भाई नरसिंगराव देशमुख

बहुजन जागरणाच्या पहिल्या पिढीचे नेते, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे सशस्त्र लढ्याचे नेतृत्व, शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य, शेतकरी योद्धा, सावकारीचा कर्दनकाळ, मराठी अस्मितेचा इतिहासातील पहिला लढा देणारे, संयुक्त महाराष्ट्र समितीचे प्रारंभीचे उस्मानाबाद विभागाचे अध्यक्ष, मराठवाड्यातील पहिले पदवीधर, मराठवाड्याचे पहिले पदवीधर वकील(त्या काळी 7वी, 10वी झाली तरी वकिली करता येत असे).
 
            मराठवाड्यातील बहुजनांची पहिली शिक्षित फळी उभारणारे, निजामाच्या राज्यात हैद्राबादमध्ये मराठा हॉस्टेलची स्थापना (साधारण 1930-32) तसेच औरंगाबादमध्ये शिवाजी हॉस्टेलची स्थापना, मराठवाड्यात सर्वत्र आर्यसमाजाच्या शाखाची स्थापना व दीर्घकाळ अध्यक्ष, मराठा व तत्सम वर्गीय बहुजन शिक्षण परिषदेचे संस्थापक अध्यक्ष (याच संस्थेने मराठवाड्याला शिक्षणाची चटक लावली, या संस्थेच्या शाळा व हॉस्टेल्स वर निजामाने बंदी आणल्यानंतर निजामाविरुद्ध सशस्त्र लढा उभारला), उमरग्याच्या भारत शिक्षण संस्थेचे एक संस्थापक(या संस्थेचा हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यात सिंहाचा वाटा आहे), राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, जगदाळे मामाच्या श्री ‘शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ’ संस्थेवर ट्रस्टी (मामा स्वतः व दादा हे दोघेच कायम ट्रस्टी होते), परांड्याचे SGRG शिंदे कॉलेजच्या संस्थेचे अध्यक्ष, तसेच भारत विद्यालय, भोसले हायस्कुल, आर पी कॉलेज, अश्या अनेक अगणित संस्था, शाळा, कॉलेजच्या स्थापनामध्ये मोलाचे योगदान होते.
 
           मराठवाड्यातील सावकारीचा बिमोड त्यासाठी प्रसंगी प्राणघातक हल्ल्याना निधड्या छातीने सामना, सावकारी विरोधी कायदा निजाम राज्याचे लागू करावा ह्यासाठी 8-10 वर्षाचा करारा संघर्ष, सावकाराच्या गोत्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच संघटन करत गावोगावी पायी प्रवास, शेतकऱ्यांची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी मोफत वकीलपत्र,
नि:स्पृह अविरत समाजहिताचे काम अन केलेल्या कामाचा कधीच बाऊ न करणारे, वकिली म्हणजे केवळ सामान्य जनतेच्या न्यायासाठी हक्कांसाठी, सेवेसाठी…. “फिससाठी अट्टाहास कधीच ज्यांनी केला नाही” हे आजही हजारो लोकं सांगतात “केवळ सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर झटले”,
 
             हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या सशस्त्र लढ्यात सैनिकी कॅम्पची उभारणा
पिंपरी, बार्शी, इर्ले, काजळा, ई सैनिकी प्रशिक्षण कॅम्प तर पानगाव येथे बॉम्ब बनवण्याचा गुप्त कारखाना तसेच क्रांतिसिंह नाना पाटील, जी डी बापू लाड, नागनाथ अण्णा नाईकवाडी यांच्या साहाय्याने सैनिकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण. दरम्यान रझाकरांकडून दोन वेळा घराची लूट, पुढे निजामाकरावी राजद्रोहाचा गुन्हा दाखल व वॉरंट निघाल्यामुळे परिवारासह भूमिगत, भूमिगत राहून गुप्तपणे व प्रसंगी वेषांतर करून सशस्त्र लढा, सरते शेवटी पुण्यातील काँग्रेस कॉन्फरन्स मध्ये शेतकरी संघातर्फे सहभाग व भारत सरकारने लष्करी कारवाई करावे असे आव्हान, त्यासाठी भारत सरकारला शेतकरी कामगार संघाचे स्वयंसेवक प्रत्यक्ष आघाडीवर मदत करतोल असे आश्वासन.
 
           ऍक्शनच्या दरम्यान मुस्लिम कत्तली रोखण्यासाठी उर्दू परिषदेची स्थापना व अध्यक्ष, मुस्लिम बहुल भागात प्रत्यक्ष भेटून संरक्षण व आधार, मुस्लिम शेतकऱ्यांची लुटपात व हत्या थांबवून प्रसंगी स्वधर्मीयांना सामोरे जाऊन मुस्लिम शेतकऱ्यांचे संरक्षण तर निजामाचा क्रूर कलेक्टर मोहम्मद हैदर अली यास फाशीच व्हावी यासाठी विविध स्तरावर केलेल्या प्रयत्नास यश मिळाले.
             भारतीय शेतकरी कामगार पक्षाची मराठवाड्यात स्थापना व विस्तार (शेकापक्षाच्या स्थापनेची ही बैठक व घोषणा त्यांच्या राहत्या घरी काटी येथे झाली होती.) पुढे बार्शी येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सभेत घोषणा, पक्षाच्या ‘वैचारीक’ बांधणीत मोलाचे योगदान होते.
            संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अमूल्य योगदान, संयुक्त महाराष्ट्र समितीचे उस्मानाबाद विभागाचे प्रारंभीचे अध्यक्ष, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनाचाच भाग म्हणून आपल्या खासदारकीची राजनामा पाठवला, त्यांच्या बरोबर मराठवाड्यातील 9 आमदारांनी आपला राजनामा पाठवला त्यात उद्धवराव दादा, विश्वासराव पाटील, अच्युतराव कवडे आदी नेते आघाडीवर. तर महिला मोर्चात आई शहाबाई, पत्नी शशिकलाबाई व उद्धवराव दादांच्या पत्नी कृष्णाबाई  आघाडीवर असत.
          मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीने एक शिष्टमंडळ तयार करण्यात आलं शिष्टमंडळात नरसिंगराव दादा, स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, शंकरराव चव्हाण, देवीसिंह चव्हाण आदी मंडळीचा समावेश…
या शिष्टमंडळाच्या माध्यमातून मराठवाड्यातील शेती, उद्योग, शिक्षण व वाहतूक या विकासकामांवर दादांचा भर.
            मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय परिवर्तनामध्ये मोलाचा वाटा आणि शिक्षण विषयी प्रचंड आस्था, निष्णात कायदेपंडित, मोडी,उर्दू ,इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व, निजामराज्यात राज्याची राजभाषा उर्दूची सक्ती  असताना सुद्धा मराठी अस्मितेपोटी मराठी भाषेचा वापर करण्याचं अवाजवी धाडस करणारे, भारताच्या पहिल्या राज्यसभेचे सदस्य, माजी खासदार भाई नरसिंगराव देशमुख काटीकर यांना विनम्र अभिवादन.