शेकापच्या ‘ढोल बजाओ’ आंदोलनाची बँक प्रशासनाने घेतली दखल: जिल्हाभरातील बँकांना दिले कर्ज वितरणाचे आदेश

 

शेकापच्या ‘ढोल बजाओ’ आंदोलनाची बँक प्रशासनाने घेतली दखल: जिल्हाभरातील बँकांना दिले कर्ज वितरणाचे आदेश

गडचिरोली: ऐन रोवणी हंगाम भरात असताना जिल्ह्यातील बँका पीक कर्जासाठी विविध कारणे देवून शेतकऱ्यांना नागविण्याचे काम करीत असल्याने बँकांच्या अड्डेलतट्टू कारभाराचा निषेध आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी ७ तारखेला गडचिरोली येथील सर्व बँकांच्या जिल्हा शाखांसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
शेतकरी कामगार पक्षाने दिलेल्या इशाऱ्याची जिल्हा बँक प्रशासनाने गंभीर दखल घेत जिल्ह्यातील सर्व बँकांना शेतकऱ्यांना नागविण्याचा प्रकार थांबवून तात्काळ कर्जमंजूरी व वितरण करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच यानंतरही शेतकऱ्यांचे कर्जप्रकरणी अड्डेलतट्टूपणाचे धोरण अवलंल्यास संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही बँकांना लिहिलेल्या पत्रात जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी आनंद बोरकर यांनी दिले आहेत.‌‌‍
दरम्यान जिल्हा अग्रणी बँकेने आपल्या इशाऱ्याची दखल घेवून कर्जप्रकरणी तातडीची कारवाई करीत बँकांना आदेश दिल्याने पुढिल मंगळवार पर्यंत जिल्हाभरातील शेतकऱ्यांना कर्जरक्कम मिळावी या अपेक्षेने ‘ढोल बजाओ’आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी दिली आहे. दरम्यानच्या काळात जिल्हाभरातील कोणत्याही बँकांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्जप्रकरणी टाळाटाळ केल्यास ९४०४७९२१०६ या क्रमांकावर कळविण्याचे आवाहनही भाई रामदास जराते यांनी केले आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *