सातही ग्रामपंचायतींवर शेकापचा लाल बावटा फडकला

सांगोला ( ३ जुलै ) : तालुक्यातील उर्वरित सात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आज निवड प्रक्रीया पार पडली. या सर्वच्या सर्व सातही ठिकाणी भाई गणपतराव देशमुख यांचे कट्टर समर्थक असलेले, शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्तेच सरपंच म्हणुन विराजमान झाले.

आजच्या सरपंच निवडीवरून अनेक प्रकारच्या अफवांना उत आला होता. व काहींना वेगळाच चमत्कार होईल अशी अपेक्षा होती. मात्र सातच्या सात ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखल्याने विरोधकांचा मोठा भ्रमनिरास झाला.

निजामपुर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कमल नानासो कोळेकर, खिलारवाडीच्या शांताबाई शरद हिप्परकर,
हणमंतगावच्या दिपाली तात्यासाहेब खांडेकर, तरंगेवाडीच्या जयश्री शरद खताळ, आगलावेवाडीच्या शांता हरीचंद्र हाके, बुरंगेवाडीच्या राजाक्का आर्जुन बुरंगे तर भोपसेवाडीच्या सरपंचपदी सखुबाई सुनील नरळे या विराजमान झाल्या.

सर्व नवनिर्वाचित सरपंचांचे भाई गणपतराव देशमुख यांनी अभिनंदन केले असून उज्वल भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *