शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेकापने केले शेतशिवारात आंदोलन

माजलगाव, बीड (१६ नोव्हेंबर): माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील शेतशिवारावर बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून ठेचा भाकरी खाऊन, तुमची दिवाळी आमचा शिमगा अशा घोषणा देवून शेतकरी कामगार पक्षातर्फे ठेचा भाकरी आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समीतीचे सदस्य भाई ॲड.नारायण गोले पाटील यांनी तहसील प्रशासनाला निवेदन दिले होते.मात्र तहसील प्रशासनाने तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यास व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दखल घेतल्यास नकार दिलेला होता.
मात्र शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ठाम असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यास परवानगी नाकारल्यानंतरही भाई अँड.नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन बांधावर करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, कापसाची खरेदी तात्काळ सुरू करा, नुकसानीचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर तात्काळ जमा करा या मागण्यासाठी शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यात आला. या ठेचा – भाकरी आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते संभाजी चव्हाण, कडाजी नावडकर, सुदर्शन हिवरकर, भगवान पवार, ज्ञानेश्वर काळे, विठ्ठल घोडके, गजानन गोंडे, पांडुरंग गोंडे प्रामुख्याने उपस्थित होते

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *