केल्यास अजूनही खूपच मागास आहे . निवडून द्यावयाच्या संस्थांमध्ये महिलांना ३३ % आरक्षण प्रदान करण्यासारख्या अगदी वरवरच्या बदलांना पुढे आणण्यासाठी विरोध होत आहे आणि हे अद्याप अंमलात येत नाही. यावरून खात्री पटते की न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती ' या मनुवादी विचारांचा पगडा प्रभावशाली आहे . जातीव्यवस्था आणि धर्माने महिलांच्या मागासपणाचे प्रमाण कायम ठेवले आहे . नियो - उदारमतवाद अंतर्गत

भांडवल आणि बाजार व्यवस्थेच्या नियमामुळे स्त्रियांची दुःखे वाढली आहेत . स्त्रीचे शरीर उपभोग्य वस्तू मानून ती बाजारात सर्रासपणे विकली जाते . पारंपरिक एकत्र कुटुंबव्यवस्थेचे विघटन होऊन तिचे रूपांतर न्यूक्लियर पद्धतीत झाल्यानंतरही समाज मुळात पुरुषप्रधान आणि पुराणमतवादी आहे . हुंडा मागणे आणि कौटुंबिक संपत्तीचा समान अधिकार नाकारणे अजून प्रचलित आहे , बालविवाह , देवदासी इत्यादीसारख्या खीची अवहेलना करणाऱ्या प्रथा आजही काही भागात सुरू आहेत .

शासनाने पुरस्कृत केलेल्या सांप्रदायिक शक्ती आणि धार्मिक मूलतत्त्ववादांची वाढ महिलांच्या स्थितीस वाईट ठरली आहे . नव - वसाहतवादी संस्कृतीच्या प्रभावाखाली , हरियाणा , पंजाबसारख्या राज्यात जन्म होण्याआधी स्त्री गर्भ नष्ट केले जातात . त्यांच्या तुलनेत पुरुषांची संख्या वाढत आहे . परिणामी , घरगुती कामासाठी आणि मुलांचे उत्पादन करण्यासाठी इतर राज्यातील महिलांची तस्करी होत आहे . एका बाजूने ' बेटी बचाओ बेटी पढाओ ' अशा जाहिरातीवर वारेमाप खर्च केला जातो. आणि दुसरीकडे विविध धर्मांध संस्था आणि नेते त्यांना १० किंवा त्याहून अधिक बालकांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहन देतात . बुर्ज्वा स्त्रीवादी चळवळीचा शहरी भागावर प्रभाव असून ग्रामीण आणि निमशहरी भागात निर्माण होणाऱ्या स्त्रियांच्या वास्तविक मुद्याचे निराकरण ती करत नाही . निवडणुकांच्या राजकारणात महिला आपल्या संख्येच्या बळावर महत्वाची भूमिका पार पाडतात. म्हणूनच विविध स्तरांवर स्त्रीयांना संघटित करून स्त्री मुक्ती कार्यासाठी जागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे . महिला चळवळीच्या विकासास हातभार लावण्यासाठी पक्षाने सक्रीय पावले उचलली पाहिजेत . विविध पातळ्यांवर पक्ष पुरस्कृत पुरोगामी स्त्री संघटनेची उभारणी केली पाहिजे.

युवा वर्ग

आपल्या देशातील तरुणांना सामाजिक पुनरुत्थानाच्या चळवळीत तसेच स्वातंत्र्यलढ्यामध्ये सक्रीयपणे सहभागी होऊन आणि प्रगतीशील चळवळीच्या नेतृत्वाखाली साम्राज्यवाद विरोधी , सामंतवाद विरोधी लढतींमध्ये गौरवशाली इतिहास आहे.

अश्फाकउल्लाह खान , भगतसिंग आणि अन्य क्रांतिकारक युवकांनी ऐतिहासिक भूमिका बजावून वसाहतवादी शक्तींना आव्हान तर दिलेच पण आजही ते युवकांना प्रेरणा देतात . परंतु सांप्रदायिक प्रवृत्तींचा प्रभाव उंचावत गेला आणि क्रांतिकारक कार्यक्रमाने देशभरातील युवकांना संघटित करण्यात साम्यवादी क्रांतिकारक चळवळ फसली . अखिल भारतीय स्तरावर डाव्या चळवळीतील युवकांचा सहभाग कमी होत गेला .

