भारतीय शेतकरी कामगार पक्ष

६ वे अधिवेशन – नाशिक  

दि.२४,२५ व २६ जानेवारी १९५९

 

राजकीय ठरावाचा मसुदा

आंतरराष्ट्रीय परिस्थिती

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात समाजवादी आणि इतर गट दिवसेंदिवस बलवत्तर होत असून युद्धखोर साम्राज्यवादी गटाचा प्रभाव उत्तरोत्तर कमी होत आहे , असे निदान पक्षाच्या शेगाव अधिवेशनात केले होते . गेल्या दोन वर्षांत घडलेल्या घटनांनी या निदानाची प्रचिती अधिकच प्रखरपणे करून दिली आहे . आज जग दोन परस्परविरोधी गटांमध्ये विभागले गेले आहे . एका बाजूला अमेरिका , इंग्लंड , असलेले इतर देश यांचा युद्धखोर गट व दुसऱ्या बाजूस फ्रान्स आदी साम्राज्यवादी राष्ट्रे आणि त्यांच्या अंकित मोव्हिएट युनियन , चीन , पूर्व युरोपातील समाजवादी राष्ट्र , अरब संयुक्त राष्ट्र , भारत , इंडोनेशिया , सिलोन आदी राष्ट्रांचा शांततावादी गट . साम्राज्यवाद्यांच्या वसाहतवादी आणि युद्धखोर धोरणापासून परावृत्त होऊन अधिकाधिक देश शांततावादी गटात सामील होत आहेत . आशिया , आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील नवोदित स्वतंत्र राष्ट्र साम्राज्यशाही विरोधी व शांततावादी धोरणाचा पुरस्कार करीत आहेत , तर इराकसारखी राष्ट्र स्वदेशातील साम्राज्यशाहीशी हातमिळवणी करणारी प्रतिगामी राजवट बदलून शांततावादी आघाडीत सामील होत आहेत . इजिप्त , सीरिया , इराक , लेबॅनॉन , जॉर्डन , अल्जिरिया , सायप्रस , तैवान इत्यादी ठिकाणी इंग्लंड , अमेरिका , फ्रान्स आदी साम्राज्यवादी देशांचे वसाहतवादी आणि युद्धपिपासू धोरण उघडेनागडे पडले आणि आम शांततावादी व लोकशाहीवादी जनतेने त्यांचा निषेध केला . साम्राज्यवादी राष्ट्रे त्या ठिकाणी एकाकी पडली आणि जगाला युद्धाच्या खाईत लोटण्याचे त्यांचे प्रयत्न एकामागून एक फसले . इराकप्रमाणेच सीरिया आणि गिनीसारख्या राष्ट्रांनी साम्राज्यवाद्यांच्या पाशातून आपली मुक्तता करून घेऊन शांततावादी राष्ट्रांची आघाडी अधिक मजबूत केली . निरनिराळ्या देशांत समाजवादी क्रांतीकरिता व राष्ट्रीय स्वातंत्र्याकरिता चाललेल्या चळवळींच्या हल्ल्यांनी साम्राज्यशाही बेजार झाली आहे . आज साम्राज्यशाहीविरोधी आघाडीत समाजवादी राष्ट्रांतील १०० कोटी जनतेबरोबर नवोदित स्वतंत्र राष्ट्रांतील ७० कोटी जनता सामील झाली आहे . भांडवलशाही देशांतील व राष्ट्रीय स्वातंत्र्याकरिता लढत असलेली वसाहतीतील ६० कोटी जनता याच आघाडीच्या पाठीशी उभी आहे . या उलट सर्वत्र साम्राज्यवादी राष्ट्रांतील लोकसंख्या अवघी ४० कोटी आहे आणि तिच्यातही दुहीची रणे माजू लागली आहेत . परस्परविरोधी हितसंबंध व गळेकापू स्पर्धा यामुळे साम्राज्यवाद्यांचा हा गट आतून पोखरलेला व दुभंगलेला माहे आणि खुद्द या साम्राज्यवादी देशांमध्येच भांडवलशाही समाजपद्धतीच्या जुलमामुळे निर्माण झालेले जनतेच्या असंतोषाचे ज्वालामुखी सतत धुमसत आहेत . साम्राज्यशाहीने सध्याची भांडवलशाही समाजरचना टिकविण्याचे कितीही अवसान आणले तरी भांडवलशाहीचा अस्त आणि समाजवादाचा उदय जगातील कुठलीही शक्ती आता रोखू शकत नाही हे निश्चित झाले आहे. साम्राज्यशाहीच्या युद्धखोर धोरणास पायबंद घालण्यास समग्रशांततावादी जनतेची विरोधी प्रतिक्रिया ज्याप्रमाणे कारणीभूत झाली , त्याहीपेक्षा जगाच्या इतिहासात प्रथमत : च अस्तित्वात आलेलीव कुठल्याही प्रकारच्या युद्धाला प्रखरपणे विरोध करणारी समाजवादी राष्ट्रांची एकवटलेली प्रचंड ताकद कारणीभूत झाली आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे . समाजवादी राष्ट्रांच्या या प्रचंड संघटित ताकदीच्या भीतीमुळेच साम्राज्यवादी राष्ट्रे युद्धाचा जुगार खेळण्यास आज पूर्वीप्रमाणे धजत नाहीत . चाळीस वर्षांपूर्वी रशियात झालेल्या महान समाजवादी क्रांतीमुळे भांडवलदारी समाजपद्धतीला प्रथम भगदाड पडले . दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व युरोपात व आशियात नवी लोकशाही राज्ये उदयास आली व आजवर त्यांची ताकद सारखी वाढत आहे . त्यामुळे आता एखाददुसऱ्या देशातील समाजवाद हे समाजवादाचे स्वरूप न राहता समाजवादी समाजव्यवस्थेस जागतिक समाजव्यवस्थेचे स्वरूप प्राप्त झाले आहे . या समाजपद्धतीला जगातील बहुसंख्य जनतेचा पाठिंबा मिळत चालला असून भांडवलशाही समाजपद्धती जनतेपासून वाढत्या प्रमाणात अलग पडत चालली आहे . समाजवादी समाजपद्धतीचा स्वीकार अनेक राष्ट्रांनी केला आहे ; एवढेच नव्हे , तर समाजवादी जनता भांडवलशाहीला व साम्राज्यशाहीला नवी नवी आव्हाने देत आगेकूच करीत आहे .

समाजवादाच्या या वाढत्या व्यापामुळे समाजवादी शक्तींचे संघटन , सहकार्य व एकजूट निर्माण करण्यात व जगापुढे जनतेच्या मित्रत्वाचे , सहकार्याचे, एकजुटीचे आणि प्रचंड शक्तीचे नवे आदर्श निर्माण करण्यात , समाजवादी राष्ट्रे गुंतून गेली आहेत . शास्त्रीय क्षेत्रात भांडवलशाही राष्ट्रांवर समाजवादी राष्ट्रांनी विजय मिळविले आहेत व यापुढे उत्पादनक्षेत्रातही भांडवलशाही राष्ट्रांवर मात करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून समाजवादी राष्ट्रांनी सतत वाढणारे उत्पादन , मागासलेल्या देशांच्या विकासासाठी मदत व समाजवादी राष्ट्रांत सहकार्य व एकजूट हे कार्यक्रम हाती समाजवादी राष्ट्रातील जनतेस शांततेची आवश्यकता घेतले आहेत . हे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता तत्त्वावर अथवाभारत व चीन या देशांनी घोषित केलेल्या आहे . लेनिनने सांगितलेल्या शांततामय सहजीवनाच्या पंचशील तत्त्वावरच राष्ट्राराष्ट्रांचे संबंध अधिष्ठित असावेत . कुठलेही तत्त्वज्ञान अगर समाजपद्धती जनतेवर सक्तीने लादतायेतनाहीवतसालादण्याचा प्रयत्नकोणी करू नये , अशी समाजवादी राष्ट्रांची भूमिका आहे . शेवटी जीसमाजपद्धती जास्तीत जास्त जनतेचे जास्तीत जास्त हित साधू शकेल , अशा समाजपद्धतीचाच अवलंब जनता करील . तेव्हा भांडवलशाही व समाजवादी राष्ट्रांनी आपापल्या समाजपद्धतीचा वरचढपणा सिद्ध करण्यासाठी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शांततामय स्पर्धा करावी , असा आग्रह समाजवादी राष्ट्र करीत आहेत . आजच्या या अणुयुगात तर शांततामय सहजीवन अगर सर्वनाश हे दोनच पर्याय मानवापुढे आहेत . अशा परिस्थितीत युद्धाची भाषा करणे हे निव्वळ माथेफिरूपणाचे लक्षण आहे . याउलट आज जे शीतयुद्धाचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे , ते नाहीसे करून सबंध कल्याणाकरिता जगातील साधनसंपत्तीचा उपयोग करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत , मानवजातीच्या अशी ठाम भूमिका समाजवादी राष्ट्रांनी घेतली आहे . याकरिता नि : शस्त्रीकरण , अणुचाचणी प्रयोगबंदी , शिखर परिषद , राष्ट्राराष्ट्रातील आर्थिक सहकार्य व मागासलेल्या देशांना आर्थिक व तांत्रिक मदतीची योजना इत्यादीबाबतीत समाजवादी राष्ट्रांनी सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखाली सतत पुढाकार घेतला आहे . अणुचाचणी प्रयोग काही काळ एकाकी बंद करून सोव्हिएत युनियनने या प्रश्नाबाबतीतील आपली कळकळ जगाला दाखवून दिली आहे . मागासलेल्या राष्ट्रांना अत्यंत अल्प मोबदल्यात व कुठल्याही प्रकारच्या राजकीय लाग्याबांध्याशिवाय आर्थिक मदत देऊन आपल्या नि : स्वार्थ मदतीची ग्वाही समाजवादी राष्ट्रांनी जगाला दिली आहे . शीतयुद्धाचे वातावरण नाहीसे होऊन जगात शांततेचे आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्यास समाजवादी राष्ट्रांचा आर्थिक विकास झपाट्याने होईल व इतर राष्ट्रांना मदत करण्याची त्यांची शक्ती प्रचंड प्रमाणात वाढेल . आजच्या या शीतयुद्धाच्या वातावरणातदेखील समाजवादी राष्ट्रांनी आपला आर्थिक विकास द्रुतगतीने करून घेतला आहे . समाजवादी राष्ट्रांचा आंतरराष्ट्रीय व्यापार वाढू लागला आहे .

साम्राज्यवाद्यांच्या बाजारपेठा दिवसेंदिवस कमी होत आहेत व जगाच्या बाजारपेठांत व्यापारी चढाओढीत त्यांना समाजवादी राष्ट्रांशी सामना द्यावा लागत आहे . अजूनपर्यंत आर्थिक मदतीसाठी मागासलेल्या देशांना साम्राज्यवाद्यांच्याच पायाशी जाणे भाग पडत होते . त्यामुळे राजकीय व आर्थिकदृष्ट्या जबर किंमत दिल्याखेरीज त्यांना ही मदत मिळत नसे . परंतु मागासलेल्या राष्ट्रांना मदतीचा हात देण्यास आज समाजवादी राष्ट्रे पुढे सरसावत असल्यामुळे गरजू देशांना आपल्या आर्थिक विकासासाठी साम्राज्यवाद्यांवर अवलंबून राहण्याची यापुढे गरज राहिली नाही .

चोहोबाजूंनी एकाकी पडत चाललेल्या साम्राज्यवाद्यांना समाजवादी राष्ट्रांचा हा वाढता प्रभाव दिवसेंदिवस असह्य होऊ लागला आहे . एका बाजूला स्वदेशातील भांडवलशाहीचा कोसळत चाललेला डोलारा सावरून धरण्यासाठी नवनवीन बाजारपेठा पादाक्रांत करण्याकरिता व असलेल्या बाजारपेठा टिकवून धरण्याकरिता ते धडपड करीत आहेत . तर दुसरीकडे स्वदेशातील जनतेच्या असंतोषाचे उद्रेक , वसाहतीतील जनतेचे स्वातंत्र्यलढे व समाजवादी राष्ट्रांशी व्यापारी स्पर्धा यांना तोंड देता देता ते बेजार झाले आहेत . हे संकट टाळण्याकरिता तथाकथित स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाने त्यांनी आरडाओरड करावयास सुरुवात केली आहे व कम्युनिझम आणि कम्युनिस्ट राष्ट्र यांचा बागुलबोवा दाखवून अनेक लहानमोठ्या देशांना निरनिराळ्या लष्करी करारांच्या दावणीत घट्ट जखडून टाकले आहे . नॅटो , सीटो , आन्जुझ व बगदाद करार यांना या उद्देशानेच जन्म देण्यात आला . या करारांद्वारे निरनिराळ्या देशांत मिळून २५० च्या वर लष्करी तळ ठोकण्यात आले आहेत . या करारात अडकलेले देश राजकीय , आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या या साम्राज्यवादी राष्ट्रांचे गुलाम झाले आहेत . लष्करी कराराद्वारे निर्माण झालेल्या या वसाहती टिकविण्याकरिता सतत अशांततेचे व असुरक्षिततेचे वातावरण राखणे आवश्यक असल्यामुळे निःशस्त्रीकरण , अणुचाचणी प्रयोगबंदी , शिखर परिषद , चीनचे युनोतील प्रतिनिधित्व अगर आर्थिक सहकार्य इत्यादीसारख्या शीतयुद्धाचे निर्मूलन करणाऱ्या योजनांना साम्राज्यवादी राष्ट्रे सतत बगल देत उलट आपल्या आणि आपल्या अंकित असलेल्या देशांतील अर्थव्यवस्थेचे लष्करीकरण करणे , शस्त्रास्त्रांचा साठा वाढविणे , अणुचाचणी - प्रयोगांची संख्या वाढविणे , समाजवादी राष्ट्रांभोवती लष्करी कडे उभारणे , नवोदित स्वतंत्र राष्ट्राराष्ट्रांत संघर्ष निर्माण करणे , शांततावादी राष्ट्रांच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करून तिथे यादवी युद्धे पेटविणे व दहशतवादी कृत्यांना उत्तेजन देणे आणि लष्करी बंड घडवून आणून जनतेची प्रातिनिधिक राजवट उलथून पाडणे इत्यादींसारख्या युद्धखोर आणि छुप्या आक्रमक ( Indirect Aggres sion ) धोरणाचा अवलंब साम्राज्यवादी राष्ट्र आंतरराष्ट्रीय राजकारणात सतत करीत आहेत . " शांतता म्हणजे भांडवलशाही समाजपद्धतीचा मृत्यू " हे ओळखूनच शीतयुद्धाचे वातावरण पद्धतशीर निर्माण करण्यात व राबवण्यात येत आहे . याउलट शांतता प्रस्थापित झाल्यास समाजवादी राष्ट्र प्रबळ होतील , त्यांच्याशी करावयाच्या स्पर्धेत आपण निश्चित मागे पडू , एवढेच नव्हे , तर स्वदेशातील जनता जागृत होऊन भांडवलशाही समाजपद्धती बदलून त्या ठिकाणी समाजवादी समाजपद्धती स्थापण्याकरिता चळवळ करील हे ओळखूनच शांतता निर्माण होऊ नये म्हणून साम्राज्यवादी राष्ट्रे आटोकाट प्रयत्न करीत आहेत , मागासलेल्या राष्ट्रांकडे स्वदेशाच्या बाजारपेठा म्हणूनच पाहण्यात येत असल्यामुळे त्यांचे औद्योगिकीकरण व्हावे अगर आर्थिक विकास साधावा म्हणून त्यांना साम्राज्यवादी आर्थिक मदत देण्यास तयार नाहीत . उलट अशा राष्ट्रांना मदत करण्यामागे त्यांना आर्थिक , राजकीयदृष्ट्या अधिक परावलंबित करणे हा त्यांचा उद्देश असतो असा आजवरचा अनुभव आहे . मागासलेल्या राष्ट्रांच्या आर्थिक निकडीचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून भरमसाट सवलती मिळवावयाच्या व त्यांच्या आर्थिक व राजकीय जीवनावर पकड मिळवून त्यांना कायमचे गुलाम बनवावयाचे हा साम्राज्यवाद्यांचा जुना डाव आहे व तोच ते आज खेळत आहेत .

भारत सरकारने आजवर इंडोनेशिया , इजिप्त , सिलोन आदी देशांतील सरकारांप्रमाणेच साम्राज्यवाद्यांच्या युद्धखोर व वसाहतवादी धोरणास विरोध केला व शांततावादी धोरणाचा सतत पुरस्कार केला आहे . परंतु भारत सरकार हे शांततावादी राष्ट्रांच्या गटात समाजवादी राष्ट्रांवरील प्रेमामुळे अगर साम्राज्यवादी राष्ट्रांना विरोध करण्याकरता सामील झालेले नाही . भारतीय जनतेत असलेल्या साम्राज्यशाहीविरोधी तीव्र भावना , जागतिक बाजारपेठेत व देशातील औद्योगिक क्षेत्रात , देशातील बड्या भांडवलदारांना परदेशी मक्तेदार भांडवलदाराविरुद्ध द्यावा लागणारा सामना , आशिया , आफ्रिकेतील सर्व लोकशाहीवादी जनतेने साम्राज्यवाद्यांविरुद्ध उघडलेली जोराची मोहीम , या सर्वांचा परिणाम म्हणूनच भारत सरकारला आज शांततावादी राष्ट्रांच्या शांतता प्रस्थापनेच्या कार्यात सहकार्य करावे लागले आहे. यामुळे शांतता आघाडी मजबूत होण्यास मदत झाली आहे . भारत सरकारची ही भूमिका स्वागतार्ह असली तरी साम्राज्यशाहीकडून लॅटीन , अमेरिका , आफ्रिका आणि आशियात इतर देशांवर अत्याचार व आक्रमण होत असताना तटस्थतेच्या नावाखाली भारत सरकारने वेळोवेळी त्रयस्थाचीच भूमिका घेतली आहे . भारत सरकारची हीच वृत्ती आशिया , आफ्रिका व लॅटीन अमेरिकेतील स्वातंत्र्यलढ्याबाबत दिसून येते . साम्राज्यवादी राष्ट्रांच्या वसाहतवादी व धोरणास तीव्र विरोध करून आक्रमकांच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या राष्ट्रांना आणि वसाहतींतील स्वातंत्र्यलढ्यांना : संदिग्धपणे पाठिंबा देण्याऐवजी “ शांततेने प्रश्न मिटवा " असा त्रयस्थाचा सल्ला देण्यापलीकडे भारत सरकारने आपले कर्तव्य पार पाडले नाही .

मध्यपूर्वेतील साम्राज्यवाद्यांचे आक्रमण व अल्जिरिया आणि सायप्रस याबाबतीत भारत सरकारने स्वीकारलेली भूमिका या धोरणाची साक्ष देईल . स्वातंत्र्यप्रिय आणि शांततावादी जनतेची एकजूट करण्यात व त्यांची युद्धविरोधी संघटित आघाडी उघडण्यात भारत सरकारने पुढाकार घ्यावयास पाहिजे . केवळ शाब्दिक निषेध अगर पाठिंबा व्यक्त करून भागणार नाही . सबंध जगातील शांततावादी जनतेची एकजूट झाली तर तिसरे महायुद्ध टाळता येणे सहजशक्य आहे , हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे . भारत सरकारच्या या धरसोडीच्या वृत्तीमुळेच काश्मीर व गोव्याबाबत भारत सरकारने चुकीची भूमिका स्वीकारली आहे.

साम्राज्यवाद्यांच्या कुटील नीतीचा आखाडा संयुक्त राष्ट्र संघटनेकडे काश्मीर प्रश्न नेण्यात भारत सरकारने चूक केली आहे . इतकेच नव्हे , तर काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे अनेकवार आवर्जुन जाहीर केल्यानंतरसुद्धा भारत सरकारने याबाबत वेळोवेळी घेतलेली भूमिका डळमळीत आहे असेच म्हणावे लागते . काश्मीरच्या व कालव्याच्या प्रश्नामध्ये युनोमार्फत साम्राज्यशाही राष्ट्रांना हस्तक्षेप करण्याची संधी भारत सरकार आपण होऊन देत आहे . या संधीचा फायदा घेऊन भारताच्या परराष्ट्रीय धोरणाला साम्राज्यशाही [ असे वळण लावण्याचे इंग्लंड , अमेरिकेचे जे प्रयत्न चालू आहेत त्यांना पायबंद घालणे अत्यावश्यक आहे . म्हणून भारताने काश्मीरचा व कालव्याच्या युनोमधून त्वरित काढून घ्यावा . या प्रश्नांची सोडवणूक भारत व साम्राज्यवाद्यांच्या दडपणाखाली मुक्त झालेले पाकिस्तान यांना आपसात वाटाघाटी करूनच केली पाहिजे . तसेच गोव्याच्या प्रश्नाबाबतीतही भारत सरकारचे धोरण धरसोडीचेच आहे . गोवा भारताचा अविभाज्य भाग आहे एवढेच केवळ जाहीर करून भारत सरकारचे कर्तव्य संपले असे समजण्याची सरकारची वृत्ती निषेधार्ह आहे . गोव्यातील स्वातंत्र्यसंग्रामास सक्रिय पाठिंबा देणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे . ते डावलून शांततेच्या गोंडस बुरख्याआड गोव्याबाबत भारत सरकारने घेतलेल्या निष्क्रिय भूमिकेमुळे अमेरिकन साम्राज्यवादी गोव्याला साम्राज्यवाद्यांचा लष्करी तळ बनवू शकले आहेत व त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यालाच मुळी जबरदस्त धोका निर्माण झाला आहे .

पाकिस्तानमध्ये लष्करी राजवट स्थापन झाली आहे , या घटनेपासूनही भारत सरकारने व भारतीय जनतेने धडा घेणे आवश्यक आहे . पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच तेथे लोकशाही चळवळ दुर्बल होती . तसेच तेथील मागासलेल्या अर्थव्यवस्थेवर साम्राज्यवादी शक्तींनी आपली पोलादी पकड भक्कम केली आणि पाकिस्तानचा भारत व रशिया यांच्याविरुद्ध लष्करी तळ बनविण्याचा व पर्यायाने भारत सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला . या घटनांचा परिपाक म्हणून पाकिस्तानात नाममात्र असलेली लोकशाही यंत्रणा कोलमडून पडली व साम्राज्यवाद्यांनी पडद्याआड राहून तेथे लष्करी राजवट जन्माला आणली . साम्राज्यवाद्यांच्या या कुटील नीतीची डोळस दखल भारत सरकारने व भारतीय जनतेने घेणे अत्यावश्यक आहे . भारत सरकारने समाजवादी समाजव्यवस्थेच्या नावाने जरी टिळा लावला असला तरी भारतात भांडवलशाही समाजव्यवस्थाच बळकट करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे . भारतीय अर्थव्यवस्थेवरील परकीय भांडवलाची पकडही उत्तरोत्तर बळकट होत आहे . गेल्या दहा वर्षांत या देशातील परकीय भांडवलाची आयात दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे . भारतीय अर्थव्यवस्था ही परकीय भांडवलावर अधिकाधिक अवलंबून राहू लागली आहे व यापुढील काळात हे परावलंबित्व अधिकच वाढणार आहे . भारतीय जनतेच्या दृष्टीने अहितकारक अशा अनेक सवलती परकीय भांडवलास देण्यात आलेल्या आहेत . परकीय भांडवलदार व देशी भांडवलदार यांची अनेक क्षेत्रांत अनिष्ट युती झाली आहे . भांडवलशाही राष्ट्रांकडून मिळणाऱ्या कर्जाचीही तीच अवस्था आहे . शेकडा ५ ते ६ टक्क्याने मिळणाऱ्या या महागड्या कर्जामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर असह्य बोजा निर्माण झाला आहे व तो नजीकच्या भविष्यकाळात अधिकच वाढणार आहे . परकीय भांडवलाने भारतीय अर्थव्यवस्थेवर बसविलेल्या या पकडीमुळे भारताच्या भवितव्याला मोठा धोका निर्माण झाला आहे . याउलट समाजवादी राष्ट्रांकडून मिळणारी आर्थिक मदत कमी व्याजाने मिळते . सोव्हिएत युनियनने तर केवळ २॥ टक्के व्याजाने अशी मदत दिली आहे . भारतालाही अशी मदत देण्यात आली आहे . परंतु भारत सरकारने या मदतीचा फायदा फार कमी प्रमाणात घेतला आहे . ३१ मार्च १९५८ पर्यंत भारतात आयात झालेल्या एकंदर ८५९ कोटी रुपये परकीय भांडवलापैकी फक्त १२३ कोटी रुपयांची मदत सोव्हिएत युनियनकडून घेण्यात आली . भारत सरकारने परदेशाकडून घ्यावयाच्या मदतीबाबतचे सध्याचे धोरण बदलून समाजवादी राष्ट्रांकडून जास्तीत जास्त मदत स्वीकारणे सर्व प्रकारे इष्ट आहे . समाजवादी देशांशी अधिकाधिक आर्थिक व व्यापारी करार करून भारताचा आर्थिक विकास साधण्याकरिता व त्या देशांशी असलेले भारताचे व्यापारी संबंध दृढ करण्याकरिता भारत सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.

युद्धखोर साम्राज्यवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडावयाचे असतील तर जगातील समाजवादी आणि शांततावादी शक्तींची वाढ झाली पाहिजे . आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत सरकारने स्वीकारलेली तटस्थतेची भूमिका युद्ध , वसाहतविरोधी धोरणात डळमळीतपणा व निष्क्रियता निर्माण करीत आहे . तसेच कॉमनवेल्थचे सभासदत्व स्वीकारून व ते अजूनही तसेच चालू ठेवून भारत सरकार आपल्या स्वातंत्र्यावर व परराष्ट्रीय धोरणावर प्रच्छन्नपणे बंधने लादून घेत आहे . या सर्व गोष्टींची भारतीय जनतेने जागृत दखल घेतली पाहिजे . जगातील शांततावादी व समाजवादी शक्तींचे संवर्धन होईल आणि साम्राज्यवाद्यांच्या युद्धखोर व वसाहतवादी धोरणाला पायबंद बसेल अशीच भूमिका आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत सरकारने घेणे जरूर आहे . भारतीय जनतेने भारत सरकारला तशी भूमिका घेण्यास भाग पाडले पाहिजे .

*पंचवार्षिक योजना व आर्थिक परिस्थिती*

शेगाव येथे भरलेल्या पक्षाच्या ५ व्या अधिवेशनामध्ये ( डिसेंबर १९५६ ) स्वीकारलेल्या राजकीय ठरावात पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या यशाची आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्याची छाननी केली होती . ही योजना सर्वसामान्य नागरिकाला दिलासा देऊ शकणार नाही , अशी दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची कुडली त्या ठरावात मांडण्यात आली होती . दुसऱ्या योजनेचे त्या ठरावात केलेले निदान अचूक असल्याचा निर्वाळा गेल्या दोन वर्षांतील घटनांनी दिला आहे . योजनेत गोंडस आश्वासनांचा कितीही पाऊस पाडण्यात आला असला तरी प्रत्यक्षात जनतेला खऱ्या अर्थाने फायदा झालेला नाही . सर्वसामान्य जनतेची दैन्यावस्था आणि हलाखी दिवसेंदिवस वाढत आहे . निरनिराळ्या करांच्या ओझ्याने वाकून दामटी झालेल्या आणि श्रमाने पिचून गेलेल्या जनतेला पोटाची आग शमविण्यासाठी भाकरीच्या तुकड्यापायी दंगली करण्याची पाळी आली आहे . ज्या देशातील शे . ६९ लोक शेतीव्यवसायावर अवलंबून आहेत , अशा भारतासारख्या शेतीप्रधान राष्ट्राने परक्या व साम्राज्यवादी राष्ट्रांपुढे लाचारीने तोंड वेंगाडून भाकरीसाठी पदर पसरावा यातच आमच्या राज्यकर्त्यांच्या आर्थिक धोरणाची दिवाळखोरी स्पष्ट होते . पंचवार्षिक योजनांच्या यशाचे ढोल बडविण्यात मश्गुल झालेल्या नेहरू सरकारला भुकेकंगाल जनतेच्या आर्त किंकाळ्या ऐकू येत नसल्यास काहीच नवल नाही . आज पुन्हा एकवार या देशाच्या खऱ्या दुखण्यावर बोट ठेवणे जरूर झाले आहे . पहिली पंचवार्षिक योजना ही दुसऱ्या योजनेचा पाया असल्याने तिच्या यशापयशावर दुसऱ्या योजनेचे यशापयश अवलबून होते . पहिल्या योजनेमुळे शेतीसुधारणा झाली असती तर दुसऱ्या योजनेत अंतर्भूत केलेल्या औद्योगिकीकरणाचा पाया घातला गेला असता . परंतु पहिली योजना अयशस्वी झाली आणि शेतीचा मागासलेपणा जसाच्या तसाच राहिला . १९५३-५४ साली निसर्गाच्या अनुकूलतेमुळे अर्थ पहिली योजना यशस्वी झाली असा लावण्यात आला . परंतु १९५३-५४ सालचे अन्नधान्याचे उत्पादन हा एक अपघात होता , हे आज स्पष्ट झाले आहे . त्या उत्पादनवाढले . त्या वर्षी अन्नधान्याचे जेवढे उत्पादन झाले तेवढे उत्पादन आजतागायत कोणत्याच वर्षी झालेले नाही हे खालील तक्त्यावरून स्पष्ट होईल .

अन्नधान्य उत्पादन ( लक्ष टन )

वर्ष -------------------------- उत्पादन

१९५३-५४ -------------------------- ६८७.२

१९५४-५५ -------------------------- ६६६.०

१९५५-५६ -------------------------- ६५२.९

१९५६-५७ -------------------------- ६८६.९

१९५७-५८ -------------------------- ६२१.०

(इकॉनॉमिक सर्व्ह १९५७-५८ गव्हमेंट ऑफ इंडिया , प्रकाशन .)

---------------------

याचा अर्थच हा की , १९५३-५४ साली जे अन्नधान्याचे उत्पादन झाले ते योजनेच्या प्रयत्नामुळे झाले नसल्याने उत्पादनाची ती पातळी पुढील काळात टिकू शकली नाही . अजूनही निसर्गाच्या बिनदिक्कत लहरीवर आणि सुलतानशाहीवर आमची शेती अवलंबून आहे ही गोष्ट लक्षात घेता पहिल्या योजनेचे अपयश कोणालाही नाकारता येणार नाही . पहिल्या योजनेच्या काळात आपणाला १३५ लक्ष २० हजार टन अन्नधान्याची आयात करावी लागली ही गोष्ट लक्षात घेता आणि आजही दरवर्षी ३० ते ३५ लाख टन अन्नधान्याची आयात केली जात असतानाही या देशातील जनतेला पोटभर अन्न मिळू शकत नाही ही गोष्ट ध्यानात घेता पहिली योजना यशस्वी झाल्याचा सरकारी प्रचार म्हणजे पोकळ बकवा आहे हे कोणीही सुज्ञ मान्य करील . पहिली योजना अपेशी झाल्याने दुसऱ्या योजनेचा पायाच उखडला गेला . तथापि ही योजना यशस्वी झाली अशी खोटीच समजूत करून घेऊन आमच्या राज्यकर्त्यांनी दुसऱ्या योजनेचा इमला उभारला . पाया नसलेला हा हवेतला मनोरा कोणत्याही क्षणी कोसळून पडेल असा धोका निर्माण झाला आहे . या बाबतीत शेगाव ठरावात केलेले निदान अचूक ठरले आहे .

काँग्रेस राज्यकर्त्यांनी आवडी अधिवेशनापासून समाजवादी समाजरचनेचे टाळ उठताबसता कुटायला सुरूवात केली आहे . तथापि समाजवादी समाजरचना म्हणजे काय याची व्याख्या मात्र ते करू इच्छित नाहीत . दुसरी पंचवार्षिक योजना आखताना योजनेची उद्दिष्टे म्हणून खाली नमूद केलेल्या चार गोष्टी सांगण्यात आल्या होत्या .

( १ ) जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढविणे .

( २ ) झपाट्याने औद्योगिकीकरण घडवून आणणे व विशेषतः मूलभूत व जड उद्योगधंद्यांच्या वाढीवर भर देणे .

( ३ ) फार मोठ्या प्रमाणावर रोजगारधंदा उपलब्ध करणे .

( ४ ) मिळकत व संपत्ती क्षेत्रातील विषमता कमी करणे व आर्थिक सामर्थ्याची अधिक समप्रमाणात विभागणी करणे .

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची पहिली तीन वर्षे जवळजवळ संपत आली आहेत . या तीन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला तर दुसरी पंचवार्षिक योजना आपली उद्दिष्टे पुरी करूं शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे . दुसऱ्या योजनेत एकूण ४८०० कोटी रु . खर्चाची तरतूद होती ; परंतु एवढी रक्कम उपलब्ध होणार नाही असे योजनाकारांना दिसून आले व योजनेच्या काटछाटीची भाषा सुरू झाली . योजनेच्या काळात प्रत्यक्षात ४२६० कोटी रुपये उपलब्ध होतील , असा सूर काही दिवस निघत होता . तथापि योजनेच्या काळात ४५०० कोटी रुपये उभारण्याचा निर्धार सध्या नियोजनमंत्र्यांनी व्यक्त केला आहे . नियोजनमंत्र्यांच्या आशावादावर विश्वास ठेवला तरी योजनेत नमूद केलेली लक्ष्ये प्रत्यक्षात ७५ टक्क्यांनीदेखील साध्य होणार नाहीत हे आज उघड झाले आहे . अशा योजनेद्वारा समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचा काँग्रेसचा बकवा निखालस ढोंगीपणाचा आहे . नियोजनकारांच्या मते आमचे राष्ट्रीय उत्पन्न दुसऱ्या योजनेच्या सुरुवातीला १०८०० कोटी रु . होते . योजनेच्या अखेरीस ते १३४८० कोटी रुपयांवर जाणार आहे . दरडोई उत्पन्न २८१ रुपयांवरून ३३१ रुपयांवर जाईल , असे आश्वासन योजनाकारांनी दिले होते . राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली की दरडोई उत्पन्नात वाढ होतेच असे मानता येत नाही . कारण राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी झाली नाही तर राष्ट्रीय उत्पन्न प्रत्यक्षात वाढत असतानासुद्धा जनतेचे जीवनमान खालावत जाते , हा भांडवलशाही समाजव्यवस्थेचा अनुभव आहे . नियोजित अर्थव्यवस्थेचे उत्पादन आणि विभागणी हे दोन अविभाज्य घटक आहेत . राष्ट्रीय उत्पन्नात नियोजनकारांनी जी वाढ अपेक्षित केली आहे तेवढी वाढ झालेली नाही व होत नाही . तथापि राष्ट्रीय उत्पन्नात जी काही वाढ झाली असेल ती थैलीशहांनी गिळंकृत केली आहे . सर्वसामान्य नागरिकांच्या वाट्याला त्या वाढीचा काही हिस्सा मिळू शकला नाही.

योजनेच्या काळात अपेक्षित केलेली भांडवलनिर्मिती होऊ शकली नाही म्हणूनच योजना धोक्यात आली आहे . १९५५-५६ साली राष्ट्रीय उत्पन्नाच्या ७ टक्के रक्कम नवीन उद्योगधंद्यांत गुंतविण्यासाठी भांडवल म्हणून उपलब्ध होत होती . दुसऱ्या योजनेच्या अखेरीला म्हणजे १९६०-६१ साली भांडवलनिर्मितीचा वेग ११ टक्क्यावर जाणार असे योजनेत अभिप्रेत होते . याच अपेक्षेने योजनेचा खर्च ४८०० कोटी रु . आखण्यात आला होता . तथापि अपेक्षेप्रमाणे भांडवलनिर्मिती होऊ शकली नाही ; म्हणूनच योजनेच्या खर्चाला कात्री लावावी लागली . सर्वसाधारण जनतेचे उत्पन्न वाढविल्याशिवाय तिची बचतशक्ती व भांडवलनिर्मिती केवळ अशक्य आहे. जनतेची क्रयशक्ती कमी झाली की औद्योगिकीकरणाच्या मार्गात भलीमोठी धोंड निर्माण होते . पक्क्या मालाची बाजारपेठसंकुचित होतेवपरिणामी उत्पादनाच्या नाड्या आखडल्या जाऊन हे आर्थिक अरिष्ट तीव्र होत होत शेवटी उत्पादक यंत्राची चाके थंडगार होतात . आजच्या घटकेला भारतातील आर्थिक अरिष्टाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत . आर्थिक अरिष्ट हा भांडवलदारी समाजव्यवस्थेचा स्थायीभाव आहे , तर नियोजित अर्थव्यवस्था हा आर्थिक अरिष्टावर एकमेव तोडगा आहे . ज्या अर्थी या देशातील अर्थव्यवस्था आर्थिक अरिष्टाला आळा घालू शकत नाही त्या अर्थी ही अर्थव्यवस्था नियोजित नाही हे उघड आहे . या देशातील शेतीचे उत्पादन खालावत असल्याचे वर स्पष्ट केले आहेच . औद्योगिक क्षेत्रातही उत्पादनाचा वेग बऱ्याच प्रमाणात मंदावला आहे . नियोजनमंत्री नंदा यांनी ता . १७ - ९ -५८ रोजी लोकसभेत अशी कबुली दिली की , औद्योगिक उत्पादनाच्या बाबतीत लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रगतीचा वेग मंदावला आहे १९५६-५७ साली औद्योगिक उत्पादनात ८.६ टक्के वाढ झाली . याउलट १९५७-५८ साली फक्त १.५ टक्के वाढ झाली . जनतेचे जीवनमान उंचावण्याचे उद्दिष्ट साध्य झाले नाही ; एवढेच नव्हे , तर ते दरवर्षी खालावत जात आहे योजनेसाठी लागणारा पैसा उभारताना भांडवलदारांच्या तिजोरीकडे पाठ फिरवून गोरगरीब जनतेच्या फाटक्या खिशावर हात मारण्याचा पराक्रम अर्थमंत्र्यांनी केला आहे . अबकारी करात दरवर्षी भरमसाट वाढ होत आहे . १९४८-४९ साली अबकारी कराचे उत्पन्न ५० कोटी ६३ लक्ष रुपये होते . १९५२-५३ साली ते ८३ कोटी ३ लाख रुपयांवर गेले . १९५४-५५ साली त्याने १०८ कोटी २२ लाख रुपयांपर्यंत मजल मारली . त्यानंतर मजल दरमजल करीत या कराची घोडदौड १९५७-५८ सालात २६२ कोटी ८३ लाख रुपयांवर पोचली आहे . कापडावरील अबकारी कराने तर जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे असेच म्हणावे लागेल . १९४८-४९ साली कापडावरील करांचे उत्पन्न ८७ लाख रुपये होते . १९५७-५८साली या कराचे उत्पन्न ७२ कोटी रुपयांवर गेले आहे . १९४८ साली एकूण ४३१ कोटी ९३ लक्षवार कापड तयार झाले तर १९५७ साली ५३१ कोटी ७४ लक्षवार कापड तयार झाले.या काळात कापडाचे उत्पन्न परंतु कापडावरील कर मात्र ८३ पटीने वाढला ! रॉकेलवरील कर १२ पटीने वाढला आणि आजतर अनेक ठिकाणी रॉकेलची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे .. नागरिकांना कामधंदा सोडून रॉकेल मिळविण्यासाठी मैलमैलभर लांबीच्या रांगा कराव्या लागत आहेत . आगपेटीवरील कर दुप्पट झाला तर साखरेवरील कराने ५॥ पटीने आगेकूच केली आहे . जनतेच्या जीवनोपयोगी वस्तूंवर करवाढ झाल्याने नागरिकांना जीवन असह्य झाले आहे . प्रत्यक्ष ( Direct ) करांचे प्रमाण दरवर्षी घसरत आहे व सर्वसाधारण जनतेच्या मानगुटीवर बसणारे अप्रत्यक्ष ( Indirect ) कर दरवर्षी वाढत आहेत . १९५५-५६ मध्ये प्रत्यक्ष करांचे प्रमाण ३५.३ टक्के होते , १९५६-५७ मध्ये ३४.८ टक्क्यापर्यंत उतरले व १९५७-५८ साली ते ३४.६ टक्क्याइतके घसरले . १९५५ ते ५८ या काळात प्रत्यक्ष करामध्ये ३२.३ टक्क्यांनी वाढ झाली ; तर त्याच काळात अप्रत्यक्ष करात ३६.७ टक्क्यांनी वाढ झाली . यावरून या सरकारच्या करवसुलीचा रणगाडा कोणत्या वेगाने व दिशेने चालला आहे याची कल्पना येऊ शकेल . दुसऱ्या योजनेच्या कालखंडात नवीन करांच्याद्वारा ४५० कोटी रुपये उभारले जाणार होते . यापैकी २२५ कोटी रुपये केंद्र सरकारने व उरलेले २२५ कोटी रुपये राज्य सरकारांनी उभारावे असे ठरले होते . प्रत्यक्षात मात्र केंद्र सरकारने नवीन करांचा रामरगाडा एवढा जोराने चालू ठेवला आहे . श्री योजनेच्या कामात नवीन करांच्याद्वारा २२५ कोटी रुपयाऐवजी २५ बोटी सपने उपलब्ध होणार आहेत . म्हणजेदनमा करोच्चाद्वारा उरलेल्या रकमेपेक्षा ५०० कोटी.अधिक मूल केते जाणार आहेत . ( Page 11. Appraisal and the Prospects of the Second Five Year Plan ) जनतेचे रक्तशोषण करून योजनेच्या नावावर उभारलेला हा पैसा बोजनेव्यतिरिक्त इतर थातूरमातूर बाबीवर खर्च करण्यात आला ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे . १९५६-५७ सालात केंद्र सरकारने योजनेखाली ३४२ कोटी खर्च केले , तर याच साली योजनेबाहेर ४०२ कोटी रुपये खर्च झाले . योजनेबाहेर खर्च झालेल्या ४०२ कोटी रुपयांपैकी फक्त ३७ कोटी रुपये विकासाच्या कार्यक्रमावर खर्च झाले , तर ३६५ कोटी रुपये बिगर विकासाच्या ( Non - development ) बाबींवर उडविण्यात आले .१९५७-५८ साली बोजनेखाली ५०० कोटी रु . खर्च करण्यात आले , तर ६२८ कोटी रुपये योजनेबाहेरील बाबींवर खर्च झाले . योजनेबाहेर खर्च झालेल्या ६२८ कोटी रुपयांपैकी फक्त ९४ कोटी रुपये विकासाच्या कार्यक्रमावर ( Development expenditure ) खर्च झाले आणि ५३४ कोटी रुपये बिगर विकासाच्या ( Non - development ) बाचीवर उधळण्यात आले . दोन वर्षात योजनेखाली ८४२ कोटी रुपये खर्च झाले , तर बोजनेबाहेरील बाबींवर १०३० कोटी रुपये खर्च झाले .

राज्य सरकारांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास , ९५६-५७ सालात योजनेखालील बाबीवर २ ९ २ कोटी रुपये खर्च झाले ; तर याच वर्षी योजनेबाहेरील बाबींवर ६८० कोटी रुपये खर्च झाले .१ ९५७-५८ साली योजनेखालील बाबींवर ३ ९९ कोटी रुपये तर योजनेबाहेरील गोष्टीवर ६२४ कोटी रुपये खर्च झाले . म्हणजेच दोन वर्षांत राज्य सरकारांनी योजनेतील बाबींवर ६९१ कोटी रु . खर्च केले तर योजनेबाहेरीत बाबींवर १३०४ कोटी रु . खर्च केले . योजनेच्या पहिल्या दोन वर्षात केंद्र सरकारवराज्य सरकारांनी मिळून योजनेत अंतर्भूत असलेल्या कार्यक्रमावर १५३३ कोटी रु . खर्च केले , तर योजनेत समाविष्ट नसलेल्या बाबींवर २३३४ कोटी रू . खर्च केले , ही गोष्ट लक्षात घेता आमच्या योजनेला ' नियोजित अर्थव्यवस्था ' म्हणणाऱ्यांच्या अंगी अजब धाडस तरी पाहिजे किंवा कमालीचा कोडगेपणा तरी पाहिजे . फायनान्स कमिशनने आपल्या निवाड्यानुसार राज्य सरकारांनाजे १६० कोटी रुपये दिले ती रकम योजनेच्या बाहेरील बाबींवर खर्च करून राज्य सरकारे आपले हात झाडून रिकामी झाली आहेत.

योजनेच्या पहिल्या वर्षी ३८७ कोटी रुपयांची तूट झाली तर दुसऱ्या वर्षी ही तूट ४११ कोटी रुपयांवर जाऊन योजनेच्या पहिल्या दोन वर्षातच एकूण ७ ९ ८ कोटी रुपयांची तूट आली आहे . पुढील तीन वर्षात ही तूट सारखी वाढत जाणार अशी चिन्हे दिसत आहेत . नियोजनमंत्री नंदा यांनी लोकसभेत ता . १७ - ९ -५८ रोजी केलेल्या भाषणावरून , योजनेत अभिप्रेत धरलेली तूट ११०० कोटी रुपयांवरून १९०० कोटी रुपयांवर जाणार हे स्पष्ट झाले आहे . परंतु योजनेबाहेरील बाबींवर अवास्तव खर्च करण्याचे आत्मघातकी धोरण राज्यकर्त्यांनी असेच चालू ठेवले व राज्यकारभाराच्या खर्चात होत असलेली उधळपट्टी अशीच चालू राहिली तर योजनेतील तूट १९०० कोटी रुपयांची मर्यादा ओलांडण्याचा धोका दिसत आहे . भारताची निर्यात वाढविण्यात अपयश आले आणि आयात मात्र वाढत आहे . १९५६-५७ साली ६३७ कोटी रुपयांचा माल निर्यात झाला , तर त्या वर्षी १०७६.५ कोटी रुपयांचा माल आयात करण्यात आला . निर्यातीपेक्षा आयात ४३९ .५ कोटी रुपयांनी वाढली . १ ९५७-५८ च्या पहिल्या सहामाहीत ( एप्रिल ते सप्टेंबर ) २६७.१ कोटी रुपयांची निर्यात झाली ६२२.२ कोटी रुपयांची आयात करण्यात आली . म्हणजे फक्त ६ महिन्यांच्या अवधीत आमच्या आयातीने निर्यातीवर ३५५.१ कोटींनी मात केली आहे . साहजिकच याचा परिणाम म्हणून परदेशी चलन साठ्याची घसरगुंडी सुरू झाली . मार्च १९५६ मध्ये आपणाकडे ७४६.१४ कोटी रुपयांचे परदेशी चलन होते . ते कमी होत होत मार्च १९५७ मध्ये ५२६.८३ कोटी रुपयांवर आले . मार्च १ ९ ५८ मध्ये ते २६७ कोटी रुपयांपर्यंत घसरले . ४ जुलै १९५८ रोजी हा साठा केवळ २१० कोटी रुपयांचा राहिला . याच काळात आंतरराष्ट्रीय द्रव्यनिधीमधून ( International Monetary Fund ) आपण ९ ५ कोटी रुपये खर्च केले आहेत , ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे . दुसरी पंचवार्षिक योजना आज आर्थिक भोवऱ्यात सापडली आहे . या योजनेच्या खर्चासाठी देशातल्या देशात आवश्यक ती भांडवलनिर्मिती होऊशकली नाही . त्यामुळे या योजनेची सर्व मदार परदेशी मदत व तुटीचा अर्थभरणा ( Deficit Financing ) यावर आहे ही गोष्ट ना . नंदानी लोकसभेत दिनांक १७ - ९ -५८ रोजी कबूल केली आहे . योजनेचा खर्च ४८०० कोटी रुपयांवरून ४६०० कोटींवर आणला तरीदेखील या रकमेपैकी २३ टक्के रक्कम परदेशांतून मिळवावी लागणार आहे व २७ टक्के रक्कम तुटीचा अर्थभरणा करून - अधिक नोटा छापून उभारावी लागणार आहे . परदेशी मदत व तुटीचा अर्थभरणा यांवर आपणाला अवास्तव भर द्यावा लागत आहे व लागणार आहे . आणि ही बाब अत्यंत काळजी करण्यासारखी आहे , अशी स्पष्ट कबुली ना . नंदा यांनी स्वमुखाने दिली आहे . तुटीचा अर्थभरणा करण्याच्या धोरणाला आमचा तत्त्वशः विरोध नाही ; परंतु तुटीचा अर्थभरणा किती प्रमाणात करावा याबाबत आमचे स्पष्ट मत आहे .औषधाचा उपयोग अन्न म्हणून करता येत नाही . तसे केल्यास रोगी जिवानिशी जाण्याचा धोका असतो . तुटीचा अर्थभरणा करताना अधिक नोटा छापल्या जातात चलनफुगवटा होऊन महागाई वाढत जाते . बतनवाढीबरोबर उत्पादनात वाढ झाली तरच तुटीच्या अर्थभरण्याचे दुष्परिणाम जाणवत नाहीत . परंतु चलनवाढ अवास्तव झाली व त्या प्रमाणात उत्पादनात वात झाली नाही तर दुष्टचक्र ( vicious circle ) निर्माण होते . चलनफुगवट्यामुळे महागाई वाढते . महागाई बाढल्यामुळे योजनेचा खर्च वाढत जातो आणि योजनेचा वाढता खर्च वा तूट भरून काढण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने नोटा छापल्या जातात ; अधिकाधिक करवाढ केली जाते . आणि या नव्या नोटांमुळे पुन्हा महागाईत भर पडते . अशा तन्जेची विचित्र कोंडी निर्माण होते.ही कोंडी फोडल्याशिवाय गत्यंतर नाही . जर ही कोंडी फोडता आली नाही तर जनतेचे जीवनमान दिवसेंदिवस खालावत जाते . तुटीचा अर्थभरणा अवास्तव प्रमाणात करण्याचे धोरण हे योजनेचे जसे एक प्रमुख दुखणे आहे , त्याचप्रमाणे परकीय मदतीवर अवलंबून राहण्याचे धोरण हे देखील योजनेच्या प्रमुख दुखण्यापैकी एक आहे . या परकीय मदतीपैकी फार मोठी रक्कम अमेरिकेकडून व इतर साम्राज्यवादी राष्ट्रांकडून स्वीकारली जात आहे . अमेरिकन साम्राज्यवादी आशियाई राष्ट्रांच्या अंतस्थ कारभारात हस्तक्षेप करून , तेथे आपणाला सोयीस्कर अशी बाजारपेठ निर्माण करण्याचा शिकस्तीचा प्रयत्न करीत आहेत . अमेरिकेची अर्थव्यवस्था आर्थिक अरिष्टात सापडली असल्याने व लक्षावधी कामगार बेकारीच्या खाईत फेकले जात असल्याने , युद्धखोर धोरणाचा पाठपुरावा केल्याशिवाय तिला गत्यंतर नाही . युद्धोपयोगी साहित्य निर्माण करण्यावर अमेरिकेला आज अधिकाधिक भर द्यावा लागत आहे . अमेरिकन अर्थव्यवस्थेमध्ये तेजीमंदीचे चढउतार होत असल्याने अशा अर्थव्यवस्थेशी आपल्या देशाची अर्थव्यवस्था निगडित करणे म्हणजे आपल्या पायावर दगड पाडून घेण्यासारखे आत्मघातकीपणाचे आहे. अमेरिका , इंग्लंड , कॅनडा वगैरे राष्ट्रांकडून आणि जागतिक बँकेकडून घेतलेल्या कर्जावर जबर व्याज द्यावे लागते . अमेरिकेकडून घेतलेल्या काही कर्जावर ४ टक्के व्याज द्यावे लागते , तर जागतिक बँकेकडून घेतलेल्या कर्जावर ३१/२ टक्क्यांपासून ६ टक्क्यांपर्यंत व्याज द्यावे लागते . सोव्हिएट रशियासारख्या समाजवादी राष्ट्राकडून अल्पव्याजाने कर्ज मिळाले आहे . सोव्हिएट रशियाकडून भारताला १२३ कोटी रुपयांचे कर्ज फक्त २१/२ टक्के व्याजाने मिळाले आहे . तथापि अमेरिकेसारख्या राष्ट्रांकडून कर्ज घेण्याचे आमच्या राज्यकर्त्यांचे धोरण आहे . ना . नंदा यांनी ता . १७ - ९ -५८ रोजी लोकसभेत सांगितल्याप्रमाणे , मार्च १९५८ पर्यंत आपणास परदेशातून ८५ ९ कोटी रुपये कर्ज मिळाले . यापैकी ४०० कोटी रुपये अमेरिकेकडून , १३६ कोटी रु . जागतिक बँकेकडून , १२३ कोटी रु . सोव्हिएट रशियाकडून , ७५ कोटी रुपये पश्चिम जर्मनीकडून , ३५ कोटी रुपये इंग्लंडकडून ४३ कोटी रुपये कोलंबो योजनेतून , २१ कोटी रुपये कॅनडाकडून आणि बाकीची रक्कम न्यूझीलंड , नॉर्वे , जपान वगैरे राष्ट्रांकडून मिळाली आहे . वरील आकड्यांवरून अमेरिकन मदतीवर ( ? ) आमचा किती भर आहे हे स्पष्ट होते . दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये परकीय मदतीवर अवास्तव भर देण्यात आला असल्याने त्याचे आपल्या अर्थव्यवस्थेवर गंभीर दुष्परिणाम झाले आहेत व होणार आहेत . १ फेब्रुवारी १ ९ ५८ रोजी आपणास एकूण १०३१.५ कोटी रुपये परकीय देणे होते . हे कर्ज हप्त्याहप्त्यांनी द्यावयाचे आहे . तरीपण १९६०-६१ साली मुद्दल व व्याज मिळून ११० कोटी रुपये आपणास परतफेड करावे लागतील , तर १९६१-६२ साली १५० कोटी रु.ची परतफेड करावी लागेल . अशाच प्रमाणात अनेकवर्षे आपणालाही परतफेड करावी लागणार आहे , हे भीषण भवितव्य आपणास दृष्टिआड करून चालणार नाही . आज अमेरिकेसारख्या साम्राज्यवादी राष्ट्राकडून कर्ज उभारून योजनेचा खर्च करताना , पुढील पिढ्यांचे आर्थिक स्वातंत्र्य गहाण टाकले जाऊनये असेच कोणीही म्हणेल . परकीय कर्जाची व त्यावरील व्याजाची परतफेड करताना आपल्या तिजोरीवर अभूतपूर्व असा ताण पडणार आहे . एवढी एकच बाब काळजी करण्यासारखी आहे असे नव्हे , तर या देशातील परकीय भांडवलात दरवर्षी जी बेसुमार वाढ होत आहे व त्यामुळे नफ्याच्या स्वरूपात कोट्यवधी रुपये परदेशात जातात ही गोष्ट तितकीच चिंताजनक आहे . गेल्या दहा वर्षांत या देशात परकीय भांडवल ज्या फार मोठ्या प्रमाणात आले त्या प्रमाणात ते इंग्रजी राजवटीतसुद्धा येऊ शकले नव्हते ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे . जून १९४८ मध्ये या देशातील परकीय भांडवलाची किंमत २८८ कोटी रुपये होती . डिसेंबर १९५३ मध्ये ती ४१९ .५ कोटी रुपये झाली . डिसेंबर १९५५ मध्ये या देशात ४८० कोटी रुपयांचे परदेशी भांडवल होते , तर आजघडीला या देशातील परकीय भांडवलाची किंमत ६५० कोटी रुपये आहे . तेल कारखाने , बँका , चहाचे मळे , ज्यूट व खाणी वगैरे महत्त्वाच्या क्षेत्रांत परकीय भांडवलाने आपले आसन स्थिर केले आहे ; एवढेच नव्हे , तर आपली मक्तेदारी निर्माण केली आहे . या भांडवलामुळे दरवर्षी नफ्याच्या रूपाने कोट्यवधी रुपये परदेशात जातात . असे असूनही भारत सरकार परकीय भांडवलदारांच्या दाढीला हात लावून त्यांची मनधरणी करीत आहे आणि त्यांनी अधिकाधिक भांडवल गुंतवावे म्हणून देशाच्या आर्थिक हिताला बाध आणणाऱ्या खास सवलती देत आहे . देशी व परदेशी भांडवलदारांचे आपल्या अर्थव्यवस्थेवरील वर्चस्व वाढत आहे . भांडवलदारांचे नफे बाडत आहेत . राष्ट्रीय उत्पन्नाचा फार मोठा भाग थैलीशहांच्या पशात जात आहे आणि श्रमजीवी जनतेला या बैलीशहांच्या टेबलावरून खाली पडणाऱ्या तुकड्यावर आपले पोटजाळावे लागत आहे. औद्योगिक शेअर्सच्या किमती वाढत आहेत . १ ९५२-५३ साल पाया धरून त्या वर्षी शेअर्सची किंमत १०० घरली तर जुलै १९५८ मध्ये औद्योगिक शेअर्सच्या किमतीचा निर्देशांक १३७.४ वर गेला आणि ऑगस्टमध्ये हाच निर्देशांक १३७.४ वरून १४२.६ वर गेल्याचे रिझर्व्ह बँकेच्या ऑगस्ट व सप्टेंबर ५८ च्या बुलेटिन्सवरून स्पष्ट आहे.

योजनेच्या काळात आमचे दरडोई उत्पन्न २८१ रुपयांवरून ३३१ रु . वर जाणार आहे असे सांगण्यात येते ; परंतु आमचे दरडोई उत्पन्न वाढलेले नाही . राष्ट्रीय उत्पत्राला लोकसंख्येने भागून दरडोई उत्पन्न काढणे म्हणजे जनतेच्या डोळ्यांत केवळ धूळ फेकल्यासारखे आहे . दुसरी गोष्ट म्हणजे महागाई भयंकर वाढत असल्याने दरडोई उत्पत्रात जी वाद दाखविण्यात येत असते तिला प्रत्यक्षात काहीच अर्थ अलेतानाही . दुसरी योजना सुरू झाल्यापासून पहिल्या २१/२ वर्षांच्या अवधीत वस्तूंच्या किमती १६ टक्यांनी वाढल्या आहेत . नियोजनमंत्री नंदा यांनी आपल्या दि .१७ - ९ -५८ च्या लोकसभेतील भाषणात तशी स्पष्ट कबुली दिली आहे . महागाई इतक्या झपाट्याने वाढत आहे , की त्यामुळे योजनेलाच केवळ धोका निर्माण झाला आहे असे नव्हे , तर आपल्या अर्थव्यवस्थेचे स्थैर्यसुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे ( ना . नंदांचे दि .२२ - ९ -५८ चे लोकसभेतील भाषण ) राष्ट्रीय उत्पन्न बाढले म्हणावे तर सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावले नाही , बेकारीचे भूत नंगानाच पालीत आहे , महागाई शिगेला पोचली आहे आणि शेतकऱ्यांचे हाल कुत्रा खात नाही . दुष्काळामुळे लक्षावधी लोक देशोधडीला लागत आहेत आणि भाकरीसाठी ठिकठिकाणी दंगली होत आहेत . या गोष्टी लक्षात घेता जनतेचे दरडोई उत्पन्न वाढले असे कोणत्या तोंडाने म्हणता येईल ? राष्ट्रीय उत्पन्न वाढले याचा अर्थ दरडोई उत्पन्न वाढले असा नाही . राष्ट्रीय उत्पन्न वाढले याचा अर्थ भांडवलदारांचे आणि कारखानदारांचे नफे वाढले . श्रीमंत लोक अधिक श्रीमंत झाले आणि गरीब अधिकाधिक गरीब झाले .

भारतासारख्या मागासलेल्या राष्ट्राचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी सार्वजनिक मालकीच्या उद्योगधंद्यांवर भर देणे जरूर असते . परंतु नेहरू सरकारने १९४८ व १९५६ साली जे औद्योगिक धोरण जाहीर केले , त्यामुळे देशी व परदेशी भांडवलदारांना मोकाटपणे चरण्यासाठी कुरणच मिळाल्यासारखे झाले . खाजगी उद्योगपतींना फार मोठे क्षेत्र मोकळे सोडण्यात आले . अनेक मोक्याच्या उद्योगधंद्यांत त्यांना प्रवेश देण्यात आला . पोलाद , लोखंड , सिमेंटसारख्या महत्त्वाच्या उद्योगधंद्यांत खाजगी मालकी प्रबळ झाली आहे . पहिल्या योजनेच्या काळात सार्वजनिक विभागात जितकी रक्कम खर्च व्हावयाची होती , त्या रक्कमेच्या निम्मी रक्कम कशीबशी खर्च करण्यात आली . डॉ . लोकनाथन यांनी केलेल्या पहाणीप्रमाणे भारतातील एकूण उद्योगधंद्यापैकी सार्वजनिक मालकीच्या उद्योगधंद्यांचे क्षेत्र फक्त ३.९ टक्के इतके अत्यल्प आहे . यावरून या देशाच्या उद्योगधंद्यांवर खाजगी विभागाची म्हणजेच भांडवलदारांची किती जीवघेणी पकड आहे हे चटकन लक्षात येईल . एवढेच नव्हे , तर सार्वजनिक मालकी विभागात निघालेल्या बऱ्याच उद्योगधंद्यांच्या भांडवलाचा फार मोठा भाग कर्जाचा आहे . नफा होवो अगर न होवो , या कर्जावर व्याज देणे भाग पडते . दुसरी गोष्ट म्हणजे सार्वजनिक मालकी विभागातील उद्योगधंद्यांत लाचलुचपत , वशिलेबाजी , उधळपट्टी वगैरेंनी अक्षरश : धुमाकूळ घातला आहे . ही सत्तास्थाने म्हणजे अधिकारारूढ पक्षाला आपले पित्ते नेमण्याची सिंहस्थ पर्वणी वाटल्यास काहीच नवल नाही . खाजगी क्षेत्रात भांडवलदार म्हणतील ती पूर्व दिशा व ते बांधतील ते तोरण असा मामला आहे . देशी आणि परकीय भांडवलदार , सरकारकडून नव्या नव्या सवलती उपटण्याच्या बाबतीत गुण्यागोविंदाने नांदत आहेत . भरमसाट नफे मिळवीत असतानाच भांडवलाच्या अडचणीचे नक्राश्रू गाळून ते सरकारकडून अधिकाधिक सवलती उपटीत आहेत. सरकारचा समाजवादी समाजरचनेचा बकवा ढोंगीपणाचा आहे . मागासलेल्या देशात समाजवादी समाजरचना निर्माण करण्यासाठी सर्वात प्रथम साम्राज्यवादी , सरंजामदार व मक्तेदार भांडवलदार यांचे वर्चस्व निकालात काढावे लागते आणि जनतेची लोकशाही प्रस्थापित करावी लागते . पहिल्या योजनेने यापैकी एकही गोष्ट केली नाही ; आणि दुसऱ्या योजनेमध्ये त्या दिशेने काही पावले पडतील असा सुतराम संभव दिसत नाही . सरंजामदारी हितसंबंध निकालात काढण्याची सरकारने दिरंगाई केल्यामुळे शेतीव्यवसायात कमालीचे अराजक निर्माण झाले आहे . शेतीचे उत्पन्न त्यामुळे खालावत आहे . शेतीच्या मागासलेपणामुळे औद्योगिकीकरणाच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे . झपाट्याने औद्योगिकीकरण घडवून आणण्याचे योजनेचे उद्दिष्ट केवळ कागदावरच राहिले आहे . भांडवलदारी हितसंबंधांना सरकारने मोकाट सोडल्याने राष्ट्राला पोषक अशा उद्योगधंद्यांत भांडवल गुंतविण्याऐवजी ज्या उद्योगधंद्यांत बेसुमार नफा मिळेल अशा क्षेत्रात ते आपल्या भांडवलाचा प्रवाह सोडीत आहेत . मूलभूत व जड उद्योगधंद्यांच्या वाढीवर विशेष भर देण्याचे योजनेचे उद्दिष्टही प्रत्यक्षात उतरू शकलेले नाही हे स्पष्ट झाले आहे .

या देशातील बेकारी नाहीशी करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात रोजगारधंदा निर्माण करण्याचे योजनेचे उद्दिष्ट साध्य होणे तर दूरच ; परंतु योजनेच्या काळात बेकारी वाढणार असल्याचे नियोजनकार कबूल करीत आहेत . राष्ट्रीय नमुना पाहणी समितीच्या ( National Sample Survey ) अहवालाप्रमाणे योजनेच्या सुरुवातीला या देशात नागरी विभागात व ग्रामीण विभागात मिळून ५३ लाख लोक बेकार होते . यामध्ये ग्रामीण विभागातील लक्षावधी अर्धबेकारांची दखल घेण्यात आलेली नसल्याने बेकारांचा खरा आकडा ५३ लाखांहून अधिक असला पाहिजे हे कोणीही मान्य करील . तथापि सरकारी अंदाजाप्रमाणे बेकारांची संख्या १९५५-५६ साली ५३ लाख मानली तरी योजनेच्या शेवटी बेकारी वाढणार की कमी होणार हा खरा सवाल आहे . योजनेच्या काळात रोजगार मागणारांच्या संख्येत दरवर्षी २० लाखांनी वाढ होणार आहे . ( आमची लोकसंख्या दरवर्षी ५० लाखांनी वाढत आहे . ) त्यामुळे ५ वर्षांत काम मागणाऱ्यांच्या संख्येत १०० लाखांची भर पडणार आहे . योजनेच्या काळात १५३ लाख लोकांना रोजगार उपलब्ध झाला तरच बेकारीला आळा घातला जाईल . योजनेमध्ये एकूण ९ ५ लाख लोकांना रोजगार देण्याची तरतूद हाती ; परंतु योजनेच्या फेररचनेनंतर फक्त ६५ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे , असे नियोजनकारांकडून स्पष्ट झाले आहे . म्हणजेच योजनेच्या सुरुवातीला ५३ लाख बेकार होते तर योजनेच्या शेवटी बेकारांची संख्या ८८ लाखांवर जाणार आहे . बेकारी वाढणार असल्याची कबुली ना . नंदानी लोकसभेतील २२ - ९ -५८ च्या आपल्या भाषणात दिली आहे .

ज्याप्रमाणे बेकारीला आळा घालण्यात योजनेला अपयश आले आहे त्याचप्रमाणे आर्थिक विषमता कमी करण्याचे योजनेचे उद्दिष्ट केवळ कागदावरच राहिले आहे . श्रीमंत आणि गरीब यांच्यामधील दरी एकसारखी वाढत आहे . एका बाजूला मूठभर पुंजीपतींच्या तिजोरीत एकसारखीभर पडत आहे तर त्याच वेळी दुसऱ्या बाजूला बहुसंख्य जनतेला आपले जीवन केवळ असह्य झाले आहे . या देशातील ५० टक्के जनतेची महिन्याकाठी फक्त १४ रु . ६० नये पैसे खर्च करण्याची ऐपत आहे . या देशातील शे . ५ लोकांची तर महिन्याकाठी फक्त ३ रु . २० नये पैसे एवढेच खर्च करण्याची ऐपत आहे . एकंदर लोकसंख्येच्या १० टक्के अगर ३ कोटी ८० लक्ष लोकांच्या वाट्याला महिन्याकाठी फक्त ८ रु . ४० नये पैसे एवढेच कसेबसे येतात . वैद्यकीय मदत म्हणजे गोरगरीब जनतेच्या दृष्टीने चैनीची बाब समजली जाते . अन्न , वस्त्र , निवारा , आरोग्य व शिक्षण या किमान गरजादेखील ज्यांच्या भागू शकत नाहीत अशी बहुसंख्य जनता माणुसकीच्या हक्कांना पारखी होऊन कसेबसे जीवन कंठीत आहे . शिक्षण , आरोग्य , घरबांधणी , समाजकल्याण वगैरे क्षेत्रांत अत्यंत निराशाजनक अवस्था आहे . समाजविकास योजना ही फक्त नावाचीच समाजविकास योजना राहिली असून खऱ्या अर्थाने ती समाजाची योजना नसून सरकारने आखलेली व सरकारी नोकरशाहीकडून जनतेच्या श्रमावर राबविली जाणारी योजना आहे . लोकशाही नियोजन कशाशी खातात याचा पत्तासुद्धा आमच्या राज्यकर्त्यांना नाही . येथून तेथून सारा नोकरशाहीचा कारभार ! साहजिकच जनतेचे सहकार्य या योजनेला मिळत नाही . योजनेची तुटपुंजी उद्दिष्टेसुद्धा त्यामुळे साध्य होणार नाहीत ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे . प्राचार्य धनंजयराव गाडगीळ यांच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास , या देशात नियोजित अर्थव्यवस्थाच मुळी निर्माण झालेली नाही ; एवढेच नव्हे , तर ती निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्नदेखील होत नाहीत . ते म्हणतात , " अद्यापि आपण नियोजित अर्थव्यवस्था निर्माण करू शकलो नाही . योजनाबद्ध अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न पहिल्या पंचवार्षिक योजनेत केलेला नव्हता . त्या दिशेने पुष्कळ प्रगती करावी असे दुसऱ्या योजनेत अभिप्रेत होते . परंतु योजनेची अंमलबजावणी ठरल्याप्रमाणे झाली नाही . शेतीमालाच्या किमती स्थिर ठेवणे , अन्नधान्याच्या पुरवठ्याची योग्य तरतूद करणे आणि परदेशी हुंडणावळीचा दक्षतापूर्वक व काटकसरीने वापर करणे अशा अगदी प्राथमिक गोष्टींबाबत यथायोग्य धोरण ठेवले गेले नाही ; एवढेच नव्हे , तर गेल्या दोन वर्षांतील अनुभवानंतरसुद्धा आवश्यक सुधारणा करण्याचा प्रयत्न किंवा त्या दिशेने निदान विचारही केला जात आहे असे दिसत नाही . अद्यापि आपल्या अर्थव्यवस्थेचा कारभार योजनाबद्ध रीतीने चालू लागलेला नाही असे म्हणावे लागते" - केसरी , ता .७ - ९ -५८

भारतीय अर्थव्यवस्था भांडवलदारांच्या पकडीत सापडली आहे . सरकारने राष्ट्रीयीकरणाची केवळ भाषा जरी काढली तरी भांडवलदारांना ती सहन होत नाही . बोलायचे एक आणि करायचे दुसरेच ही राज्यकर्त्यांची नीती असल्याने नेहरू सरकार जरी तोंडाने समाजवादी समाजरचनेची भाषा काढीत असले तरी भांडवलदारांना चरण्यासाठी कुरण निर्माण करून देत आहे . लागते .

*तिसरी पंचवार्षिक योजना*

भारताची पहिली पंचवार्षिक योजना अयशस्वी झाली आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची तीन वर्षे पुरी होण्यापूर्वीच योजनेच्या खर्चात काटछाट करण्याची पाळी आली . आज तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या प्रसूतिवेदना राष्ट्राला सुरू झाल्या आहेत . तिसरी योजना आखताना पहिल्या दोन योजनांचा अनुभव लक्षात घेऊन राज्यकर्ते शहाणपणाने पाऊल टाकतील असे वाटत नाही . या देशाच्या अर्थव्यवस्थेतील मूलभूत समस्या नियोजनकारांनी व राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलेल्या नाहीत व अजूनही घेण्याची सुबुद्धी त्यांना होत नाही. पहिल्या योजनेत शेतीसुधारणेवर भर देण्यात आला आणि त्या काळात शेतीसुधारणा झाली असे गृहीत धरून दुसऱ्या योजनेत औद्योगिकीकरणाचा कार्यक्रम हातात घेण्यात आला . दुसऱ्या योजनेच्या अपयशाचे मूळ शेतीच्या मागासलेपणात आहे . पहिली योजना अपेशी झाली असताही ती यशस्वी झाल्याचा दावा योजनाकारांनी केला नसता तर दुसऱ्या योजनेचे त्यांचे प्रमेय चुकले नसते . एखादा रोग जनलज्जेस्तव झाकून ठेवला म्हणून त्याचे भयानक परिणाम काही थांबत नाहीत . त्यामुळे रोगी जिवानिशी जाण्याचा संभव असतो . पहिल्या योजनेचे अपयश कबूल करण्याचे धाडस दाखवून दुसऱ्या योजनेत जरूर तो फेरफार करून शेतीवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत जरूर होते . ते झाले नाही . त्याचे दुष्परिणाम आज राष्ट्राला भोगावे लागत आहेत . दुसऱ्या योजनेत अपेक्षित केलेली भांडवलनिर्मिती होऊशकली नाही . त्यामुळे योजनेच्या खर्चासाठी तुटीचा अर्थभरणा आणि परकीय मदत या दोन कुबड्यांचा आधार घेतल्याशिवाय योजनेचे पाऊलही पुढे पडू शकत नाही . नोटा छापून बेकारी दूर होत नाही . त्यासाठी उत्पादनात वाढ झाली पाहिजे हे कटू सत्य आमच्या योजनाकारांना व राज्यकर्त्यांना अजून उमगले नाही . चुकीच्या वाटेने गेल्यामुळेच योजनेचा रथ आरपार चिखलात रुतून बसला आहे . हे दिसत असूनही तो त्याच आडमार्गाने नेण्याचा अट्टहास योजनाकार दाखवीत आहेत . हा रथ ओढण्यासाठी उपाशीपोटी जनतेच्या पाठीवर महागाईच्या आणि करवाढीच्या स्वरूपात कोरडे ओढीत आहेत . आज योजनाकार तिसऱ्या योजनेच्या रूपरेषेचा ज्या दृष्टिकोनातून विचार करीत आहेत तो लक्षात घेता तिसरी योजना म्हणजे दुसऱ्या योजनेची केवळ पुनर्मुद्रित आवृत्ती ठरण्याचाच धोका स्पष्ट दिसत आहे . दुसऱ्या योजनेत सुरुवातीला ४८०० कोटी रु . खर्चाची तरतूद होती . ती फेरविचारानंतर ४५०० कोटी रुपये करण्यात आली ; तर तिसऱ्या योजनेत १०००० कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात येण्याची शक्यता दिसत आहे . खर्चाच्या रकमेत जरी दोन - अडीचपट वाढ होणार असली तरी मूलभूत भूमिकेत काही फरक होण्याची शक्यता दिसत नाही . योजनेत किती खर्चाची तरतूद केली आहे या गोष्टीपेक्षा ती रक्कम कोठून वसूल केली जाणार आहे , कोणकोणत्या बाबींवर खर्च होणार आहे व त्यामुळे निरनिराळ्या थरावर त्याचे काय परिणाम होणार आहेत. या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत . या देशाच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी आखल्या जाणाऱ्या कोणत्याही योजनेत जनतेच्या दारिद्र्याचा सर्वात प्रथम विचार करणे जरूर आहे . हिंदी जनतेचे जीवनमान अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे . भारताच्या या दारिद्र्यावर ' मूले कुठार ' करण्याचा चंग योजनेने बांधला पाहिजे . आमचा देश शेतीप्रधान असल्याने व शे . ६ ९ लोक शेतीवर उदरनिर्वाह करीत असल्याने शेतीचे उत्पादन वाढविणे व त्याची योग्य विभागणी करणे या गोष्टीला आमच्या देशाच्या नियोजनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे . या देशातील शेती मागासलेली राहिली तर औद्योगिकीकरण यशस्वी होण्याचा संभव आहे .

शेतीसुधारणा

या देशातील शे . ६ ९ लोक शेतीवर अवलंबून आहेत आणि देशाच्या एकूण उत्पन्नापैकी जवळजवळ निम्मा भाग ( ४९ % ) शेतीमधून मिळतो . परंतु या देशात शेतीची जेवढी अनास्था होत आहे तेवढी इतरत्र कोठेही दिसणार नाही . १९३१ नंतर लोकसंख्या जसजशी झपाट्याने वाढत गेली तसतशी शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या फार वेगाने वाढत गेली . ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढत गेली त्या प्रमाणात नवीन जमीन लागवडीखाली आणली गेलेली नाही. साहजिकच शेतमजुरांची संख्या वाढली . १९३१ साली १०० माणसांमागे १०४ एकर जमीन येत होती , तर १९५१ साली हे प्रमाण ८४ एकरांपर्यंत खाली आले . जमिनीची उत्पादनक्षमता वाढली नाहीच ; परंतु औद्योगिक क्षेत्रातही फारशी वाढ होऊ शकली नाही . शेतमजुरांना तर वर्षाकाठी १०० दिवस रोजगार मिळतो . ॲग्रिकल्चरल लेबर इन्क्वायरी कमिटीच्या रिपोर्टाप्रमाणे या देशात शे . ६७ शेतकऱ्यांजवळ देशातील एकूण जमिनीपैकी फक्त १५ टक्के जमीन आहे , तर ३३ टक्के शेतकऱ्यांजवळ देशातील ८५ टक्के जमीन आहे . या ६७ टक्क्यांपैकी १ ९ टक्के शेतकऱ्यांजवळ एक तसूभरही जमीन नसून ते एकतर इतरांच्या जमिनीवर राबत आहेत अगर शेतमजूर आहेत . बाकी उरलेल्या ४८ टक्के शेतकऱ्यांजवळ एक एकरापासून ५ एकरापर्यंतच जमीन आहे . याउलट , ज्या ३३ टक्के शेतकऱ्यांजवळ देशातील ८५ टक्के जमीन आहे , त्यांच्यापैकी फक्त ५ टक्के जमीनदारांजवळ या देशातील एकूण जमिनीच्या ३५ टक्के जमीन आहे . उरलेल्या २८ टक्के शेतकऱ्यांजवळ देशातील ५० टक्के जमीन आहे . शेतकऱ्यांपैकी ४० टक्के लोक अगर ग्रामीण लोकसंख्येपैकी ३० टक्के जनता शेतमजुरी करून कशीबशी पोटात काटे भरीत आहे . वरील आकडे पाहिल्यावर या देशातील जमिनीची भयंकर विषम वाटणी लक्षात येईल . देशात एका बाजूला लक्षावधी लोक रोजगाराविना तडफडत असतानाच दुसऱ्या बाजूला काही मूठभर जमीनदारांनी व सरंजामदारांनी लक्षावधी एकर जमीन अडवून ठेवली आहे . हे सरंजामदार व जमीनदार एवढी अफाट जमीन स्वत : कसू शकत नाहीत हे उघड आहे . कुळांकडून अगर नोकरांकडून ही जमीन ते पिकवून घेतात . अनेक वर्षे जमिनीवर राबणाऱ्या कुळांना , जमीन मालकांनी कुळकायद्याची चाहूल लागताच जमिनीवरून हुसकून लावले आहे . त्यांच्या झोपड्या व संसार उद्ध्वस्त केले आहेत . अनेक ठिकाणी दहशतवादाचा उपयोग करून जमीन मालकांनी कुळांकडून ' खुशीचे राजीनामे ' लिहून घेतले आहेत . अनेक ठिकाणी जमीनदार कुळाकडून नोकरनामा लिहून घेऊन कुळाचा हक्क गुंडाळून ठेवीत आहेत . सरकारने केलेल्या कायद्यामध्ये जमीनदारांसाठी इतक्या पळवाटा ठेवल्या आहेत , की गरीब बिचाऱ्या कुळाला या कायद्याचा फायदा मिळणे अवघड झाले आहे . कसणाऱ्याला जमीन देण्याच्या बाबतीत सरकारला अपयश आलेले आहे . अनेक राज्यांतून लक्षावधी कुळांची हकालपट्टी झाली आहे आणि आजघडीलाही लाखो कुळांची हकालपट्टी होत आहे . नियोजन मंडळाने ठरविलेल्या दिशेने कायदे करण्याला काही राज्य सरकारांनी उघड उघड विरोध दर्शविला आहे . कसणाऱ्याला जमीन देण्याची घोषणा देत असतानाच जमिनीची कमालमर्यादा अगदीच अवास्तव ठरवून सरकारने कुळांच्या आणि शेतमजुरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत . स्वत : कसण्याच्या मिषाने अनेक जमीनदारांनी कुळांना हुसकून आपल्या ताब्यात जमिनी घेतल्या आहेत . जमीन मालकांच्या हितसंबंधांना या कायद्याने फारशी तोशीस लावली नाही हे उघड आहे . कुळकायद्यामुळे एक स्वागतार्ह गोष्ट झाली आहे ती ही , की जमीनदार , सरंजामदार यांचे सामाजिक वर्चव - ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये ज्याला फार महत्त्वाचे स्थान होते - कमी झाले आहे . ग्रामीण विभागामध्ये हा वर्ग भांडवलदारांना पोषक व्हावा अशी क्रिया चालू झाली . तथापि अजूनही या प्रयत्नाला यावे तसे यश आलेले नसल्याने शेतीव्यवसायामध्ये फार मोठे अराजक निर्माण झाले आहे. बहुतेक सर्वच राज्यांतील कुळकायद्यांची व जमीन सुधारणा प्रश्नांची हीच अवस्था आहे . जमीनदारांनी आपल्या नातलगांच्या नावावर पोकळ ट्रान्स्फर करून हजारो एकर जमिनीवरून कुळांना हुसकले आहे . शेतीव्यवसायातील मक्तेदारी नाहीशी केल्याशिवाय आणि कुळाला संरक्षण दिल्याशिवाय शेतीचे उत्पादन वाढणार नाही . गरीब शेतकऱ्यांना व कुळांना जे संरक्षण मिळणे जरूर आहे , त्याची किमान शाश्वतीसुद्धा योजनेत दिली गेलेली नाही . देशातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी ७५० कोटी रु . कर्जाची गरज असते . या कर्जापैकी सरकारकडून फक्त ३.३ टक्के आणि सहकारी पतपेढ्यांमार्फत फक्त ३.१ टक्के कर्जपुरवठा केला जातो . अर्थातच ९ ३.६ टक्के कर्जासाठी त्याला आपली मान सावकार आणि दलाल यांच्या मगरमिठीत द्यावी लागते . त्याला लागणाऱ्या कर्जाचा पुरवठा सहकारी यंत्रणेतर्फे झाला पाहिजे . शेतीमालाच्या विक्रीच्या व्यवहारात दलालाकडून शेतकऱ्याची नागवणूक होते ती बंद करण्यासाठी सहकारी पद्धतीने खरेदी - विक्री करणारे संघ निघाले पाहिजेत . शेतकऱ्याचा माल विकत घेण्यासाठी आणि शेतकऱ्याला लागणारी खते , बी - बियाणे , शेतीची अवजारे वगैरे वस्तूंचा त्याचप्रमाणे त्याला दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या उपभोग्य वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी सहकारी खरेदी - विक्री सोसायट्यांचे जाळे विणणे जरूर आहे . शेतीव्यवसायातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्याची हमी देणे . या बाबतीत सरकारचे धोरण अत्यंत बेपर्वाईचे आहे . शेतीमालाच्या उत्पादनाचा खर्च व शेतकऱ्यांचे जीवनमान याचा विचार करून शेतीमालाच्या किमती ठरवून मिळाल्या पाहिजेत . मालाच्या किमती ठराविक पातळीपेक्षाखाली आल्या तर सरकारने ठरवून दिलेल्या दराने शेतकऱ्यापासून माल खरेदी केला पाहिजे . भारत सरकारचे जे शिष्टमंडळ चीनला शेतीसुधारणेच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी गेले होते , त्यांनी सादर केलेल्या अहवालात शेतीमालाच्या किमती ठरवून देण्याची शिफारस केली होती . अन्नधान्य चौकशी समितीने व बलवंतराय मेहता समितीनेही शेतकऱ्यांना भाव ठरवून देण्याबद्दल सरकारला शिफारस केली होती . परंतु सरकारने आतापर्यंत या ना त्या सबबीचे साप शेतकऱ्यांच्या अंगावर सोडून शेतमालाच्या किमती ठरवून द्यायला नकार दिला . या प्रश्नाची योग्यरीत्या सोडवणूक झाल्याशिवाय शेतीव्यवस्था विकासाच्या मार्गावर नेण्यात कदापि यश येणार नाही असा इशारा आम्ही यापूर्वीही दिला होता . सहकारी शेतीबाबत सरकारचे धोरण गुळमुळीत आहे . सरकारला सहकारी शेतीचे महत्त्व खरोखर पटले असेल तर सरकारचे धोरण अधिक सुस्पष्ट होणे जरूर आहे . गोरगरीब शेतमजूर व लहान लहान शेतकरी यांना एकत्र आणून सहकारी शेती सुरू करणे अत्यंत अगत्याचे आहे . तथापि या सहकारी सोसायट्यांना सरकारकडून योग्य ती मदत झाली नाही तर त्या टिकू शकत नाहीत . त्यासाठी या सहकारी शेतीला जरूर ते सर्व साहाय्य करण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे . दुसरी गोष्ट म्हणजे या सोसायट्यांमधून श्रीमंत शेतकरी व सावकार यांचे वर्चस्व होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे . या देशातील सहकारी चळवळ विकास पावली नाही याचे कारण या चळवळीचे पुढारीपण , गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या प्रवृत्तीकडे होते . ही स्थिती तातडीने बदलली पाहिजे. समाजविकास योजनांद्वारे अमलात येणाऱ्या कार्यक्रमाचा फायदा ग्रामीण विभागातील सुखवस्तू विभाग म्हणजे श्रीमंत शेतकरी उपटीत आहे . गोरगरीब थरापर्यंत या योजनेचे फायदे पोहोचू शकत नाहीत . उलट त्यांच्या नशिबी फक्त वेठबिगार आलेली आहे . श्रमदानाच्या गोंडस नावाखाली गोरगरीब जनतेची वेठबिगार चालू आहे . या देशात औद्योगिकीकरण यशस्वी करावयाचे झाले तरी प्रथम शेतीव्यवसायातील सरंजामदारी व जमीनदारी नष्ट करून कसणारास जमीन या तत्त्वावर शेतीव्यवस्था आणली पाहिजे . परंतु हे कार्य काँग्रेस सरकार करू शकत नाही . सरजामदार व जमीनदार या थरांचे राज्य सरकारे व काँग्रेस समित्यांवर इतके मक्तेदारी नाहीशी करणारे विधेयक राज्य सरकारे आणू शकत नाहीत.याउलट जनतेचा प्रक्षोभशात करण्यासाठी काही थातूरमातूर तरतुदी असणारी विधेयके पास केली जात आहेत . या कायद्यात जमीनदारास अनेक पळवाटा ठेवण्यात येत आहेत . परिणामी शेतकऱ्यांना या कायद्यांचा प्रत्यक्षात काही उपयोग होत नाही असा आजवरचा अनुभव आहे . शेती आणि औद्योगिकीकरण यांचा विकास एकमेकांवर अवलंबून आहे . वास्तविक पाहता , शेती हा या देशातला सर्वात मोठा उद्योगधंदा आहे . राष्ट्रीय उत्पन्नाचा ४ ९ टक्के भाग म्हणजे सर्वात मोठा हिस्सा शेतीव्यवसायातून येतो . औद्योगिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाचा आणि अन्नधान्याचा भरपूर पुरवठा शेतीव्यवसायातूनच होतो . ही गोष्ट लक्षात घेता या उद्योगधंद्यांची आबाळ करणे व तोमागासलेला राहू देणे आत्मघातकीपणाचे आहे . देशात जमिनीचे दुर्भिक्ष असल्याने शेतीव्यवसायातील सरंजामी हितसंबंध निकालात काढल्याशिवाय व वाढत्या खतांचा , पाणीपुरवठ्याच्या सोइचा आणि सुधारक शेतीतंत्राचा वापर केल्याशिवाय शेतीचे उत्पादन वाढणार नाही . अर्थातच शेतीला वाढत्या प्रमाणात खतांचा पुरवठा करण्यासाठी अगर सुधारलेली शेतीची अवजारे पुरविण्यासाठी कारखाने निघाले पाहिजेत ही गोष्ट कोणीही नाकारणार नाही . शेतीव्यवसायावर भर दिला जावा असे सांगताना उद्योगधंद्यांकडे दुर्लक्ष करावे असे ध्वनित करण्याचा मुळीच हेतू नाही . परंतु शेतीव्यवसाय हा कमालीचा मागासलेला उद्योगधंदा असल्याने शेतीची उत्पादनक्षमता वाढवून शेतीव्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचे दरडोई उत्पन्न वाढविण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे . जमीन धारण करण्याची कमाल मर्यादा ठरवून तिचे काटेकोर पालन केल्याशिवाय शेतविरहित मजूर व लहान शेतकरी यांना देण्यासाठी जमीन उपलब्ध होणार नाही . सदर शेतमजुरांना व शेतकऱ्यांना सहकारी पद्धतीने शेती करण्यास उत्तेजन दिले पाहिजे . बी - बियाणे , शेतीची अवजारे , भांडवल यांचा पुरवठा करण्याची तरतूद योजनेत असली पाहिजे . कुळाची हकालपट्टी ताबडतोब थांबली पाहिजे . त्याचप्रमाणे ज्या कुळांची हकालपट्टी झाली असेल त्यांना परत जमीन मिळाली पाहिजे . या देशातील शेतीवर अवलंबून असणारे ६ ९ टक्के लोक राष्ट्रीय उत्पन्नात ४ ९ टक्क्यांची भर घालतात . म्हणजेच बिगर शेतीव्यवसायातील ३१ टक्के लोक ५१ टक्के उत्पन्नाची भर घालतात . साहजिकच शेतीव्यवसायातील जनतेचे दरडोई उत्पन्न बिगरशेती विभागातील जनतेच्या दरडोई उत्पन्नापेक्षा फारच कमी आहे . शेतीव्यवसायातील जनतेचे दरडोई उत्पन्न १७९ रुपये आहे , तर बिगरशेती विभागातील दरडोई उत्पन्न ४३३ रुपये आहे . शेतीव्यवसायाकडे जर असेच दुर्लक्ष होत गेले तर शेतीविभागातील दरडोई उत्पन्न व बिगरशेती विभागातील दरडोई उत्पन्न यांमधील तफावत वाढत जाईल . ही तफावत कमी करण्याची तरतूद तिसऱ्या योजनेमध्ये पाहिजे . ही गोष्ट जर योजनेमध्ये साधता आली नाही तर समाजवादी समाजरचनेच्या जयघोषाला काहीच अर्थ राहणार नाही . या देशातील शेतीव्यवसायावर अवास्तव लोकसंख्येचा बोजा पडला आहे . इंग्लंडमध्ये शे . ५ लोक शेतीवर अवलंबून आहेत . अमेरिकेमध्ये हे प्रमाण शे . १२ आहे तर भारतात ते शे . ६ ९ आहे . शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येपैकी किमान १५ टक्के लोकसंख्या बिगर शेतीविभागात मुरविण्याची तरतूद योजनेत असली पाहिजे. या संबंधात चीनचे उदाहरण घेण्यासारखे आहे . भारतात एकूण जमिनीच्या ३८ % क्षेत्र म्हणजेच ३१ कोटी ५० लक्ष एकर जमीन लागवडीखाली आहे . याउलट चीनमध्ये एकूण जमिनीच्या फक्त ११ % म्हणजेच २७ कोटी २० लक्ष एकर जमीन लागवडीखाली आहे . भारताला ३१ कोटी ५० लक्ष एकर जमिनीवर ३८ कोटी लोकसंख्या जगविता येत नाही ; परंतु चीनमध्ये फक्त २७ कोटी २० लक्ष एकर जमिनीवर ६० कोटी लोकसंख्या चांगल्या त - हेने पोसली जाते . १९४९ ते १९५५ या काळात चीनमधील बागायत शेतीचे क्षेत्र २९ टक्क्यांनी वाढले . याउलट त्याच काळात भारतातील बागायतीचे क्षेत्र फक्त ९ टक्क्यांनी वाढले . चीनची लोकसंख्या आमच्या लोकसंख्येच्या दीडपट आहे . परंतु अन्नधान्याचे उत्पादन आमच्या तिप्पट काढले जाते . याही गोष्टीचा तिसऱ्या योजनेमध्ये विचार केला पाहिजे . आज आम्ही सरासरीने ३५ लाख टन अन्नधान्य परदेशातून आणतो . त्यासाठी आम्हाला सर्वसाधारणपणे १५० कोटी रुपये बाहेर घालवावे लागतात. औद्योगिक उत्पादनापेक्षा शेती उत्पादन मागे मागे रेंगाळत राहिले तर केवळ शेतीव्यवसायातील लोकांचे दरडोई उत्पन्न कमी होते . एवढेच नव्हे , तर त्याचा निरनिराळ्या हलक्या उद्योगधंद्यांवर अत्यंत प्रतिकूल परिणाम होतो . त्या उद्योगधंद्याची प्रगती चांगलेवाईट पीक येण्यावर अवलंबून असते . प्रतिकूल निसर्गामुळे पीक बुडाले तर त्या कारखान्यांना कच्च्या मालाचा पुरवठा होऊ शकत नाही व कारखाने आपल्या संपूर्ण उत्पादकशक्तीचा वापर करू शकत नाहीत . चीनमध्ये आजतागायत ही परिस्थिती होती ; परंतु आज संपूर्ण चित्र बदलले आहे . आता शेती उत्पादन हे औद्योगिक उत्पादनाच्या पाठीमागे न राहता , ते औद्योगिक उत्पादनापेक्षा जलद गतीने वाढले असून औद्योगिक उत्पादनाला ते आपल्या बरोबर खेचून नेत आहे . कच्च्या मालाचा भरपूर पुरवठा होत राहिल्याने या कारखान्यांवर झपाट्याने प्रगती साधण्याचा दबाव वाढत्या शेतीउत्पादनामुळे येत आहे . शेती आणि कारखाने यांची एकमेकांच्या हातात हात घालून वाटचाल घडवून आणली पाहिजे . जलद औद्योगिकीकरण घडवून आणण्यासाठी योग्य पाया तयार व्हावा म्हणून जड उद्योगधंद्यांची उभारणी करणे आणि मूलभूत शेतीसुधारणा अमलात आणून लहान शेतकरी व शेतमजूर यांना योग्य संरक्षण देणे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत . आपली अर्थव्यवस्था अमेरिकेसारख्या साम्राज्यवादी राष्ट्रावर अवलंबून राहू नये व ती पुरोगामी व्हावी यासाठी या गोष्टी योजनेने केल्या पाहिजेत.

*औद्योगिकीकरण व बेकारीनिवारण*

दुसऱ्या योजनेत बेकारीला आळा तर बसला नाहीच ; परंतु बेकारी प्रत्यक्षात वाढली आहे . योजनेच्या सुरुवातीला नॅशनल सँपल सर्व्हेप्रमाणे ५३ लाख लोक बेकार होते , तर योजनेच्या शेवटी बेकारांची संख्या ९० लाखावर जाणार आहे . दुसरी गोष्ट म्हणजे या संख्येत अर्धबेकारांची गणना केलेली नाही . दुसऱ्या योजनेच्या काळात दरवर्षी २० लाख नवी माणसे रोजगार मागत होती ; तर तिसऱ्या योजनेच्या काळात दरवर्षी २२ लाख नवी माणसे रोजगार मागणार आहेत . म्हणजे अर्धबेकारांचा विचार केला नाही तरी तिसऱ्या योजनेमध्ये एकूण २ कोटी लोकांना रोजगार मिळवून देता आला पाहिजे . योजनेच्या सुरुवातीला ९० लाख लोक बेकार असतील आणि दरवर्षी २२ लाख बेकारांची भर पडत जाईल . दोन कोटी लोकांना रोजगार मिळवून देता आला नाही तर बेकारीला आळा घातला जाणार नाही . या देशात बॉक्साइट , लोखंड , कोळसा वगैरेंच्या खाणी विपुल प्रमाणात आहेत . या साधनसामुग्रीचा उपयोग करून मोठमोठी यंत्रसामुग्री , टरबाइन्स वगैरेंची स्थापना करून औद्योगिकीकरणाचा पाया घालणे शक्य आहे . या कारखान्यांची उभारणी झाली , की बाकीच्या वस्तू देशातल्या देशात उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा उपयोग करून निर्माण केल्या जातील . ज्या प्रमाणात यंत्रसामुग्री उपलब्ध होत जाईल त्या प्रमाणात अधिकाधिक रोजगार उपलब्ध होईल . नवीन यंत्रे तयार केली जातील आणि कोळसा व वीज , पोलाद , ॲल्युमिनियम , खते , सिमेंट , जड रसायने , दळणवळणाची साधने व शास्त्रीय उपकरणे त्याचप्रमाणे जनतेच्या उपभोग्य वस्तूंचेही उत्पादन वाढविता येईल . आपल्या देशात एका बाजूला यंत्रसामुग्रीचा तुटवडा आहे तर दुसऱ्या बाजूला लक्षावधी लोक बेकार आहेत . कितीतरी मनुष्यबळ वाया चालले आहे . छोट्या आणि घरगुती उद्योगधंद्यांची वाढ केली तर बेकारीला बराच आळा बसेल . या धंद्यातून निर्माण होणाऱ्या उपभोग्य वस्तूंचा पुरवठा वाढेल आणि मूलभूत उद्योगधंद्यांच्या वाढीच्या आड न येता जनतेचे जीवनमान सुधारू शकेल . तिसऱ्या योजनेच्या सुरुवातीला आपणास परदेशी चलनाची तीव्र टंचाई भासणार आहे . आपणाकडे जे काही तुटपुंजे परदेशी चलन असेल त्याचा विनियोग केला पाहिजे . या तुटपुंज्या परदेशी चलनाची उधळपट्टी उपभोग्य वस्तूंची आयात करण्यात अगर देशातील मनुष्यबळाचा व उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून ज्या उपभोग्य वस्तू तयार करता येण्यासारख्या आहेत त्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या यंत्रसामुग्रीची आयात करण्यासाठी होता कामा नये . आपल्या देशातील मनुष्यबळाचा योग्य वापर होत नाही ; तो करून घेण्यासाठी पाणीपुरवठा , रस्तेबांधणी , नवीन जमीन लागवडीखाली आणणे , स्थानिक उद्योगधंदे व शिक्षण या क्षेत्रात नेटाने कामाला लागणे जरूर आहे . चीनने या क्षेत्रात घालून दिलेला धडा खात्रीने मार्गदर्शक ठरेल . चीनने आपल्या जनतेला नवीन जमीन लागवडीखाली आणण्यासाठी , पाणीपुरवठ्याच्या योजना पूर्ण करण्यासाठी , रस्तेबांधणीसाठी भरपूर प्रमाणात ऑक्टोबर १९५७ ते ३१ मे १९५८ या आठ महिन्याच्या मुदतीत चीनने आपल्या शेतकऱ्यांना कामाला लावून २ कोटी १० लक्ष एकर जमीन पाण्याखाली आणली . १९५८ च्या सुरुवातीला चीनच्या लोकसंख्येचा १/६ विभाग किंवा १० कोटी माणसे पाणीपुरवठ्याच्या योजनेत कामाला लागली होती . ( इकॉनॉमिक वीकली खास अंक जुलै १९५८, पृष्ठ ९२५.) शेतीव्यवसायातील अतिरिक्त लोकसंख्येला चीनने जमीन लागवडीखाली आणणे , तिची धूप थांबविणे , पाणीपुरवठ्याच्या योजना पुऱ्या करणे अशा स्वरूपाच्या कामाला लावून , शेती विभागातसुद्धा भरपूर प्रमाणात भांडवलनिर्मिती करता येते हे सिद्ध केले आहे . या सुधारणांमुळे शेतीउत्पादन अधिकाधिक वाढते हेही लक्षात घेतले पाहिजे. बेकारीला आळा घालण्यासाठी अर्थव्यवस्थेचा सातत्याने विकास झाला पाहिजे . विकास पावणारी अर्थव्यवस्थाच सर्वांना काम देऊ शकते . उत्पादनाची वाढ खुंटते त्या वेळी उत्पादनक्षमता बाढविणारे कोणतेही तंत्र उपयोगात आणले तरी काही लोक बेकारीच्या खाईत लोटले जाणे अपरिहार्य असते . म्हणून नियोजित अर्थव्यवस्था यशस्वी करण्यासाठी उत्पादनाचे उद्दिष्ट बदलणे भाग असते . नफ्यासाठी उत्पादन केले तर उत्पादनाला मर्यादा पडतात व बेकारी वाढते . परंतु नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये उपभोगासाठी उत्पादन केले जाते ; त्यामुळे जसजसे उत्पादन वाढते तसतसे जनतेचे जीवनमान उंचावते ; परंतु उत्पादनाला कोणत्याही स्थितीत मर्यादा पडत नाहीत . जनतेच्या गरजा आणि उत्पादन या दोहोत सुसंवाद निर्माण करणे हे नियोजित अर्थव्यवस्थेचे नाही तर योजना यशस्वी होऊ शकत नाही .

*योजनेच्या खर्चासाठी देशात भांडवल निर्माण करणे*

पहिल्या योजनेपेक्षा दुसऱ्या योजनेमध्ये आपण परकीय मदतीवर अधिक अवलंबून आहोत . आपल्या नियोजनाचा तो एक कच्चा दुवा आहे . अमेरिकेसारख्या अरिष्टग्रस्त अर्थव्यवस्थेवर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणे धोक्याचे आहे असे आमचे स्पष्ट मत आहे . योजनेच्या खर्चासाठी देशातल्या देशात भांडवलनिर्मिती करणे ही तिसऱ्या योजनेतील निकडीची बाब आहे . पुढील १५-२० वर्षांत आपण जे औद्योगिकीकरण करणार आहोत , त्याचा पाया घालण्यासाठी , या औद्योगिकीकरणाला आवश्यक लागणारी यंत्रसामुग्री तयार करणारी जड यंत्रे आणण्यासाठी परदेशी चलनाचा उपयोग केला जावा . आपण जड यंत्रसामुग्री , जड विद्युत उपकरणे , टरबाइन्स , खाणीतील यंत्रसामुग्री , रासायनिक यंत्रसामुग्री , यंत्राची हत्यारे , अॅल्युमिनियम वगैरे मूलभूत उद्योगधंद्यांची उभारणी करण्याचा निर्धार केला तर आपण ५०० कोटी रुपयांमध्ये हे धंदे उभे करू शकू . त्याप्रमाणे हे ५०० कोटी रु . आपणाला सर्वस्वी परदेशी चलनाच्या स्वरूपात देण्याची गरज पडत नाही . ३०० ते ३५० कोटी रुपयांचे परदेशी चलन या कार्यक्रमासाठी बाजूला काढले तर आपल्या औद्योगिकीकरणाचा पाया घातला जाईल आणि अमेरिकेसारख्या राष्ट्रावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही . आपल्या आयात- निर्यातीचे पृथक्करण केले तर हे परदेशी चलन आपण उपलब्ध करू शकू असे दिसून येईल . १९५६-५७ साली आमची आयात निर्यातीपेक्षा ४३९ .५ कोटींनी जास्त झाली . १९५७-५८ साली पहिल्या सहामाहीत आमची आयात निर्यातीपेक्षा ३५५.१ कोटींनी वाढली . अनावश्यक गोष्टींची आयात करण्यात आपण परदेशी चलन खर्च न करता त्याचा यंत्रोत्पादक यंत्रसामुग्री आणण्यासाठी उपयोग केला तर आर्थिकदृष्ट्या आपण स्वावलंबी होऊ शकतो . चीनसारख्या खंडप्राय देशाने १९५७ अखेरपर्यंत परदेशातून कर्ज म्हणून फक्त ५२९ कोटी ४० लक्ष यूयान किंवा १०५ ९ कोटी रुपये स्वीकारले . त्यापैकी बरीच रक्कम क्रांतीनंतरच्या पुनर्वसाहतीसाठी व कोरियन युद्धासाठी खर्च होऊनही चीनने या मुदतीत आपले जड व मूलभूत उद्योगधंदे उभारून भावी प्रगतीचा पाया घातला . आज चीनला परकीय मदतीची अजिबात गरज नाही असे चीनच्या अर्थमंत्र्याने जाहीर केले आहे . याउलट भारताला मार्च १९५८ पर्यंत ८५९ कोटी रु . परकीय मदत उपलब्ध झाली . एवढ्यातूनही भारताची अर्थव्यवस्था स्वत : च्या पायावर उभी राहू शकली नाही . एवढेच नव्हे , तर ती अधिकाधिक परावलंबी झाली आहे . परकीय मदतीच्या कुबडीशिवाय ती पाऊल टाकू शकत नाही . भारताला परदेशी चलनाचा तुटवडा अजूनही कित्येक वर्षे भोगावा लागेल हे उघड आहे . “ भारताला आपल्या विकासासाठी परदेशी भांडवलावर कमीत कमी २५ वर्षे तरी फार मोठ्या रकमेसाठी अवलंबून राहावे लागले , " असे मत , अमेरिका , इंग्लंड , कॅनडा , पश्चिम जर्मनी या देशांना १९५७ सालात भेट देण्यास गेलेल्या भारतीय औद्योगिक शिष्टमंडळाने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री यांना सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे . ( पृष्ठ २७ ) हिंदुस्थानच्या १॥ पट लोकसंख्या असलेल्या चीनने मात्र केवळ १०५ ९ कोटी रुपयांचे परदेशी कर्ज घेऊन केवळ ७-८ वर्षांत फार पुढे मजल मारली आहे .

*योजनेच्या खर्चासाठी लागणारे द्रव्य*

योजनेच्या खर्चासाठी द्रव्य गोळा करताना गोरगरीब जनतेवर बेसुमार कर बसविण्याचे धोरण सरकारने सोडून दिले पाहिजे . श्रीमंत लोकांवर प्रत्यक्ष कर बसवून आणि सार्वजनिक मालकी विभागांतील उद्योगधंद्यांचा कारभार चोख ठेवून त्याद्वारे मिळणारा नफा योजनेच्या खर्चासाठी उपलब्ध करावा . स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ताबडतोब कार्यान्वित करून त्यांत होणारा नफा योजनेच्या खर्चासाठी उपलब्ध केला पाहिजे . बँका , चहाचे मळे , कोळशाच्या खाणी , त्याचप्रमाणे सोने , लोखंड , तांबे , अॅल्युमिनियम वगैरे सर्व खनिज संपत्तीचे राष्ट्रीयीकरण केले पाहिजे . नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी विभागातील उद्योगधंद्यांचे नफे नियंत्रित करणे जरूर असते . ठराविक मर्यादवरील नफा हा सरकारने कर्जाऊ म्हणून सक्तीने घ्यावा . इन्कमटॅक्स व इतर प्रत्यक्ष कर चुकविणारे अनेक व्यापारी व कारखानदार आहेत . कोणीही कर चुकवू शकणार नाही अशी व्यवस्था करावी . योग्य रीतीने प्रयत्न केल्यास देशातल्या देशात योजनेच्या खर्चासाठी फार मोठा द्रव्यनिधी उपलब्ध होऊ शकतो . तिसरी योजना आखताना सरकारने पूर्वीची चाकोरी बदलली पाहिजे . लोकशाही स्वरूपाचे नियोजन आखण्याचा सरकारने कधीच प्रयत्न केलेला नाही . त्यामुळे राष्ट्रीय अर्थव्यवस्था स्थिर व स्वतंत्र होण्याचा मार्ग पहिल्या व दुसऱ्या योजनेने चोखाळला नाही . याउलट साम्राज्यवाद्यांच्या साखळीतील भांडवलदारी अर्थव्यवस्थेचा पाया घालण्याची कामगिरी या दोन्ही योजनांनी केली आहे . आता येऊ घातलेली तिसरी पंचवार्षिक योजना जर पूर्वीच्याच चाकोरीतून जाणार असेल तर या देशात आर्थिक अरिष्ट तीव्रतर होत जाईल . कारण सध्याच्या सरकारी धोरणामुळे भांडवलदारी अर्थव्यवस्था दृढमूल होण्याचीच शक्यता आहे . तिसरी योजना ही लोकशाही नियोजनाच्या कसोटीला उतरली नाही तर तिचे अपयश ठरलेले आहे .

*आर्थिक विषमता कमी करणे*

नियोजित अर्थव्यवस्थेमध्ये केवळ उत्पादनाकडे लक्ष देऊन भागत नाही . वाढते उत्पादन समाजाच्या सर्व थरात योग्य प्रमाणावर विभागले जाईल अशी तरतूद करणे अत्यावश्यक असते . उत्पादन व विभागणी ही अविभाज्य आहे . भारतीय राज्यघटनेतील ३६ ते ५१ कलमामध्ये जे धोरणविषयक आदेश देण्यात आले आहेत त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी , राष्ट्राची संपत्ती लोकांच्या हाती साठणार नाही हे पाहिले पाहिजे . जमीनदारी नष्ट करणे , कुळांना त्यांच्या हक्काची शाश्वती देणे , डेथ ड्युटी श्रीमंतांवर बसतील असे प्रत्यक्ष कर गांची तातडीने अंमलबजावणी करणे ; त्याचप्रमाणे सार्वजनिक मालकी विभाग वाढवून प्रमुख उद्योगधंद्यांचे व बँकांचे राष्ट्रीयीकरण करणे या मार्गाने आर्थिक विषमतेला काही आळा घालता येईल . तथापि सरकारचे १९४८ व १९५६ साली जाहीर झालेले औद्योगिक धोरण हे नियोजित अर्थव्यवस्थेच्या तत्त्वांशी विसंगत आहे . सरकारने खाजगी मालकी विभागाला फार मोठे कुरण रिकामे ठेवले आहे . सरकारने आपल्या औद्योगिक धोरणाचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे . नियोजन यशस्वी करण्यासाठी लागणारीभांडवलनिर्मिती खाजगी मालकी विभागाला मोकाट सोडून व त्याच्या नफ्यावर परिणामकारक नियंत्रण न ठेवता यशस्वी होणार नाही . योजनेने जनतेच्या किमान गरजा भागविण्याची तरी हमी दिली पाहिजे . किमान २६०० कॅलरीज उष्णता देऊ शकेल एवढे अन्न शरीराच्या वाढीला आवश्यक असताना कोट्यवधी लोकांना अर्धपोटी राहावे लागत आहे . अन्नधान्याचे सध्याचे उत्पन्न दुप्पट झाले तरच लोकांना घासभर अन्न वेळेवर मिळू शकेल . कोट्यवधी लोकांना घरे नाहीत तर केवळ माणसे राहतात म्हणूनच ज्याला ' घर ' म्हटले जाते अशा गलिच्छ वस्त्यांमधून लक्षावधी लोक राहात आहेत . त्यांच्या घरबांधणीचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे . भारतीय जनतेची आरोग्याची तर एवढी हेळसांड होते , की वैद्यकीय मदत ही चैनीची बाब समजली जाते इतकी ती दुर्मिळ आहे. आज दरमाणशी १७ वार कापडाचे उत्पादन होते . युद्धपूर्वकालातही दरडोई जवळजवळ एवढा कपडा उपलब्ध होत होता असे म्हटले तरी चालेल . अर्थातच कापडाच्या उत्पादनात अजून खूप वाढ झाली पाहिजे . दरमाणशी ५० वार कापड उपलब्ध झाले पाहिजे . शिक्षणाच्या बाबतीत तर निराशाजनक अवस्था आहे . शे . ८० लोक साधी सहीसुद्धा करू शकत नाहीत ; आणि अजूनही प्राथमिक शिक्षणासाठीसुद्धा जबर फी द्यावी लागते . राज्यघटनेतील ४५ वे कलम आज केवळ अडगळीत पडले आहे . सरकारच्या आजच्या धोरणाने येत्या ५० वर्षांतसुद्धा शिक्षणाचा प्रश्न सुटणार नाही असे त्यांनी , निवारा , आरोग्य व शिक्षण या बाबींची अशी कमालीची हेळसांड केली जात आहे . योजनेसाठी घाम गाळायला जनतेला सांगताना , तिच्या किमान गरजा तरी भागविल्या जाव्यात हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे . काँग्रेस सरकारच्या दोन्ही योजना अपेशी ठरल्या आहेत ; याचे कारण काँग्रेसची भाषा जरी समाजवादी असली तरी कृती मात्र भांडवलदारांच्या घरी पाणी भरण्याची आहे . परंतु हे खरे कारण दडवून , योजनेच्या अपयशाचे खापर लोकशाहीच्या माथ्यावर मारण्याचे पाप काँग्रेस सरकार करीत आहे . ज्या राष्ट्रांत नियोजन यशस्वी झाले त्या समाजवादी राष्ट्रांत एकपक्षीय राजवट असल्याने ते शक्य झाले ; परंतु भारतात लोकशाही राजवट असल्याने नियोजित अर्थव्यवस्था त्या प्रमाणात यशस्वी झाली नाही , असा कांगावा काँग्रेस सरकार करीत आहे . हा खोडसाळपणा आहे . भांडवलदार व सरंजामदार यांच्या जोखडातून राजसत्तेची मुक्तता करून जनतेच्या हातात खरीखुरी सत्ता आल्याशिवाय नियोजित अर्थव्यवस्था यशस्वी होऊ शकत नाही . काँग्रेस सरकारच्या कृतीत नेमका या गोष्टीचा अभाव आहे . एवढेच नव्हे , तर लोकशाही व शांततावादी मार्ग या शब्दावडंबराखाली वर्गसमन्वयवादी धोरणाचा पाठपुरावा करण्यासाठी व जनतेच्या लोकशाही चळवळी चिरडून टाकण्यासाठी काँग्रेस सरकार जिवाचे रान करीत आहे . प्रचलित समाजव्यवस्थेतील भांडवलदारी चौकट जशीच्या तशी कायम ठेवून समाजवाद आणण्याची अजब किमया नेहरू सरकार करणार असल्याच्या वावड्या उडविण्यात येत आहेत . जनतेची ही क्रूर फसवणूक आहे . काँग्रेस सरकारचा समाजवादाचा मायावी बुरखा टरकावून फेकून दिला पाहिजे व त्यांचे सत्य स्वरूप उघड केले पाहिजे .

*शेतीप्रश्न व पक्षकार्य*

नागपूरला भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात या देशातील शेतीप्रश्नावर काँग्रेस पक्षाने आपली भूमिका मांडून जनतेमध्ये काही आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केलाआहे . १९५९ सालअखेर जमिनीची कमालमर्यादा अमलात आणण्याचा पुकारा काँग्रेस पक्षाने केला आहे . त्याचप्रमाणे सहकारी शेतीचे तत्त्व काँग्रेसने स्वीकारले असल्याचे जाहीर झाले आहे . परंतु या घोषणेमुळे शेतीव्यवसायातील सध्याचे अराजक नष्ट होणार नाही . कारण सरकारने १९५९ सालअखेर जमिनीची कमालमर्यादा अमलात आणण्याची दवंडी पिटली असल्याने अशी कमालमर्यादा अमलात येण्यापूर्वीच जमीनमालक आपल्याजवळ असणाऱ्या अधिक जमिनीची वासलात लावून टाकणार आहेत हे उघड आहे . सहकारी शेतीसंबंधी बोलायचे झाल्यास ती यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती पार्श्वभूमी सध्या या देशात नाही . एकतर सरंजामदारी मालकी संबंध निकालात निघालेले नाहीत . भांडवलदारी अर्थव्यवस्था अस्तित्वात असल्याने उत्पादनाच्या क्षेत्रात अराजक व बाजारात गळेकापूस्पर्धा ( Cut throat competition ) अशी अवस्था आहे . त्यामुळे सहकारी शेती यशस्वी होणार नाही . काँग्रेस सरकारने शेतीसुधारणेचे जे कायदे केले आहेत , त्यामुळे शेती उत्पादनात वाढ झालेली नाही . शेती उत्पादनवाढ न होण्यास इतरही काही बाबी कारणीभूत आहेत . त्या म्हणजे माफक दरात पाणीपुरवठा न होणे , भांडवलाची व्यवस्था न होणे , खते वसुधारलेले बियाणे आणि शेतीची अवजारे याच्या पुरवठ्याचा अभाव इत्यादी होत . तसेच शेतीमालास योग्य भाव मिळत नाही हेही एक कारण आहे . शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खालील मागण्यांवर वर्गीय भूमिकेवरून शेतकऱ्यांची चळवळ संघटित करावी .

१ ) शेतीव्यवसायातील मध्यस्थांची उचलबांगडी झाली पाहिजे .

२ ) जमिनीच्या कमालमर्यादेची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे .

३ ) शेतीसाठी स्वस्त दराने पाणीपुरवठा झाला पाहिजे आणि पाणीपुरवठ्याच्या योजना हाती घेतल्या पाहिजेत .

४ ) शेतकऱ्यांना स्वस्त कर्जाचा पुरवठा झाला पाहिजे .

५ ) शेतीसाठी सुधारलेली अवजारे व बियाणे उपलब्ध झाली पाहिजेत .

६ ) शेतीमालाच्या किमती व पक्क्या मालाच्या किमतीमधील तफावत नष्ट झाली पाहिजे.

शेतकरी कामगार पक्ष , वरील मागण्यांच्या पूर्ततेसाठी सभा , परिषदा व मोर्चे वगैरे मार्गांनी लोकमत जागृत व संघटित करून वर्गीय भूमिकेवरून शेतकऱ्यांची चळवळ संघटित करण्याची पराकाष्ठा करील .