लोह खाणी तातडीने रद्द करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा दिला इशारा गडचिरोली : गडचिरोली जिल्हा हा भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूची अंतर्गत समाविष्ठ असलेला क्षेत्र असून या क्षेत्रात लागू असलेला पेसा कायद्याच्या तरतूदीचा भंग करुन बेकायदेशिरपणे प्रस्तावित व मंजूर केलेल्या लोह खाणी तातडीने रद्द करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करु. असा इशारा शेतकरी कामगार पक्षाने दिला आहे. भारतीय खाण ब्युरोच्या महानियंत्रकांना पाठविलेल्या तक्रारीत शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यातील खाणींच्या विरोधात स्थानिक वैधानिक ग्रामसभांनी आणि आदिवासी जनतेने प्रखर आंदोलने, मोर्चे , निवेदने, ठराव केलेले असून वेळोवेळी शासनाला सादर…