बॅंकेच्या दारावरच शेकापचे ठिय्या आंदोलन

अधिकार्‍याच्या तोंडाला काळे फासू : भाई ॲड.नारायण गोले पाटील यांचा इशारा

माजलगाव ( २९ जुलै) : परळी शिरसाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात कानाडोळा करत असल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बँकेच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड.नारायण गोले पाटील यांनी बोलताना, बँक प्रशासन शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्याचे पाप करीत असून हतबल झालेला शेतकरी उद्ध्वस्त होत असताना निगरगट्ट प्रशासन शेतकऱ्यांना सहकार्य करणार नसेल तर अधिकार्‍याच्या तोंडाला काळे फासू व सुतासारखे अधिकाऱ्यांना सरळ करु असा खरमरीत इशारा दिला.

यावेळी भाई सुमंत आण्णा उंबरे,भाई माउली जाधव, सिद्धेश्वर नायबळ, महेश काळे, बालासाहेब सोनटक्के, पांडुरंग खोसरे, विनायक कदम, काका कदम, नवनाथ शिंदे, वैजनाथ जाधव, विलास कुलकर्णी, सुनील घनवट, उपस्थित होते त्यावेळी माकपचे नेते कॉम्रेड भगवान बडे, कॉम्रेड मदन वाघमारे यांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी आंदोलकांसह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.

दरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड.नारायण गोले पाटील आणि आंदोलकांची आक्रमकता लक्षात घेऊन बँकेचे शाखा अधिकारी अर्धापूरे यांनी भेट घेऊन आंदोलकांशी चर्चा केली. नवीन व जुने शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी बॅंकेच्या वतीने दिली.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *