कोरोना काळातील वीज बील माफ करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन

पुणे ( २० नोव्हेंबर) : वीज बीलावरुन राजकारण करण्यापेक्षा कोरोना काळातील वीज बील माफ करण्याची कार्यवाही करुन सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या पुणे शहर शाखेतर्फे करण्यात आली आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या पुणे शहर शाखेच्या वतीने शहर चिटणीस भाई सागर आल्हाट यांच्या नेतृत्वात महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महावितरण महामंडळ ची आर्थिक स्थिती ठिक नसेल पण कोवीड १९ मुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचेही कंबरडे मोडले आहे, लोकांचा रोजगार गेला आहे, सामान्य जनतेची बचत ही संपली असल्याने भयानक आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा महावितरण आणि राज्य सरकारने विचार करण्याची गरज आहे. मात्र महावितरण महामंडळाने व राज्य सरकारने वीज बिलावरून राजकारण करण्यापेक्षा सर्व सामान्य जनतेला सवलत आणि कोवीड काळातील विज बिलात सुट कशी देता येईल यांचा संवेदनशीलपणे विचार करावा अशीही मागणी शेतकरी कामगार पक्षातर्फे करण्यात आली.

सदर निवेदन देतांना शेतकरी कामगार पक्षाच्या पुणे शहर शाखेचे कार्यकर्ते सचिन कडाळे,सागर पवार, सिद्धार्थ कार्लेकर, कार्तिक सामर्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *