शेतकर्‍यांनो महावितरणची वीजबिले भरू नका : शेतकरी कामगार पक्षाचे आवाहन

गडचिरोली (१८ फेब्रुवारी): राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारने वीजबिल वसूलीची सुरू केलेली मोहीम पुर्णतः चुकीची आणि बेकायदेशीर असून राज्यातील शेतकऱ्यांनी महावितरणने पाठविलेल्या अव्वाच्या सव्वा वीजबिलांची रक्कम भरु नये, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षातर्फे करण्यात आले आहे. शेतकरी कामगार पक्षातर्फे दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, सन २००८ पासून राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या वीजबिलापोटी २/३ रक्कम अनुदान स्वरूपात द्यायचे मान्य केले होते आणि त्यानुसार शासनाने ती अनुदानाची रक्कम महावितरणकडे जमा सुद्धा केली. सदर अनुदान रक्कम ही २/३ म्हणजे चोवीस तास वीज वापर गृहीत धरून त्यापैकी सोळा तासांचा हिशेब लावून दिली गेली आहे. याशिवाय शेतकर्‍यांनी उर्वरित १/३ म्हणजे आठ तासांच्या…