दरम्यान , नव - वसाहतवादी व विशेषत : नव - उदारमतवादी धोरणांच्या अंमलबजावणीनंतर युवा वर्गासमोर येणाऱ्या आव्हानांना आणखी तीव्र केले आहे . बेरोजगारी आणि बेकारी वाढत आहे . नवीन अर्थव्यवस्थेत रोजगार कमी होत असल्याने तरुणांना प्रगतीशील चळवळीमध्ये सामील होण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये साम्राज्यवादी संस्कृती , मादक द्रव्ये आणि गुन्हेगारीचा प्रचार केला जात आहे . शिवाय इतर धर्माचे किंवा जातीचे लोक आपले शत्रू असून त्यांच्यामुळे आपली वाढ खुंटलेली आहे असा आभास निर्माण करून सांप्रदायिक , जातीवाद पसरवणाऱ्या आणि दंगे घडवून आणणाऱ्या गटात त्यांना मोठ्या प्रमाणात भरती केले जाते . यातून शासक वर्ग गोरक्षक, बजरंग दल यासारख्या गुंडांच्या टोळ्यांना उघड उघड पाठिंबा देत आहे .

वैफल्य आलेल्या युवा वर्गाची ताकद सकारात्मक लोक चळवळींसाठी जोडणे आज महत्त्वाचे आहे . पक्षाने पुरोगामी युवक संघटनेला उत्तेजन देऊन स्थानिक आणि राज्य पातळीवर युवा नेतृत्वाला वाव दिला पाहिजे .

विद्यार्थी वर्ग

विद्यार्थी वर्ग देशातील सामाजिक स्तरावरील एक प्रमुख शक्ती आहे . जागतिकीकरण - उदारीकरण - खासगीकरण या नव - उदारमतविषयक धोरणांनी शिक्षण केवळ एक वस्तू बनवून ठेवली आहे . आणि एकदा शिक्षणक्षेत्रात प्रचलित असलेल्या प्रगतीशील सामाजिक व्यक्तिमत्त्वाचा व दिशादर्शनाचा -हास झालेला आहे . शैक्षणिक व्यवस्था आणि नव - उदारमतवादी अभ्यासक्रमांचे व्यावसायीकरण यामुळे उच्च दजांचे शिक्षण घेणारे सामाजिक वास्तवापासून दूर जात आहेत . व्यापारीकरणाने उच्च शिक्षण बदलले आहे .

उच्च जाती व उच्चवर्गीय विद्याथ्यांना राखीव असलेल्या एका उच्चस्तरीय क्षेत्रासाठी निर्माण केलेल्या ' उत्कृष्टतेच्या केंद्रांमध्ये प्रचलित अभ्यासक्रम , शिक्षण पद्धती म्हणजे खास वर्गाची मक्तेदारी आहे . व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये औपचारिक शिक्षणाच्या प्रक्रियेचे मूलतत्त्व अजून वसाहतवादीच आहे , तथापि त्याची सामग्री आणि स्वरूप नव - वसाहतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी थोडेफार बदलले आहेत इतकेच., सध्याची व्यवस्था अशा प्रकारे आयोजित केली आहे की विद्याथ्यांनी आणि युवकांनी साम्राज्यवादी व भांडवल बाजाराची सेवा करावी. समाजात शैक्षणिक व्यवस्थेचे स्वरूप तत्कालीन शासक वर्गाचे हितसंबंध संरक्षित करण्यासाठी कार्यान्वित केले जाते , हे स्पष्ट आहे . विद्यार्थ्यांना सत्ताधाऱ्यांच्या विचारधारा आणि राजकीय - प्रशासकीय गरजांनुसार शैक्षणिक व्यवस्थेच्या माध्यमातून वापरले जाते .

विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग , विशेषतः उच्च आणि मध्यमवर्गीय , जातीयवादी विचार पसरवणाऱ्या भाजपची सूत्रे हातात ठेवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हाती जात आहे . हा वर्ग भ्रष्टाचार आणि त्यांच्या राजकीय गुरुंचा सांस्कृतिक अधःपतन यांचे अनुकरण करत नव - उदारमतवादी मूल्यांनी प्रभावित होतात . आरक्षण धोरणाच्या नावावर ते विद्यार्थ्यांचे विभाजन करतात . शिक्षणाचे व्यावसायिकीकरण , कॅम्पसच्या जीवनाचे गुन्हेगारीकरण व प्रतिक्रियावादी संस्कृतीचे वाढते वर्चस्व लोकशाही विद्यार्थी चळवळीसामोर सर्वात मोठे आव्हान आहे . सध्याच्या सांप्रदायिक प्रवृत्तींचा प्रतिकार करताना विद्यार्थी संघटना काही राज्यांमध्ये व्यापक लोकशाही कार्यक्रमाद्वारे एकत्र आल्या आहेत . क्रांतिकारक चळवळीचा विकास करण्यासाठी एक शक्तिशाली विद्यार्थी चळवळ समाजावर व्यापक पातळीवर प्रभाव टाकेल म्हणूनच विद्यार्थी वर्गाला सध्याच्या सामाजिक जाणिवांविषयी सतर्क करणे पक्षाच्या भविष्यातील वाढीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे .

सांस्कृतिक क्षेत्र

संविधानाने भारताला धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक घोषित केले असले तरी सुरुवातीपासूनच काँग्रेसने सर्वधर्मसमभाव ' अंतर्गत सर्व धार्मिक शक्तींचे लांगूलचालन केले आहे . लवकरच इतर सत्तारूढ पक्षांनी देखील व्होट बँकांचा प्रकार सुरू केला . जनसंघ आणि मुस्लिम लीग सारख्या धार्मिक संघटनांची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झाल्यापासून अल्पसंख्य आणि बहुसंख्य धर्मातले कट्टरवादी एकमेकांबरोबर सतत भांडणे करत आहेत . राजीव गांधी सरकारने शरियतच्या बाजूने कायद्याची अंमलबजावणी करून इस्लामिक कट्टरपंथीयाचा अनुनय करताना बाबरी मशीद येथे शिलान्यासाची परवानगी देऊन बहुसंख्य कट्टरपंथीयाना प्रोत्साहन दिले . या परिस्थितीचा फायदा घेऊन १९८० च्या शेवटी मंडल आयोगाच्या अहवालाच्या विरोधात संघ परिवाराने आंदोलन करून १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्याचे कारस्थान रचले . सर्व तडजोडवादी राजकीय पक्षांनी केलेल्या सांप्रदायिक प्रक्रियेची परिणती म्हणून मोदी सरकार सत्तेवर आले आहे

संघप्रणित भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर लेखक , कलाकार , बुद्धीजीवी वर्गाला खास टार्गेट केले जात आहे . काँग्रेसच्या राजवटीत नरेंद्र दाभोलकरांचा खून झाल्यानंतर पानसरे , कलबुर्गी आणि हल्लीच गौरी लंकेश यांचे बळी पडले . मुरुगन पेरुमल या लेखकाला स्वतः लेखक म्हणून मृत झालो आहे असे जाहीर करावे लागले . सांस्कृतिक दहशतवादातून नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी बॉम्बस्फोट घडवणे , कलाकारांना धमक्या देणे असले प्रकार सर्रास चालू आहेत . व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी हा फॅसिस्ट विचारधारेच्या सत्ताधाऱ्याचा स्वाभाविक स्वभाव आहे .

इंटरनेटसारख्या माध्यमांवर ' ट्रोल ' नावाच्या नवीन वर्गाची भर पडली आहे . प्रामुख्याने भाजप समर्थक असलेली ही फौज टीकाकारांना शिवीगाळ करुन व धमक्या देऊन गप्प बसवण्याचा प्रयत्न करते . भाजपकडून प्रचंड पैसा खर्च करून मोठया प्रमाणात संगणक क्षेत्रातल्या व्यावसायिकांना भाड्याने कामाला लावले जाते . यांचे काम असते ते म्हणजे खोट्यानाट्या माहितीद्वारे आणि आकडेवारीद्वारे विद्यमान सरकारचे सतत समर्थन करणे .

या सर्वांना आव्हान देण्यासाठी राजकीयदृष्ट्या परिपक्व माहिती तंत्रज्ञानात तसेच कला , साहित्यात कार्यरत असलेल्या व्यक्तीना पक्षात सामावून घेतले पाहिजे . आणि एक व्यापक स्वरूपाची मोहीम सुरु केली पाहिजे . १९९८ च्या निवडणुकीत एनडीएच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजपपेक्षा आज भाजप फार वेगळा आहे . राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम आक्रमकपणे कार्यान्वित करण्याची सुरुवात केली आहे . भारताला हिंदु राष्ट्रात बदलण्याची परिस्थिती निर्माण केली जात आहे . भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार विविध राज्यांतून आणि आता केंद्रीय पातळीवरून शिक्षणाचे हिंदुत्वकरण , गोरक्षकांचा उच्छाद , त्याचबरोबर हिंदुत्ववादाचा जहाल प्रचार आणि प्रसार करून इतर धर्मियांविषयी द्वेष पसरवणाऱ्या घटनांना उत्तेजन देत आहे . संविधानाला थेट आव्हान देणाऱ्या आणि विरोध असलेल्यांचे मुडदे पाडायच्या धमक्या देणाऱ्या संघटना जन्माला घातल्या जात आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या नियंत्रणात असलेल्या भाजपला देशाची संघराज्यीय रचना मोडीत काढायची आहे . त्यासाठी संघाला राज्यांना दुबळे करायचे आहे . त्यामुळे ते संघराज्यीय पद्धतीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत . जेणेकरून त्यांना समाजात ' हिंदू ' , ' हिंदी ' , हिंदुस्तान ' असे कप्पे पाडणे शक्य होईल . भाजपकडूनही तेच धोरण राबविण्याचा प्रयत्न होत आहे . भारत हा बहुभाषिक , बहुसांस्कृतिक देश आहे . या ठिकाणी आचार - विचाराचे स्वातंत्र्य आणि मतभिन्नतेला स्थान आहे . हीच संकल्पना मुळात संघाला मान्य नाही . त्यामुळे संघाकडून देशावर एक संस्कृती , एक भाषा ही विचारसरणी लादण्याचे प्रयत्न सुरु आहेत .

या सर्व घडामोडीना आतरराष्ट्रीय संदर्भ आहे . अमेरिकेच्या नेतृत्वाखालील साम्राज्यवाद्यांनी नव उदारमतवादी व नव वसाहतवादीविरोधी लढ्याला सांस्कृतिक युद्धाचे स्वरूप दिले . आशियातील सुत्री - शिया , हिंदू- मुसलमान ; बौद्ध - मुसलमान अशा संघर्षांना खतपाणी घालून जनतेला वास्तव प्रश्नापासून दूर नेण्यात ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालेले आहेत . म्हणूनच सांप्रतकाळी धर्म आणि राजकारण यांना वेगळे करणे अत्यंत गरजेचे आहे . धार्मिक स्थळे , धर्मगुरू , मठ , आश्रम , सण - समारंभ अशा सर्व माध्यमांचे व्यावसायिकरण करुन कट्टर हिंदुत्ववादाचा प्रसार करणारे स्वयंघोषित नेते व कार्यकर्ते तयार होत आहेत . देवभोळ्या जनतेचा पैसा धार्मिक तेव व दंगली घडवण्यासाठी वापरला जात आहे . हिंदुत्ववादाच्या नावाआड खरेतर ब्राह्मण्यवादी प्रवृत्ती आपले वर्चस्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत .

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शेकापच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रातील शाहीर , लेखक , कवी आणि बुद्धीजीवी वर्ग लढला . सांस्कृतिक दहशतवादाचा बिमोड करून पुरोगामी विचारसरणीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत होणे गरजेचे आहे. म्हणून सांस्कृतिक क्षेत्रातील समविचारी व्यक्ती व संघटनाबरोबर आपल्याला काम करावे लागेल . शेतकरी कामगार पक्षाला ब्राह्मणेतर चळवळीची फार मोठी परंपरा आहे . बहुजन हा आपल्या पक्षाचा कणा आहे आणि आज बहुजन समाजातला मोठा युवा वर्ग हिंदू धर्माने ठेकेदार बनलेल्या मूलतत्ववाद्यांच्या आहारी जात आहे. ब्राह्मण्यवादाचे खरे स्वरूप त्यांच्यापुढे ठेवून त्यांना परत पक्षाकडे आकृष्ट करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात जाती अंताच्या लढ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे . जाती - आधारित दडपशाही, जातीभेद , अस्पृश्यता आणि जात पंचायतीकडून टाकला जाणारा सामाजिक बहिष्कार अशा प्रकारांना आपण सदैव विरोध केला पाहिजे प्रतिक्रियावादी विचारांविरुद्ध , सामाजिक असमानता नष्ट होईपर्यंत आरक्षणासारख्या लोकशाही अधिकाराला पाठिंबा दिला पाहिजे . वर्ग संघर्षांचा एक भाग म्हणून जातीचा नाश करणे आवश्यक आहे .

लढ्यासाठी पोषक वातावरण

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असतानाच सरकार सर्वच आघाड्यांवर तोंडघशी पडत आहे. लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करतील. शेतकन्यांच्या प्रश्नावर सरकारने अक्षरशः सर्वांच्याच डोळ्यात धूळ फेकली आहे. शेतकऱ्यांच्या महामोर्चानंतर धास्ती घेतलेल्या सरकारने सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन कोणतीही ठोस कृती केली नाही. मराठा आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे. आर्थिक सामाजिक प्रश्नावर तोडगे न निघाल्याने लोकक्षोभ आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या सनातनी प्रवृत्ती संभाजी भिडेंसारख्या फसव्या नेतृत्वाखाली बहुजन समाजातील युवकांना धर्मांध तालिबानी बनवत आहेत. मेघालय, मणिपूर , गोवा येथे लोकशाहीचे सर्व संकेत पायदळी तुडवून संपत्तीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना विकत घेऊन बहुमत मिळवण्याचे यशस्वी प्रयोग कर्नाटकात फसले आणि मोदींच्या मीडियाने निर्माण केलेली लोकप्रियता सवंग आहे याचा पडा देशातील जनतेने भाजपला दिला . या आधी २००४ च्या निवडणुकांआधी शायनिंग इंडियाची नारेबाजी चालू होतो. आताही प्रसारमाध्यामांची कोंडी करून किंवा त्यांना सरळ सरळ विकत घेऊन सरकारने केलेल्या खोट्या विकासाच्या प्रचाराची राळ उडवली जात आहे. परंतु २०१४ च्या निवडणुकीत भाजपने प्रभावीपणे वापरलेली सोशल मीडियासारखी शस्त्रे त्यांच्याच अंगलट येत आहेत.

नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून झालेल्या सर्व लोकसभा पोटनिवडणुकांत भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी आपल्या २०१४ मध्ये मिळालेल्या ३३६ जागांमध्ये भर टाकलीच नाही . उलट भाजपची संख्या २८२ वरून २७१ पर्यंत घसरली ( नियुक्त धरून २७३ ) तर रालोआ आघाडीचा आकडा ३२७ वर आला .

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर १९ राज्यातील विधानसभा निवडणुका झाल्या . आसाम , बिहार , दिल्ली , हरियाणा , जम्मू आणि काश्मीर , झारखंड , केरळ , महाराष्ट्र , पॉन्डिचेरी , तामिळनाडू , पश्चिम बंगाल , पंजाब , उत्तराखंड , गोवा , मणिपूर , उत्तर प्रदेश , गुजरात , हिमाचल प्रदेश व कर्नाटकात निवडणुका झाल्या . जर त्या निकालावर नजर टाकली तर भाजप तीन राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, पाच राज्यात भाजपने निर्विवाद विजय मिळवला आणि अकरा राज्यात पराभव पत्करला . यात लपलेले सत्य म्हणजे २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमताचा पाठिंबा मिळालेल्या १८ राज्यापैकी १४ राज्यांत भगव्या पक्षाची पीछेहाट झाली.

भाजपने गेली चार वर्षे केवळ धार्मिक जातीय विव्देषाचे आणि सामाजिक दुफळी माजवण्याचे राजकारण केले आहे. भाजप आणि शिवसेना यांना वगळून उर्वरित पुरोगामी , लोकशाहीवादी आणि डाव्या पक्षांची महायुती महाराष्ट्रात आकार घेताना दिसत आहे . काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या भांडवलदारांची तळी उचलणाऱ्या पक्षांशी आपले मतभेद असणे स्वाभाविक आहे परंतु भाजप शिवसेनेचे राजकारण शेकापचे प्रेरणास्थान असलेल्या फुले , शाहू , आंबेडकरी विचारधारेला सरळसरळ छेद देणारे आहे म्हणून त्यांचा बिमोड करणे आपले पहिले उद्दिष्ट आहे .

कर्नाटकमधील निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकात विरोधकांच्या ऐक्याने एककल्ली पद्धतीने राज्यकारभार चालवणाऱ्या मोदी शाहच्या जोडगोळीला घाम फुटला होता. तिरस्करणीय शेरेबाजी करणाऱ्या मोदींना अविश्वास ठरावाच्या वेळी आलिंगन देऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्यांच्या विखारातील हवाच काढून टाकली. त्यावेळी भांबावलेल्या मोदींचा चेहरा साऱ्या देशाने पाहिला.

विकासाच्या नावाने शून्य कामगिरी केल्याने परत एकदा हिंदुत्वाचा अजेंडा त्यांना समोर आणावा लागत आहे . अशावेळी बहुजनवादी विचारधारेच्या आधाराने महाराष्ट्रातील समस्त शेतकरी, कष्टकरी जनतेची लढाई लढण्याचे आवाहन हे अधिवेशन करत आहे.