कोरोना काळातील वीज बील माफ करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन पुणे ( २० नोव्हेंबर) : वीज बीलावरुन राजकारण करण्यापेक्षा कोरोना काळातील वीज बील माफ करण्याची कार्यवाही करुन सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या पुणे शहर शाखेतर्फे करण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या पुणे शहर शाखेच्या वतीने शहर चिटणीस भाई सागर आल्हाट यांच्या नेतृत्वात महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महावितरण महामंडळ ची आर्थिक स्थिती ठिक नसेल पण कोवीड १९ मुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचेही कंबरडे मोडले आहे, लोकांचा रोजगार गेला आहे, सामान्य जनतेची बचत ही संपली असल्याने भयानक आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा…

शेतकरी कामगार पक्षाच्या मागणीला यश : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया नव्याने जाहीर होणार

नव्या मतदारांना मतदान आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा मुंबई (१९ नोव्हेंबर): कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या स्थितीत स्थगिती दिलेल्या आदेशाला झालेला दिर्घ काळ लक्षात घेऊन व नव्याने उमेदवारीस आणि मतदानास इच्छुकांची संधी हिरावली जावू नये यासाठी सदर निवडणूक प्रक्रिया नव्याने व जलद गतीने राबविण्यात यावी या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याच्या निवडणूक आयोगाकडे केलेल्या मागणीला यश मिळाले असून राज्य निवडणूक आयोगाने आहे त्या टप्प्यावर तात्पूरती स्थगित केलेली सदर निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची आज घोषणा केलेली आहे. भाई जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लिहिलेल्या…

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेकापने केले शेतशिवारात आंदोलन

माजलगाव, बीड (१६ नोव्हेंबर): माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील शेतशिवारावर बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून ठेचा भाकरी खाऊन, तुमची दिवाळी आमचा शिमगा अशा घोषणा देवून शेतकरी कामगार पक्षातर्फे ठेचा भाकरी आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समीतीचे सदस्य भाई ॲड.नारायण गोले पाटील यांनी तहसील प्रशासनाला निवेदन दिले होते.मात्र तहसील प्रशासनाने तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यास व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर दखल घेतल्यास नकार दिलेला होता. मात्र शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ठाम असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यास परवानगी नाकारल्यानंतरही भाई अँड.नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरचे आंदोलन बांधावर करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा,…

मागील वर्षी एफआरपी पेक्षा ऊसाला कमी दर देऊन साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना फसवले – भाई मोहन गुंड

एफ आर पी प्रमाणे ऊस बील द्या शेकापची साखर आयुक्तांकडे तक्रार बीड (७नोव्हेंबर): बीड जिल्ह्यामध्ये जवळपास डझनभर साखर कारखाने असून बीड जिल्ह्याला लागून असलेले शेजारील जिल्ह्यांमधील साखर कारखान्यांनी देखील मागील वर्षाच्या ठरवुन दिलेल्या एफ आर पी प्रमाणे शेतकऱ्यांना ऊस बिल दिले नसल्याची तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड यांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. मागील वर्षी ऊस हागामात कारखान दाराकडुन शेतकऱ्यांना एफ आर पी प्रमाणे ऊस बील देऊ इतर कारखान्याच्या तुलनेत शंभर रुपयांचा हप्ता अधिक देऊ असे खोटे आश्वासन जिल्ह्यातील कारखान्याच्या चेअरमनी मोठ मोठ्या गप्पा मारल्या पण बील मात्र देत असताना जिल्ह्यातील कुठल्याच कारखान्यांनी एफआर…

आमदार भाई बाळाराम पाटील यांच्या पाठपुराव्याला यश : अखेर विद्यार्थी, शिक्षकांना १४ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर

मुंबई (७ नोव्हेंबर) : कोरोना संक्रमणाच्या पार्श्र्वभूमीवर सलग सात महिन्यांपासून अध्ययन अध्यापन प्रक्रियेत, शालेय कामकाजात गुंतलेल्या विद्यार्थी, शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानसिक आराम मिळावा यासाठी दिवाळीची सुट्टी पुर्वीप्रमाणेच जाहीर करण्यात यावी यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळालेले असून शासनाला १४ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर करावी लागली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, एप्रिल महिन्यापासून सलग ७ महिने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी…

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आक्रमक : अन्यायकारक कृषी विधेयके रद्द करण्यासाठी केला चक्काजाम

कोल्हापूर/पुणे (६ नोव्हेंबर) : केंद्र सरकारने  बहुमताच्या जोरावर    संमत केलेले कृषी विधेेयक शेतकरी व कामगार विरोधी असून पारंपारिक कृषी अर्थव्यवस्था  उध्वस्त करणारे आहेत हे कायदे रद्द करावेत  या  मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी कोल्हापूर, पुण्यासह विविध ठिकाणी रास्ता रोको,चक्काजाम, निदर्शने करण्यात आले. कोल्हापुर-राधानगरी मार्गावर हळदी ता.करवीर येथील शिवाजी चौकात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आयोजित केलेल्या देशव्यापी    चक्काजाम आंदोलन करून सुमारे एक तास वाहतुक रोखुन धरली. यावेळी मोदी  सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य तथा माजी आमदार भाई संपत बापू पवार म्हणाले, नवीन…

विद्यार्थी, शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच १८ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर करा : आमदार भाई बाळाराम पाटील यांची मागणी

मुंबई (६ नोव्हेंबर): कोरोना संक्रमण काळ असुनही , वाहतुकीची पर्याप्त साधने उपलब्ध नसतानाही प्रत्यक्ष शाळा – कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आवश्यक शालेय कामकाज करीत असलेल्या आणि सलग ७ महिन्यापासून अध्ययन अध्यापन प्रक्रियेत , शालेय कामकाजात गुंतलेल्या विद्यार्थी , शिक्षकांना , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानसिक आराम म्हणून दिवाळीची सुट्टी जाहीर करा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार भाई बाळाराम पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात ज्ञआमदार भाई बाळाराम पाटील यांनी म्हटले आहे की, एप्रिल महिन्यापासून सलग ७ महिने…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया नव्याने राबवा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांचे निवडणूक आयोगाला पत्र मुंबई (६ नोव्हेंबर): कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या स्थितीत स्थगिती दिलेल्या आदेशाला झालेला दिर्घ काळ लक्षात घेऊन व नव्याने उमेदवारीस इच्छुकांची संधी हिरावली जावू नये यासाठी सदर निवडणूक प्रक्रिया नव्याने व जलद गतीने राबविण्यात यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी राज्याच्या निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाई जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,महानगर पालिका, नवी मुंबई, औरंगाबाद व वसई विरार , ९ नगर परिषद – नगर पंचायती व पोटनिवडणुका, जिल्हा परिषदा व…

रंगभूमीतील बॅकस्टेज कामगारांना ५० हजारांची मदत करा : अमित देशमुख यांचेकडे शेतकरी कामगार पक्षाची मागणी

शेकापच्या शिष्टमंडळाने केली चर्चा : मंत्र्यांनी दिले मदत करण्याचे आश्वासन मुंबई (२ नोव्हेंबर) : कोविड -१९ च्या लॉकडाऊन मुळे मुंबई सह राज्यातील सर्व नाट्यगृहे बंद असून नाटकांच्या सादरीकरणावरही बंदी आहे . परिणामी रंगभूमीवरील बॅकस्टेज कामगाराचा रोजगार बुडाला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने रंगभूमीतील बॅकस्टेज कामगारांना शासनाने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षातर्फे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमीत देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षातर्फे पक्षाचे कार्यालयीन चिटणीस भाई ॲड.राजेंद्र कोरडे, राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई शैलेंद्र मेहता,भाई रामदास जराते,रायगड शेकापच्या महिला नेत्या चित्रलेखा पाटील, ठाणे शहर चिटणीस भाई अनिल…