भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा – भाई चंद्रशेखर नलावडे – पाटील

१९४७ रोजी भारतात एकुण ५०००० डाॅक्टर्स आणि २५००० नर्सेस होत्या. आरोग्य क्षेत्रासंदर्भात आजवर तीन प्रमुख आयोग नेमले गेले, भोर आयोग (१९४६), मुदलियार आयोग (१९६१), बजाज आयोग (१९८७). विषयांतर आणि विस्तारभयास्तव आपण इथे ब्रिटिशपुर्व काळातील अस्तित्वात असणारी तत्कालीन राज्यपुरस्कृत पारंपारीक सार्वजनिक परंतु सामाजिकदृष्ट्या पक्षपाती उपचार व्यवस्था विश्लेषणासाठी घेत नाही. वसाहतकाळात रूग्णालये व दवाखाने हे प्रामुख्याने शासनाच्या मालकीचे होते व खाजगी क्षेत्राला यात फारच अल्प भुमिका होती. १८८१ च्या गणणेनुसार तेव्हा १०८७५१ लोक वैद्यकीय सेवा देत होते, पैकी १२६२० हे वर्गीकृत शिक्षीत वैद्यकीय व शल्यचिकित्सक होते आणि ६०६७८ हे शैक्षणीक अर्हता नसलेले पारंपारीक वैद्य/हकिम होते. याव्यतिरिक्त ५८२ प्रशिक्षीत…