म्हाळुंगे ता. करवीर येथे वर्धापनदिन मोठ्या उत्साहात

कोल्हापूर- म्हाळुंगे ता. करवीर येथे शेतकरी कामगार पक्षाचा 73 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित श्री. के . बी. पाटील, बाबासाहेब देवकर,सरदार पाटील,अमित कांबळे,तुकाराम खराडे, एम डी निचिते, आंनदा मोरे,म्हाळुंगे गावातील पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते होते,यावेळी पक्षाची ध्येयधोरणे,विचार,व भविष्यात करावयाची वाटचाल या विषयी चर्चा मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली,तसेच कोरोनाच्या लॉकडाऊन काळात आलेली घरगुती वीज बिल माफ करणेसाठी,दुधदर वाढीसाठी शासनाला ,त्या त्या विभागाला पत्रव्यवहार अथवा मोबाईल द्वारे एस एम एस प्रत्येक कार्यकर्त्याने करनेचे ठरवण्यात आले,प्रसंगी आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला .

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *