बदली प्रकरणी बोंबा मारो आंदोलनाने तहसील कार्यालय दणाणले : बदली न झाल्यास आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन

 

 

  1. केज,बीड (२४ऑगष्ट): येथील नायब तहसीलदार सचिन देशपांडे हे वीस ते पंचवीस वर्षांपासून केज येथील वेगवेगळ्या विभागात तर कधी नगरपंचायत मध्ये पदभार घेऊन, राजकीय व्यक्तींच्या सोयीनुसार वागतात त्याचा फायदा स्थानिक राजकारण्यांना होतो त्यामुळे हे ठाण मांडे अधिकारी यांची बदली व्हावी ,जिल्ह्यात नायब तहसीलदार मंडळधिकारी ,कारकून यांच्या बदल्या झाल्या असताना केज तहसील अंतर्गत नायब ताहसिलदारासह तलाठी ,मंडळ अधिकारी यांच्या बदल्या होणे अपेक्षित तक्रारी केल्या असताना बदल्या का होत नाहीत म्हणून दि.24 रोजी केज तहसील कार्यालयासमोर जिल्हाधिकारी यांच्या नावाने बोंबा मारो आंदोलन करण्यात आले.या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने तहसील कार्यालय परिसर दणाणून गेले.
    शेतकरी कामगार पक्ष, शिवसंग्राम,रिपाई मित्र पक्ष वंचित आघाडी रिपब्लिकन सेना यासह अनेक संघटनेनांनी या आदोलनात सहभागी होवून पाठिंबा दिला आहे.अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याची दखल घेतली नसल्यामुळे या बदली प्रकरणात बड्या राजकीय पक्षांचा हस्तक्षेप आहे की काय असा प्रश्नही आंदोलनकर्त्यांनी निर्माण केला आहे.
    या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड,शिवसंग्राम चे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब गलांडे, रिपाईचे ता प्रमुख दीपक सुरेश बापु बचुटे, बाळासाहेब ओव्हाळ, पंडित चाळक, प्रवीण खोडसे, शिवाजी वाघमारे,प्रवीण चाळक, अशोक रोडे, रजाक सय्यद, बाबासाहेब अहिरे, गोपीनाथ इनकर, गणेश तपसे, किरण पारवे, सुमीत वाघमारे कार्यकर्ते उपस्थित होते.
    दरम्यान नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आलेले नसून लवकरात लवकर बदली नाही झाली तर औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *