“मार्क्सवाद संपला आहे ?”

गेली अनेक दशकं हे पुनःपुन्हा ओरडून सांगितलं जातं आहे.एक साधा प्रश्न आहे, जर तो खरंच संपला असेल तर हे पुनःपुन्हा ओरडून सांगायची गरज का वाटते?कारण यामागं दडली असते एक भीती, जी प्रस्थापित वर्गाला आतून सतत पोखरत असते.या भांडवली जगात जगण्याची जणू जीवघेणी स्पर्धाच लागली आहे, प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीत इतरांना मागे टाकण्यासाठी धावतो आहे. त्यामुळे तो इतरांपासून सतत दुरावला जातो आहे. त्याला हवं असणारं आयुष्य तो जगू शकत नाही आहे आणि तो जे जगतो आहे ते त्याला नको आहे यामुळे तो स्वतः पासून देखील दुरावला जातो आहे. इतरांना दाखवताना सगळं काही आलबेल असल्याचा मुखवटा पण प्रत्यक्ष…